शाळेची निवड

Submitted by माधव on 6 July, 2011 - 06:05

आज आपल्या भोवती अनुदानीत / विनाअनुदानीत, मराठी / इंग्रजी माध्यम, SSC / ICSC / CBSC असे वेगवेगळे बोर्ड अशा अनेक पर्याय असलेल्या शाळा उपलब्ध आहेत. आपल्या पाल्याला नक्की कुठल्या शाळेत घालावे याचा गोंधळ उडतो. या विविध पर्यांयांचे फायदे / तोटे आणि त्याच्या अनुषंगाने इतर बाबींची चर्चा करण्यासाठी हा बाफ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

माधव, भ्रमराला अनुमोदन. इथं माध्यम आणि अनुदान / विनाअनुदान असे दोनच मुद्दे असले तर सोयीचे होईल असे वाटते. बोर्डाच्या निवडीबाबत स्वतंत्र चर्चा झाली आहे असे मला आठवते.

मंजू... भ्रमाचा मुद्दा spoken englishचा आहे.

मुद्दा हा आहे की globalization आणि ईंग्रजी माध्यमातून शिक्षण यांचा संबंध खरोखर आहे कां???? >>> खरच नाही... पण इंग्रजी माध्यमातून मुल शिकलं म्हंजे त्याला घोडे बाजारात चांगला भाव मिळणार ही मानसिकता चूक आहे.

घरा जवळ असलेली शाळा. म्हणने सोप्पे करणे कठिण Sad

रैना सारखं मला पण वाटतं.

माध्यमाच्या बाबतीत सांगायच तर मराठी शाळाच नाहीत जवळपास Sad

मला वाटत जवळपास असेल तर सेमी इंन्ग्लिश किंवा सेमी मराठि शाळा सगळ्यात चांगला ऑपशन असेल.

भ्रमर, बरीच काँबीनेशन्स होताहेत पण सर्व चर्चा एकाच ठिकाणी रहावी म्हणून तो पर्याय पण दिला आहे. त्या विषयीची चर्चा गजानन म्हणतोय तशी नव्या हितगुजवर तरी नाही सापडली मला. असल्यास सांगा तो पर्याय काढून टाकतो.

इंद्रधनुष्यला अनुमोदन.

निव्वळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं असा हट्ट करायचा? त्यासाठी किती पैसा खर्च करण्याची हिम्मत दाखवायची? हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणजे तो विद्यार्थी विद्वान,हुशार किंवा तोच ग्लोबलायझेशनच्या दुनियेत टिकून राहील हे सगळे समज चुकीचेच आहेत.

यावर माझेही काही मुद्दे.

१. कुठेतरी विद्यार्थ्याची मानसिकता, त्याची अभ्यासाची क्षमता किंवा त्याच्या शिक्षणाला पुरक असं वातावरण हे सगळं पडताळून पहायला हवं.
उदा. वडील सरपंच किंवा ग्रामसेवक आहेत आणि आपली पत किंवा उगाच इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा बोलबाला आहे म्हणून आपल्या मुलाला इंग्रजी शाळा का नको? आम्हाली बी पायजे. असं चित्र दिसतं. हे प्रामुख्याने बदलायला हवं.

२. मराठी माध्यमातल्या बहुतांश शाळा अजूनही दर्जेदार आणि उत्तम शिक्षणप्रणालीने सज्ज आहेत. अश्या शाळांचं महत्व लोकांपर्यंत पोहचवलं गेलं पाहिजे. हे कठीण असलं तरीही उत्तम कौसिंलिंग कौशल्याने हे टिकवून ठेवू शकतो. ग्लोबलायझेशन मधे मराठीला ही, सेमी इंग्लिश माध्यमाची साथ देऊन ग्लोबल करण्याकडे कल असला पाहिजे.

३. पहिलीपासून ते बारावी पर्यंतच शिक्षण हे ग्रेड पद्धतीने असायला हवं. बहुतेक बर्‍याच इंटरनॅशनल स्कुल्समधे हे सुरु झालंय. ग्रेड पद्धतीच्या शिक्षणामधे विद्यार्थ्याला कोणत्या तरी एका विषयाचा बाऊ किंवा बर्डन राहत नाही. हिच पद्धत मराठी माध्यमातही आजमावता येऊ शकते.

४. ग्लोबलायझेशनच्या दृष्टीने कुठल्याही अभ्यासक्रमाचे किमान पाच वर्षा पर्यंतचे योग्य प्लॅनिंग करून त्या प्रमाणे योग्य ते बदल आमलात आणले तर हे सगळं बदलू शकतं. मग माध्यमाचा प्रश्न उरणारंच नाही.

५. किमान तांत्रिक,वैज्ञानिक हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले आणि इतर सगळे विषय मराठी माध्यमातून शिकवले तर हे बदलू शकतं.

६. अर्थात हे सगळं कठीण आहे पण ह्यासाठी पालकांचा सहभाग आणि त्यांची तीव्र इच्छा असेल तर आपणच आपल्या पाल्याला आपल्याला हव्या असलेल्या शाळेत शिकवू शकतो.

७. १६ व्या वर्षानंतर ग्लोबलायझेशन नुसार व्यवसायभिमूक अभ्यासक्रमाची सक्ती / ऐच्छिक विषयाचे शिक्षण दिल्यास त्याचा आणखी फरक पडू शकेल.

८. अवास्तव फी किंवा एकूण शिक्षण खर्च हा मुद्दा आणि त्यासाठी करावी लागणारी कसरत हा ज्या त्या पालकांचा प्रश्न आहे. पण त्यासाठीही काही विशेष योजना आहेतच ना? शिक्षण पॉलिसीज वगेरे?

वरील सर्व मुद्दे हे माझ्या स्वतःच्या शिक्षणातल्या अडचणी, इंग्रजीची बोंब अश्या स्वानुभवातून मांडल्या आहेत. Happy

माध्यम हे कुठलही असोत शिक्षणाचा, शिकवण्याचा आणि शिक्षण संस्थेचा एक विशिष्ट दर्जा असेल तर त्या शाळेतलं पाल्य नेहमीच सरस ठरू शकेल.

ह्या सगळ्या बाबींवर चर्चा करताना महत्वाचा मुद्दा राहतो तो पालकांचे शिक्षण. तो मुद्दा फार महत्वाचा. शाळेतला अभ्यास हा घरी येतो तेव्हा घरचे शिक्षकही (पालक) त्या पाल्याचा अभ्यास घेण्याच Suffificiant असले पाहिजेत. असे मला वाटते. जास्त करून इंग्रजी माध्यमातल्या पाल्यांसाठी/पालकांसाठी.

मराठी माध्यमाबद्दल वरच्या काही पोस्ट्स वाचल्यावर खुप वाईट वाटले. मराठी भाषा बोलणारे नी तिच्यावर प्रेम करणारे लोक आपली मुले ग्लोबलायझेशन मध्ये मागे पडु नये म्हणुन इंग्रजीत घालतात हे वाचुनही वाईट वाटले कारण आपण सगळेजण मराठीवर प्रेम करणारे लोक आहोत.

आपण मराठीत शिकुन जर मागे पडलो नाहीत तर आपली मुले कशीकाय मागे पडतील? ११ नंतर पुर्णपणे इंग्रजीत शिकण्याचा पर्याय आहे ना आपल्याला? मग १० वी पर्यंत तरी मुलांना शिकुद्या की त्यांना जी भाषा जवळची आहे त्या भाषेत. ज्यांच्या पालकांपैकी एकजण अमराठी आहे त्यानीही हा पर्याय निवडावा म्हणजे दोघांनाही एकत्र भाषेची ओळख होईल Happy

ग्लोबलायझेशन्साठी इंग्रजी बोलण्याचा सराव पाहिजे, तो आपण मुलांकडुन हळूहळू करुन घेऊ शकतो, त्यासाठी नर्सरीपासुनच इंग्रजीत शिकायची आवश्यकता नाहीय.

मराठी शाळांची अवस्था सध्या बिकट आहे याचे एक महत्वाचे कारण त्यांना आता गि-हाईकेच उरली नाहीत हेही आहे. माझ्या आजुबाजुच्या सगळ्या मराठी शाळा एकेक करुन बंद पडताहेत. उद्या माझ्या नातीला मराठी शाळेत शिकायची संधी मिळणार नाही याची मला खात्री आहे Sad

माझ्या मुलीला मराठीत शिकवू शकले हे तिचे नी माझे नशीब... माझी मुलगी मराठीत शिकुनही इंग्रजीत तितकीच व्यवस्थित संभाषण करु शकते, हल्लीची सगळी फेमस इंग्रजी गाणी तिला मुखोत्गत आहेत नी दिवसभर गात बसुन ती मला वातही आणत असते. ग्लोबलायजेशनमध्ये ती मागे पडलीच तर त्याची कारणे इतर काहीतरी असतील, भाषेमुळे नक्कीच मागे पडणार नाही.

इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणजे तो विद्यार्थी विद्वान,हुशार किंवा तोच ग्लोबलायझेशनच्या दुनियेत टिकून राहील हे सगळे समज चुकीचेच आहेत.

१००% सत्य. माझ्या मुलीकडुन तर ताटभरुन मोदक Happy

मराठी माध्यमाची कुठची शाळा याने फरक पडतो.. नि त्यातल्या त्यात संस्था आणि मुख्याद्यापक यांच्यातील दूरदृष्टी आणि क्षमतेने फरक पडतो.

गोरेगावची सन्मित्र, अ.भि. आणि ठाण्याची सरस्वती मराठी ह्या उदाहरण ठराव्यात. मी स्वतः नंदादीपची विद्यार्थिनी आहे पण सध्याच्या परिस्थितीबाबत खुश नाहीये. कदाचित माझ्या अपेक्षा आणि आतल्या गोटातल्या जास्त माहित्या असल्याने असेल.

माझ्या लेकीला इंग्रजी मिडिअमशिवाय पर्याय नाही असे सध्या तरी वाटते करण -
१. घरापासून २ कि.मी.त सरस्वती मराठी शाळा नाही.
२. आम्ही दो घडीचे प्रवासी .. कुठे कधी असू ह्याचा भरवसा नाही.

आम्ही सध्या स्टेशनला शिफ्ट करायचे आणि लेक पाचवीत जाईपर्यन्त पुण्या-मुम्बैतच रहायचे की कसे ह्यावर खल करत आहोत.

ज्यांना आपली नोकरी पुढच्या वर्षी पुण्यात असेल की बंगलोर/हैदराबाद्ला की अमेरिका/इंग्लंडला हे आधी ठरवता येत नाही त्यांना इंग्रजी माध्यम घ्यावे लागणे साहजिक आहे. त्यात भारतात इतरत्र राहावे लागणार असेल तर सीबीएसई लागेल, परदेशात (निदान अमेरिकेत) काही फरक पडत नाही. जपान, फ्रान्स वगैरे न-इंग्रजी ठिकाणी कसे बरे पडते त्याची कल्पना नाही, तेथील अनुभव असलेले सांगू शकतील.

पण एकूण इंग्रजी माध्यमात शिकलेली मुले नेहमीच्या व्यवहारात आमच्यापेक्षा जास्त स्मार्ट असतात असा आमचा तेव्हा समज होता. कदाचित ती मुळातच स्मार्ट असतील आमच्यापेक्षा Happy

खरे म्हणजे रोजच्या वापरातील इंग्रजी चांगले बोलता येणे, त्यासाठी योग्य इंग्रजी शब्द माहीत असणे, वेगवेगळ्या राज्यातील, देशांतील लोकांबरोबर वागताना योग्य मॅनरिजम्स, एटिकेट्स माहीत असणे, भारताच्या इतिहासाबरोबरच ग्रीक, लॅटिन ई. इतिहास, त्यातील व्यक्ती आणि इंग्रजीत वापरल्या जाणार्‍या त्यातील उपमा (e.g. Achilles heel, David v Goliath वगैरे गोष्टी एखादा इंग्रजी लेख वाचत असताना अचानक खड्यासारख्या लागतात आणि माहीत नसतील तर ती उपमा का वापरली हे कळायला वेळ लागतो, किंवा संदर्भावरून अंदाज लावावा लागतो) हे शिक्षण संपल्यावर महत्त्वाचे. पण ते मराठी माध्यमात शिकूनही येउ शकेल असे काही करता येणार नाही का? आत्मविश्वासाने फाड फाड इंग्रजी बोलणारे कित्येक जण अत्यंत चुकीचे इंग्रजी बोलतात्/लिहीतात. याउलट लेखी इंग्रजी ग्रामर वगैरे अचूक माहीत असणारे कित्येक लोक एखाद्या प्रसंगात लागणारा शब्द पटकन न सुचल्याने बोलू शकत नाहीत किंवा बोललेच तर पुस्तकी इंग्रजी बोलतात.
Indian uptight guy at the grocery counter: "I want currency in the denomination of twenty-five cents"
Grocery counter girl: "you want quarters"? Happy

म्हणजे साधारण (शास्त्र, गणित यासाठी) इंग्रजी माध्यम पण इंग्रजी ऐवजी मराठी मुख्य लेखी भाषा असे काहीतरी, पण शाळेची वर्षे पूर्ण केल्यावर जगात वावरायला "तयार" करणारे स्कूल असे काहीतरी झाले तर कोणत्या माध्यमात शिकलो याने फार फरक पडणार नाही. फक्त इतिहास, भूगोल वगैरे मराठीतून शिकलो नाही तर आपल्याच भाषेतील शब्द आपल्यालाच माहीत नसतील. तो जरा अवघड मुद्दा आहे.

आमची सुरूवात पूर्ण मराठीतून, मग शास्त्र/गणित इंग्रजीत, मग पुढे अ-मराठी लोकांत वावर वाढल्यावर इंग्रजी बोलण्यात थोडी सफाई येणे, मग परदेशात गेल्यावर इतर संस्कृतींची माहिती होणे अशा क्रमाने गाडी पुढे गेली. आपल्या पुढच्या पिढीला तेच करायला लावण्यापेक्षा काही कौशल्ये आपोआप शाळेतूनच मिळतील असे बघणे जास्त बरे असे बर्‍याच जणांना वाटत असेल.

आपल्या अपत्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातले तरच आपले मराठी भाषेवरचे प्रेम सिद्ध होते का?
इथे प्रत्येकजण आपापल्या निर्णयाचे समर्थन करत राहणार. कोणाचे समज/ निर्णय कसे चुकीचे आहेत यावर टिप्पणी करण्यापेक्षा आपण आपल्या पाल्याला कुठल्या माध्यमातून शिकवण्याचा निर्णय का घेतला हे एवढेच लिहिले तर ते इच्छुकांना मार्गदर्शक ठरेल.

साधना चांगली पोस्ट. फक्त एक <<ज्यांच्या पालकांपैकी एकजण अमराठी आहे त्यानीही हा पर्याय निवडावा म्हणजे दोघांनाही एकत्र भाषेची ओळख होईल >> हे फारच कठिण आहे. असे केल्याने पालकापैकी एकाचा मुलाच्या अभ्यासात काहिही सहभाग रहाणार नाही. ती केवळ एकाच पालकाची (जो मराठी आहे) त्याची जबाबदारी राहिल. ज्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणामधे रस आहे आणि एकत्र बसुन शिकवायला आवडते अशा लोकांना हे जमणार नाही.

<<इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणजे तो विद्यार्थी विद्वान,हुशार किंवा तोच ग्लोबलायझेशनच्या दुनियेत टिकून राहील हे सगळे समज चुकीचेच आहेत.>> अनुमोदन
नादखुळा, तुम्ही लिहिलेल्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण त्या सगळ्याच प्रत्यक्षात येणे इतक्यात तरी शक्य वाटत नाही
शाळांच्या खालावलेल्या दर्जाबद्दल सुद्धा अनुमोदन.

मला माझ्या मुलीला इंग्रजी माध्यमात घालावे लागणार याचे खरच प्रचंड वाईट वाटतय...

<<ज्यांना आपली नोकरी पुढच्या वर्षी पुण्यात असेल की बंगलोर/हैदराबाद्ला की अमेरिका/इंग्लंडला हे आधी ठरवता येत नाही त्यांना इंग्रजी माध्यम घ्यावे लागणे साहजिक आहे. >> हे मान्य.

केवळ इंग्रजी बोलता येणे म्हणजे स्मार्ट / हुषार असा काहीसा समज साधारणपणे आपल्या इथे आहे, जो खरच चुकीचा आहे. इंग्रजी बोलता येणे हे हुषारीचे लक्षण असते तर इंग्रजी मुख्य भाषा असलेल्या देशातला भिकारी सुद्धा स्मार्ट म्हणावा लागेल. सगळं पुर्व प्राथमिक, प्राथमिक, सेकंडरी शिक्षण मराठीत किंवा इतर भाषात झालेले लोक शिकल्यावर सहज सफाईदारपणे इंग्रजी बोलू शकतात. इंग्रजी किंवा कुठलीही भाषा सफाईदार पणे बोली भाषेसारखीच बोलता येण्यासाठी फक्त संवादाचा सराव हवा.

वर क्वार्टरचे दिलेले उदाहरण म्हणजे बोली भाषा आणि प्रमाण भाषेतला फरक आहे. हा फरक कुठेही गेलात तरी असणार आहे. बोली भाषा शिकण्यासाठी पुस्तके आणि शाळा नाही तर संभाषण हवे.

लहानपणीच कुठलाही भारतीय संदर्भ नसलेला गोलियाथ वगैरे शिकवुन, जॉनी किंव जॅकची कविता शिकुन खरतर नक्की काय साध्य होणार? बर आज गोलियाथ शिकलात आणि पुढे कुठल्यातरी तिसर्‍याच देशात गेलात तरी तिथला इतिहास तिथले संदर्भ वेगळे असणार ते शिकावेच लागणार ना? म्हणजे शालेय शिक्षणात सगळ्याच गोष्टी कशा सामावता येतील? मी तर म्हणेन की इंग्रजीचा सिलॅबस जास्तीत जास्त भारतीये कसा होईल ते बघितले पाहीजे. बहुतेक इतर सगळ्याच देशात शालेय शिक्षण मुलांना त्यांच्या मातृभाषेतुन देतात. स्वतच्या भाषेत शिकलेल्या गोष्टींनी आकलन सहज आणि सोप्पे होते असे मानणे आहे.

शालेय शिक्षणाचा उपयोग सगळ्या गोष्टी शिकवणे हा नसुन शिकायचे कसे हे शिकवणे आहे असे मी मानते. सगळ्या मुख्य विषयांची थोडक्यात ओळख करुन स्वतःची आवड ठरवता येणे हे शालेय शिक्षणाचे मुख्य लक्ष्य हवे.
खरतर दहावी पर्यंत मातृभाषेत शिक्षण देऊन मग उच्च शिक्षण इंग्रजी मधे असल्याने अकरावीचे वर्ष हे इंग्रजी सुधारणे आणि निवडलेल्या विषयातले इंग्रजी शब्द जाणुन घेणे यात घालवायला हवे.
(पण हे नुसते माझे मत असुन काय उपयोग!?)

आपल्या अपत्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातले तरच आपले मराठी भाषेवरचे प्रेम सिद्ध होते का?
>>> अर्थातच नाही. Happy

आपण आपल्या पाल्याला कुठल्या माध्यमातून शिकवण्याचा निर्णय का घेतला हे एवढेच लिहिले तर ते इच्छुकांना मार्गदर्शक ठरेल. <<< अनुमोदन!

पण त्या निर्णयावर इतरांचीही मतं (म्हणजे हा निर्णय एकदम चूकच किंवा बरोबरच या भाषेत नाही) आली तर ज्यांनी तो आधीच निर्णय घेतला आहे त्यांना आणि जे निर्णय घेऊ इच्छिताहेत त्यांना आपल्या पाल्याच्या बाबतीत आणखी कोणत्या गोष्टींकडे विषेश लक्ष देणे आवश्यक आहे, हे लक्षात येईल.

आरंभीचे शिक्षण मातृभाषेतून घेतल्याने संकल्पना लवकर कळतात असे शिक्षणतज्ञ म्हणतात ना?
मराठीतून शिकल्याने आपल्याला इंग्रजी येत नाही /झेपत नाही असा एक उगाच न्यूनगंड महाविद्यालयात जाताना असतो. अकरावीची पहिली टर्म जरा जड जाईल.
इंग्रजीतून विचार करायची सवय लागली (ती लावायला मात्र हवी) की मग काही अडत नाही.
माझ्या ऐकण्यात आलेल्या अनुभवांवरून : विनाअनुदानित सीबीएसई इ. बोर्डांच्या शाळा पांढर्‍या हत्तीसारख्या वाटतात. बी कॉम झालेली व्यक्ती तिथे इंग्रजी, विज्ञान शिक्षक म्हणून येऊ शकते.
बाकीच्या शाळांत विद्यार्थ्यांना ताट वाढून मिळत असेल, इथे बफे सिस्टम. हिंदी सारख्या विषयांत प्रशिक्षित शिक्षक नसल्याने कधी एखादा संपूर्ण पाठ स्वाध्याय म्हणून दिला जातो.
शाळा इंग्रजी माध्यमाची पण वर्गशिक्षिकेला ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्रजी बोलता येत नाही. (मराठी शाळांत इंग्रजी व्याकरणाचा बागुलबोवा करून ते घोटून घेतलं जातं.)
अशा शाळा म्हणजे सिस्टमॅटिक एक्स्पेन्स प्लान्स : गृहपाठ नेटवरून उतरून घ्या (म्हणजे घरी पीसी, नेट , प्रिंटर हवा), पण करा मात्र लेखी, परीक्षेला स्वतःच्या उत्तरपत्रिका घेऊन या, दर पंधरा दिवसांत एखादा प्रोजेक्ट असतोच त्याच्यासाठी साहित्य घेऊन या. दिवाळीसाठी प्रोजेक्ट काय तर मिठायांनी भरलेला बॉक्स सजवून शाळेत आणा (आणि जमा करा).
यावरून जनरलायझेशन करू नये हे खरं ,पण ऐकायला मिळालेल्या अनुभवांत चांगले अनुभव नव्हते. कदाचित ते टेकन फॉर ग्रँटेड म्हणून बोलले जात नसतील.

फारएण्डसारखाच माझाही अनुभव आहे. दहावीपर्यंत पूर्ण मराठी माध्यम होते. बोलीभाषा अर्थातच मराठी. ११/१२वीत माध्यम बदलल्यावर काही जड नाही गेले. पण इथे एक गल्लत झाली. नामांकीत कॉलेज असले तरी दुसरी भाषा मराठी घेतल्याने वर्गात सगळीच मराठी कुटुंबातलीच मुले होती - काही मराठी माध्यमातली तर काही इंग्रजी माध्यमातली. पण सगळेच मराठी असल्याने बोलीभाषा मराठीच राहिली. त्यामुळे मराठी माध्यमात राहून spoken english चा सराव केला तर खूप फायदा होईल.

सावली, बाकी मतांशी सहमत आहेच, फक्त एक दोन खुलासे: मी गोलियाथ वगैरे लहानपणी शिकवा म्हणत नाही - शालेय शिक्षण संपून नोकरी, धंदा वगैरे सुरू करताना. आणि शिकवायचे नाहीच, त्या गोष्टी माहीत होतील असे काहीतरी. तू म्हणतेस तसे संभाषणही. आणि दुसरे म्हणजे इंग्रजी येणे म्हणजे स्मार्ट असे मी कोठेच म्हंटलेले नाही. स्मार्टपणाची व्याख्या नीट करता येणार नाही आत्ता, पण काय गोष्टी माहीत असाव्यात ते मी वर दिलेलेच आहे.

आपण आपल्या पाल्याला कुठल्या माध्यमातून शिकवण्याचा निर्णय का घेतला >>>>

माझा कल आधीपासून मराठी माध्यमाकडेच (किंवा मातृभाषेतून शिक्षण घेण्याकडेच) होता. आपण लहानपणापासून ज्या भाषेत विचार करतो, एखाद्या गोष्टीची चिकीत्सा करतो, आपली विचारप्रणाली ज्या भाषेतून घडलेली असते त्या भाषेच्या माध्यमातून घेतलेले शिक्षण हे मुलांच्या लवकर पचनी पडते असं तज्ञांच मत आहे. (कृपय याच्या लिंक्स वगैरे मागू नका). माझंही तेच मत होतं. (अजुनही आहे) परंतु माझी बायको ईंग्रजी माध्यमातून शिकलेली आहे. 'मुलीचा अभ्यास घ्यायचा तर मला प्रॉब्लेम होईल' हे तिचं म्हणणं होतं. आणि अगदी पहिलीपासून ट्यूशन वगैरे लावायच्या मी विरुद्ध आहे. त्यामुळे मनात असुनही मी मुलीला ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले.

मी मुलीला मराठी माध्यमातच घालायला हवं होतं. हे मला केव्हा जाणवलं, तर मी तिला विंदाची एक परीराणीची कविता ऐकवली साधारण दहा ओळींची, प्रत्येक ओळीत चार शब्द. तिने एकाच दमात ती पाठ करुन म्हणुन दाखवली. पण शाळेत शिकवलेल्या कविता ४-५ वेळा म्हणुन पाठ कराव्या लागतात. शेवटी 'फॉरीन बॉडी' आपलें शरीर स्विकारु शकत नाही तसं भाषेच्या बाबतीतही होत असावं

अमोल, तुझे मुद्दे लक्षात आले.
इथे मला इन्द्राचा मुद्दा अतिशय पटतो - माध्यमापेक्षा शाळा कशी आहे हे आधी बघावे.

साधना, तुझी कळकळ समजतेय, पण अश्विनी आता दहावी पास झाली आहे. म्हणजे तिला शाळेत घातले तेव्हा आणि आता यामध्ये दहा वर्षांचा कालखंड आहे ज्यात खूप काही बदलले आहे.

इथे कोणत्याही एका माध्यमाला कमी लेखण्याच्या अथवा दुसर्‍याचा उदोउदो करण्याच्या हेतूने कोणी लिहिते आहे असे मला वाटत नाही. तर सध्याची स्थिती काय आहे आणि त्यात काय करणे व्यवहार्य ठरेल याबाबत मते येताहेत/यावेत असे वाटते.

वाचते आहे.
मराठी माध्यमाबाबत मला माहित नाही पण मुलांना 'मराठी' लिहीता, वाचता, बोलता यावे हे मात्र अनिवार्य असावे असे वाटते.
कदाचित काही वर्षांने तेही वाटणार नाही.

माहित नाही रे.
मायबोलीवर लिहीणार्‍या किती जणांच्या मुलांना मुळातच मराठी भाषा येते?
आधीच पालकांना खूप उठाठेव करावी लागते शिक्षणाबाबतीत. मग उठुन मुलांना मराठी यावे यासाठी किती जणं आटापिटा करतील? आणि जी भाषा व्यवहारात वापरली जात नाही, ती मुलांनी शिकावी यासाठी मुलं किती सहकार्य करतील? कुठ्ल्यातरी क्षणी या रस्सीखेचीचा कंटाळा येणार आणि परदेशातील बहुसंख्य पालक आपल्या दोरीचे टोक सोडुन देणार.
मायदेशात ही भाषा दहावीपर्यंत असणार. मुळात वाचनाची आवड विकसीत नाही झाली तर तो विषय फक्त एक कटकट म्हणून राहतो. जसे हिंदी. (आपल्याला सर्वांना हिंदी भाषा दहावीपर्यंत होती. ही भाषा आपण किती निष्ठेने वापरतो, या भाषेतील साहित्य किती जण वाचतात? मला चांगला धक्का बसला होता, की हिंदी भाषा किती मधुर आहे ते पाहुन. शाळेत कधी कळलेच नाही. )
अकरावीनंतर कुठलेही शैक्षणिक व्यवहार/ पुस्तके मराठीत नाहीत.
उदाहर्णार्थ जपानमध्ये डिग्रीचे शिक्षणही जपानीच भाषेत असते. ६ वर्षे शाळांमध्ये इंग्रजी शिकतात एक विषय म्हणून, पण तेच, एक विषय एवढीच त्याची व्याप्ती राहिल्याने इंग्रजी पुन्हा कधीतरी नीट शिकावे लागते.
दुसरे- आपल्यात आणि मुलांमध्ये अमुक एक गोष्ट शिकावी यात फक्त प्राणांतिक अट्टाहास आणि इगो असला, तर मग ती सोडुन द्यावी लागते. आपण काही 'मी सांगतो ती पूर्व' वाले पालक नाही. मग जर पाल्याला नसेल आवडत तर सोडुन द्यावे कुठल्यातरी एका अफाट मॅच्युरिटीच्या क्षणी. कुठल्या गोष्टी सोडाव्यात आणि कुठल्या नाही ते असे नाही सांगता येत.

मायदेशात ही भाषा दहावीपर्यंत असणार. >> फक्त महाराष्ट्रात ग Happy माझ्या मुलीला पहिलीपासून गुजराती शिकावं लागलं. मावशीभाषा असं ती म्हणते. सुदैवाने ती लहानपणी दर सुट्टीत आजीकडे जात असल्याने तिला मराठी वाचता-लिहिता येते. काय करणार.. Sad

Pages