शाळेची निवड

Submitted by माधव on 6 July, 2011 - 06:05

आज आपल्या भोवती अनुदानीत / विनाअनुदानीत, मराठी / इंग्रजी माध्यम, SSC / ICSC / CBSC असे वेगवेगळे बोर्ड अशा अनेक पर्याय असलेल्या शाळा उपलब्ध आहेत. आपल्या पाल्याला नक्की कुठल्या शाळेत घालावे याचा गोंधळ उडतो. या विविध पर्यांयांचे फायदे / तोटे आणि त्याच्या अनुषंगाने इतर बाबींची चर्चा करण्यासाठी हा बाफ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ मोहन की मीरा :-

बापरे.... म्हणजे शाळा खर्च चांगली दिसते.

मला एक कळत नाही "मराठी माणसासाठी" भांडणार्‍यांना अशी / अश्या शाळा काढायची अक्कल का येत नाही. त्यांनी काढलेल्या शाळेलातरी कीमापरवानगी देईल सरकार.

का आपणच काढावी ?

नर्सरी प्रवेशासाठी शाळेत होणाऱ्या इंटरव्ह्यू बद्दल ?

आमची कन्या घरी आणि प्लेग्रूप मध्ये खूप व्यवस्थित पोएम्स व इतर गोष्टी गप्पबसावं लागे पर्यंत चांगल्या करते , पण नविन लोकांसमोर घाबरते आणि जर काहीच बोलली नाहीतर शाळेत प्रवेश नाही मिळणार (एकच चांगली शाळा आहे तिच्यासाठी आमच्या गावात )

काय करावं ?

नर्सरी प्रवेशासाठी शाळेत होणाऱ्या इंटरव्ह्यू बद्दल ? >> शाळेतल्या प्रवेशासाठी मुलांची मुलाखत घेणे बेकायदा आहे असे वाचलेय. आसपासच्या कुठल्याही शाळेत नर्सरी प्रवेशासाठी मुलाखत घेताना पाहिलेले नाही.
पहिली पासुनच्या पुढच्या प्रवेशासाठीही लेखी परिक्षा असतात पण मुलाखती नाही.

हो नर्सरी प्रवेशासाठी मुलाखती घेण्यास (मुलांच्या आणि पालकांच्या) बंदी आहे. मी सुद्धा अशात कुणाकडून अशी काही मुलाखत झाल्याबद्दल ऐकलं नाहीये.

जर international school जसे पुण्यामधील symbiosis international school, मधे ९वी ते १२वी केले तर त्यानंतर काय options असतात? भारतात ह्या शाळेच्या credit वरती coep किंवा लोकल engineering la admission मिळते का? तसेच US college मध्ये undergrad साठी apply करता येते का?

आम्ही मुलाला घेऊन चार वर्षे भारतात जायचा विचार करत आहोत पण त्यानंतर पुढच्या शिक्षणाचे कसे ह्याबद्दल मार्गदर्शन हवे होते.

State level (mh cet), national level, IIT (IIT jee) and international (GRE) अश्या वेगवेगळ्या entrance test असतात. Entrancए test मधल्या score नुसार centralized admission असते. महाराष्ट्रातल्या engg. college मध्ये admission घ्यायची असेल तर महाराष्ट्रात काही वर्षे वास्तव्य आणि बारावी झालेले पाहिजे, असा काहीतरी नियम आहे. नक्की काय नियम ते माहित नाही. अजून सुपात नसल्याने माझी माहिती ऐकीव आहे, तपशिलात चुका असू शकतात.

नमस्कार मी मायबोलीवर नवीन आहे. माझा मुलगा हा दुसरीत सीबीएसई बोर्ड शाळेत असून सध्या सैनिक स्कुल ला पाठविण्याचा विचार करतोय . ते इयत्ता 5 वी नंतर असते पण त्यासाठी प्रवेश परीक्षा क्लीअर करावी लागते. माझा प्रश्न असा आहे की आता तो ज्या शाळेत जात असून ती 12 वी पर्यंत आहे व ती सध्या डोंबीवलीतील नामांकित शाळा असून तेथील शिक्षण व सैनिक स्कुल मधील शिक्षण याचा काही फरक होईल काय....तो खेळात प्रचंड आवड व एनर्जी असून आत्मविश्वास या सर्व गोष्टीमुळे आम्ही सैनिक शाळेच विचार करतोय तो निर्णय योग्य होईल काय कृपया प्रतिसाद दयावा

नामांकित शाळेचा उपयोग बहुदा स्टेटसपुरता असतो.

सैनिकी शाळेचे शिस्त आणि शारिरीक तंदुरुस्ती हे दोन महत्वाचे फायदे आहेत, जे पुढील आयुष्यात खूप उपयोगी आहेत. काही मुलांना सैनिकी शाळा तेथील थकवणार्‍या रुटीनमुळे झेपत नाहीत. पण तुमच्या मुलात एनर्जी प्रचंड असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे.

Pages