शाळेची निवड

Submitted by माधव on 6 July, 2011 - 06:05

आज आपल्या भोवती अनुदानीत / विनाअनुदानीत, मराठी / इंग्रजी माध्यम, SSC / ICSC / CBSC असे वेगवेगळे बोर्ड अशा अनेक पर्याय असलेल्या शाळा उपलब्ध आहेत. आपल्या पाल्याला नक्की कुठल्या शाळेत घालावे याचा गोंधळ उडतो. या विविध पर्यांयांचे फायदे / तोटे आणि त्याच्या अनुषंगाने इतर बाबींची चर्चा करण्यासाठी हा बाफ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ.मा. शाळे बद्दल माहित नाही. पण पुढच्या वर्षी तुम्ही मुंबईत असणार का ? Happy
छान आपण जवळच असु म्हणजे भेटूच.

इथे जा

http://fyjc.org.in/mumbai/

इथे applicant and parent वर जा. तिथे झोनवाई़ज कॉलेजेसची लिस्ट आहे. तुझी लेकीला ११वी मुंबईतुन करायचे असल्यास ऑनलाईन अ‍ॅडमिशनला पर्याय नाही. तेव्हा अपडेटेड लिस्ट असेलच बोर्डाच्या साईटवर. तेव्हा फिकर नॉट Happy

सतिश,

मी नेट्वरही बघितले माहिती द्याल का प्लीज.

१) ऐरोली डीएव्हीचा रिपोर्ट मुलुन्ड पेक्षा बरा आहे म्हंटात.
२) ऐरोलीस जाण्यास स्कूल बस मिळेल का नाहीतर माझी मेन पंचाइत म्हणजे सकाळी साडेआठ चे हपीस, त्याआधी तिला सोडणे स्वयंपाक करणे बॅक टू होम फ्रोम स्कूल स्नॅक बनविणे व अर्धा तास किमान कुत्रे चालविणे असे होणार आहे. ती बस ने गेली व आली तर बरे पडेल.

सावली हो तिला फोटोग्राफी शिकायची आहे तेव्हा तुझ्याच कडे पाठविणार. प्रिन्टा धुवायला वगैरे मदत नीस होइल. तेवढ्यावेळात मी तुझ्या छोटीला व भू भूज ना घेउन बागेत फिरवून खेळवून आणू शकेन.

साधना धन्यवाद. पहिले दहावीचा गड सर करायचा आहे.

ऐरोली डि.ए.व्ही. शाळेबद्दल बोलायचे झाले तर प्रश्नच नाही..:)
बाकी.. शाळेची फी १५०० प्रती माह (इयत्ता नववी साठी)
केवल हिंदी किंवा संस्कृत किंवा मराठी हे options आहेत. यंदा पासुन फ्रेंच बंद केले आहे. (या वर्षी तरी)
शाळेची वेळ सकाळी ०७:०० ते १२:४५
शाळेच्या बसेस मुलुंड येथे जातात.. किंबहुना ऐरोली पेक्षा जास्त मुले मुलुंडहुनच येतात..:)
अजुन काही हवे असल्यास.. Happy

>>> मिलेनियमची फी खूप आहे असे ऐकले. मिळाली तर माहिती द्या.

फी वर्षाला ३६००० रू आहे असे एका मित्राकडून समजले.>
एवढी असेल तर ठिक आहे.
मी लाखाच्या घरात ऐकली होती फी. कदाचित प्रवेशाच्या वेळी एकदाच असेल.
धन्यवाद!

मला पुण्यातील हडपसर परिसरातील शाळांची माहिती हवी आहे. त्यांच्या प्रवेशाबद्दल (तारीख, फी वगैरे) माहिती असल्यास ती सुद्धा सांगा.

कोणाला कलमाडि (secondary school, pune)
शाळेची फी, त्यांच्या प्रवेशाबद्दल माहिती असल्यास ती सुद्धा सांगा. शाळेबद्दल तेथिल , हिंदी किंवा संस्कृत किंवा मराठी हे options बद्दल सुद्धा सांगा.

आमचे कन्यारत्न जन्म तारीख ०६.१०.२०१० महाराष्ट्र
मझा प्रश्न तिला जून २०१२ मध्ये प्लेग्रुपला अडमिशन घावी का ? कारण वय वर्षे ०२ हि सर्व साधारण अट आहे.
तिला एकतर आत्ताच अडमिशन घावी का एक वर्ष उशीराने अडमिशन घावी ?

केदार, तुमच्यासारखाच प्रश्न मलापण पडलाय. सुनिधी जुलै २०१०ची आहे. तिला आता जवळच्या एखाद्या प्लेग्रूपला पाठवणार आहे. त्यानंतर २०१३ मधे तिला नर्सरीला पाठवायचं की अजून एका वर्षानंतर?

कॅलेंडर वर्ष २०१० मध्ये जन्मलेली मुले शैक्षणिक वर्ष २०१६ - १७ (म्हणजे जून २०१६) मध्ये पहिलीला प्रवेश घेतील.
या हिशोबाने उलट्या गणिताने आपापल्या बाळांसाठी प्ले ग्रूप/ नर्सरीला प्रवेश घ्या.
बहुतांशी शाळांमध्ये प्रवेशासाठी कॅलेंडर वर्ष ग्राह्य धरलं जातं.

केदार२०, तुमची मुलगी जूनमधली आणि नंदिनी, सुनिधी जुलैतली असल्यामुळे प्रवेश शाळेत घेताना 'यंदा की पुढच्या वर्षी?' हा चॉईस मिळण अवघड वाटतंय. तरीही ते तुम्ही ज्या शाळेत प्रवेश घेऊ इच्छिता तिथल्या नियमांवर अवलंबून आहे.

तुमच्या पसंतीची शाळा - जी पुढे दहावी पर्यंत असणार आहे - जर आत्ता प्रवेश देत असेल तरच प्रवेश घ्यावा. न पेक्षा मुलांना उशीरात उशीरा शाळेत घालावे असे माझे मत. बाजूचा/मित्राचा/नातेवाईकांचा मुलगा/मुलगी जाते म्हणून त्या दबावाला अजिबात बळी पडू नये. पुढे आहेच की शाळा, कॉलेज, नोकरी वगैरे वगैरे.

मंजूडी, माधव धन्यवाद प्रतिसादा बद्दल
केदार२०, तुमची मुलगी जूनमधली >>>>>नाही ती १० वा महिना म्हणजे ऑक्टोबर २०१० ची आहे !

मोठी झाल्यावर माझे एक वर्ष वाया घालवले किवां लवकर घातले म्हणून ताण पडतो असे मित्र मैत्रिणीचे अनुभव आहेत म्हणून समजत नाहीये

प्लेग्रूप ला २ वय वर्षे असणाऱ्याना अडमिशन मिळत आहे पण ओळखीतील असल्या मुळे दोन ऑप्शन मिळाले आहेत
१. जूनला अडमिशन घेऊन ति रुळतेय काते पहाणे (कारण थोडी समज कमी असते )
२. किवां मग ऑक्टोबर ला शाळा जॉईन करणे ( २ वय वर्षे झाल्यावर ऑक्टोबर २०१२ ला)

मंजुडी, धन्यवाद. म्हणजे या वर्षी तिला प्लेग्रूपला पाठवणे ठिक राहील. पुढच्या वर्षी नर्सरी.

मी सध्या तरी तिला जितक्या उशीरा होइल तितक्या उशीरा शाळेत घालणार आहे. Proud ट्युशनला केजीची मुलं येतात त्यांचा अभ्यासक्रम बघून डोकंच फिरतं. मी या वर्षी तरी तिला शाळेतल्या प्लेग्रूपम्धे घालत नाहीये. त्याऐअवजी बाजूच्याच बिल्डिंगमधे एक आंटी गेले वीस वर्षे प्लेग्रूप चालवतात त्यांच्याकडे पाठवेन. त्यांच्या प्लेग्रूपमधे सुविधा उत्तम आहेत शिवाय या आंटी मुलाना खूप छान सांभाळतात.

या निर्णयावरून एका बाईने (तिचा मुलगा सुनिधीच्या बरोबरीचा) मला असं सांगितलं की शाळामधे अ‍ॅडमिशन देताना रेप्युटेड प्लेग्रूप असेल तर प्राधान्य देतात (युरो किड्स अथवा किड्सझी). Uhoh तरी इथे मंगलोरमधे अ‍ॅडमिशन मिळणे तितकेसे कठीण नाही शिवाय फीपण जरा कमी असते.

मुलीला प्लेग्रूपला सध्या अडमिशन घेतली आहे. (वय १ वर्षे ८ महिने )

पण नवीन संकटे उद्भाव्लीत पहिल्या दिवशी आवडीने शाळेत गेली पण दुसर्या दिवशी रडणे चालू झालेय शाल्चाळू झाल्यापासून १० दिवस व्यवस्थित शाळेत गेली पण या आठवडया पासून सारखी रडते आहे.पहिल्याच आठवड्यात एक मुलगा तिला चावला तशी ती मस्तीखोर नाहीये पण एकाजागी बसत नाही (माझ्यावर गेलेय Wink ) घरात सुद्धा सारखी रडत असते आणि हट्टी होत चालेय

शाळेत लवकर घातल्या मुळे असे होतंय का ? की हे असचं असत ?

काळजी करू नका. सगळीच मुले सुरुवातीला प्लेग्रूप मधे गेल्या गेल्या रडतातच. साधारणपणे दिड ते २ महिने हा प्रकार चालू असतो. शाळेतल्या टीचर्स अनुभवी असतात. व्यवस्थित हँडल करतात मुलांना.

धन्यवाद निंबुडा

शाळेतल्या टीचर्स अनुभवी असतात. व्यवस्थित हँडल करतात मुलांना. >>>>> पण त्या स्वताहून काहीच सांगत नाहीत आम्हीच अती काळजी करोय अस होतंय ? आणखी एक दुसरी बरीच मुले रडत असतात मग हिला अटेन्शन मिळत नाही त्यामुळे ती अस करतेय का ? अस असेल तर पुढे जाऊन ती बराच त्रास देईल का ? किवां आभ्यासात लक्ष देईल की नाही ?

माझा मुलगा पण १ वर्ष ९ महिन्याचा आहे, मी पण तोच विचार करत होते कि त्याला एवढ्यात शाळेत पाठवू कि नको, तो खूप बोलतो मग सर्वजन म्हणतात कि तो लगेच शिकतो तर त्याला पाठवायला काही हरकत नाहीये, तिथे जाऊन तो लवकर शिकेल, पण माझीच इच्छा नाहीये त्याला एवढ्यात शाळेत पाठवायची

<<माफ करा, पण १ वर्ष ८ महिने हे वय नाही शाळेत जाण्याचे.>> बरोबर मलाही हेच म्हणायचे आहे.
पण काहि कारणास्तव शाळेत टाकावे लागलेच असेल , तर मुल सुरूवातीला असच करतात, आपल मुल म्हणून आपल्याला काळजी वाटते, टिचरांना सवयच असते .
<<आणखी एक दुसरी बरीच मुले रडत असतात मग हिला अटेन्शन मिळत नाही त्यामुळे ती अस करतेय का ?>> असूही शकेल, माझा मुलगापण नर्सरीमध्ये असाच करायचा , दुसरे रडले की याच सुरू व्हायच. वय लहान असल्यामुळे लगेच अ‍ॅड्जस्ट व्हायला थोडा वेळ लागेल. तुम्ही देखील थोडफार गमतीत , गोष्टीत सकारात्मक सांगा Happy

माफ करा, पण १ वर्ष ८ महिने हे वय नाही शाळेत जाण्याचे. भलेही ते प्लेग्रुपमध्ये असो.>>> ६ वर्षे पुर्ण वय आहे शाळेत घालण्याचे. आणि त्याचा नक्किच खुप फायदा होतो असे वाटते. वाटते म्हणजे माझ्या मुलाला ६ वर्षे पुर्ण झाल्यावर 'डायरेक्ट' पहिलीला घातले (तो पर्यंत तो घरीच होता ) आता तो ४ थीत आहे. शिक्षणात प्रगती चांगली आहे. आता त्याला ३ वर्षाचा असताना घातले अस्ते तर काय झाले अस्ते हा डाटा उपलब्ध नाही. पण मुलीला पण ६ वर्षे पुर्ण झाल्यावरच घालायचे असे ठरवले आहे. पण हे अतिशय वयक्तिक मत आहे. कदाचित ठार चुकिचे देखिल असु शकते. महत्वाचे म्हणजे हा सल्ला नाहिय. Happy

पाटील १ ली चे ६ वय बरोबर आहे. माझा मुलगा ३ - प्ले ग्रुप, ४ - नर्सरी ५ - प्रेप करुन ६ व्या वर्शी १लीत गेला. शाळेत त्याला प्ले ग्रुप नंतर डाररेक्ट प्रेप ला घाला म्हणत होते पण आम्ही एकले नाही. (हे नोएडा cbse शाळेत महाराष्ट्रातले माहीत नाही)

वाटते म्हणजे माझ्या मुलाला ६ वर्षे पुर्ण झाल्यावर 'डायरेक्ट' पहिलीला घातले (तो पर्यंत तो घरीच होता )

तुम्ही राहता कुठे?? इथे मुंबईत मुल ५ पुर्ण आणि तरीही अजुन शाळेत नाही हे बघुन लोक पालकांना वेड्यात काढतील, मुलाचे पुढचे पुर्ण आयुष्य बरबाद करताहेत म्हणुन. Happy इथे मुल वर्षाचे होत नाही तोच आपल्या भागातली सगळ्यात बेस्ट शाळा शोधण्याची सुरवात होते. प्रत्येक पावलावर आपण अमुकमुकच करावे कारण फक्त तेच समाजमान्य आहे याचा प्रचंड ताण हल्ली सगळ्यांवर असतो, जे ताण घेऊ इच्छित नाही त्यांच्यावर इतर लोक ताण घालतात.

तुम्ही असा काहीच ताण न घेता जे मुलासाठी योग्य तेच केलेत याबद्दल अभिनंदन.

निवांत मस्त.

गरज म्हणून बाहेर ठेवणे भागच असेल तर ठीक पण मग त्याला प्रिस्कूल वगैरे म्हणू नये तशा काही अपेक्षाच ठेऊ नये. १ वर्ष ८ महिने म्हणजे बाबाच्या खांद्यावरून जग बघण्याचे वय आणि तीच त्याची (बाळाची) तेंव्हाची खरी शाळा.

आता त्याला ३ वर्षाचा असताना घातले अस्ते तर काय झाले अस्ते हा डाटा उपलब्ध नाही. >> Lol अतिशय प्रामाणिक पोस्ट!

खरंतर ही चर्चा << मुलांना कितव्या वर्षी शाळेत पाठवावे?>> या बाफवर योग्य नाही. पुढे कधी गरज भासल्यास पटकन संदर्भ मिळणार नाही.

Pages