पुणे आणि पुणेकर

Submitted by चौकट राजा on 22 June, 2011 - 17:57

सर्वात आधी मी हे सांगु ईच्छितो कि हा लेख लिहिण्यामागे कोणत्याही एका लेखकाची वा त्याच्या लेखाची मापे काढणे हा हेतू नाही. बर्‍याच दिवसांपासुन ह्या विषयावर लिहायचं मनात होतं पण काही ना काही कारणानी राहुनच जात होतं. काल "डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा" हा लेख वाचला आणि माझ्यातला पुणेरी बाणा जागा झाला!.. आणि मग ठरवलं कि आज लिहुनच टाकुयात मनातल. तेव्हा कविताबाई, तुमचा लेख हे फक्त निमित्त झालय.. तुमची लिहिण्याची शैली, लेखाची मांडणी उत्तम आहे. मी फक्त विषयावर थोड भाष्य करु ईच्छितो...
*****************************************************

तर मी पक्का पुणेकर. वयाची पहिली २५ वर्ष पुण्यातच काढली आणि मग थेट अमेरिकेत येऊन पोचलो. इथे आल्यावर मला पहिल्यांदाच कळालं कि पुणेकर प्रचंड special असतात. कारण आजुबाजुचे मराठी मित्रसुद्धा बोलताना वाक्याची सुरुवात "तुम्ही पुणेकर.." अशी करत होते. आणि मग "तुमच्या पुण्यात / पुण्या-मुंबई कडे" असे टोमणे येता जाता ऐकू यायला लागले. अगदी महाराष्ट्र मंडळात पण असेच उल्लेख ऐकायला मिळाले. वर जाता जाता पु.लं.च्या 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मधली वाक्य पण लोक ऐकवत होते.

तसे कॉलेजमधे असताना माझे अनेक मित्र नांदेड, नागपुर, नाशिक (माफ करा 'नासिक'), जळगाव, धुळे (माफ करा 'धुलिया') चे होते. तसेच इथेही आहेत. पण आम्ही कधी त्यांना कोणाला त्यांच्या गावावरुन एवढं 'गौरवल्याच' आठवत नाही. मग प्रश्न असा पडला कि केवळ पुणेकरांना का एवढा 'मान' मिळतो? बरीच मंडळी आधी सांगताना जोरात सांगतात कि "आम्ही अमुक अमुक गावचे, पण आता रिटायर झाल्यावर आई बाबा पुण्याला असतात." किंवा "परवाच पुण्यात फ्लॅट बूक केला बर का"... आणि मग येतं, 'काय हो तुमच्या पुण्याचा ट्रॅफिक!, काय पण पुण्याचे रिक्शावाले!, काय ते पुण्याचे दुकानदार!, काय चितळ्यांसमोरच्या रांगा!, काय हो पुण्याचे रस्ते!, वगैरे..वगैरे'. हल्ली महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून आलेल्या प्रत्येकाला पुण्यातच का घर घ्यायच असतं? आणि एवढाच पुण्यात त्रास आहे तर का एवढा पुण्यात रहाण्याचा अट्टाहास? मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच, पुण्यात रहायला यायचच कशाला?

तो 'मुंबई पुणे मुंबई' चित्रपट लोकांना प्रचंड आवडला पण मला त्या नायकाची (पेक्षा लेखकाची) कीव आली. आजपर्यंत कोणीही पुणेकर असा जाता येता 'मग जाज्वल्य अभिमान आहे' असं म्हणताना मी बघितला नाहिये. "तो चित्रपट आहे, त्यात जरा मेलोड्रामा असणारच," असं म्हणुन स्वतःची समजुत काढली तर लोक नंतर तो संवाद ऐकवून आमचीच टिंगल करत होते. तसच आता हा 'डोंबिवली स्पेशल....' लेख. गेली अनेक वर्ष डोंबिवलीमधे रहाणार्‍या आणि तिथेच व्यवसाय करणार्‍या त्या मूनमून मिसळवाल्या बाईंना 'पुणेरी' बाणा का चिकटवायचा? डोंबिवलीतच तशाच तिखट जिभेच्या कोणी बटाटेवडा विकणार्‍या बाई आहेत हि माहिती प्रतिसादांमधुन कळाली. म्हणजे प्रत्येक शहरात अशी मंडळी असतातच. मग त्यांना 'पुणेरी' बाणाच का नेहेमी चिकटवायचा? पु.लं. नी 'पुणेकर, मुंबईकर..' लिहुन आता ४० वर्ष झाली. पण तेव्हाचा पुणेकर आणि आत्ताचा पुणेकर बराच वेगळा आहे. किती वर्ष हे stereotyping करत रहाणार आपण? गावोगावी असे लोक सापडतातच.
आता उदाहरण म्हणून "टायगर ऑईल कंपनी, ह्युस्टन" असं गूगल करा. त्या कंपनीच्या मालकानी त्याच्या कर्मचार्‍याना लिहिलेले मेमो तुम्हाला दिसतील. (आणि ते वाचून कृपया "मालक पुण्याचे दिसतात" असा निष्कर्श काढु नका!!) त्यातल्या त्यात जमेची बाजु म्हणजे 'आता पुणं कात टाकतय' हे पण 'डोंबिवली स्पेशल....' लेखात वाचयला मिळालं. म्हणजे पुणं आता बदललय हे आता लोक जरातरी मान्य करायला लागलेत.

मी असं अजिबात म्हणत नाही कि पुणेकर चिकित्सक नसतात. ते जरा जास्त चिकित्सक असतातच आणि ते तसे असतात कारण अगदी काही वर्ष आधीपर्यंत पुणं महाराष्ट्रातलं एकमेव सांस्कृतिक केंद्र होतं. तिथल्या लोकांनी नेहेमी जर का जागतिक किर्तीच्या कलाकारांना (ह्यात लेखक, गायक, नट, नाटककार, कवी सगळे आले) बघितलं असेल तर आपोआप अपेक्षा ऊंचावणारच. आणि मग ते साध्या कलाकारांच्या चुका काढताना दिसतात. कदाचित म्हणूनच अनेक कलाकार म्हणतात कि पुण्यात टाळी मिळणं सगळ्यात अवघड आहे. पण आता इतर सगळीकडे मोठे मोठे कार्यक्रम होतात. दूरचित्रवाणीमुळे सगळीकडच्या प्रेक्षकांना आता उत्तमोत्तम कलाकारांच्या कलाकृती बघायला मिळतात. पण अजुनही कोणी एखाद्या कार्यक्रमावर जरा टिका केली कि बाकिचे विचारतात,"तुम्ही पुण्याचे का हो?". माझं त्यातल्या गंमतीशी काही वाकड नाही, मला टोचतो तो त्यातला कुत्सित्पणा.

चितळ्यांच्या दुपारी दुकान बंद ठेवण्याला नावं ठेवणारे लोक त्याच चितळ्यांच्या बाकरवड्यांवर तुटुन पडतात. कोणी पुण्याहुन येत असेल तर बाकरवड्या, आंबा बर्फी अगदी मागवुन घेतात. आणि परवाच एक जण अत्यंत चिडुन सांगत होता कि चितळे हल्ली प्लॅस्टिकच्या पिशव्या देत नाहीत. आता तक्रार करायची म्हणून काहीही करायची का? ते चांगले प्लॅस्टिक कमी करायला मदत करत आहेत असं का बघायचं नाही? पुणेरी पाट्या ह्या नावाखाली कोणत्याही गावतल्या पाटया टाकतात हल्ली लोक. त्यातल्या बर्‍याच पुण्यात नसतातही पण लिखाण जरा खोचक असलं कि त्या पाटीला पुणेरी म्हणायचा शिरस्ताच पडला आहे.

हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच कि ह्याचा मनाला त्रास होतो. आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का?

*****************************************************

ता.क. - मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. चुक भूल द्यावी घ्यावी..

कळावे,

लोभ असावा.

गुलमोहर: 

आSSsssणि या बाफचा 'न.था.पा.पु.क' पुरस्कार जात आSSssssहे

श्रि. भुषणराव कटककर (उर्फ बेफ़िकीर)awards.gif यांSSSssनाSSSss
Talia.gif

मजा आली धागा वाचून. वेळ कसा गेला समजले नाही. Happy
संबंधीतांचे आभार

अमोल केळकर
(नवी मुंबईकर)
------------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

इथे झक्कींची उणीव भासत आहे. ते या वादात उतरले असते तर एव्हाना "तुमच्या पुण्यामुबैपेक्षा आमचं नाग्पूर कितीतरी भारी है ना बे" असे म्हणून मोकळे झाले असते.

लेख आवडला आणि प्रचंड पटलाही!!!
माझ्या मनातलेच बोल तुम्ही माबो वर उतरवलेत. मलाही कायम कुत्सित टोमणे, फालतू जोक यांना सामोरे जावे लागते. त्यात माझं सासर सोलापूर ते तर कायम जिभेची तलवार करूनच खचाखच ताशेरे ओढत असतात. शिवाय ऑफिस मधील परप्रांतीय मंडळी! हमारे यहा ये और हमारे यहा वो! पुणे मी क्या है? वाली. असा राग यायचा ना!

मात्र पुण्याची मंडळी कधीच कुठल्या गावाला नावं ठेवत नाहीत हो. हे आपला माझं एक निरीक्षण!

एकदा असाच खूप आलेला राग शांत करण्या साठी मी ब्लॉग वर एक छोटासा लेख लिहिला होता. तो इथे मिळेल:

धन्यवाद बेफिकीर!
पण खरच सांगते. पुणेकरांच पुण्यावर फार प्रेम असतं. कोणी त्या भावनांना सारखा डिवचू नये एवढंच!!!

मी स्वत: मुंबईकर असूनही... माझ्यासाठी ह्या धरतीवरील अत्यंत आवडती जागा म्हणजे..पुणे ( पुना ?? Happy ...)
तो जंगली महाराज रोड.... टिळक रोड... ते वैशाली.... तो शनिवारवाडा.... ती पर्वती... तो लकडी पूल... तो F.C. रोड... ती सदाशिव पेठ... तो नागनाथ पार.... तो अप्पा बळवंत चौक अहाहा... स्वप्न आहे माझे... या माझ्या मराठ्मोळ्या पुण्यामधे कायमचे रहायचे... ही so called cosmopolitan मोहमयी मुंबापुरी सोडुन......

ऋयाम | 27 June, 2011 - 12:50>>>>>>>>>>>>>>>>> अक्षरशः डोळे दिपले राव....

@ चिन्मय .... सहमत तुमच्या प्रतिसादाशी . पुढे लिस्ट वाढवायची झाल्यास सदैव पाठिशी असणारा तो दगडूशेठ बाप्पा, ती तुळशीबाग, ते जोशी वडेवाले , ते अमृततुल्य ( यासारखी चहाची टपरी आणि चहा अख्या जगात सापडणार नाही Happy ) आणि सगळ्यात महत्वाचे जागोजागी डेक्कन ला मिळणारा सकाळचा उपमा , पोहे यांचा नाष्टा मुंबईत मिस करतो.

अमोल केळकर
-----------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

काही पुरस्कार मी सुचवतोय. जमेल तशी भर घालावी. नॉमिनेशन्स जाहीर व्हावीत..

१. हुषार माबोकर
२. शांत व सालस माबोकर
३. अजातशत्रू माबोकर
४. सर्वात खवचट माबोकर
५. सर्वाधिक प्रतिभाशाली माबोकर
६. सर्वात लोकप्रिय माबोकर
७. सर्वात भांडखोर माबोकर
८. सर्वात उमदा नवा माबोकर
९. सर्वात सुंदर माबोकर
१०. सर्वात गोड माबोकर
११. सर्वात समंजस माबोकर ( या ठिकाणी वादाची शक्यता आहे)
१२. मायावी माबोकर
१३. कळलावू माबोकर
१४. प्रतिभा असूनही दुर्लक्षित माबोकर
१५. सणसणाटी माबोकर
.................
....................
..................
.................

Pages