पुणे आणि पुणेकर

Submitted by चौकट राजा on 22 June, 2011 - 17:57

सर्वात आधी मी हे सांगु ईच्छितो कि हा लेख लिहिण्यामागे कोणत्याही एका लेखकाची वा त्याच्या लेखाची मापे काढणे हा हेतू नाही. बर्‍याच दिवसांपासुन ह्या विषयावर लिहायचं मनात होतं पण काही ना काही कारणानी राहुनच जात होतं. काल "डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा" हा लेख वाचला आणि माझ्यातला पुणेरी बाणा जागा झाला!.. आणि मग ठरवलं कि आज लिहुनच टाकुयात मनातल. तेव्हा कविताबाई, तुमचा लेख हे फक्त निमित्त झालय.. तुमची लिहिण्याची शैली, लेखाची मांडणी उत्तम आहे. मी फक्त विषयावर थोड भाष्य करु ईच्छितो...
*****************************************************

तर मी पक्का पुणेकर. वयाची पहिली २५ वर्ष पुण्यातच काढली आणि मग थेट अमेरिकेत येऊन पोचलो. इथे आल्यावर मला पहिल्यांदाच कळालं कि पुणेकर प्रचंड special असतात. कारण आजुबाजुचे मराठी मित्रसुद्धा बोलताना वाक्याची सुरुवात "तुम्ही पुणेकर.." अशी करत होते. आणि मग "तुमच्या पुण्यात / पुण्या-मुंबई कडे" असे टोमणे येता जाता ऐकू यायला लागले. अगदी महाराष्ट्र मंडळात पण असेच उल्लेख ऐकायला मिळाले. वर जाता जाता पु.लं.च्या 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मधली वाक्य पण लोक ऐकवत होते.

तसे कॉलेजमधे असताना माझे अनेक मित्र नांदेड, नागपुर, नाशिक (माफ करा 'नासिक'), जळगाव, धुळे (माफ करा 'धुलिया') चे होते. तसेच इथेही आहेत. पण आम्ही कधी त्यांना कोणाला त्यांच्या गावावरुन एवढं 'गौरवल्याच' आठवत नाही. मग प्रश्न असा पडला कि केवळ पुणेकरांना का एवढा 'मान' मिळतो? बरीच मंडळी आधी सांगताना जोरात सांगतात कि "आम्ही अमुक अमुक गावचे, पण आता रिटायर झाल्यावर आई बाबा पुण्याला असतात." किंवा "परवाच पुण्यात फ्लॅट बूक केला बर का"... आणि मग येतं, 'काय हो तुमच्या पुण्याचा ट्रॅफिक!, काय पण पुण्याचे रिक्शावाले!, काय ते पुण्याचे दुकानदार!, काय चितळ्यांसमोरच्या रांगा!, काय हो पुण्याचे रस्ते!, वगैरे..वगैरे'. हल्ली महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून आलेल्या प्रत्येकाला पुण्यातच का घर घ्यायच असतं? आणि एवढाच पुण्यात त्रास आहे तर का एवढा पुण्यात रहाण्याचा अट्टाहास? मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच, पुण्यात रहायला यायचच कशाला?

तो 'मुंबई पुणे मुंबई' चित्रपट लोकांना प्रचंड आवडला पण मला त्या नायकाची (पेक्षा लेखकाची) कीव आली. आजपर्यंत कोणीही पुणेकर असा जाता येता 'मग जाज्वल्य अभिमान आहे' असं म्हणताना मी बघितला नाहिये. "तो चित्रपट आहे, त्यात जरा मेलोड्रामा असणारच," असं म्हणुन स्वतःची समजुत काढली तर लोक नंतर तो संवाद ऐकवून आमचीच टिंगल करत होते. तसच आता हा 'डोंबिवली स्पेशल....' लेख. गेली अनेक वर्ष डोंबिवलीमधे रहाणार्‍या आणि तिथेच व्यवसाय करणार्‍या त्या मूनमून मिसळवाल्या बाईंना 'पुणेरी' बाणा का चिकटवायचा? डोंबिवलीतच तशाच तिखट जिभेच्या कोणी बटाटेवडा विकणार्‍या बाई आहेत हि माहिती प्रतिसादांमधुन कळाली. म्हणजे प्रत्येक शहरात अशी मंडळी असतातच. मग त्यांना 'पुणेरी' बाणाच का नेहेमी चिकटवायचा? पु.लं. नी 'पुणेकर, मुंबईकर..' लिहुन आता ४० वर्ष झाली. पण तेव्हाचा पुणेकर आणि आत्ताचा पुणेकर बराच वेगळा आहे. किती वर्ष हे stereotyping करत रहाणार आपण? गावोगावी असे लोक सापडतातच.
आता उदाहरण म्हणून "टायगर ऑईल कंपनी, ह्युस्टन" असं गूगल करा. त्या कंपनीच्या मालकानी त्याच्या कर्मचार्‍याना लिहिलेले मेमो तुम्हाला दिसतील. (आणि ते वाचून कृपया "मालक पुण्याचे दिसतात" असा निष्कर्श काढु नका!!) त्यातल्या त्यात जमेची बाजु म्हणजे 'आता पुणं कात टाकतय' हे पण 'डोंबिवली स्पेशल....' लेखात वाचयला मिळालं. म्हणजे पुणं आता बदललय हे आता लोक जरातरी मान्य करायला लागलेत.

मी असं अजिबात म्हणत नाही कि पुणेकर चिकित्सक नसतात. ते जरा जास्त चिकित्सक असतातच आणि ते तसे असतात कारण अगदी काही वर्ष आधीपर्यंत पुणं महाराष्ट्रातलं एकमेव सांस्कृतिक केंद्र होतं. तिथल्या लोकांनी नेहेमी जर का जागतिक किर्तीच्या कलाकारांना (ह्यात लेखक, गायक, नट, नाटककार, कवी सगळे आले) बघितलं असेल तर आपोआप अपेक्षा ऊंचावणारच. आणि मग ते साध्या कलाकारांच्या चुका काढताना दिसतात. कदाचित म्हणूनच अनेक कलाकार म्हणतात कि पुण्यात टाळी मिळणं सगळ्यात अवघड आहे. पण आता इतर सगळीकडे मोठे मोठे कार्यक्रम होतात. दूरचित्रवाणीमुळे सगळीकडच्या प्रेक्षकांना आता उत्तमोत्तम कलाकारांच्या कलाकृती बघायला मिळतात. पण अजुनही कोणी एखाद्या कार्यक्रमावर जरा टिका केली कि बाकिचे विचारतात,"तुम्ही पुण्याचे का हो?". माझं त्यातल्या गंमतीशी काही वाकड नाही, मला टोचतो तो त्यातला कुत्सित्पणा.

चितळ्यांच्या दुपारी दुकान बंद ठेवण्याला नावं ठेवणारे लोक त्याच चितळ्यांच्या बाकरवड्यांवर तुटुन पडतात. कोणी पुण्याहुन येत असेल तर बाकरवड्या, आंबा बर्फी अगदी मागवुन घेतात. आणि परवाच एक जण अत्यंत चिडुन सांगत होता कि चितळे हल्ली प्लॅस्टिकच्या पिशव्या देत नाहीत. आता तक्रार करायची म्हणून काहीही करायची का? ते चांगले प्लॅस्टिक कमी करायला मदत करत आहेत असं का बघायचं नाही? पुणेरी पाट्या ह्या नावाखाली कोणत्याही गावतल्या पाटया टाकतात हल्ली लोक. त्यातल्या बर्‍याच पुण्यात नसतातही पण लिखाण जरा खोचक असलं कि त्या पाटीला पुणेरी म्हणायचा शिरस्ताच पडला आहे.

हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच कि ह्याचा मनाला त्रास होतो. आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का?

*****************************************************

ता.क. - मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. चुक भूल द्यावी घ्यावी..

कळावे,

लोभ असावा.

गुलमोहर: 

मुंबईकरांमधे दम नाही. बाँबस्फोट होऊनही यांना काहीच वाटत नाही. >> अत्यंत असंवेदनशील मनोवृत्ती दर्शवणारं, असंस्कृत वाक्य आहे हे.

पुण्याची तुलना आधी मुळात मुंबईशी करणच चुकीचं आहे. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय, भिन्न संस्कृतींना एकत्र नांदवणारं शहर आहे. मुंबईकरांची मनोवृत्ती त्याला साजेशी आपोआप बनते. मग तो जन्मलेला असो तिथे किंवा बाहेरुन येऊन स्थिरावलेला असो. मुंबईचे जे गुण-दोष असतील ते असतील. पण पुण्यासारख्या प्रादेशिक शहराशी तुलना हाच मुळात अन्याय आहे मुंबई आणि मुंबईकरांवर. पुणेकरांनी आपल्या शहराची तुलना कोल्हापूर, नागपूर, सातारा वगैरे शहरातील नागरिकांशी खुशाल करावी. उगीच मुंबईकरांना आपल्या पंक्तित बसवायचा प्रयत्न करु नये :प

बाकी चालूद्या.

एका नव्वदीतल्या पुणेकराने सर्कशीतल्या स्त्री कलाकारांच्या तोकड्या स्कर्टबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करणारं पत्र लिहीलं होतं.

एका ठिकाणी त्याचा गौप्यस्फोट करण्यात आला होता. टीव्हीवर सर्कशीतली ती यौवना स्कर्टमधे असताना आजोबांनी टीव्ही उलटा ठेवून पाहीला होता.... Wink

दोघेही अर्थातच पुणेकर Happy

पुणेरीपण हे पुण्यात राहील्यानेच, जन्म घेतल्याने प्राप्त होतं असं नाही. आपल्याबद्दल, शहराबद्दल अवाक्षरही चालवून न घेणं , उसळून प्रत्त्युत्तर देणं यालाच तर पुणेरीपणा म्हणतात...जो वैश्विक आहे. बरोबर ना शर्मिलाजी ? Wink

पुण्याची तुलना आधी मुळात मुंबईशी करणच चुकीचं आहे. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय, भिन्न संस्कृतींना एकत्र नांदवणारं शहर आहे. मुंबईकरांची मनोवृत्ती त्याला साजेशी आपोआप बनते. मग तो जन्मलेला असो तिथे किंवा बाहेरुन येऊन स्थिरावलेला असो. मुंबईचे जे गुण-दोष असतील ते असतील. पण पुण्यासारख्या प्रादेशिक शहराशी तुलना हाच मुळात अन्याय आहे मुंबई आणि मुंबईकरांवर. पुणेकरांनी आपल्या शहराची तुलना कोल्हापूर, नागपूर, सातारा वगैरे शहरातील नागरिकांशी खुशाल करावी. उगीच मुंबईकरांना आपल्या पंक्तित बसवायचा प्रयत्न करु नये>>>>>>>>>>>>>>>>>>>

कसं बोललीस शर्मिला. यापुढे काही बोलण्यात पॉईंटच नाही. मुंबई मेरी जान. Happy

पुण्याची तुलना आधी मुळात मुंबईशी करणच चुकीचं आहे. >>>

किस खुषीमे म्हणे? दोन्ही शहरे महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रातील सर्वात प्रगत तीन शहरात मुंबई, पुणे व नागपूर आहेत. भाषा समान आहे. संस्कृती समान आहे. (म्हणजे मुंबईतील मराठी माणसांची संस्कृती महाराष्ट्रीयनांसारखीच आहे, ती काही आंतरराष्ट्रीय नाही. गणपती बसवणे, दिवाळी, लग्न, मुंजी वगैरे!)

मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय, भिन्न संस्कृतींना एकत्र नांदवणारं शहर आहे. >>>>

Rofl

यात मराठी मुंबईकरांचं कंट्रिब्युशन एक तर काहीही नाही. व्यवसाय सगळे 'त्या दृष्टीने' परक्यांच्या हातात. आणि पुण्यात आहेत की मुसलमान, ख्रिश्चन, सिंधी अन काय काय! उलट पुण्यात दंगेधोपे होत नाहीत.

मुंबईकरांची मनोवृत्ती त्याला साजेशी आपोआप बनते. >>>

आणखीन एक जनरलायझेशन!

मुंबईचे जे गुण-दोष असतील ते असतील. पण पुण्यासारख्या प्रादेशिक शहराशी तुलना हाच मुळात अन्याय आहे मुंबई आणि मुंबईकरांवर. >>>

अन्याय झाला तरी मुंबईतील दैनंदिन आयुष्य चालूच राहते कारण मुंबईकर शूर असतात. तेव्हा अन्यायाला वाचा कशाला फोडताय? Lol

पुणेकरांनी आपल्या शहराची तुलना कोल्हापूर, नागपूर, सातारा वगैरे शहरातील नागरिकांशी खुशाल करावी. उगीच मुंबईकरांना आपल्या पंक्तित बसवायचा प्रयत्न करु नये>>>

अयायायायाया! प्लीजच नका हो इतक्या विनोदी लिहू ! मुंबईकरांना पुणेकरांनी पंक्तीत बसवून घेऊच नये हेच तर मी सांगतोय आधीपासून! Lol

================================

बाकी, कोणत्याही शहराचे चांगले वाईट मुद्दे असणारच म्हणा, पण पुणेकरांवर जी एक तलवार उपसली जाते तिच्यात आता तरी फारसे तथ्य राहिलेले नाही.

-'बेफिकीर'!

पुणेकरांनी आपल्या शहराची तुलना कोल्हापूर, नागपूर, सातारा वगैरे शहरातील नागरिकांशी खुशाल करावी. >> नाही कोल्हापूर, नागपूर, सातारा ही शहरे पुणे व मुंबई पेक्षा चांगली आहेत. Happy

मला दिल्ली खुप आवडते. मुंबईशी नक्कीच तुलना करता येइल कारण हे शहर पण आंतरराष्ट्रीय, भिन्न संस्कृतींना एकत्र नांदवणारं शहर आहे. Happy मुंबई पेक्षा शांत आहे,clean आहे. infrastructure is 100 times better than mumbai. प्रदुषण कमी आहे. फक्त law & order चा प्रोब्लेम आहे.

अजून चाल्लंच आहे का ?
बाकी जोडप्यापैकी एक मुंबईचा अन एक पुण्याचा असला की वाईट्ट अवस्था होत असावी. अनुभव टाका बरं.. >>> माझी बहीण आहे उदाहरण. जन्म अन २५ वर्ष पुण्यात, (तेही सपेठेत). नवरा जन्माने नसला तरी बरीच वर्षे राहून पक्का मुंबईकर. :). अजून तरी मेजर खटके नाहीत. लोकांनी आधी फारच घाबरवलं होतं (दोघांनाही ;)). सध्या तरी तिच्या ऑफीसजवळ रहात असल्याने लोकल्स चा अनुभव फक्त वीकेंड्सना. पण मुंबईचा स्पीड, लाईफ, फ्लो, मेट्रो फील हे सगळे सध्या तिला आवडते आहे. अर्थात पुण्यावरचे प्रेम तीळमात्रही कमी झालेले नाही. Happy

चौकट राजा, लेख वाचला, पोचला व्यवस्थित.. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही प्रयत्नपुर्वक योग्य शब्दात मांडलंय.. Happy
पण काही लोकांना लेखात पुणे-मुंबई किंवा पुण्याची इतर कोणत्याही शहराशी तुलना होऊन वाद वाढतील इतकेच मुद्दे दिसतात त्यामुळे इथे चाललेली तुरळक तलवारबाजी अपेक्षित होती.
या लेखावरची राम आणि शर्मिला ची पोस्ट अतिशय सुंदर आणि मुद्देसुद आहे.

मला वैयक्तिक रित्या असे वाटते की कोणत्याही शहराची इतर कोणत्याही शहराशी तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणचे रहिवासी हे तिथल्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीनुसार वागत असतात. त्या अनुषंगाने अचारातले वैविध्य हे वाद घालण्यासाठी उपयुक्त ठरू नये.

वर कुणितरी >> मुंबईकरांमधे दम नाही. बाँबस्फोट होऊनही यांना काहीच वाटत नाही. >> असं वाक्य लिहिलं आहे. ते वाचल्यावर शर्मिलाजींना ते असंवेदनशील वाटलं, ते योग्य आहे, पण या वाक्याचा दुसरा अर्थ जो मला वाटतो तो असा आहे की मुंबईकर कोणत्याही आपत्तीला घाबरत नाही, तर येतील त्या सर्व संकटांना सामोरा जातो. कारण राजकिय परिस्थीती... तसंच २६ जुलैच्या पावसात मुंबईकरांनी एकमेकांना दिलेला धीर... खरंच वाखाणण्याजोगा आहे, हिच परिस्थिती पुण्यात आली तर पुणेकर सुद्धा नक्की एकमेकांना होल्ड करतील... देव करो आणि अशी परिस्थीती ना पुण्यावर येवो ना मुंबईवर. वरची उदा. फक्त परिस्थीतीला सामोरं जाण्यासाठीची मानसिकता दाखवण्यासाठी दिली आहेत. अशी अनेको उदा. देता येतील जिथे पुण्यातल्या लोकांच्या पॉझिटिव्ह गोष्टी दाखवता येतील. रामने त्या दाखवल्याच आहेत. दुसर्‍याच्या प्रायव्हसीचा रिस्पेक्ट ही सर्वात मोठी गोष्ट इतर शहरातल्या लोकांना खडूसपणा, अलिप्तपणा वगैरे वाटते.

मूळात कोणत्याही शहराच्या मानसिकतेवर टिका-टिप्पणी करणारे आपण कोण? जिथे राहतो, तिथे रूळून तिथले होऊन जातो. आज मी ही पूण्यात १६ वर्ष रहातेय. पूण्यात रमायला मला बरीच वर्ष लागली.. माझीही मतं अशीच होती की इथले लोक सेन्सिटिव्ह नाहीत. पण हळूहळू पुण्याचे आयुष्य जगायला लागल्यावर कळू लागले..
म्हणतात ना..
पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा
जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे....

अजून चालूच आहे की... श्री राज ठाकरे यांना या बा.फ. ची लिंक पाठवा रे Happy
असो. ते बाँबस्फोट वगैरे मात्र आवरा...

>>पण मुंबईचा स्पीड, लाईफ, फ्लो, मेट्रो सिटी हे सगळे सध्या तिला आवडते आहे.
अर्थातच, "अपग्रेड" झालेलं कुणाला नाही आवडणार? Happy
~द

माझे या लेखावरील प्रतिक्रियांमध्ये प्रामुख्याने नीधप यांना अनुमोदन आहे. तेही तसेच, जोरदार वगैरे!

असो,

पुणे पुणेकर तुम्ही ग्रेट आहात पुणे हे एक महान लोकांचे शहर आहे, शांत शहर खुपच गोड शहर उच्चप्रतिचे विचार करण्याची क्षमता प्रत्येकात असलेले शहर...पुण्याच्या संस्कृतिची महानता जगविख्यात असेल...आहे...सदा राहो....मला काहीच प्रोब्लेम नाही, हरकत नाही, याची काहीच खंत नाही. मी माझ्या अता पर्यंत च्या अयुष्यात कधीच पुण्या बद्दल पुणेकरा बद्द्ल (अगदी दुसर्‍या शहरां बद्द्लही) हिन विचार मनात आणले नाही....ते कधी येणारही नाही...प्रत्येक गाव हे कालांतराने शहरात रुपांतर होणार असतेच यावर माझा विश्वास आहे... आणि 'भुगोल' पाहुन मी 'माणुस' ओळखत नाही.

मुंबई...चा विकास होताना मी पाहीले आहे...परप्रांतिय इथे वसताना आणि मुंबईकर देशा बाहेर जाताना पाहीले आहे.
नैसर्गिक सौंदर्य विलोप होताना पाहीले आहे...जंगल-झोपड्या उजाडुन इमारती होताना पाहीले आहे....याच लोकांना वनसंरक्षाणासाठी आंदोलने करतानाही पाहीले आहे...पण 'बदल' ही काळाची गरज आहे... त्याचेच प्रयोजन असुनही याला खुद्द 'विधाता' ही रोखु शकत नाही.

पण काही प्रतिसादांमध्ये 'आम्ही ग्रेट आहोत' म्हणण्यासाठी 'तुम्ही ग्रेट नाही' हे दाखवाताना पुणेकरांच्या मनाची संकुंचित वृत्ती दिसुन येते.
मुंबईकरांच्या प्रत्येक प्रतिसादात समजंसपणा दिसुन येत आहे...प्रत्येक प्रतिसादात चांगले/वाईट या दोन्ही बाजुने विचार मांडले आहे...तसेच लेखकाच्या विचारांचे स्वागतही केले आहे. Happy
पुणेकरांच्या प्रतिसादात 'आम्हीच ग्रेट' हे दाखवण्याचा..आणि तुम्ही 'फडतुस'.... तेही कसे फडतुस Lol हे ही दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

पुणे, पुणेकर (सर्वच नगरकर) ग्रेट आहेत...मला काही हरकत नाहीय्...या बाबतीत.
पण मी आणि माझी मुंबई जसे आहोत तसे आहोत याचीही खंत नाही. Happy

फारच अवांतर प्रतिसाद देत आहे, मुळ लेखाशी त्याचे काहीही संबंध नाही.

मुंबई मधे तुम्हाला फक्त गटारेच दिसली का हो, मुंबई चे ऐश्वर्य दिसले नाही वाटतं.

Hmmmm, The Grapes are sour. Wink Proud

अजुन ही फार आहे पेटवण्या सारखं, पण सच्च्या म्हमईकरा सारखे आवरतं घेतोय.

दिवा नाही पुर्ण ट्युब लाईटच घ्या Wink Tube Light_1.jpg

Proud

बेफिकीरांचे मुंबई आणि कोकणातल्या लोकांबद्दलचे विचार म्हणजे अगदी त्यांच्या विनोदी लेखनासारखे आहेत............ पण त्यांना कोण थांबवणार????? हाडामांसाचे पुणेकर ते.... चालू द्या.

पुण्यात आता अस्सल पुणेकर फारसे शिल्लक नाहीत. जे आहेत ते हळूहळू लोप पावत आहेत. आयटीमुळे पुण्यात आता परप्रांतीय मोठ्या प्रमाणावर स्थायिक झालेले आहेत. मुळात अस्सल पुणेकर असलेल्या पेठांमधले (सदाशिव, नारायण, शनिवार, कसबा इ.) बरेचजण कोथरूडला रहायला गेले आहेत. त्यामुळे आता अस्सल पुणेरी फारसे पहायला मिळत नाहीत.

मी कोथरुडातच राहतो. त्यामुळे असले नमूने मला भेटतातच.
रच्याकने, कोथरुड या शब्दाचं यमक खत्रूड या शब्दाशी किती छान जुळतं, नाही? Wink

मी कोथरुडातच राहतो व माझे बालपण सदाशिव व शनिवार येथेच गेलेले आहे.

मला कोथरुडात कोणतेही नमुने भेटत नाहीत. Lol

मास्तुरे, मी अस्सल पुणेकर आहे.

Lol

शक्य आहे भुंगा!

अवांतर - मी आपल्याला उद्देशून किंवा आपले नांव घेऊन एकही प्रतिसाद दिलेला नाही. आपला हा तिसरा चौथा असावा. Happy

-'बेफिकीर'!

<<मी कोथरुडातच राहतो व माझे बालपण सदाशिव व शनिवार येथेच गेलेले आहे>>

माझा 'पुणे हे संस्कृतीचे माहेरघर आहे' यावरचा विश्वास उडाला Light 1 Rofl

माझा 'पुणे हे संस्कृतीचे माहेरघर आहे' यावरचा विश्वास उडाला >>> Rofl

मी त्याला अपवाद आहे काकासाहेब!

मला कोथरुडात कोणतेही नमुने भेटत नाहीत. >> आपल्याच पंथातल्या लोकाना आपलेच रंग काय दाखवणार नाही का? Proud Lol

(नशिब इथे Light 1 देण्याची सोय आहे ते.)

>>> मास्तुरे, मी अस्सल पुणेकर आहे.

बेफिकीरपंत,

मला तुमच्याबद्दल कोणतीच शंका नाही. मला एवढेच म्हणायचे होते की जागतिकीकरणाचे परिणाम आता पुण्यात देखील जाणवत असून अस्सल पुणेरी ही जमात हळूहळू कमी होत आहे. पुण्याची मुंबई होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

आपल्याच पंथातल्या लोकाना आपलेच रंग काय दाखवणार नाही का?>>

Lol

तसे नाही दक्षिणा, काही नॉनपुणेकरहि तेथे राहतात म्हणून म्हणालो. Happy

अवांतर - मी आपल्याला उद्देशून किंवा आपले नांव घेऊन एकही प्रतिसाद दिलेला नाही. आपला हा तिसरा चौथा असावा.
>>>>>>>>

बेफी हा फक्त दुसरा होता..... इथेही अतिशयोक्ती अलंकाराचा सढळ वापर Light 1

Pages