सर्वात आधी मी हे सांगु ईच्छितो कि हा लेख लिहिण्यामागे कोणत्याही एका लेखकाची वा त्याच्या लेखाची मापे काढणे हा हेतू नाही. बर्याच दिवसांपासुन ह्या विषयावर लिहायचं मनात होतं पण काही ना काही कारणानी राहुनच जात होतं. काल "डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा" हा लेख वाचला आणि माझ्यातला पुणेरी बाणा जागा झाला!.. आणि मग ठरवलं कि आज लिहुनच टाकुयात मनातल. तेव्हा कविताबाई, तुमचा लेख हे फक्त निमित्त झालय.. तुमची लिहिण्याची शैली, लेखाची मांडणी उत्तम आहे. मी फक्त विषयावर थोड भाष्य करु ईच्छितो...
*****************************************************
तर मी पक्का पुणेकर. वयाची पहिली २५ वर्ष पुण्यातच काढली आणि मग थेट अमेरिकेत येऊन पोचलो. इथे आल्यावर मला पहिल्यांदाच कळालं कि पुणेकर प्रचंड special असतात. कारण आजुबाजुचे मराठी मित्रसुद्धा बोलताना वाक्याची सुरुवात "तुम्ही पुणेकर.." अशी करत होते. आणि मग "तुमच्या पुण्यात / पुण्या-मुंबई कडे" असे टोमणे येता जाता ऐकू यायला लागले. अगदी महाराष्ट्र मंडळात पण असेच उल्लेख ऐकायला मिळाले. वर जाता जाता पु.लं.च्या 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मधली वाक्य पण लोक ऐकवत होते.
तसे कॉलेजमधे असताना माझे अनेक मित्र नांदेड, नागपुर, नाशिक (माफ करा 'नासिक'), जळगाव, धुळे (माफ करा 'धुलिया') चे होते. तसेच इथेही आहेत. पण आम्ही कधी त्यांना कोणाला त्यांच्या गावावरुन एवढं 'गौरवल्याच' आठवत नाही. मग प्रश्न असा पडला कि केवळ पुणेकरांना का एवढा 'मान' मिळतो? बरीच मंडळी आधी सांगताना जोरात सांगतात कि "आम्ही अमुक अमुक गावचे, पण आता रिटायर झाल्यावर आई बाबा पुण्याला असतात." किंवा "परवाच पुण्यात फ्लॅट बूक केला बर का"... आणि मग येतं, 'काय हो तुमच्या पुण्याचा ट्रॅफिक!, काय पण पुण्याचे रिक्शावाले!, काय ते पुण्याचे दुकानदार!, काय चितळ्यांसमोरच्या रांगा!, काय हो पुण्याचे रस्ते!, वगैरे..वगैरे'. हल्ली महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपर्यातून आलेल्या प्रत्येकाला पुण्यातच का घर घ्यायच असतं? आणि एवढाच पुण्यात त्रास आहे तर का एवढा पुण्यात रहाण्याचा अट्टाहास? मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच, पुण्यात रहायला यायचच कशाला?
तो 'मुंबई पुणे मुंबई' चित्रपट लोकांना प्रचंड आवडला पण मला त्या नायकाची (पेक्षा लेखकाची) कीव आली. आजपर्यंत कोणीही पुणेकर असा जाता येता 'मग जाज्वल्य अभिमान आहे' असं म्हणताना मी बघितला नाहिये. "तो चित्रपट आहे, त्यात जरा मेलोड्रामा असणारच," असं म्हणुन स्वतःची समजुत काढली तर लोक नंतर तो संवाद ऐकवून आमचीच टिंगल करत होते. तसच आता हा 'डोंबिवली स्पेशल....' लेख. गेली अनेक वर्ष डोंबिवलीमधे रहाणार्या आणि तिथेच व्यवसाय करणार्या त्या मूनमून मिसळवाल्या बाईंना 'पुणेरी' बाणा का चिकटवायचा? डोंबिवलीतच तशाच तिखट जिभेच्या कोणी बटाटेवडा विकणार्या बाई आहेत हि माहिती प्रतिसादांमधुन कळाली. म्हणजे प्रत्येक शहरात अशी मंडळी असतातच. मग त्यांना 'पुणेरी' बाणाच का नेहेमी चिकटवायचा? पु.लं. नी 'पुणेकर, मुंबईकर..' लिहुन आता ४० वर्ष झाली. पण तेव्हाचा पुणेकर आणि आत्ताचा पुणेकर बराच वेगळा आहे. किती वर्ष हे stereotyping करत रहाणार आपण? गावोगावी असे लोक सापडतातच.
आता उदाहरण म्हणून "टायगर ऑईल कंपनी, ह्युस्टन" असं गूगल करा. त्या कंपनीच्या मालकानी त्याच्या कर्मचार्याना लिहिलेले मेमो तुम्हाला दिसतील. (आणि ते वाचून कृपया "मालक पुण्याचे दिसतात" असा निष्कर्श काढु नका!!) त्यातल्या त्यात जमेची बाजु म्हणजे 'आता पुणं कात टाकतय' हे पण 'डोंबिवली स्पेशल....' लेखात वाचयला मिळालं. म्हणजे पुणं आता बदललय हे आता लोक जरातरी मान्य करायला लागलेत.
मी असं अजिबात म्हणत नाही कि पुणेकर चिकित्सक नसतात. ते जरा जास्त चिकित्सक असतातच आणि ते तसे असतात कारण अगदी काही वर्ष आधीपर्यंत पुणं महाराष्ट्रातलं एकमेव सांस्कृतिक केंद्र होतं. तिथल्या लोकांनी नेहेमी जर का जागतिक किर्तीच्या कलाकारांना (ह्यात लेखक, गायक, नट, नाटककार, कवी सगळे आले) बघितलं असेल तर आपोआप अपेक्षा ऊंचावणारच. आणि मग ते साध्या कलाकारांच्या चुका काढताना दिसतात. कदाचित म्हणूनच अनेक कलाकार म्हणतात कि पुण्यात टाळी मिळणं सगळ्यात अवघड आहे. पण आता इतर सगळीकडे मोठे मोठे कार्यक्रम होतात. दूरचित्रवाणीमुळे सगळीकडच्या प्रेक्षकांना आता उत्तमोत्तम कलाकारांच्या कलाकृती बघायला मिळतात. पण अजुनही कोणी एखाद्या कार्यक्रमावर जरा टिका केली कि बाकिचे विचारतात,"तुम्ही पुण्याचे का हो?". माझं त्यातल्या गंमतीशी काही वाकड नाही, मला टोचतो तो त्यातला कुत्सित्पणा.
चितळ्यांच्या दुपारी दुकान बंद ठेवण्याला नावं ठेवणारे लोक त्याच चितळ्यांच्या बाकरवड्यांवर तुटुन पडतात. कोणी पुण्याहुन येत असेल तर बाकरवड्या, आंबा बर्फी अगदी मागवुन घेतात. आणि परवाच एक जण अत्यंत चिडुन सांगत होता कि चितळे हल्ली प्लॅस्टिकच्या पिशव्या देत नाहीत. आता तक्रार करायची म्हणून काहीही करायची का? ते चांगले प्लॅस्टिक कमी करायला मदत करत आहेत असं का बघायचं नाही? पुणेरी पाट्या ह्या नावाखाली कोणत्याही गावतल्या पाटया टाकतात हल्ली लोक. त्यातल्या बर्याच पुण्यात नसतातही पण लिखाण जरा खोचक असलं कि त्या पाटीला पुणेरी म्हणायचा शिरस्ताच पडला आहे.
हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच कि ह्याचा मनाला त्रास होतो. आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का?
*****************************************************
ता.क. - मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. चुक भूल द्यावी घ्यावी..
कळावे,
लोभ असावा.
मंजो यांनी वर्णिलेले प्रसंग
मंजो यांनी वर्णिलेले प्रसंग हे केवळ उदाहरणे आहेत, त्यावरून जनरलायझेशन करु नये.
जरासं अवांतर : जनगणना करणार्या कर्मचार्यांचे हे मुंबईतले अनुभव वाचायला मिळाले. त्यात उच्चभ्रू/उच्च मध्यमवर्गीय वस्तीत या कर्मचार्यांना घरातही न घेता, व्हरांड्यात्/जिन्यात उभे ठेवून माहिती दिली गेली. तेच चाळींत्/झोपडपट्टीत घरात बसवून चहा ऑफर केला गेला. त्यांना घरोघर फिरायला लागू नये, म्हणून त्याघरातले लोक शेजार्यांना आपल्या घरी बोलवून त्यांची माहिती नोंदवायला मदत करत होते.
साहित्य विनोद इत्यादी सोडून
साहित्य विनोद इत्यादी सोडून दिलं तरी बाहेरून काही काळासाठी पुण्यात आलेल्या लोकांचे अनुभव 'पुणेरी' स्वभाव दाखवून जातात. पंचवीस तीस ठिकाणी राहीलेल्या माणसांना विचारून पहा (म्हणजे माझ्यासारख्या), पटकन पुण्याची उदाहरणं लक्षात येतात. तेव्हा मुळात काहीतरी आहेच, ते आता अतिरंजीत केलं जातंय.. एकाद्या जागेबद्दल असं म्हटलं म्हणून तिथले सगळेच तसेच वागतात असं कधीच नसतं. सगळे सरदार दिवसभर विनोदीच वागतात, सगळे 'बाल्या' भांडी घासतात असं म्हणण्यासारखं आहे. या लेखाबद्द्ल कुणाशी तरी बोलताना देखील त्या बाईनी (म्हणजे कुटूंब पुण्याचे पण वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे भारतभर फिरलेले) दोन तीन अशी शेलकी उदाहरणं सांगितली की त्यांना पुणे असं का वाटलं ते पटकन कळलं. माझेही अनुभव काहीसे असेच आहेत आणि माझ्या वडिलांचेही.
आता पुणं बदललंय, शहरीकरण झालंय, पण ते काही दिवसानी ओळखूही येणार नाही एवढं शहरी होईल. दोन तीन वर्षांपूर्वी एका मायबोलीकराबरोबर रिक्षात बसताना त्याने, 'स्वारगेट चलो' अशी हिन्दी हाक दिलेली ऐकलीय जी मला फार खटकली. मग कदाचित ते बदललेलं पुणं पाहण्यापेक्षा मला जुनं पुणं आवडेलही...
आमच्या वेळचं पुणं असं नव्हतं
आमच्या वेळचं पुणं असं नव्हतं हो........
वैद्यबुवा, बस्के, सायो, भरत,
वैद्यबुवा, बस्के, सायो, भरत, मित, भुंगा, मैत्रेयी, मंदार, कविता, राम, चातक, परदेसाई - सर्वांचे आभार.
भरत - हा विषय महत्वाचा वाटला कारण मी इथे लोकांना त्यावरून विभागताना पहिलं. 'महाराष्ट्र मंडळात सगळे पुण्याचे लोक पुणेरीपणा करत बसतात' असं म्हणून तिथे कधीही न फिरकणारी मंडळी बघितली. एक दोन मित्रमंडळींना बोलताना हा विषय काढल्याशिवाय बोलताच येत नाही जणू. जेव्हा हे मजेत चालतं तेव्हा त्यातली मजा कळते पण जेव्हा त्याचे टोमणे, शेरे होतात तेव्हा त्यातला मत्सर दिसतो. बाकिच्या गावच्या लोकांबद्दल सुद्धा बोललं नक्कि जातं पण पुणेकरांबद्दल जेवढं सारखं बोललं जातं तेवढ नाही. म्हणून लिहावसं वाटलं.
भुंगा, चातक - >>कमी अधिक प्रमाणात हे सगळ्याच प्रांतात आणि देशात असतं..... छुपं प्रादेशिक द्वंद्व म्हणा हवं तर >> हेच असू नये असं मला वाटत. अधून मधून असे विनोद ऐकायला मिळाले तर एवढं वाटलं नसतं.. हल्ली जरा जास्तच होतय आणि त्याचा कंटाळा आलय. या लेखात त्याविषयी मनस्ताप आहे, निषेध नाही. आपल्या बाकीच्या मुद्यांवर मी सहमत आहे.
मंदार - तुम्हाला असे अनुभव आल्याचं खूप वाईट वाटलं. खरच वारंवार असे अनुभव आले तर वैताग येणरच. पण अश्विनीमामींनी म्हटल्याप्रमाणे पुण्यात खरच खूप लोक घरगुती अगत्य दाखवतात. तुम्हाला त्याचासुद्धा लवकच अनुभव येईल अशी आशा आहे. राम ह्यांनी म्हटल्याप्रमाणे "इथे खुप सभ्य, सुसंस्कृत आणी शांततामय जिवनाची अपेक्षा असलेले लोक रहातात. इथे लोकाना स्वताच्या आणी दुसर्याच्या प्रायव्हसीची जाणीव असते आणी त्यांचे वागणे सुद्धा त्याला अनुसरुनच असते... काही फार थोडे लोक खवट सुद्धा भेटले पण याचा अर्थ खवटपणा किंवा तुसडेपणा ही पुण्याची ओळख किंवा संस्कृती नाही". असा अनुभव आल तर जरूर कळवा. नाहीतर माझ्या घरच पत्ता देतो, एकदा नक्कि जाऊन या
राम - तुमचा प्रतिसाद वाचुन छान वाटलं. मला हेच म्हणायचं होतं. धन्यवाद.
>>अगदी काही वर्ष आधीपर्यंत
>>अगदी काही वर्ष आधीपर्यंत पुणं महाराष्ट्रातलं एकमेव सांस्कृतिक केंद्र होत<<
माझ्यासाठी नविन माहिती. उदाहरणं देऊन स्पष्ट कराल? हाच गोड गैरसमज (दुर्दम्य दूराभिमान) टिंगल्-टवाळीला उध्युक्त करतो असं तुम्हाला नाहि वाटत?
महाराष्ट्र मंडळात माणसं कां तुटतात हा एक प्रबंधाचा विषय आहे. त्या एव्हढ्या मोठ्या राजकारणात, पुणेरी बाणा/वाद म्हणजे "किस झाडकि पत्ती".
तोंडातून एकही शब्द नाही. कधी
तोंडातून एकही शब्द नाही. कधी चावी घेतली आणि घरात कुणी नसेल तर चहा तर सोडाच, पाणीही कधी विचारलं नाही.
तरी मला चक्क पाणी मागावं लागलं तेव्हा मिळालं.
तेव्हा पुण्यात (की पुणेरी कुटुंबात??) घरगुती अगत्याची पद्धत आहे असा विनोद मला तरी सांगू नका.
=======================================
हा किस्सा केळशीचा...
ज्यावेळी पोचलो त्यावेळी रात्र झालेली होती, गावात लाईट गेले होते. ज्यांच्याकडे राहणार होतो त्यांचे घर वापरात नव्हते..समोरच्या घरातून चावी घेऊन तिथे एक रात्र राहून सकाळी पुढे जाणार होतो. चावी घ्यायला समोर गेलो त्यांनी हातात चावी ठेवली आणि दार लाऊन घेतले. अर्थातच प्यायला पाणी कुठेही नव्हते. घाबरत घाबरतच त्यांचे दार वाजवले आणि प्यायला पाणी मागितले. त्यांनी दोन भांडी भरून पाणी दिले.
"नाही, रात्रीपण लागेल. एवढी बाटली भरून पाणी देता का.??"
आम्ही आमचीच पाण्याची बाटली पुढे करत.
त्यावर त्या बाईंनी अत्यंत रुक्षपणे आत्ता लाईट गेलेत, ही आमची बाटली घेऊन जा आणि उद्या सकाळी जाताना परत द्या असे सांगितले.
त्याहून कहर म्हणजे जेवायची व्यवस्था त्याच घरी होणार आहे असा निरोप होता पण त्याचाही काही पत्ता नाही..
त्यामुळे जरा संकोचानेच इथे जेवायची काय व्यवस्था
"जेवायला, आत्ता...???"
"असं करा इथून गावात जा, तिकडे होईल काहीतरी..."
मग त्या चिखल, पाण्यातून, अंधारात वाट काढत कसेतरी एका खानावळवजा घरी पोहोचलो. अत्यंत अदबीने जेवायची काय सोय होईल का विचारले..आणि जणू काही आम्ही फुकटे आलोय अशा थाटात त्या खानावळ मालकांनी सुनावले, "आता काही मिळणार नाही. दुसरीकडे काय मिळतेय का पहा.."
तेव्हा असे विनोद तुमच्याही गावी होतात मुंबईकर...
ह लेख लिहीलात तिथेचे पुणे हे
"इथे मुर्खा सारखे वळू नका" अशा नो एंट्रीच्या पाट्या पुण्यात पाहिल्यावर हसू येणारच, पुणेकर दुकानदार, खादाडी, ई. ई. विनोदी आहेच. हे मान्य करा मनस्ताप कमी होईल. बाकी लोकं एकाच दोन करुन सांगणारच आणि समोरचा चिडतो म्हंटल की दोनाचे चार, तेंव्हा जेवढ कमी रिअॅक्ट व्हाल तेवढ बरं. लोक पुण्यात जागा घेत आहेत यात अभिमानास्पद काय? मुंबईत गेली कित्येक दशके, देशभरातुन काय तर जगभरातुन येऊन लोक जागा घेतात (आता त्या साठी कुवत असावी लागते) पण त्यात अभिमानास्प्द काय आहे?
पुलं नी "जाज्वल्य" हे उगाच म्हंटलेलं नाही.
हे मान्य करा मनस्ताप कमी
हे मान्य करा मनस्ताप कमी होईल.>>> ????
काय मान्य करायचे? मुंबईत घामाघूम व्हायला होते तरी मुंबई मस्तच! चौपाटीचे गटार झाले आहे तरी मुंबई मस्तच! लोकलमध्ये आयुष्य जाते तरी मुंबई मस्तच! रात्री दहा ही घरी येण्याची नॉर्मल वेळ असू शकते तरी मुंबई मस्तच! वाशीपासून पुढे निघाले की रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाले, ओढे आणि अत्यंत सुंदर रमणीय अशी गटारे आहेत तरी मुंबई मस्तच! कचराकुंडीच्या शेजारी पाणीपुरी खावी लागते तरी मुंबई मस्तच! मुंबईचे लोक मुंबईच्या एकंदर प्रकारांना वैतागून आणि मुख्य म्हणजे फक्त पुण्यात परवडते म्हणून पुण्यात येऊन पुणेकरांनाच शिव्या देत बसतात तरी मुंबई मस्तच! पावसाने दैना उडते, ड्र्नेजेस ब्लॉक झाल्याने तारांबळ होते आणि चक्क माणसे मरतात तरी मुंबई मस्तच! पुणेकर भेटला की चितळे, पुल आणि पुण्यातील इतर दुकाने याशिवाय स्वतःची अशी काहीही विनोदीक भर घालता येत नसली तरीही हासणार्यांची मुंबई मस्तच!
पोरं बापाला फक्त रविवारीच पाहू शकत असल्याने मामा म्हणतात आणि बापाचा मामा होतो तरी मुंबई मस्तच! लोकल अंगावरून गेल्याने मेलेला माणूस कुणाचाही कुणीही नसल्याने अर्धा तास तसाच पडून राहतो तरी मुंबई मस्तच! आला होता याला 'आलेला', दिसला होतास याला 'दिसलेला' अशी भ्रष्ट रुपे आणून मराठीला एक तिरस्करणीय छेद देण्याचे कर्तृत्व याच लोकांचे! पण मुबई मस्तच! बाकी, हा वाद जरी आता पुणे विरुद्ध मुंबई असा होत असला तरी मुंबईतील माझे मित्र नातेवाईक यांना उद्देशून पर्सनली काहीच नाही आहे, त्यांनी जरी मला उद्देशून काहीही लिहीले तरी!
केवळ गुजराथ्यांनी आणि दाक्षिणात्यांनी चालवलेल्या या महानगरीचे कौतुक मराठी माणसाने करणे हा १९८० नंतरचा मोठा विनोद आहे.
-'बेफिकीर'!
@ आशुचँप माझी पोस्ट आणि तुमची
@ आशुचँप
माझी पोस्ट आणि तुमची पोस्ट नीट वाचलीत तर तुमच्या पोस्टीतल्या काही गंभीर चुका तुमच्या नक्की लक्षात येतील.
मी त्या प्रभात रोडवरच्या ज्या घरात राहत होतो तिथे मी तीन महिने राहत होतो. त्या आधी माझी पत्नी (लग्ना आधी) तिथे पाच वर्ष राहत होती. त्यामुळे शेजारच्या त्या काकूंशी तिची चांगलीच ओळख होती आणि त्या माझीही ओळख झाली होती. तुमच्यासारखा मी तिथे अनोळखी नव्हतो. शिवाय दुसर्या अनुभवात ज्या घरी मी पाणी मागावं लागलं तिथेही मी येणार हे चांगलंच माहित होतं आणि महत्वाचं म्हणजे ह्या दोन्ही घरी मी दिवसाढवळ्या गेलो होतो. आणि ही दोन्ही घरे शहरातली होती.
घरात बाईमाणसं असतात, तेव्हा भारतातल्या कुठल्याही
(१) गावात,
(२) रात्री ,
(३) लाईट गेलेले असताना,
(४) शहरातून बाईकवरुन आलेल्या काही अनोळखी पुरुष मंडळींनी दार ठोठावलं तर असंच अनुभवायला मिळेल.
अगदी तुम्ही येणार हे माहित असलं तरीही.
>>"नाही, रात्रीपण लागेल. एवढी बाटली भरून पाणी देता का.??"
आम्ही आमचीच पाण्याची बाटली पुढे करत.
त्यावर त्या बाईंनी अत्यंत रुक्षपणे आत्ता लाईट गेलेत, ही आमची बाटली घेऊन जा आणि उद्या सकाळी जाताना परत द्या असे सांगितले.
अरे वा, तुमची बाटली भरायची वाट न बघता त्यांनी स्वतःकडची बाटली दिली ते कुठेच गेलं....तुमच्या बाटलीला सोनं लागलं होतं का हो? कैच्याकै.

>>त्याहून कहर म्हणजे जेवायची व्यवस्था त्याच घरी होणार आहे असा निरोप होता पण त्याचाही काही पत्ता नाही..
त्यामुळे जरा संकोचानेच इथे जेवायची काय व्यवस्था
"जेवायला, आत्ता...???"
"असं करा इथून गावात जा, तिकडे होईल काहीतरी..."
हे मात्र मान्य (मूळचा मुंबईकर असल्याने चुका मान्य करण्याची सवय आहे
). आधी सांगून गेला होतात तर ती सोय व्हायला हवी होती.
पण पुन्हा तेच........ते गाव आहे, पुण्यासारख शहर नव्हे. पुन्हा सांगतो आख्ख्या भारतातल्या कुठल्याही खेड्यात जाताना असा अनुभव येऊ शकतो. तुम्ही नीट तयारीने जायला हवं होतं. खेड्यात गैरसोय ठरलेलीच.
>>तिथे जाताना मग त्या चिखल, पाण्यातून, अंधारात वाट काढत कसेतरी एका खानावळवजा घरी पोहोचलो. अत्यंत अदबीने जेवायची काय सोय होईल का विचारले..आणि जणू काही आम्ही फुकटे आलोय अशा थाटात त्या खानावळ मालकांनी सुनावले, "आता काही मिळणार नाही. दुसरीकडे काय मिळतेय का पहा.."
तुमच्याच पोस्टीत तुमचे उत्तर आहे. ते एका गावातले खानावळवजा घर आहे, वाट्टेल तेव्हा गेलात (तुम्ही रात्री गेला होतात) तर तुम्हाला खाऊ-पिउ घालणं कसं शक्य आहे?
मुंबईत असताना एकदा ऑफिसातून घरी परतायला उशीर झाला असताना रात्री पाऊण वाजता घाटकोपर रेल्वे स्थानका बाहेर पश्चिम बाजूस मी रस्त्यावर उत्तम पैकी पुलाव खाल्ला आहे. तसं पुण्यात किंवा उपनगरात शक्य आहे का? *आता प्लीजच पुणे रेल्वे स्टेशनचं आणि बाहेर उपलब्ध एखाद्या टपरीचं isolated उदाहरण देऊ नका.
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा,
की अनुभवाला अनुभव फेकायचाच असेल तोंडावर तर निदान परिस्थिती सारखी असेल असं बघा हो.
उदाहरण द्यायचं असेल तर मुंबईचं द्या किंवा एखाद्या शहराचं द्या, शहरातली घटना/अनुभव यांची तूलना केळशीसारख्या गावातल्या अनुभवांची कशी करता? नाहीतर मुकाटपणे पुणं हे अजूनही गाव असल्याचं मान्य करा (नाहीतरी पुणेकर पुण्यात ज्या प्रकारे गाड्या चालवतात आणि रस्त्यावरून बागेत फिरल्याप्रमाणे चालतात त्यावरून पुणे हे गावच असल्याचं समजतात ते दिसतंच) मग मी माझी विधानं सपशेल मागे घेतो.
@ चौकट राजा आणि आशुचँप
पुण्यात येताना मी कुठलाही चष्मा घालून आलो नव्हतो. म्हणजेच पूर्वग्रहाच्या कुठल्याही चष्म्याने या शहराकडे बघितलं नाही. ज्याला "ओपन माइंड" म्हणतात तेच ठेवलं होतं. कारण कुठल्याही नवीन शहरात जाताना वेगळेपणा असणारच. म्हणूनच हे अनुभव सुरवातीला आले तरी मी विचार केला की काही वर्ष राहून पुरेसा अनुभव घेतल्याशिवाय एखाद्या शहराविषयी एखादं मत बनवणं योग्य नाही. पण आज चार वर्ष झाली तरी असे अनुभव येणं सुरूच आहे. त्या टीपिकल काकू अजूनही तशाच आहेत.
कोणत्याही शहराचे दोष असतात तसे गुणही असतातच. तसे पुण्याचेही आहेतच. फक्त दोष आहेत असं मी म्हणणार नाही. पण शहरीकरण होताना कोणत्याही शहराचे काही विशिष्ठ गुण किंवा वैशिष्ठ्ये असायला हवीत ती मात्र या शहराने उचललेली दिसत नाहीत. तेव्हा गुण जसे आहेत पुण्याला तसे ठळक दोषही आहेत हे मान्य करायला हरकत नसावी. आम्ही मुंबईचे जसे मान्य करतो तसे. हा लेख गंभीरपणे लिहीला गेला म्हणून मीही प्रतिसाद गंभीरपणेच दिला. अन्यथा पुलंच्या विनोदांसारखं पुण्यावरच्या विनोदांना हलके घ्यायला हरकत नसावी (त्यातला खोल अर्थ विसरून फक्त अतिशयोक्ती अलंकार लक्षात ठेउन
)
चौकट राजा, लेख जमलाय.
चौकट राजा, लेख जमलाय. त्यामागची कळकळ जाणवतेय आणि थोडिशी पटलीही. नीरजा म्हणतेय तसं पुलंनी लिहिलं म्हणून तो त्या शहराचा गुण असं प्रत्येकजण गृहित धरून चालतोय. तोच चष्मा लावून बघायचं मग त्या शहरातल्या प्रत्येकाकडे.
इथे सिडनीत काही वर्षांपूर्वी एक पुणेकर बाई आणि एक नाशिककर बुवा ह्यांचं जाम वाजलं होतं. दोघंही पुलंचं वाचून बोलत असल्याचं जाणवत होतं...
अजून त्या कुटुंबांमधे "बोलाचाली" नाही... घ्या!
तेव्हा गुण जसे आहेत पुण्याला
तेव्हा गुण जसे आहेत पुण्याला तसे ठळक दोषही आहेत हे मान्य करायला हरकत नसावी. आम्ही मुंबईचे जसे मान्य करतो तसे>>
मुंबईचे आपण मान्य केलेले दोष काय काय आहेत ते कृपया सांगावेत.
बेफिकीर यानी मुम्बईबद्दल
बेफिकीर यानी मुम्बईबद्दल लिहिले आहे ते १०० टक्के सत्य आहे. मुम्बईसारखे घाणेरडे शहर जगात नसेल. जी काही सुन्दर स्वच्छ मुम्बैचे तुकडे दिसतात तिथे आपल्या बापाचे काय आहे? तिथे तुम्हाला रस्त्यावर मुम्बईकर अथवा महाराष्ट्रीयन नव्हे तर टूरिस्ट म्हणूनच फिरावे लागते. मध्ये मी यवतमाळला गेलो होतो . मला हे गाव खूपच आवडले. आटोपशीर स्वच्छ, झोपडपट्टीविरहित. झाडेझुडपे असलेले. आणि वैदर्भीय अगत्य असलेले...
मुम्बै म्हनजे झोपडपट्टी. धारावीला गरिबांची, दादर गिरगावला मध्यमवर्गियांची, मलबार हिलला उच्चभ्रूंची . वाळकेश्वर परिसरात इतकी घाण असते की इथे सगळ्यात श्रीमन्त लोक राहतात हे पटू नये. नरक कसा असतो कोनाला पहायचे असेल तर त्याने नक्कीच गिरगाव चौपाटीवर जावे. आणि ही म्हणे यांची 'फिरायला जाण्याची ' जागा...
मुम्बईहून आलेल्या भाच्यांची मराठी ऐकली तर खरेच एक श्रीमुखात द्यावीशी वाटते. तेच ते 'आलेलो गेलेलो...'
मातीचा गुण असतो हे जसे
मातीचा गुण असतो हे जसे पुण्याला लागू होते तसेच सर्वच भूभागांना!
कोकण हा प्रदेश कितीही निसर्गसौंदर्याने श्रीमंत असला तरी पिढ्यानपिढ्या येथील माणूसः
१. गरीब
२. भांडकुदळ व त्यामुळे आयुष्य खटल्यात घालवणारा
३. अत्यंत संशयी, सर्व जग आपला फायदा घेण्यासाठी निर्माण झालेले आहे याबाबत ठाम
४. दुसर्याची सातत्याने कुचेष्टा करणारा, कारण नाही दुसर्याचेही पाहवत आणि नाही स्वतःला काही करता येत!
असा असतो. कोकणातील जनता प्रामुख्याने मुंबईत शिफ्ट झालेली आहे. त्यामुळे मुंबईतही हे गुण प्रामुख्याने जाणवत राहतात. कोकणी वेटरला टीप दिली तर त्याला असे वाटते की आपण त्याला आता एखादे अधिक काम सांगू आणि त्यामुळे तो पळ काढतो टीप घेऊन!
लोकल अंगावरून गेल्याने मेलेला
लोकल अंगावरून गेल्याने मेलेला माणूस कुणाचाही कुणीही नसल्याने अर्धा तास तसाच पडून राहतो >>> अशक्य! अपघात दोन स्टेशन दरम्यान घडला असावा तरच शक्य आहे..तरी अर्धातास जास्त होतो.
केवळ गुजराथ्यांनी आणि दाक्षिणात्यांनी चालवलेल्या या महानगरीचे कौतुक मराठी माणसाने करणे हा १९८० नंतरचा मोठा विनोद आहे. >>> हो हे एक कटु सत्य आहे. भुषणराव.
मुम्बईसारखे घाणेरडे शहर जगात नसेल. >>> बाळ जोशी आपण १००% प्युअर, शुध्द्द 'पुणेकर' आहात हे सिध्द्द केले आहे... हे मीही कबुल करतो.
आपण वर उल्लेख केलेले मुंबईतील ठिकाण प्रत्यक्ष पाहीलेलेच नाही हेच दिसुन येते. आपल्याच जवळच्या माणसाकडुन एकुन आहात. पण तुम्ही हे मान्य करणार नाही. पुणेकर आहात ना.
फक्त मुंबई संदर्भात: कुणी
फक्त मुंबई संदर्भात:
कुणी मागीतल्यास सर्व मुद्दे सपुरावा-उदाहरण देउन स्पष्ट करु शकतो.
मुम्बै म्हनजे झोपडपट्टी. >>मुंबई म्हणजे गगन चुंबी इमारती, मुंबई म्हणजे स्वप्न, मुंबई म्हणजे अपेक्षा-आकांक्षा, मुंबई म्हणजे माया-मोह, मुंबई म्हणजे अश्रु-स्मित, मुंबई म्हणजे राग द्वेश, मुंबई म्हणजे आतंक विद्रोह, मुंबई म्हणजे दया माया प्रेम मदत, मुंबई म्हणजे सागर किनारा, मुंबई म्हणजे गटर्-नाळा, मुंबई म्हणजे ऋतुंची मजा, मुंबई म्हणजे दगा-धोका, मुंबई म्हणजे गरीब-श्रिमंत, मुंबई म्हणजे धैर्य-सबुरी, मुंबई म्हणजे आराम-व्यस्थताव्यग्रता, मुंबई म्हणजे शिल्-अश्लिलता, मुंबई म्हणजेसंस्कृति-आधुनिकता, मुंबई म्हणजे तत्पर्ता-आळस, मुंबई म्हणजे जगभरातील लोकांच्या पाउल खुणा. मुंबई म्हणजे इतिहास्-अर्थ.
विशेष, मुंबई म्हणजे नसे एक गाव मुंबई म्हणजे जाती-भेद - तरी अनेकांत एकता. मुंबई म्हणजे कठीण प्रसंगाना सामोरे जाण्याची प्रेरणा, मुंबई म्हणजे काळावरही मात करण्याची कला, मुंबई म्हणजे परप्रातियांची ओढ-त्यांच्याच जळफळाटीचे कारणही, मुंबई म्हणजे परिपक्वता, मुंबई म्हणजे जिवनाची परिक्षा, मुंबई म्हणजे अनेकांत राहुन आलेली समज जी फक्त आपल्याच लोकांत राहुन मिळणे कठीण आणि त्यामुळे आलेली मनाची परिपक्वता-दृढता....
मुंबई म्हणजे नसे एक गाव मंदिर्-मस्जिद्-चर्च्-गुरुद्वारा, मुंबई म्हणजे भारत देश!
मुंबई म्हणजे जिवनाचे प्राथमिक विद्यालय-महाविद्यालय..!
वाटे कधी नको तो त्राण,मुंबई म्हणजे जिव की प्राण.
भलतीच की ओ रंजक व्हायलीय. ती
भलतीच की ओ रंजक व्हायलीय. ती चर्चा म्हणायलोय की.
चातक मुंबईवर वेगळा लेख लिहा.
चातक मुंबईवर वेगळा लेख लिहा. पुण्यात अतिक्रमण करून बांधकाम करु नका.
मुंबईत जन्मलेल्याला दुसर्या कोणत्याही शहरात रहायला आवडायचे नाही.
(हे प्रत्येक शहराबाबतही खरे असेलही).
बापरे! एव्हडं सर्व आहे
बापरे! एव्हडं सर्व आहे होय...
म्हणूनच मा.बो. वर्षाविहार कर्जत/लोणावळा सारख्या "न्युट्रल" ठिकाणी ठेवत असावेत
आयला हेच मा.बो. कर त्या वर्षाविहारात "देह भान" वगैरे विसरून गळाभेट झाल्याचे वृतांत नंतर येत असतात- खरे खोटे देवालाच माहित.
बाकी जोडप्यापैकी एक मुंबईचा अन एक पुण्याचा असला की वाईट्ट अवस्था होत असावी. अनुभव टाका बरं..
चातक मुंबईवर वेगळा लेख लिहा.
चातक मुंबईवर वेगळा लेख लिहा. >>> काय भरत साहेब... 'दिसला, खुपला की लगेच वेगळा करा'..... खुपलं का सत्य...?
जसे या लेखाचेही झाले आहे. लगेच दुसरा. लाघ्या.
पुण्यात अतिक्रमण करून बांधकाम करु नका.>> पुण्याच्या या 'मुळलेखातुन' आणि लेखाच्या वेगवेगळ्या 'प्रतिसादांतुन' आधी 'मुंबईचे' नाव काढा साहेब. बघा तुमचा कायदा कुठे चालतो का ते? बांधकामाचा.
चौकट राजा मला माहीत आपला मुद्द्दा वेगळा आहे...पण माफ करा.
योग
चौकट राजा, आता पु.लं.च्याच
चौकट राजा,
आता पु.लं.च्याच भाषेत सांगायचं झालं तर, तुम्ही अस्सल मुंबईकर असलात आणि कोणी मुंबईला एक भिकार शहर आहे असं म्हंटलं तर आपण सात भिकार म्हणावं. हा प्रकार अक्षरश: खरा आहे. मुंबईला शिव्या देण्यात सर्वात आघाडीवर मुंबईकरच असतात. मात्र पुण्याच्या बाबतीत हे का नाही घडत? पुण्याबद्दल एव्हढी माया का? ती असलेली चांगलं की वाईट ते एकवेळ सोडून देऊया आपण.
आणि त्या stereotyping चं काय आहे की मासलेवाईकांची खिल्ली उडवणं सहजसाध्य असतं. Mocking the stereotypes is dead easy! पुण्यात तुलनेने थोड्या अंतरात आणि अल्पकालावधीत अनेकानेक नमुने मिळत असावेत.
हा आपला माझा अंदाज बरंका!
लेख खूप तळमळीने लिहिला आहे.
-निनाद
'जळफळाट' चालुच राहील अता पुढे
'जळफळाट' चालुच राहील अता पुढे यांची

लेख लिहिण्यामागची तळमळ
लेख लिहिण्यामागची तळमळ पोचली..
दोन्ही बाजूंचे काही प्रतिसाद पटले. कारण माझी केस पण आनंदयात्रींसारखीच.. जन्म आणि आधीची काही वर्षे डोंबिवलीत, मग कॉलेजपासून पुढे पुण्यात.. दोन्ही ठिकाणी चांगल्या वाईट गोष्टी आहेतच आणि माझ्यामते त्यातलं काय निवडावं हे आपल्या त्या त्या वेळच्या बाकीच्या priorities प्रमाणे निवडावं आणि जे काय वाईट वाटयत त्याकडे दुर्लक्ष करावं..
अमेरिकेतसुद्धा कोणीही भेटलं तरी हल्ली 'पुण्याचे का?' असा प्रश्न येतो आणि पुन:पुन्हा तेच तेच रटाळ बोरिंग जोक्स, स्टीरिओटाईप्स वगैरे वगैरे चालू होतं.... >>>>>> ह्याला अनुमोदन.
स्पीड, गर्दी, जिवंतपणा ह्यासाठी सायोला अनुमोदन.. अतिशयोक्तीबद्दल नीरजाला अनुमोदन...
बाकी पुण्यातल्या "आदरातिथ्या"बद्दल मामींनी लिहिलय ते अजिबातच पटलं नाही..
दोन्ही शहरांना स्वतःची वैशिष्ट्ये आहेत (डास, ट्रॅफिक बद्दल नाही म्हणते) ती जपली जाण्यातच मजा आहे.
एव्हड करून कविता नवरेचा डोंबिवलीबद्दलचा लेख अजून वाचलेलाच नाहीये ! तो आता वाचतो..
मी पण पुण्यातच राहतो. कुणी
मी पण पुण्यातच राहतो. कुणी काही म्हटलं तरी मला काहीच फरक पडत नाही...
टू व्हीलर वर फिरताना लोक म्हणतात तसे अनुभव येतातच.
इथे पार्किंग करू नये, हवा सोडली जाईल. असे बोर्ड ( खडूने लिहीलेले ) पुण्यात नाहीत का ?
बाटल्यांच्या बुचाला हजर स्टॉकमधे बुचं बसवण्यात येईल. टिळक रोडला ही पाटी आहे. हा धंदा मुंबईत सापडेल का ?
सिग्नलला एकमेकांकडे खुन्नस ने पाहून वेळ घालवणारे टू व्हीलर वाले पुण्यात नाहीत ? सगळेच शहाणे ! कुणी कुणासाठी थांबायचं ?
आख्ख्या देशात हेल्मेटसक्ती यशस्वी झाली. पुण्यात मात्र आंदोलनं झाली.
पूर्वी सकाळच्या वाचकांची पत्रे मधून जी पत्रं प्रसिद्ध व्हायची त्यातून जो बाणा व्यक्त व्ह्यायचा तो कुठला म्हणायचा ?
सकाळने एकदा काय चुकतं हे सदर चालू केलं होतं. त्यात प्रसिद्ध होणारे लेख खूप करमणूक करून गेले. पत्रलेखक तळमळीने लिहायचे खरे पण त्यांमुळंच पुलंनी जे काही लिहीलं तो कल्पनाविलास नसून निरीक्षण आहे याची खात्री पटली.
इतर गोष्टी विवा साठी राखीव !!
अरे मी कुठे म्हणतो मुंबई
अरे मी कुठे म्हणतो मुंबई ग्रेट आहे
पण भांडखोरीच्या बाबतीत मात्र मुंबईत कुणाला येवढा फालतू वेळ नाही
बाकी पुणं ग्रेट आहे बाबा बाकी सगळ जग भिकार आहे
पण कोणाला आमच्या शहरा बद्दल काय वाटतं आणि काय वाटायलाच हवं यावर आमचा आक्षेप नाही. 
कोकणातील जनता प्रामुख्याने
कोकणातील जनता प्रामुख्याने मुंबईत शिफ्ट झालेली आहे. त्यामुळे मुंबईतही हे गुण प्रामुख्याने जाणवत राहतात. >>>
केवळ गुजराथ्यांनी आणि दाक्षिणात्यांनी चालवलेल्या या महानगरीचे कौतुक मराठी माणसाने करणे हा १९८० नंतरचा मोठा विनोद आहे.>>>
वरच्या दोन पोस्टमधे काही विसंगती जाणवतेय का? की उगाच आता या पोस्टमधे कोकणी माणसाना पण ओढून ताणून आणायचेच या अर्थाने लिहिलेय??? तसे असेल तर उत्तम.. आपण कधी वरची, खालची, मधली (नविन लोक त्याला टिळक आळी म्हणतात) अथवा पर्याची आळी येथे गेला नसालच. वरच्या प्रतिसादामधे जे "पुणेरीपणा" वगैरे सतत येतय ना, त्याचे मूळ इथेच कुठेतरी आहे. शहाण्या माणसाने कोकण्याच्या वाटेला जाऊ नये, गेल्यास पुढील परिणामाला जबाबदार रहावे. (इतर शहरासारखे इथे नुसते पोस्ट्स लिहत बसणार नाहीत, सरळ कोर्ट केसच चालू होइल
)
दिवे घ्यालच!!!
मुंबईकरांमधे दम नाही.
मुंबईकरांमधे दम नाही. बाँबस्फोट होऊनही यांना काहीच वाटत नाही.
पुण्यात मात्र एक काका जीव धोक्यात घालून सिग्नल तोडून जाणा-या बसला आपली स्कूटर आडवी घालत. त्यांनीच रविवार सकाळमधे लेख लिहूनहे आपलं समाजकार्य समाजाच्या अवलोकनार्थ ठेवलेलं.
काही विशिष्ट ठिकाणी पत्ता विचारायला भीती वाटते. बरीच मासलेवाईक उत्तरे (खोचक हास्यासहित) मिळालेली आहेत.
शिकलेले दिसता.... हा डायलॉग पुण्यात कुठल्या अर्थाने वापरला जातो जे का सांगावयास हवे बरें ? ( रे वरचा अनुस्वार कदाचित स्क्रीनवरचा डाग आहे असं वाटण्याची शक्यता आहे )
सिग्नल तोडल्यावर मागून वेगाने येऊन "काय युद्धावर निघालेत का " अशी प्रेमळ धावती विचारपूस कुठल्या शहरात होते बरें ?
पुणेरीपण हा संसर्गजन्य रोग
पुणेरीपण हा संसर्गजन्य रोग आहे आणि या रोगाचा प्रादुर्भाव सर्वच माबोकरांना झालेला आहे.
मी माझ्या विपुत "रजेवर" असं अपडेट केलं. ( काय रे कुठं चाललाहेस ? काय प्रॉब्लेम आहे ? अशा पोष्टींचा पाऊस पडावा असं मला वाटलं असेल असा विचार केला असाल तर...... हुषार आहात )
बरेच दिवसांनी येऊन बघतो तो काय
" काय रे दिवट्या, आजकाल कोणत्या आयडीने फिरतोस माबोवर "
ही एकच विपु आढळली..
इतरांनी रजेवर चाललाय ना, आपल्याला काय त्याचं ही अस्सल पुणेरी भूमिका घेतली !!
आणखी काय पुरावे द्यावें बरें ?
मधेच रजेवर जाऊन अचानक उगवून
मधेच रजेवर जाऊन अचानक उगवून आपल्याच शहराबद्दल हा असा मजकूर लिहील्याने गडकरींना जसं मुंडें हे नाव घेतल्यावर प्रेमाचा उमाळा येतो तसच माझ्याबाबत पुणेकरांचं झालं असणार.
अर्थात अस्सल पुणेकर हा एक हुकमी शब्दप्रयोग वापरून ते मला गारद करू शकतातच ..
विवा पर्यंत दम धरवत नाही. आणि
विवा पर्यंत दम धरवत नाही. आणि इथंच "रिता" झालो तर विवा ला येऊन करायचं तरी काय ?
इतक्या पोष्टी (एकट्यानेच)
इतक्या पोष्टी (एकट्यानेच) टाकण्याचे कारण कुणी पुणेकर विचारणारच... खालील सर्व पर्याय हे उत्तरास लागू होतात.
१. कुणाशी तरी बोलायचं होतंच. आयतीच संधी चालून आली.
२. उद्यापासून पुन्हा रजेवर जाणार आहे.
३. एकटाच खेळाडू होतो आज. बाकि शुकशुकाट होता.
४. एकट्यानेच का : आज सगळे ड्युआय पंढरीच्या वारीला गेल्याने नाईलाज झाला.
Pages