स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

|| श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ||

ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: | ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||

नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||

नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||

थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||

श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||

नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक
|| ६||

त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||

म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या
निमित्ताने || ८ ||

कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी
|| ९ ||

एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||

मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||

खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||

दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||

नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||

दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||

यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||

काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||

पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||

तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||

स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||

पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ |
जागृत दत्तस्थान ते || २१ ||

तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे
|| २२ ||

अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||

नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||

स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||

ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||

सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||

स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||

जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||

कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||

ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही
दिलें त्यांनी || ३१ ||

अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा
|| ३२ ||

सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||

न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||

दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||

स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी
|| ३६ ||

मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||

ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||

तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९

संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना
|| ४० ||

तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला
|| ४१ ||

अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||

स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||

पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||

भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||

वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला | भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी || ४६ ||

स्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे | त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते || ४७ ||

बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्‍यांनी | गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती
|| ४८ ||

जे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें | हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें
|| ४९ ||

पुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ | स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें || ५० ||

शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी | पुण्य घटिका तिसर्‍या प्रहरी | स्वामी गेले निजधामा || ५१ ||

बोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल | क्षणात पापण्या झाल्या अचल | निजानंदी झाले
निमग्न || ५२ ||

वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार | स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी || ५३ ||

ऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार | निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके || ५४ ||

बातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली | सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना
|| ५५ ||

गावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली | समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी

|| ५६ ||

चवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला | अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें
|| ५७ ||

अजूनही जे येती समाधीदर्शना | त्यांच्या व्याधी आणी विवंचना | संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात || ५८ ||

याचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले | म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया || ५९ ||

नम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी | स्वामींना यावी करुणा म्हणूनी | प्रार्थना त्यांना करुंया || ६० ||

जयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था | सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी
|| ६१ ||

अनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून | समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला
|| ६२ ||

व्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून | तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी
|| ६३ ||

सदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी | ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी || ६४ ||

सुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख | गृहसौख्य आणी वाहनसुख |
अंती सदगति लाभावी || ६५ ||

तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा | उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे
|| ६६ ||

तुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य | म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना
|| ६७ ||

मी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून | या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे || ६८ ||

वेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा | वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती || ६९ ||

शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी | शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही || ७० ||

स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत | बसुनी ही पोथी वाचावी मनांत |
इच्छा सफल होईल || ७१ ||

माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर | एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||
एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती | ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||

या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न | करतील सर्व मनोरथ पूर्ण |
सत्य सत्य वाचा ही || ७४ ||

ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु || ॐ शांति:शांति:शांति: || (ओवी संख्या ७४ )

मिलिंदमाधवकृत

|| " श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र ---माहात्म्य सम्पूर्ण " ||

यमुनाष्टक नक्की कोणते आहे?? बालाजी तांबे यांच्या फेमिनाईन बॅलन्स या संग्रहातील वेगळे आहे आणि ते डाऊनलोड होत नाही, नी नेटवर सर्च केले तर वेगळे सापडते.

*** मानसपूजा ***

जय जय स्वामी समर्थ |

नमो स्वामीराज दत्तावतारम् | श्री विष्णू ब्रह्म शिवशक्तीरुपम् |
ब्रह्मस्वरुपाय करुणाकराय | स्वामी समर्थाय नमोस्तुते |

स्वामी दत्तात्रय हे कृपाळा | मला ध्यानमुर्ती दिसू येई डोळा |
कुठे माय माझी म्हणे बाल जैसा | समर्था तुम्हाविण हो जीव कैसा |

स्वामी समर्था तुम्ही स्मर्तुगामी | हृदयासनी बसा प्रार्थितो मी |
पूजेचे यथासांग साहित्य केले | मखरात स्वामी गुरु बैसविले |

महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती | जिथे सर्व सिध्दी पदी लोळताती |
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ | परब्रम्ह्य साक्षात गुरुदेव दत्त |

सुवर्णताटी महारत्न ज्योती | ओवाळूनी अक्षता लाऊ मोती |
शुभारंभ ऐसा करुनी पुजेला | चरणावरी ठेऊ या मस्तकाला |

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा | तुझी पाद्यपुजा करी बाळ तुझा |
प्रणिपात साष्टांग शरणागताचा | तुम्हा वाहिला भार या जीवनाचा |

ही ब्रह्मपुजा महाविष्णू पूजा | शिवशंकराची असे शक्तीपूजा |
दही दूध शुध्दोदकाने तयाला | पंचामृत स्नान घालू प्रभूला |

वीणा तुतार्‍या किती वाजताती | शंखादी वाद्ये पहा गर्जताती |
म्हणती नगारे गुरुदेव दत्ता | श्रीदत्त जय दत्त स्वामी समर्था |

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली | श्री दत्त स्वामीसिया स्नान घाली |
महासिध्द पदतीर्थ घ्यावा | महिमा तयाचा कळे ना जगा या |

मी धन्य झालो हे तीर्थ घेता | घडू दे पूजा ही यथासांग आता |
अजानूबाहू भव्य कांती सतेज | नसे मानवी देह हा स्वामीराज |

प्रत्यक्ष श्री सदगुरु दत्तराज | तया घालुया रेशमी वस्त्रसाज |
सुगंधित भाळी टिळा रेखियेला | शिरी हा जरी टोप शोभे तयाला |

वक्षःस्थळी लाविल्या चंदनाचा | सुवास तो वाढवी भाव साचा |
शिरी वाहुया बिल्व तुलसीदलाचे | गुलाब जाईजुई अत्तराते |

गंधाक्षता वाहूनी या पदाला | ही अर्पूया जीवन पुष्पमाला |
चरणीं करांनी मिठी मारु देई | म्हणे "लेकरासी सांभाळ आई " |

इथे लावुया केशर कस्तुरीचा | सुगंधता हा धूप नाना प्रतीचा |
पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली | गगनातुनी पुष्पवृष्टी जहाली |

करुणावतारी अवधूत किर्ती | दयेची कृपेचीच जी शुध्द मूर्ती |
प्रभा फाकली शक्तीच्या मंडलाची | अशी दिव्यता स्वामी योगेश्वराची |

ह्रदयमंदिराची ही स्नेह ज्योती | मला दाखवी स्वामींची योगमूर्ती |
करु आरती आर्तभावे प्रभूची | गुरुदेव ही स्वामी दत्तात्रयाची |

पंचारती ही असे पंचप्राण | ओवाळूनि ठेऊ चरणावरुन |
निघेना पुढे शब्द बोलु मी तो ही | मनीचे तुम्ही जाणता सर्व काही |

हे स्वामी राजा बसा भोजनाला | हा पंचपक्वान्न नैवेद्य केला |
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची | लाडू करंजी असे ही खव्याची |

डाळींब द्राक्षे फळे आणि मेवा | केशरी दूध घ्या स्वामीदेवा |
पुढे हात केला या लेकराने | प्रसाद द्यावा आपुल्या कराने |

तांबुल घ्यावा स्वामी समर्था | चरणाची सेवा करु द्यावी आता |
प्रसन्नेतुन मागू मी काय | हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय |

सर्वस्व हा जीव चरणीच ठेऊ | दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ |
नका दूर लोटू आपल्या मुलासी | कृपाछत्र तुमचेच या बालकासी |

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला | पदी ठेऊ दे शीर शरणागताला |
हृदयी भाव यावे असे तळमळीचे | करी पूर्ण कल्याण हे या जीवाचे |

तुझे बाळ पाही तुझी वाट देवा | नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा |
मनी पुजनाची असे दिव्य ठेव | वसो माझिया अंतरी स्वामी ठेव |

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

*** समाप्त ***

हे भजन माझी आत्या म्हणत असे. ते पन्नास साठ वर्षांनी आज पूर्ण वाचायला मिळाले त्याबद्दल अत्यंत आभारी आहे.
भाष

श्री स्वामी समर्थ स्तवन

नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ ||

नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार |
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ ||

नरदेही नरसिंह | प्रगटला तरुपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्यागती || ३ ||

कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी |
यमा वाटे ज्याची भीती | योगीश्वर हाच यती || ४ ||

कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली |
कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमातटी || ५ ||

कालीमाता बोले संगे | बोले कन्याकुमारीही |
अन्नपूर्णा ज्याचे हाती | दत्तगुरु एकमुखी || ६ ||

भारताच्या कानोकानी | गेला स्वये चिंतामणी |
सुखी व्हावे सारे जन | तेथे धावे जनार्दन || ७ ||

प्रज्ञापुरी स्थिर झाला | माध्यान्हीच्या रविप्रत |
रामानुज करी भावे | स्वामी पदा दंडवत || ८ ||

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

२८ स्तवने = १ मंडळ, अशी २८ मंडळे केल्यास संकट दूर होते.

फलप्राप्ती झाल्यानंतर एखादे सत्कर्म करावे.

यमुनाष्टक नक्की कोणते आहे?? बालाजी तांबे यांच्या फेमिनाईन बॅलन्स या संग्रहातील वेगळे आहे आणि ते डाऊनलोड होत नाही, नी नेटवर सर्च केले तर वेगळे सापडते.
प्लीज मला कोणी सांगेल का?

स्तोत्र आणि मंत्र
श्री दुर्गा सप्तशती
श्री महालक्ष्मी सहस्त्रनामस्तोत्र
श्री महागणपती सहस्त्रकमस्तोत्रं
श्री महासरस्वती सहस्त्रनामस्तोत्रं
श्री राधा कृष्ण सहस्त्रनामस्तोत्रं
श्री शिव सहस्त्र नामस्तोत्रं
नव्ग्रह्मंत्र: स्तोत्रं
गुरुपादुका स्तोत्रं
श्री ललिताम्बिकासहस्त्रकमस्तोत्रं
देविमाहात्मकम
देविसुक्ताकं
श्री दुर्गा दकारादी सहस्त्रनामस्तोत्रं
श्री विष्णु सहस्त्रनामस्तोत्रं
सरस्वती स्तोत्रं
श्री पार्वतीसहस्त्रनाम स्तोत्रं

वरील सर्व स्तोत्रे खालील link वर उपलब्द आहेत
http://saptashrungi.org/index.php?option=com_content&view=article&id=72%...

माझी रोजची आवडती प्रार्थना

GOD grant me the SERENITY,
To accept the things I cannot change,

COURAGE to change the things I can,

ANd the WISDOM to know the difference. Happy

सर्वसिध्दी मंत्र

प्रत्येक मनुष्यावर ग्रहांचा बरा वाईट परिणाम होतो त्यासाठी त्याच्या निवार्णाथ निरनिराळी यंत्रे, तोडगे सिध्द करून घेणे, त्यांची शांती करणे, त्या साठी दान देणे, इत्यादि उपाय केले जातात. हे उपाय फार वेळ घेणारे व अती खर्चिक असतात. असे न करता त्यासाठी दर दिवशी जपावयाचे मंत्र देत आहे.
स़काळी अगर सायंकाळी, स्नान करून हे मंत्र त्या त्या दिवशी १०८ वेळा जपावयाचे आहेत.

मंत्र जपताना मनाची एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. सकाळी जपण्यासाठी पूर्वेला तोंड करून बसावे व जपावेत. सायंकाळी जपायचे असतील त्यावेळी पश्विमेकडे तोंड करून जपावेत.

असे केले असता सर्व बाधा दूर होतात असा अनुमव आहे.

रविवार (सूर्य)

ॐ ह्लीं ह्लीं सूर्याय नमः |

सोमवार (चंद्र)

ॐ ऐं क्लीं सोमाय नमः |

मंगळवार ( मंगळ )

ॐ हूं श्रीं मङगलाय नमः |

बुधवार (बुध)

ॐ ऐं क्लीं श्रीं बुधाय नमः |

गुरूवार (गुरु)

ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः |

शुक्रवार (शुक्र)

ॐ ह्लीं श्रीं शुक्राय नमः |

शनिवार (शनी)

ॐ ऐं ह्लीं श्रीं शनैश्वराय नमः |

राहू व केतू यांचा मंत्रजप ही शनिवारी करावा.

राहू ॐ ऐं ह्लीं राहवे नमः |

केतु ॐ ह्लीं केतवे नमः |

( हे लिखाण " आपला चातुर्मास " ह्या पुस्तकातून घेतले आहे. ( पृ. क्र. ४२८ -४२९ )

|| श्री स्वामी समर्थ मानस पूजा ||

|| श्री स्वामी समर्थ मानस पूजा || || श्रीगणेशाय नम: || नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम || ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते || हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा || कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ || स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी || पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ || महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ || सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षदा लावू मोती || शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ || हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा || दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ || वीणा तुतार्‍या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ || प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ || मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ || प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज || सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० || वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा || शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ || गंधाक्षदा वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला || चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ || इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा || पुष्पाजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ || करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती || प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४ हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति || करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ || पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून || निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ || हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला || पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ || डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा || पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ || तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता || प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ || सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षणा मी तुम्हां काय देऊ || नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० || धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला || हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ || तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा || मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ || || श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त |

ही स्तोत्रे mp3 / wav स्वरुपात कुठे मिळतील? माझ्याकडे रामरक्षा आहे ती आता लेकाची पाठ होत आली. मला आता मारुति स्तोत्र हवे आहे. कोणाला माहिती असल्यास सांगा.

अग कधि कधि पेशन्स नसतो, शिवाय रोज त्याच स्पिडमधे होत नाही. पण ती रामरक्षा व बॅकग्राउंड म्युझिक छान आहे, लावुन ठेवले की कानावर पडत रहाते. हवे तेवढे वेळा रिपीट करता येते Happy म्हणुन असे अजुन हवे आहेत.
बेसिक आवड आम्हिच म्हणुन त्याला लावली. आता रेकॉर्डेड लावते.

श्रावण सुरु झाला आहे.त्या निमित्ताने शिव मानस पूजा देत आहे.यू ट्यूब वर श्री श्री रविशंकर यांच्या भगिनी भानु ह्यांच्या आवाजातली मानस पूजा फार सुंदर आहे .

श्री शिव मानस पूजा

रत्ने: कल्पितमासनं हिमजलै:स्नानंच दिव्यांम्बरं ।
नानारत्नविभूषितं मृगमदामोदाकितं चंदनं ।
जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा ।
दिपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम ॥१॥

सौवर्णे मणिखण्ड रत्न रचिते पत्रे घृतं पायसं ।
भक्ष्यं पंचविधं पयोदधियुतंरंम्भाफलं पानकम् ।
शाकानामयुतं जलं रूचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ।
ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभोस्बीकुरू ॥२॥

छत्रं चामरयोर्युगंव्यजनकं चादर्शकं निर्मलं ।
वीणाभेरिमृदड्ग.का हलकला गीतं च नृत्यं तथा ।
साष्टाड्ग प्रणति:स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समत्सं मया।
संकंल्पेन समर्पितं तव विभो पूजा गृहाण प्रभो ॥३॥

आत्मात्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा:शरीरं गृहं ।
पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा: समाधिस्थिती: ।
संचार पदयो: प्रदक्षिणविधी: स्तोत्राणि सर्वा गिरो ।
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम ॥४॥
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा । श्रवणनयनंजंवामानसंवापराधम ॥
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे ॥

निराली, तुम्ही इंग्रजीत दिलेली प्रार्थना मराठीत काहीशी अशी आहे-

जे टाळणे अशक्य, दे शक्ति ते सहाया
जे शक्य-साध्य आहे, निर्धार ते कराया |
मज काय शक्य आहे? आहे अशक्य काय?
माझे मला कळाया, दे बुद्धि देवराया ||

भारतात माझ्या मामाने सज्जनगडावरुन एक रामनामाची रेकॉर्ड आणली होती. खूप छान संथ लयीत ''श्रीराम जय राम जय जय राम" चालू असते. मला सेम रेकॉर्ड डाऊनलोड करुन घ्यायची आहे. मला ऐकायला खूप आवडते. कुणाला माहीती असेल तर दुवा द्या प्लीज.

॥ अथ शनिस्तोत्रम् ॥

श्री: ॥ अस्य श्रीशनैश्चरस्तोत्रस्य दशरथ ऋषि: शनैश्चरो देवत त्रिष्टुपछंद: शनैश्चरप्रीत्यर्थे जपे विनियोग: ॥
दशरथ उवाच ॥
कोणाऽन्तको रौद्रयमोऽथ बभ्रु: कृष्ण: शनि: पिंगलमंद सौरि: ॥ नित्यं स्मृतो यो हरते च पीडां तस्मै नम: श्रीरविनंदनाय ॥ १ ॥
सुरासुर: किंपुरूषा गणेंद्रा गन्धर्वविद्याधरपन्नगाश्च ॥ पीड्यंति सर्वे विषमस्थितेन तस्मै नाम: श्रीरविनंदनाय ॥ २ ॥
नरा नरेंद्रा: पशवो मृगेंद्रा वन्याश्च ये कीटपतंगभृंगा ॥ पीड्यंति सर्वे विषमस्थितेन तस्मै नम: श्रीरविनंदनाय ॥ ३ ॥
देशाश्च दुर्गाणि वनानि यत्र सेनानिवेशा: पुरपत्तनाति ॥ पीड्यंति सर्वे विषमस्थितेन तस्मै नम: श्रीरविनंदनाय ॥ ४ ॥
तिलैर्यवैर्माषगुडन्नदानैर्लोहे​न नीलांबरदानतो वा ॥ प्रीणाति मंत्रैर्निजवासरे च तस्मै नम: श्रीरविनंदनाय ॥ ५ ॥
प्रयाकूले यमुनातटे च सरस्वती पुण्यजले गुहायाम्‌ ॥ यो योगिनां ध्यानगतोऽपि सूक्ष्मस्तस्मै नम: श्रीरविनंदनाय ॥ ६ ॥
अन्यप्रदेशात्स्वगृहं प्रविष्टस्तदीयवारे स नर: सूखी स्यात्‌ ॥ गृहाद्‌ गतो यो न पुन: प्रयाति तस्मै नम: श्रीरविनंदनाय नम: ॥ ७ ॥
स्रष्टा स्यंभूर्भुवनतरस्य त्राता हरि: संहरते पिनाकी ॥ एकस्त्रिधा ऋग्यजु:साममूर्तितस्मै नम: श्रीरविनंदनाय नम: ॥ ८ ॥
शन्यष्टकं य: प्रयत: प्रभाते नित्यं सुपुत्रै: पशुबांधवैश्च ॥ पठेच्च सौख्यं भुवि भोगयुक्तं प्राप्नोति निर्वाणपदं परं स: ॥ ९ ॥
कोणस्थ: पिंगलो बभ्र: कृष्णा रौद्राऽन्तको यम: ॥ सौरि:शनेश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत: ॥ १० ॥
एतानि दश नामानि प्रातरुत्थाप य: पठेत् ॥ शनैश्चरकृता पीडा न कदाचिद्‍भविष्यति ॥ ११ ॥
इति श्रीदशरथप्रोक्तं शनैश्चरस्तोत्रं संपूर्णम् ॥

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.

"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"

अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुबव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत.

१. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्‍या अर्थाकडे असावे.

२. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे.

३. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.

४. श्रीदत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रेयांचे आवाहन करावे.

५. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)

६. रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्‍या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्‍यांचा अनुभव आहे.

७. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्‍याशी बोलू नये.

८. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंदगमनाचा दिवस होय.

९. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

॥ श्री स्वामी समर्थ||
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!

भि- भिती कसली उरात धरुनी राहसी

ऊ - उगाच चिंता करूनी वृथा का शिणसी

न- नको डगमगू मी तर तुझा सोबती

को- कोठूनी आलो कुठे जायचे चिंतन करी

स- सतत रहा तू दंग नामस्मरणी

मी- मीपण सोडूनी ये माझ्य जवळी

तु- तुझा भार घेई सर्वदा मी शिरी

झ्या - जहागिरदारी इथेच राहील सारी

पा- पापांचे ती कारण होईल या संसारी

ठि- ठिकाण माझे ठाऊक तुजला अक्कलकोट

शी- शीघ्र येई धावूनी पाहतो तुझी मी वाट

आ- आहे बसलो भक्तांसाठी मी वटवृक्षाखाली

हे- हे अनुभवाया भक्तजनांनो या रे अक्कलकोट

जहले भजन आम्हि नमितो तव चरन....हे निरोप भजन
जै जै श्रिशनि देव पद्मकर शिरि थेव...
आअर्ति सैबब सौख्य दतर जिव ......
आरति तुकरअमा.....
आरति एकनथा......
असेल तर पअठवा
थन्क्स
...नीता

Pages