स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाकडे अन्नपुर्णा स्तोत्र आहे का?
"भिक्षांदेही क्रुपावलंब न करी मातान्न्पुर्णेष्वरी " असा त्याच्या प्रत्येक कडव्याची शेवटची ओळ आहे..

हा एक वेगळा श्लोक -
अनंतं वासुकि शेषं पद्मनाभंच कंबलम्‌ ।
धृत्तराष्ट्रं शंखपालं तक्षकं कालियं तथा ।।

~साक्षी

साक्षी, पुर्ण टाक की नवनागस्तोत्र!

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा
एतानी नवनामानी नागानां च महात्मनम
सायंकाले पठेनित्यं प्रातःकाले विशेषतः
तस्य विषभयं नास्ती, सर्वत्र विजयी भवेत
|| इति श्री नवनागस्तोत्रम सम्पूर्णं || Happy

नमस्कार, फारच सात्विक धागा आहे. अगदी माझ्या मनासारखा. मला अतिशय आवडणारे आणि सहसा जालावर न सापडणारे स्तोत्रं पुढे देत आहे. स्तोत्राचे नाव आहे - "धर्मराजाचे दुर्गास्तवन" -

श्री गणेशाय नमः|
नगरी प्रवेशले पंडुनंदन| तो देखिले दुर्गास्थान|धर्मराजा करी स्तवन|जगदंबेचे तेधवा||१||
जय जय दुर्गे भुवनेश्वरी|यशोदागर्भसंभवकुमारी|इन्दिरारमणसहोदरी|नारायणी चंडीके अंबीके||२||
जय जय जगदंबे भवानी|मूळप्रकृती प्रणवरुपिणी|ब्रह्मानंदपददायिनी|चिद्विलासिनी जगदंबे||३||
जय जय धराधरकुमारी|सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी|हेरंबजननी अंतरी|प्रवेशी तू अमुचिया||४||
भक्तहृदयारविंद्रभ्रमरी| तुझिया कृपावलोकने निर्धारी|अतिमूढ तो निगमार्थ करी|काव्यरचना अद्भुत||५||
तुझिया आपंगते करून्|जन्मांधासी येती नयन्|पांगुळ धावे पवनाहून|करी गमन त्वरेने||६||
जन्माधाराभ्य जो मुका|होय वाचस्पतीसम बोलका|तू स्वानंदसरोवरमराळिका|होसी भाविका सुप्रसन्न||७||
ब्रम्हानंदे आदि जननी|तव कृपेची नौका करुनी|दुस्तर भवसिंधु लंघोनी|निवृत्ती तटा नेईजे||८||
जय जय आदि कुमारीके|जय जय मूळपीठनायिके|सकल सौभाग्यदायिके|जगदंबिके मूळप्रकृती||९||
जय जय भर्गप्रियभवानी|भवनाशके भक्तवरदायिनी|समुद्रकारके हिमनगनंदिनी|त्रिपुरसुंदरी महामाये||१०||
जय आनंदकासारमराळिके|पद्मनयन दुरितकानन पावके|त्रिविध ताप भवमोचके|सर्व व्यापके मृडानी||११||
शिवमानस कनक लतिके|जय चातुर्य चंपक कलिके|शुंभनिशुंभ दैत्यांतके|निजजनपालके अपर्णे||१२||
तव मुखकमल शोभा देखोनी|इंदुबिंब गेले गळोनी|ब्रम्हादिके बाळे तान्ही|स्वानंदसदनी नीजवीसी||१३||
जीव शीव दोन्ही बालके|अंबे तुवा नीर्मीली कौतुके|जीव तुझे स्वरुप नोळखे|म्हणोनी पडला आवर्ती||१४||
शीव तुझे स्मरणी सावचित्त|म्हणोनी अंबे तो नित्यमुक्त|स्वनंदपद हातासी येत्|कृपे तुझ्या जननीये||१५||
मेळवुनी पंचभूतांचा मेळ्|तुवा रचिला ब्रह्माडगोळ|इच्छा परतता तत्काळ|क्षणात निर्मूळ करीसी तू||१६||
अनंतबालसूर्य श्रेणी|तव प्रभेमाजी गेल्या विरोनी|सकल सौभाग्य शुभकल्याणी|रमा रमणे वरप्रदे||१७||
शंबरारि रिपुवल्लभे|त्रैलोक्यनगरारंभस्तंभे|आदिमाये आदिप्रभे|सकळारंभे मूळप्रकृती||१८||
जय जय करुणामृतसरीते|निजभक्तपालके गुणभरीते|अनंत ब्रह्मांडपालके कृपावंते|आदिमाये अपर्णे||१९||
सच्चिदानंद प्रणवरुपिणी|चराचरजीव सकलव्यापिणी|सर्गस्थित्यंतकारिणी|भवमोचनी महामाये||२०||
ऐकोनी धर्मराजाचे स्तवन्|दुर्गादेवी झाली प्रसन्न|म्हणे तव शत्रू संहारून्|रीज्यी स्थापीन धर्मा तू ते||२१||
तुम्ही वास करावा येथे|प्रकटो नेदी जनाते|शत्रू क्षय पावती तुमचे हाते|सुख अद्भुत तुम्हा होय||२२||
तुवा जे केले स्तोत्रपठण्|हे जो करील पठण श्रवण||त्यासी सर्वदा रक्षीन्|अंतर्बाह्य निजांगे||२३||

मला कोणी श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित अघोरकष्टोद्धारण स्तोत्राचा अर्थ सन्गेल क?

नर्मदाष्टका आणि त्याचा अर्थ टाकल्याबद्द्ल धन्यवाद!
लहानपणी पाठ होते, पण अर्थ कळत नव्हता..आता अर्थ कळला तरी पाठ होईल का कुणास ठाऊक :अआ:

मयुरा१२,
’अघोरकष्टोद्धरण स्तोत्र’ संपूर्ण अर्थ व विवेचन ...या साठी खालील दुव्यात दाखवलेले पुस्तक जरूर घ्यावे.
http://yadnya.in/index.php?option=com_content&view=article&id=54&Itemid=47

बितुबन्ग खुप अभर

i am out of maharashtra ,, can i get summary of श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित अघोरकष्टोद्धारण स्तोत्रा

सायली, स्तोत्र टाकायला वेळ लागल्याबद्दल सॉरी Happy

॥ अन्नपूर्णास्तोत्रम् ॥

नित्यानंदकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी
निर्धूताखिलघोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी l
प्रालेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१॥

नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी
मुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी ।
काश्मिरागुरूवासिता रूचिकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ll२॥

योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मार्थनिष्ठाकरी
चन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी ।
सर्वैश्वर्यसमस्तवांछनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ll३॥

कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमाशंकरी
कौमारी निगमार्थगोचरकरी ॐ कारबीजाक्षरी ।
मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ll४॥

दृश्यादृश्यविभूतवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी
लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपांकुरी ।
श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ll५॥

उर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी
वेणीनीलसमानकुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी ।
सर्वानन्दकरी सदाशुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ll६॥

आदिक्षान्तिसमस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी
काश्मीरात्रिपुरेश्वरी त्रिनयनी नित्यांकुरा शर्वरी ।
कामाकांक्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥७॥

देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरी
वामा स्वादुपयोधरप्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी ।
भक्ताभीष्टकरी दशाशुभहरी काशिपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥८॥

चन्द्रार्कालयकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी
चन्द्रार्काग्निसमानकुंडलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी ।
मालापुस्तकपाशसांकुशधरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥९॥

क्षत्रत्राणकरी महाsभयकरी माता कृपासागरी
साक्षान्मोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी ।
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१०॥

भगवति भवरोगात्पीडितं दुष्कृतोत्थात्
सुतदुहितृकलत्रोपद्रवेणानुयातम् ।
विलसदमृतदृष्ट्या वीक्ष्य विभ्रान्तचित्तं
सकलभुवनमातस्त्राहि मामों नमस्ते ॥११॥

माहेश्वरीमाश्रितकल्पवल्ली-
महम्भवोच्छेदकरीं भवानीम् ।
क्षुधार्तजायातनयाद्दुपेत-
स्त्वामन्नपूर्णे शरणं प्रपद्द्ये ॥१२॥

दारिद्र्यदावानलदह्यमानं
पाह्यन्नपूर्णे गिरिराजकन्ये ।
कृपाम्बुधौ मज्जय मां त्वदीये
त्वत्पादपद्मार्पितचित्तवृत्तिम् ॥१३॥

अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥१४॥

माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवा: शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥१५॥

॥ इति श्रीमच्छंकराचार्यविरचितमन्नपूर्णास्तोत्रं संपूर्णम् ॥

......( ११ व्या श्लोकापासून चाल बदलतेय.)

अजुन एक ... नर्मदास्तोत्र. सुरेख आहे आणि म्हणताना देखील एक सुरेल अनुभुती येते. मिळाले की पाठवतो.

मयुर१२,
त्या दिव्य स्तोत्राची 'समरी' देणे केवळ अशक्य आहे; नव्हे ते अन्यायकारक (आणि हास्यास्पद) ठरेल Happy
खालील ईमेल आयडीला पत्र लिहून, वरील पुस्तक आपण कुठेही कुरियरद्वरे मागवू शकता-
--------------------------------
प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र,
कल्याण
(श्री. अशोक सावंत. भ्रमणध्वनी - ९८६९१५७३०८)
E-mail: prakashdnyan@gmail.com
---------------------------------
धन्यवाद!

श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित अजून एक स्तोत्र. कोणी याचे नाव सांगेल काय?

उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया|
जो अनसूयेच्या भावाला भुलूनिया सुत झाला,
दत्तात्रेय अशा नामाला मीरवी वंद्य सुरांना,
तो तू मुनीवर्या निज पाया स्मरता वारीसी माया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया||१||

जो माहुरपूरी स्नान करी, निवसे सह्याद्रीचे शिरी
गंगेचे स्नान करी, भिक्षा कोल्हापूरी
स्मरता दर्शन दे वारी भया, तो तू आगमगेया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया||२||

तो तू वांझेसी सुत देसी सौभाग्या वाढविसी
मरता प्रेतासी जीववीसी सद्वरदाना देसी
यास्तव वासुदेव तव पाया दरत्या तारी सदया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया||३||

एक अप्रतिम सात्विक स्तोत्र. दर गुरुवारी जरूर म्हणावं -

सद्गुरु स्तोत्र

गुरू| गुणालया| परापराधिनाथ सुंदरा|देवादिकांहुनि वरीष्ठ तूचि साजीरा|गुणावतार तू धरोनिया या जगास तारीसी| सुरा मुनीश्वरा अलभ्य या गतीस दावीसी||१||
जया गुरूत्व वेधिले तयासि कार्य साधिले| भवार्णवासि लंघिले सुविघ्नदुर्ग भंगिले|सहा रिपूंसि जिंकिले निजात्मतत्व चिंतीले|परात्परासि पाहीले प्रकृष्ट दु:ख साहीले||२||
गुरू उदार माऊली प्रशांतसौख्य साऊली| जया नरास फावली तयास सिद्धी गावली|'गुरू गुरू गुरू गुरू' म्हणोनी जो नरे स्मरू|तरे मोहसागरू सुखी घडे निरंतरू||३||
गुरू चिदब्धीचंद्र हा महत्पदी महेंद्र हा|असे प्रतापरुद्र हा गुरु कृपासमुद्र हा| गुरु स्वरूप दे स्वतः गुरूचि ब्रम्ह सर्वथा| गुरूविना महाव्यथा नसे जनी निवारिता||४||
शिवाहुनि गुरु असे अधिक हे मला दिसे| नरांसि मोक्ष द्यावया गुरू स्वरूप घेतसे| शिवस्वरूप आपुले न मोक्षदक्ष देखिले| गुरुने पूर्ण घेतले म्हणोनि कृत्य साधिले||५||
गुरूचि बापमाऊली गुरूचि दीनसाऊली| गुरूचि शिष्यवासरांस कामधेनु साऊली|गुरुचि चिंतीतार्थ दे गुरुचि तत्व तो वदे| अलभ्य मोक्षलाभ आपुल्या कृपे गुरुचि दे||६||
गुरुचि भेद नाशितो जडांधकार शोषितो| गुरुचि मोह वारितो अविद्यभाव सारितो| गुरूचि ब्रम्ह दावितो गुरूचि ध्यान लावितो| गुरुचि विश्व सर्व आत्मरूप हे बुझवितो||७||
गुरुचि मूळदीप रे जगत गुरुस्वरूप रे| समस्त देव तदंश दिसताति साजीरे| गुरुचि पूर्णसिंधू रे तयांत देव बिंदू रे| गुरु स्वयंभू सूर्य अन्य सर्वही मयूर रे||८||
गुरुचि दिव्य दृष्टी रे गुरुचि सर्व सृष्टी रे| गुरुचि ज्ञानबोध रे गुरुचि सर्व शोध रे| गुणांत तोचि विस्तरे मनांत तोचि संचरे| समस्त भूतमात्र चेष्टवोनि एकला ऊरे| |९||
गुरु विराटरूप रे गुरु हिरण्यगर्भ रे| गुरुचि ॐ हिरण्यवर्ण पंचवर्ण मुख्य तार रे| गुरुचि विश्व तेजसू गुरुचि प्राज्ञ पुरुषु| गुरुविना दुजा नसे शृतीष घोष सर्वसु||१०||
गुरुचि ध्येय ध्यान रे गुरुचि सर्व मान रे| नसे गुरु समान रे| जनी गुरुस मान रे|गुरुचि थोर सान रे महासुखा निधान रे|'गुरू गुरू गुरू गुरू' करी म्हणोनी गान रे||११||
गुरुस्वरूप चिंतीजे समाधि हेचि बोलीजे| समस्त वेदपाथनाममंत्रजाप्य जाणिजे| यथार्थ सर्वतीर्थ जे सद्गुरुपदाब्जतोय हे| गुरुचि सेवणे अनेक अश्वमेध यज्ञ हे||१२||
नमो गुरु कृपाकरा| नमो गुरु परात्परा|नमो गुरु धनाधना| नमो गुरु निरंजना||१३||

महालक्ष्मीची आरती -

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता । ।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता ।
सहस्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां । । १ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ।
झळके हाटक-वाटी पीयुषरसपाणी ॥
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिकरवदना राजस मदनाची जननी । । २ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

ताराशक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं । ।
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रकटे पद्मावती निजधर्माचारी । । ३ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

अमृतभरिते सरिते अधदुरिते वारीं ।
मारीं दुर्घट असुरां भव दुस्तर तारी । ।
वारीं मायापटल प्रणमत परिवारी ।
हें रूप चिद्रुप तद्रुप दावीं निर्धारीं । । ४ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी ।
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी । ।
पुसोनी चरणतळीं पदसुमनें क्षाळी ।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी । । ५ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

श्री मंगेशाची आरती -
जय देव जय देव जय श्री मंगेशा| आरती ओवाळू तुजला सर्वेशा|| धृ||
महास्थान तुझे गोमंतक प्रांती| भावे करूनी करीतो तुजला आरती|
महाभक्त तुझे निशीदिनी गुण गाती|मी तो दास तुझ्या चरणांची माती|
जय||१||
धरलासी अवतार दुष्टा माराया|साधू संतजन पृथ्वी ताराया|
भक्तांचा तारक तू मंगेशराया|सर्प अक्षय करीतो तुजवरती छाया|
जय||२||
दु:खदारीद्रीक ही विघ्ने निवारी|संकटापासूनी मजलागी तारी|
शक्ती घेऊनी करी दुष्टा संहारी|जैसा धेनू रक्षी कृष्ण नरकारी|
जय||३||
तव गुणवर्णन करीता पुण्या ये चेव|तुझिया चरणी आहे माझा दृढभाव|
तुझे देवालयी बहुतची उत्साह|मोरेश्वर तुज नमितो चरणी दे ठाव||
जय||४||

श्री शांतादुर्गेची आरती
भूकैलासा ऐसी ही कवला नगरी|शांतादुर्गा तेथे भक्तभवहारी|
असुराते मर्दुनिया सुरवरकैवारी|स्मरती विधीहरीशंकर सुरगण अंतरी||१||
जय देवी जय देवी जय शांते जननी| दुर्गे बहुदु:खदमने रतलो तव भजनी||धृ||
प्रबोध तुझा नव्हे विश्वाभीतरी|नेति नेति शब्दे गर्जती पै चारी|
साही शास्त्रे मथिता न कळीसी निर्धारी|अष्टादश गर्जती परी नेणती तव थोरी|
जय||२||
कोटी मदन रूपा ऐसी मुखशोभा|सर्वांगी भूषणे जांबूनदगाभा|
नासाग्री मुक्ताफळ दिनमणीची प्रभा|भक्तजनाते अभय देसी तू अंबा|
जय||३||
अंबे भक्तांसाठी होसी साकार|नातरी जगजीवन तू नव्हसी गोचर|
विराटरूपा धरूनी करीसी व्यापार|त्रिगुणी विरहीत सहीत तुज कैचा पार|
जय||४||
त्रितापतापे श्रमलो निजवी निजसदनी|अंबे सकळारंभे राका शशीवदनी|
अगमे निगमे दुर्गे भक्तांचे जननी|पद्माजी बाबाजी रमला तव भजनी|
जय||५||

अंबेची आरती-

अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो|
प्रतिपदेपासूनी ती घटस्थापना करूनी हो|
मूलमंत्र जप करूनी भोवते रक्षक ठेवूनी हो|
ब्रम्हाविष्णूरुद्र आईचे पूजन करीती हो|

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।धृ।।

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो।
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो।।
कस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरूनी हो।
उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनि हो ।।उदो।।2।।

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो।
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो।।
कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो। उदो।।3।।

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो।
उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणीं हो।।
पूर्ण कृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो।
भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणी हो।।उदो।।4।।

पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो।
अर्घ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो।।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो।
आनंदे प्रेम तें आलें सद्भावे क्रिडता हो।।उदो।।5।।

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो।
घेऊनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो।।
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्तफलांचा हो।
जोगावा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो।।उदो।।6।।

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो।
तेथें तूं नांदसी भोवतें पुष्पें नानापरी हो।।
जाईजुई- शेवंती पूजा रेखियली बरवी हो।
भक्त संकटी पडतां झे‍लूनि घेसी वरचे वरी हो।।उदो।।7।।

अष्टमीचे दिवशी अष्टभुजां नारायणी हो।
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो।।
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो।
स्तनपान देऊनि सुखी केली अंत:करणीं हो।।उदो।।8।।

नवमीचे दिवशी नवदिवसांचें पारणें हो।
सप्तशतीजप होम हवनें सद्गक्ती करूनी हो।।
षड्रसअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो।
आचार्य ब्राह्मणा तृप्त केलें कृपेंवरूनी हो।।उदो।।9।।

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो।
सिंहारुढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो।।
शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो।।उदा।।10 ||

|| (अ)घोरकष्टोद्धारणस्तोत्रम ||

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव| श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव |
भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || १ ||

त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं | त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम |
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || २ ||

पापं तापं व्याधीमाधींच दैन्यम | भीतिं क्लेशं त्वं हरा$शुत्व दैन्यम |
त्रातारंनो वीक्ष इशास्त जूर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ३ ||

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता | त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता |
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ४ ||

धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिं | सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं
भावासक्तिंचाखिलानन्दमूर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ५ ||

श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम |
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत || ६ ||

|| इति श्रीमत्वासुदेवानंदसरस्वतिविरचितं (अ)घोरकष्टोद्धारणस्तोत्रम सम्पूर्णम ||

(अ)'घोरकष्टोद्धारणस्तोत्रम' या नावामध्येच या स्तोत्राचे फलीत आहे. 'घोर+कष्ट+उद्धार' अशी याची फोड केल्यास, असे लक्षात येते की मनुष्य जन्म हाच मुळी, पाप आणि पुण्य याच्या संमिश्रणातून साकार होतो. अशा 'मनुष्य' जन्माला आल्यानंतर... या 'जन्म आणि मृत्यू' या चक्रात अखंडपणे फिरताना होणार्‍या 'घोर' कष्टाची जाणीव झाल्यामूळे आणि यातून सुटण्याची जीवाची असहाय्यता लक्षात आल्यामूळे.... होणारी जीवाची 'तडफड' पाहून अतिशय करूणा आल्यामूळे.. स्वतः प.पू.श्री सद्गुरु भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप ..प.पू प.प. श्री वासूदेवानंद सरस्वती .. श्रीटेंब्येस्वामी यांनी या स्तोत्राची रचना केली आहे.

या दृष्टीने पाहू गेल्यास ... या स्तोत्राचे फलीत अगोदर पाहूयात..

धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिं | सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं
भावासक्तिंचाखिलानन्दमूर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ५ ||

श्रीगुरूमुखातून मिळालेल्या.. या स्तोत्राच्या पठणाने.. सद-धर्माविषयी प्रेम... सु-मति (सद्-बुद्धी).. भक्ति.. सत्-संगती याची प्राप्ति होते.. त्यामूळे याच देहात भुक्तिं म्हणजेच सर्व ऐहिक आणि पारलौकिक कामनांची पुर्तता झाल्यामूळे, अंतिमतः 'मुक्तिं' या चतुर्थ पुरुषार्थाचा लाभ होतो. म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाची पुर्तता होऊन "भावासक्तिंचाखिलानन्दमूर्त" रुपी, श्रीदत्तात्रेय-आनंद स्वरुपाची,म्हणजेच 'भक्ति' या पंचम पुरुषार्थाची निश्चितपणे प्राप्ती होते.

त्यामूळे..

श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम |
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत || ६ ||

अशा प्रकारे.. या पाच श्लोकाचे 'नित्य' पठण करणार्‍या..कर्त्याचे, सर्वार्थाने 'मंगल' होते.. असा अनन्य भक्त, प्रभुश्रीदत्तात्रेयाना अति प्रिय होतो.

आता थोडक्यात अर्थ पाहू...

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव| श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव |
भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || १ ||

हे प.पू श्रीपाद.. श्रीवल्लभा.. देवाधीदेवा.. 'मी' आपणास शरण आलो आहे.. हा माझा भाव लक्षात(ग्राह्य मानून) घेऊन.. आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत... आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा! आपणास माझा नमस्कार असो!

त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं | त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम |
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || २ ||

हे प्रभो..विश्वमूर्ते.. माझे माता-पिता-बांधव..त्राता आपणच आहात.... आपणच सर्वाचे 'योग-क्षेम' पहाता.. माझे सर्वस्व आपणच आहात.. म्हणून आपण कृपावंत होऊन या संसाररुपी-भवसागररुपी घोर संकटातून माझा उद्धार करावा.. हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो.

पापं तापं व्याधीमाधींच दैन्यम | भीतिं क्लेशं त्वं हरा$शुत्व दैन्यम |
त्रातारंनो वीक्ष इशास्त जूर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ३ ||

आपण.. आध्यात्मिक,आधिभौतिक आणि आधिदैविक, अशा पापयुक्त त्रिविधतापातून माझी सुटका करावी.. माझ्या शारिरीक-मानसिक व्याधी.. माझे दैन्य,भीति इ. क्लेश दूर करावेत आणि या घोर-कलीकाळापासून..या घोरसंकटातून माझा उद्धार करावा... हे श्रीदत्तात्रेया.. आपणास माझा नमस्कार असो.

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता | त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता |
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ४ ||

हे श्री अत्रिनंदना ... आपणाशिवाय मला अन्य कोणी समर्थ 'त्राता' नाही.. आपणासम दानशूर 'दाता' ही नाही.. आपणासम भरण-पोषण करणारा 'भर्ता' ही नाही... हे आपण लक्षात घेऊन, हे शरणागताची कोणत्याही प्रकारे उपेक्षा न करणार्‍या.. देवाधिदेवा, आपण माझा या 'घोर' संकटातून, माझ्यावर 'पुर्ण-अनुग्रह' करून उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिंगबरा ||
|| अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त ||

विडा

विडा घ्या हो स्वामी गुरुराया| तूची विश्रांतीची छाया||
अर्पितसे स्वीकार कराया|समर्थ तू योगीराया||धृ||
देह हे पिकले पान|त्यात घालोनी सामान||
त्रयोदशगुणीपूर्ण|विडा झाला प्रेमळ भजन||१||
केशर कस्तुरी विवेक|वैराग्याचा त्यात कात||
चुना भक्ती ही सुपारी|पत्री ही भूतदया||२||
शांती ही वेलदोडा|समाधान जायफळा||
बदाम खोबरे कंकोळ|क्षमा लवंग सत्क्रिया||३||
बालक दासाचा हा दास|प्रसादाची करी आस||४॥

शेजारती

आता स्वामी सुखे निद्रा करी अवधूता|सिद्धा अवधूता||
चिन्मय सुखस्वामी जऊनी पहुडा एकांता||
वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला|
तयावरी सत्प्रेमाचा शिडकाव केला||१||
पायघड्या घातलिया सुंदर नवविधा भक्ती||
स्वामी नवविधा भक्ती||
ज्ञानाच्या समई उजळोनी लावियल्या ज्योती||२||
भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगला|हृदयाकाशी टांगला|
मनाची सुमने करूनी केले शेजेला||३||
द्वैताचे कपाट लावूनी एकीकरण केले|एकीकरण केले|
दुर्बुद्धीच्या गाठी सोदूनी पडदे सोडीले||४||
आता तृष्णा कल्पनेचा सांडूनी गलबला|स्वामी सांडूनी गलबला||
क्षमा दया शांती उभ्या सेवेला||५||
अलक्ष हा उन्मनी घेऊनी नाजूक हा शेला|स्वामी नाजूक हा शेला|
निरंजन सद्गुरू माझा स्वामी निजला शेजेला||६||

पहिल्या पानावर अश्विनीने उल्लेख केलेले श्री क्षेत्र नारेश्वर, गुजराथ येथील प.पू. श्री रंगावधुत स्वामींची ही श्री रंग बावनी, आज गुरुवार २५ नोव्हें. २०१०, तिथी: संकष्टी चतुर्थी, रोजी इथे टाकत आहे.

|| श्री रंग बावनी ||

ब्रम्हानंदि निमग्न शांत भगवन ज्ञानेश योगीश्वर |
रेवातीरि निवासी संत हृदय श्रीदत्त सिद्धेश्वर ||
भावातीत भवाब्धितारक गुरु श्रीरंग स्वामी प्रभू |
वासूदेव पदी सदा नत असे श्रीरंग भावे नमू ||
||अवधूत चिंतन श्री | गुरुदेव दत्त ||
|| सदा शुद्धचित्ती स्मरु रंग दत्त ||
||ओम श्रीरंग प्रसन्नो अस्तु||

जय सद्गुरु रंगावधुता | नित्य निरामय श्रीदत्ता |
मम माता तु बंधु पिता | सखा सोयारा हितकर्ता ||१||

सदैव वाहसि मम चिंता | तू माझा पालन कर्ता |
अवखळ जरि भाविक परि | श्रद्धेने भजतात हरि ||२||

त्यांच्या कल्याणासाठी | संत महंताचे पोटी |
निर्गुण होते साकार | परब्रम्ह घे अवतार ||३||

विठ्ठल बाबा तपोनिधान | रुक्मांबा सात्विक महान |
केवळ त्यांना करुनि निमित्त | अवतरले प्रभू श्रीगुरुदत्त ||४||

शुद्धपक्ष कार्तिकांत | नवमि प्रदोष काळांत |
प्रगटे गोध्रा गावांत | भाविक गुर्जर प्रांतात ||५||

पांडुरंग नामे नटला | नारेश्वराचा नाथ भला |
ब्रम्हा शिव विष्णू अवतार | भक्तांना करण्या भवपार ||६||

शांत दांत योगी श्रेष्ठ | ब्रम्हनिष्ठ अन तपनिष्ठ |
निबिडारण्यी वास करी | नारेश्वरी रेवा तिरी ||७||

स्वर्ग लोक पृथ्वी वरती | प्रांतोप्रांती ही ख्याती |
सद्भक्तांना ये प्रचिती | नित्य दर्शनासी येती ||८||

भाविक श्रद्धेने करती | अनुष्ठान स्थानावरती |
त्वरित तयांना फलप्राप्ती | आणि मिळते चिरशांती ||९||

चिन्मय मंगल नाम तुझे | दत्त दिगंबर दयानिधे |
अपराधी मी पतित जरि | सेवक आश्रित तुझा परि ||१०||

अज्ञानी मी मूढ जरी | भक्त तुझा रे खरा परी |
पूजातंत्रि अजाण जरे | भावे पूजा करी परी ||११||

श्रद्धेने भजतो नित्य | तव पदी स्थिर ठेउनी चित्त |
लीले पूजा करिती |त्यांना होते तव प्राप्ती ||१२||

सकल मनेप्सित मिळताती | अंती मिळते मोक्षगती |
श्रेष्ठी ऐसें वदताती | कोडे मज मी मंदमती ||१३||

फेडी माझी ही भ्रांती | तोवरी नसूदे विश्रांती |
अगाध लिला तू करिशी | कुंठित मति वर्णायासी ||१४||

भवानी शंकर शास्त्रींना | पिंडित दर्शन दिलेस ना |
कागद दिधले काकांना | यवन वेष तू धरुनी ना ||१५||

मग आत तू गप्प कसा | असशील येई त्वरे तसा |
डायाभाईंचा विस्फोटक | जयाबेनचा आजार अंतक ||१६||

बाबुभाईंचा ताप भयंकर | घालविले तुज स्मरता सर्वर |
मंगललालाकडे किती | जेउन उरले अन्न अती || १७||

ऐशा लिला नित्य किती | केल्या त्यांना नाही मिती |
जे तुज श्रद्धेने भजती | त्यांना काय कमी जगती ||१८||

जीवन रंगी रंगविले | ज्यांनी त्यांना तू दिधले |
सुख धन आणि जे भोग्य | यश किर्ती आयुरारोग्य ||१९||

मनकवडा म्हणतात तुला | जाणून दे मम मजसी मला |
विनम्र लिंबाचे झाड | तुझ्या कृपे पाने गोड ||२०||

वृक्षलताही उद्धरती | म्हणूनी मजला नाही क्षिती |
गाता तव मंगल कीर्ति | होईल आणि इच्छा पूर्ति ||२१||

सिद्धी सा-या होतील दास | करतील पायी नित्य निवास |
पापे त्वरीत जळतील | वांछित प्राप्तही होईल ||२२||

विश्वासा या ठेवोनी | विनम्र भावे तव चरणी |
आलो लोळत पतित जरी | शरणांगत मी मज तारी ||२३||

आता पाहू नको अंत | तारी मारी नसे खंत |
मारशील तर कृपानिधी | होईल ऐसे तरि कधी ||२४||

विलंब आता कां करसी | कृपा करी झणि मजवरती |
अवधूता रे अवधूता | नाही कशाची मज चिंता ||२५||

तव चरणी लोळण घेई | प्रसादकण तरि मज देई |
योगी तारक पतितांचा | बोला जय रंग अवधूता ||२६||

अरे तुम्ही लोक फारच छान लिहिता बाई !
मी आज प्रथमच 'मायबोली डॉट कॉम' बघितले, आणि प्रेमातच पडले हो !
लगेच मेम्बर सुद्।आ झाले हो !
कित्ती मजा हो !

आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी आपण देवाची नेहेमीच प्रार्थना करतो,अशीच ही एक प्रार्थना.

तुझ्याच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा
सर्व संकटे दूर करोनी रक्षी रे जगदीशा (१)

प्रातःकाळी सायंकाळी दिवसा रात्री केंव्हाही
शिशुवरी तव कृपा असुदे चिंता त्याची तू वाही (२)

दुष्ट नजर त्या कधी न लागो ग्रहादि पीडा तू तोडी
गोरजपीडा भूतप्रपीडा तोडी ,फोडी ,तू मोडी (३)

त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्टा छेदोनी
तुझ्या रक्षणे अलंकारिले बालक तूही पाहोनी (४)

अश्विनीवेषा हे जगदीशा कुमार माझा तू रक्षी
झोपी जावो उभा असो वा असो कुठेही ,तू साक्षी (५)

दीर्घायू हे बालक होवो ओजबलाने युक्त असो
मुमुक्षत्व तू मला देऊनी बालकचिंता तुला असो (६)

Pages