स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks Ashwini for reply pan he mi marathi war sharad upadhe yani sangitle hote ki pregnant women ne datta prabodh wachave,

If u have more information regarding this kindly reply,

Thanks uju

उजू, ज्यांनी तुला दत्त प्रबोध वाचायला सांगितला आहे त्यांनाच तू कधी वाचू असं विचारलेलं बरं कारण काही स्पेसिफिक कारणासाठी त्यांनी तुला वाचायला सांगितला असेल Happy

पाठ क्रमांक तीस मधे "तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि" असे म्हणले आहे, तर या हरिपाठात "तुका म्हणे" हे कसे काय? कृपया जाणकारांनी खुलासा करावा! मी अन्य साधने तपासुन घेतो आहे.


॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥

॥ एक ॥
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण् करी ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥
॥ दोन ॥
चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मागु ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न भाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
॥ तिन ॥
त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥
॥ चार ॥
भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलं नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥
॥ पाच ॥
योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांग ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥
॥ सहा ॥
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसा ॥२॥
मोक्षरेख आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥
॥ सात ॥
पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥
नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥
॥ आठ ॥
संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
॥ न‌ऊ ॥
विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥
उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
॥ दहा ॥
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥
पुराणप्रसिद्ध वोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥
॥ अकरा ॥
हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥
तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥
हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे याचे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥
॥ बारा ॥
तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि । वायांचि उपाधि करिसी जनां ॥१॥
भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेतां भूमिवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥
॥ तेरा ॥
समाधि हरिची सम सुखेंवीण् । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥
ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥
ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥
॥ चौदा ॥
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥
॥ पंधरा ॥
एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥
समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥
सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४॥
॥ सोळा ॥
हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥४॥
॥ सतरा ॥
हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥
मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर हो‌ऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिले माझ्या हातीं ॥४॥
॥ अठरा ॥
हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥
॥ एकोणीस ॥
वेदशास्त्रपुराण श्रेतींचें वचन । एक नारायण सार जप ॥१॥
जप तप कर्म हरिविण धर्म । वा‌उगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवां मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४॥
॥ विस ॥
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोडी गेली त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचे तप एक नाम । सर्वमार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥
ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥
॥ एकविस ॥
काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥
॥ बाविस ॥
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरिविण जन्म नरकचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणि होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥
॥ तेविस ॥
सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥
तैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥
अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥
॥ चौविस ॥
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥
जाति वित्त गोत कुलशील मात । भजकां त्वरीत भावयुक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥
॥ पंचविस ॥
जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरि‌उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥
॥ सव्वीस ॥
एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा ये‌ईल तुझी ॥१॥
तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जासील झणीं ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥
॥ सत्तावीस ॥
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥
नाम मंत्र जप कोटी जा‌ईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥
निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी । इंद्रियांसवडी लपू नको ॥४॥
तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥

सूचना: न्यूबिर यांनी तपासण्यास सूचविल्याप्रमाणे, त्यांचेकडील श्री. के. वि. बेलसरे ह्यांचे 'श्री ज्ञानदेव हरिपाठ सार्थ' मधे फक्त २७ अभंग आहेत व ते येथिल अभंगांशी जुळतात. परंतु २८-३१ हे अभंग श्री. बेलसरे ह्यांच्या भावार्थासहित असलेल्या 'ज्ञानदेवांच्या हरिपाठ' मध्ये नाही आहेत. मी जयहिंद प्रकाशनच्या ज्या २००२ सालच्या आवृत्तीच्या पुस्तिकेतुन घेतले आहेत ते बहुतेक, परंपरेप्रमाणे एकापाठी म्हणले जातात म्हणून आले असावेत. स्वतंत्ररित्या श्री तुकाराम महाराजांचे हरिपाठ इथे देताना सुधारणा करता येईल.

॥ अठ्ठावीस ॥
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥
असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मनीं । उल्हासेंकरूनी स्मरावा हरि ॥३॥
अंतकाळी तैसा संकटाचे वेळीं । हरि त्या सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥
संतसज्जनांनी घेतली प्रचीति । आळसी मंदमति केवीं तरे ॥५॥
श्रीगुरु-निवृत्तिवचन तें प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥
॥ एकोणतीस ॥
कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥१॥
मी तूं हा विचार विवेकें शोधावा । गोविंदामाधवा याच देहीं ॥२॥
देहीं ध्यातां ध्यान त्रिपुटींवेगळा । सहस्र दळी उगवला सूर्य जैसा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योति । या नांवे रूपें तीं तुम्ही जाणा ॥४॥
॥ तीस ॥
नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरींची ॥१॥
न लगती सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥२॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥३॥
रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥४॥
यावीण असतां आणीक साधन । वाहातसें आण विठोबाची ॥५॥
तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि । शहाणा तो धणी घेतो येथें ॥६॥
॥ एकतीस ॥
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरीं । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरी ॥४॥

मी लहानपणापासून जसं म्हणते तसं देवी कवच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. जाणकार मार्गदर्शन करतीलच.
// श्री देवी कवच //
अथ दुर्गा कवच प्रारभ्यते
नमश्चंडिकायै मार्कंडेयु्वाच
ओम यद्गुय्हम परमम् लोके सर्व रक्षा कर नृणाम
यन्न कस्य चिदाख्यातम् तन्मे ब्रूहि पितामह
अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारम्
देव्यास्तु कवचं पुण्यं तत् शृणुश्व महामुने
प्रथमम् शैलपुत्रीच द्वितीयम् ब्रह्मचारिणी
तृतीयम चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकम्
पंचमम् स्कंदमातेति षष्टं कात्यायनीतिच
सप्तमम् कालरात्रीश्च महागौरीतिचाष्टमम्
नवमम् सिद्धदात्रीश्च नवदुर्गा प्रकीर्तिता
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना
अग्निना दय्हमानस्तु शत्रुमध्ये गतो रणे
विषमे दुर्गमेचैव भयार्ता शरणं गता
नतेषाम् जायते किंचित अशुभम् रणसंकटे
नापदम् तस्य पश्यामि शोक दु:खम् भयम् नहि
येस्तुभक्त्यास्मृतानूनं तेषां सिद्धी: प्रजायते
ये त्वां स्मरंति देवेषी रक्षसे तांनसंशय:
प्रेतसंस्था तु चामुंडा वाराही महिषास्मरा
ऐंद्रिगज समारूढा वैष्णवी गरुडासना
माहेश्वरी वृषारूढा कौमेरी शिखिवाहना
लक्ष्मी:पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया
श्वेतरूपधरादेवी इश्वरी वृशवाहना
ब्राह्मीहंससमारूढा सर्वाभरणाभूषित
इत्येतामातर: सर्वा सर्व योग समन्विता
नानाभरण शोभाढया नाना रत्नोपशिभिता
दृश्यंते रथमारूढा देवै क्रोध समाकुला
शंखं चक्रं गदां शक्तीं हलंचमुसलायुधम्
खेटकं तोमरंचैव परशूं पाशमेवच
कुंतायुधं त्रिशूलंच शारंग्रमायुधमुत्तम्
दैत्यानां देहनाशाय भक्तानाम भयायच
धारय्न्त्यायुधानिथ्थम्म् देवानाम् च हितायवै
नमस्तैस्तु महारौद्रे महाघोर पराक्रमे
महाबले महोत्साहे महाभयविलासिनी
त्राहि माम देवी दुष्प्रेक्षे शत्रुणां भयवर्धिनी
प्राच्याम् रक्षति मामेंद्रि अग्नेयाम् अग्नि देवता
दक्षिणेवतु वाराही नैऋत्याम् खड्गधारिणीम्
प्रचित्याम् वारुणीम् रक्षेत वायव्याम् मृगवाहिनीम्
उदिच्याम् पातु कौमेरी ईशान्यम् शूलधारिणीम्
ऊर्ध्वम् ब्रह्माणिमेरक्षेत दधस्ता वैष्णवी तथा
एवं दशदिशो रक्षेत चामुंडा शववाहना
जयामेचाघ्रत: पातु विजय: पाप पृष्ठ्त:
अजिता वाम पार्श्वेतु दक्षिणेचा पराजिता
शिखामेद्योतिनी रक्षेदुमामूर्ध्नीव्यवस्थिता
मालाधरिललाटेच भ्रुवौरक्षेत् यशस्विनी
त्रिनेत्राच भ्रुवोर्मध्येर्यमघंटाच नासिके
शंखिनी चक्षशोर्मध्येर्श्रोत्रयोर्द्वारवासिनी
कपौलोकालिकारक्षेत् कर्णमूलेतु शांकरी
नासिकायां सुगंधाच उत्तरोष्ठेचर्चिका
अधरेचामृतकलाजिव्हायामच सरस्वती
दंतारक्षतु कौमेरी कंठदेशेतु चंडिका
घंटिका चित्रघंटाच महामायाच ताल्लुके
कामाक्षि चिबुकं रक्षेद्वाचंमे सर्वमंगला
ग्रीवायां भद्रकालीच पृष्ठवंशे धनुर्धरी
नीलग्रीवा बहि:कंठे नलिकांनलकूबरी
स्कंदयो खड्गिनीरक्षेत बाहुमे वज्रधारिणी
हस्तयोर्द्ंडिनिरक्षेत् अंबिकाचांगुलीषुच
नखांशूलेश्वरी रक्षेत कुक्षौरक्षेत कुलेश्वरी
स्तनौरक्षेत् महादेवी मन:शोकविनाशिनीं
ऱ्हदये ललितादेवी उदरे शूलधारिणीं
नाभौचकामिनी रक्षेत गुह्यं गुह्येश्वरी तथा
पूतनाकामिका मेंढ्र्ं गुदे महिषवाहिनी
कट्यां भगवतीं रक्षेत् जानुनी विध्यवासिनी
जंघेमहाबलारक्षेत् सर्वकामप्रदायिनी
गुल्फ़योर्नारसींव्हीम् च पादपृष्ठैतुतेजससि
पादांगुलीषु श्रीरक्षेत पादाद: स्तलवासिनी
नखदंष्ट्रा करालीच केशांश्चेवोर्ध्वकेशिनी
रोमकूपेशु कौमेरी त्वचंवागीश्वरी तथा
रक्तमज्जवसामांस्यानस्थीमेदांसि पार्वती
अंत्राणि कालरात्रीश्चपित्तंच मुकुटेश्वरी
पद्मावति पद्मकोषे कफ़ेचुडामणिस्तथा
ज्वालामुखी नसजालमभेद्या सर्वसंधिषु
शुक्रंब्रह्माणिमेरक्षेत छायांछत्रेश्वरी तथा
अहंकारं मनोबुद्धींरक्षेन्मे धर्मधारिणीम्
प्राणापानौतथाव्यानम् उदानंच समानकम
वज्रहस्ताचमे रक्षेत प्राणं कल्याणशोभनाम्
रसं रूपंच गंधंच शब्दं स्पर्शंच योगिनी
सत्वंरजस्तमश्चैव रक्षेन्नारायणि सदा
आयु रक्षतु वाराही धर्मम् रक्षतु वैश्णवी
यश: किर्तींच लक्ष्मींच धनं विद्याम् च चक्रिणीम्
गोत्रम् इंद्राणिमे रक्षेत पशून्मे रक्ष चंडिके
पुत्रां रक्षेत महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी
पंथानम् सुपंथान् रक्षेत मार्गम् क्षेमकरी तथा
राजद्वारे महालक्ष्मीं विजय:सर्वतस्थिता:
रक्षाहीनं तु यत्स्थानम् वर्जितम् कवचेनतु
तत्सर्वम् रक्षमे देवी जयंती पापनाशिनी
पदमेकंनगच्छेत्तु यदिच्छेच्छु भामात्मना:
कवचेनावृतोनित्यम् यत्रयत्रैव गच्छति
तत्रतत्रार्त् लाभश्च विजय: सर्वकामिक:
यं यं चिंतयते कामम् तं तं प्राप्नोतिनिश्चितम
परमैश्वर्यमतुलम् प्राप्स्यते भूतलेपुमान्
निर्भयो जायते मर्त्य:स्ंग्रामेश्वपराजिता:
जीवेत् वर्षशतंसाग्रम् अपमृत्युविवर्जित:
नश्यन्तिदर्शनास्तस्य कवचेऱ्हदिसंस्थिते
मानोन्नतिर्भवेद्राद्न्यस्तेजोवृद्धिकरंपरम्
यशसावर्धतेसोपिकीर्तिमंडितभूतले
जपेत्सप्तशतिंचंडिम् कृत्वातुकवचंपुरा
यावद् भूमंडलंधत्तेसशैलवनकाननम्
तावस्तिष्ठतिमेदिन्यासंतति:पुत्रपौत्रिकी
देहांतेपरम् स्थानम् यत्सुरैरापिदुर्लभम्
प्राप्नोति पुरुषो नित्यं महामाया प्रसादत:
लभते परम् रूप शिवेनसहमोदते
इतिवाराहपुराणे हरिहरब्रह्मविरचितम्
देवै:कवचम् समाप्तम् //

सिद्धमंगल स्तोत्रः
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात हे स्तोत्र दिलेले आहे.

श्रीमदनन्त श्रीविभूषित अप्पल लक्ष्मी नरसिम्हराजा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||१||

श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखिधरा श्रीपादा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||२||

माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||३||

सत्य ऋषीश्वर दुहितानन्दन बापनार्यनुत श्रीचरणा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||४||

सवित्रृकाठकचयन पुण्यफल भारद्वाजऋषि गोत्र संभवा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||५||

दो चौपाती देव लक्ष्मी घनसख्या बोधित श्रीचरणा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||६||

पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भपुण्यफल संजाता
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||७||

सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेवप्रभु श्रीपादा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||८||

पीठिकापुर नित्यविहारा मधुमती दत्ता मन्गलरूपा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||९||

आज घरी एक यंत्र आणले. त्यात ५० मंत्र ऐकू येतात. त्यात शनी मंत्र आहे. त्यात शनैश्वरं असे म्हटले आहे. ( सुरेश वाडकर) . पण मला ते शनैश्चरम असे असल्याचे वाटते - लहानपणी पाठ केलेले. म्हणून इथे येऊन पाहिले, तर इथेही शनैश्वरं आहे..
पान तीनवर नवग्रह स्तोत्र आहे...

नीलांजन समाभासं
रविपुत्रं यमाग्रजं
छायामार्तंड संभूतं
तं नमामि शनैश्वरं

ते शनैश्वरं आहे की शनैश्चरम आहे?

विकिपेडियावरही असे दिले आहे.. http://en.wikipedia.org/wiki/Shani

निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥
nilānjana samābhāsaṁ raviputraṁ yamāgrajama,
chāyāmārtaṁḍa saṁbhūtaṁ taṁ namāmi śanaiścarama.

शनीला शनीश्वर म्हणतात. शनी + ईश्वर.. तसा पाठ्भेद असता, तर शनीश्वरम् आले असते, शनैश्वरम् नव्हे.

शनैश्चर: म्हणजे शनै: + चर: .. म्हणजे हळूहळू चालणारा. . शनीदेव एका पायाने अधू असल्याने हळू चालतो. शनैश्चरम् हे त्याचे द्वितियेचे रूप आहे असे वाटते. जाणकारानी खुलासा करावा..

अश्विनि के. तु सुरु केलेला धागा छानच सुरु आहे, त्याबद्दल तुझे अभिनन्दन. विविध स्तोत्रे या सदरात आलेलि आहेत, त्यन्च्या चालि मला हव्या आहेत्त. क्रुपया असे एखादे सन्केत स्थल असेल तर लिन्क देने.
धन्यवाद!

जामोप्या,
'शनैश्चरं' च बरोबर आहे.
शनैश्वर हे रूपच गडबड घोटाळा आहे !
शनै: असा शब्द आहे. अगदीच 'ईश्वर' हवाच असेल तर
शनैश्चरेश्वर असं पाहिजे. Proud

@ मानुषी,
देवीकवचात बर्‍याच चुका आहेत लिखाणाच्या दृष्टीने.
उद्या/परवात इथे देतो सुधारित आवृत्ती!

ragh.JPG

ही प्रार्थना म्हणत असताना प.पू. बापूंजींच्यावर सांप्रदायिकतेचे आरोप झाले.. त्यामुळे त्यानी अंतरा बदलला असे म्हणतात.. Happy

रघुपति राघव राजाराम,
पतित पावन सीताराम |

सीताराम सीताराम,
भज प्यारे तू सीताराम |

ईश्वर अल्लाह तेरो नाम,
सब को सन्मति दे भगवान |

जय रघुनंदन जय सिया राम,
जानकी वल्लभ सीताराम |

अतिशय उपयुक्त असा हा सन्ग्रह आहे. मला मराठी शिवमहिन्म स्तोत्र (पुश्पदन्ताचे ओविबध) हवे आहे.मिळेल का?

सर्वांची श्रध्दा पाहून मन खुप भरुन आल आहे.सर्व जण नियमाने सूर्याथर्वशीर्ष
का म्हणत नाहीत अर्थात मला हे सांगण्याचा अधिकार नाही तरी सांगीतल
चू. भू. माफ.

अर्र अर्पणा, थोड आधी तरी सुचवायचस Happy , लिम्बी करते मार्गशीर्ष गुरुवारची पूजा. आता जमल्यास या आठवड्यात तिच्याकडच्या पुस्तकातुन घेतो ती कहाणी टायपायला. Happy

तुमचा वर विषय निघाला म्हणून अन माझ्याकडे आहे तयार टायपुन म्हणून लगेच इथे देतोय.

हे स्तोत्र म्हणताना/ऐकताना फार छान वाटते. उच्चार मात्र स्पष्ट व शुद्ध हवेत.
स्तोत्राचे शेवटी फलनि:ष्पत्ती मधे दिल्याप्रमाणे विशिष्ट हेतू मनाशी ठेवुन (अन अर्थातच, तुमचा हेतू रास्त/न्याय्य आहे असे गृहित धरुन) या स्तोत्राचे रोजचे रोज पठण केले असता महिनाभरातच परिणाम दिसू लागतात, हेतू स्वरुपानुसार किती काळ पठण करायचे ते ठरवावे. हनुमान चिरंजीव आहे, त्याच्या तसेच नवनाथ स्तोत्रान्चा प्रभाव तत्काळ दिसून येतो असा अनुभव आहे. माझ्यावरील आत्यन्तिक संकटकाळात, चहुबाजून्नी परिस्थितीजन्य शत्रून्नी कुटुम्बासहित घेरले गेलो असताना, व्यावहारिक सर्व उपाय हरले असताना वा अजुन कोणते व्यावहारिक उपायच शक्याशक्यतेत नसताना, समोर केवळ वाताहत सदृष परिस्थिती निर्माण करणारे दिसत असता, माझ्या मित्राने मला हे सुचविले, मी लगेच सलग तिन महिने ते न चूकता रोजचे रोज पठण केले, व त्याचे अपेक्षीत "दूरगामी" फळही मिळाले. कुटुम्बावरिल त्या विशिष्ट "सन्कटाचे" नामोनिशाणही राहिले नाही/परस्पर पारिपत्य झाले.

***************************

॥ पंचमुखी हनुमत्कवचम् ॥
ॐ श्री हरिगुरुभ्यो नम: ॥ हरि: ॐ ॥ अस्य श्रीपंचमुखी वीर हनुमत्कवच स्त्रोत्र मंत्रस्य ॥ ब्रह्मा‌ऋषी: ॥ गायत्री छंद: ॥ पंचमुखी श्रीरामचंद्ररूपी परमात्मा देवता ॥ र्‍हां बीजम् र्‍हीं शक्ति: चंद्र इति कीलकं ॥ पंचमुखांतर्गत श्रीरामचंद्ररूपी परमात्मा प्रसाद सिद्ध्यर्थे जपे विनियोग: ॥
॥ अथ अंगुली न्यास: ॥
ॐ र्‍हां अंगुष्ठाभ्यां नम: ॥ ॐ र्‍हीं तर्जनीभ्यां नम: || ॐ र्‍हूं मध्यमाभ्यां नम: ॥ ॐ र्‍हैं अनामिकाभ्यां नम: ॥ ॐ र्‍हौं कनिष्ठिकाभ्यां नम: ॥ ॐ र्‍हः करतल करपृष्ठाभ्यां नम: ॥ इति करन्यास: ॥
॥ अथ हृदयादि न्यास: ॥
ॐ र्‍हां हृदयाय नम: ॥ ॐ र्‍हीं शिरसे स्वाहा ॥ ॐ र्‍हूं शिखायै वषट् ॥ ॐ र्‍हैं कवचायहुम् ॥ ॐ र्‍हौं नेत्रत्रयाय वौषट् ॥ ॐ र्‍हः अस्त्राय फट् ॥ इति हृदयन्यास: ॥ ॐ भूर्भुवस्वरोम् ॥
॥ अथ दिग्बंध: ॥
॥ ॐ कँ खँ घँ गँ ङँ चँ छँ जँ झँ ञँ टँ ठँ डँ ढँ णँ तँ थँ दँ धँ नँ पँ फँ बँ भँ मँ यँ रँ लँ वँ शँ षँ सँ हँ ळँ क्षँ स्वाहा ॥ इति दिग्बंध: ॥
॥ अथ ध्यानम् ॥
वंदे वानर नारसिंह खगराट् क्रोडागाश्ववक्त्रान्वितं । दिव्यालंकरणं त्रिपंचनयनं दैदीप्यमानं ऋचा । हस्ताब्जैरसिखेट पुस्तकं सुधाकुंभं कुशादीन् हलान् । खट्वागं कनिभूरुहं दशभुजं सर्वारिदर्पापहम् ॥१॥
पंचवक्त्रं महाभीमं त्रिपंचनयनैर्युतम् । दशभिर्बाहुभिर्युक्तं सर्व कामार्थ सिद्धिदम् ॥२॥
पूर्वे तु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम् । दंष्ट्रा कराल वदनं भृकुटीकुटिलेक्षणम् ॥३॥
अन्यं तु दक्षिणे वक्त्रं नारसिंहं महाद्भुतं । अत्युग्रतेजोज्वलितं भीषणं भयनाशनम् ॥४॥
पश्चिमे गारुडं वक्त्र वज्रतुंडं महाबलं । सर्व रोग प्रशमनं विषभूतादिकृंतनम् ॥५॥
उत्तरे सूकरं वक्त्र कृष्णादित्यं महोज्वलं । पाताल सिद्धिदं नृणां ज्वर रोगादि नाशनम् ॥६॥
ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवांतकरंपरं । येन वक्त्रेण विप्रेंद्र सर्व विद्याविनिर्ययु: ॥७॥
एतत्पंचमुखं तस्य ध्यायतोन भयंकरं । खड्गं त्रिशूलं खट्वागं परश्वंकुशपर्वतम् ॥८॥
खेटांसीनि-पुस्तकं च सुधा कुंभ हलं तथा । एतान्यायुध जातानि धारयंतं भजामहे ॥९॥
प्रेतासनोपविष्टंतुं दिव्याभरणभूषितं । दिव्यमालांबरधरं दिव्यगंधानुलेपनम् ॥१०॥
ॐ मर्कटेश महोत्साह सर्वशोकविनाशक । शत्रून्‌संहर मां रक्षश्रियं दापयमे प्रभो ॥११॥
सर्वैश्वर्यमयं देवमनंतं विश्वतोमुखम् । एवं ध्यायेत् पंचमुखं सर्व काम फल प्रदं ॥१२॥ पंचास्यमच्युतमनेकविचित्रवीर्यं । श्रीशंख चक्र रमणीय भुजाग्रदेशम् ॥
पीतांबरं मुकुट कुंडल नूपुरांगं । उद्द्योतितंकपिवरं हृदि भावयामि ॥१३॥
चंद्रार्धंचरणावरविंद युगुलं कौपीनमौंजीधर । नाभ्यांवैकटीसूत्रबद्ध वसनं यज्ञोपवीतं शुभम् । हस्ताभ्यामवलंब्यचांजलिपुटं हारावलिं कुंडलम् । बिभ्रद्वीर्यशिखं प्रसन्नवदनं विद्याजनेयं भजे ॥१४॥
ॐ मर्कटेश महोत्साह सर्वशोकविनाशक । शत्रून्‌संहर मां रक्षश्रियं दापयमे प्रभो ॥१५॥
इति ध्यानम् ॥
॥ अथ प्रयोग मंत्र: ॥
॥ ॐ हरिमर्कट महामर्कटाय ॐ वँ वँ वँ वँ वँ वँ वौषट् हुंफट् घेघेघे स्वाहा (कपिमुखे) ॥
ॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ फँ फँ फँ फँ फँ फँ हुंफट् घेघेघे स्वाहा (नारसिंहमुखे) ॥
ॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ खें खें खें खें खें खें हुंफट् घेघेघे स्वाहा (गरूडमुखे) ॥
ॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ ठँ ठँ ठँ ठँ ठँ ठँ हुंफट् घेघेघे स्तंभनाय स्वाहा (वराहमुखे) ॥
ॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ हुंफट् घेघेघे आकर्षण सप्तकाय स्वाहा (हयमुखे) ॥
ॐ हरि मर्कट महामंत्रमिदं परिलिख्यति लिख्यति भूमितले ॥ यदि नश्यति नश्यति वामकरे परिमुंचति मुंचति श्रृंखलिका
॥ इति प्रयोगमंत्र: ॥
॥ॐ अथ मूलमंत्र: ॥
॥ ॐ हरिमर्कट महामर्कटाय हुंफट् घेघेघे स्वाहा ॥
ॐ नमो भगवते पंचवदनाय पूर्वे कपिमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ ठँ ठँ ठँ ठँ ठँ सकलशत्रुविनाशाय सर्वशत्रुसंहारणाय महाबलाय ॥ हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥१॥
ॐ नमो भगवते पंचवदनाय दक्षिण करालवदन श्रीनारसिंहमुखाय ॐ हँ हँ हँ हँ हँ हँ सकलभूतप्रेतदमनाय ब्रह्महत्यासमंध बाधानिवारणाय महाबलाय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥२॥
ॐ नमो भगवते पंचवदनाय पश्चिमे वीरगरुडमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ मँ मँ मँ मँ मँ मँ महारुद्राय सकल रोगविषपरिहाराय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥३॥
ॐ नमो भगवते पंचवदनाय उत्तरे आदिवराहमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ लँ लँ लँ लँ लँ लँ लक्ष्मणप्राणदात्रे लंकापुरीदाहनाय सकल संपत्‌करायपुत्रपौत्राद्यभिवृद्धिकराय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥४॥
ॐ नमो भगवते पंचवदनाय उर्ध्वदिशे हयग्रीवमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ रूँ रूँ रूँ रूँ रूँ रूँ रुद्रमूर्तये सकललोक वशीकरणाय वेदविद्या स्वरूपिणे हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥५॥
इति मूलमंत्र: ॥
॥ हनुमत्कवचम् ॥
॥ अथ कवच प्रारंभ: ॥
ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥ ॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते प्रभवपराक्रमाय अक्रांताय सकल दिग्मंडलाय । शोभिताननाय । धवलोकृतवज्रदेहाय जगतचिंतिताय । रुद्रावताराय । लंकापुरी दहनाय । उदधिलंघनाय । सेतुबंधनाय । दशकंठ शिराक्रांतनाय । सीताऽऽ श्वासनाय । अनंतकोटीब्रह्मांडनायकाय । महाबलाय । वायुपुत्राय । अंजनीदेविगर्भसंभूताय । श्रीरामलक्ष्मण आनंदकराय । कपिसैन्य प्रियकराय । सुग्रीव सहायकारण कार्य साधकाय । पर्वतोत्पातनाय । कुमार ब्रह्म चारिणे गंभीर शब्दोदयाय । ॐ र्‍हीं क्लीं सर्व दुष्ट ग्रहनिवारणाय । सर्वरोग ज्वरोच्चाटनाय । डाकिनीशाकिनीविध्वंसनाय ॐ श्रीं र्‍हीं हुंफट् घेघेघे स्वाहा ॥६॥
ॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते महाबलाय । सर्वदोष निवारणाय । सर्व दुष्ट ग्रहरोगानुच्याटनाय । सर्व भूतमंडलप्रेतमंडल सर्व पिशाच मंडलादि सर्व दुष्टमंडलोच्चाटनाय । ॐ र्‍हीं र्‍हैं हुंफट् घेघेघे स्वाहा ॥७॥
ॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते सर्व भूतज्वरं सर्व प्रेतज्वरं एकाहिक द्व्याहिक त्र्याहिक चातुर्थिक संतप्त विषमज्वर गुप्तज्वर तापज्वर शीतज्वर माहेश्वरीज्वर वैष्णवीज्वर सर्वज्वरान् छिन्धि छिन्धि भिंन्धि भिंन्धि यक्ष राक्षस ब्रह्मराक्षसान् भूत वेताळप्रेतपिशाच्चान् उच्चाट्योचाट्य । ॐ र्‍हां र्‍हीं र्‍हैं हुं फट् घेघेघे स्वाहा ॥८॥
ॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते नम: । ॐ र्‍हां र्‍हीं र्‍हं र्‍हैं र्‍हौं र्‍ह: । आह आह अस‌ई अस‌ई एहि‌एहि ॐ ॐ हों हों हुं हुं फट् घेघेघे स्वाहा ॥ ॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते पवनात्मजाय डाकिनी शाकिनी मोहिनी नि:शेषनिरसनाय सर्पविषं निर्विषं कुरु निर्विषं कुरु ॥ हारय हारय हुंफट् घेघेघे स्वाहा ॥९॥
ॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते सिंहशरभ शार्दूलगंडभेरूड पुरूषामृगाणां उपद्रव निरसनायाक्रमणं निरसनायाक्रमणं कुरू । सर्वरोगान् निवारय निवारय आक्रोशय आक्रोशय । शत्रून् मर्दय मर्दय उन्माद भयं छिन्धि छिन्धि भिंन्धि भिंन्धि । छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय सकल रोगान् छेदय छेदय । ॐ र्‍हीं र्‍हूं हुंफट् घेघेघे स्वाहा ॥१०॥
ॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते सर्व रोग दुष्टग्रहान् उच्चाट्य उच्चाट्य परबलान् क्षोभय क्षोभय मम सर्व कार्याणि साधय साधय श्रृंखला बंधनं मोक्षय मोक्षय कारागृहादिभ्य: मोचय मोचय ॥११॥
शिर:शूल कर्णशूलाक्षिशूल कुक्षिशूल पार्श्वशूलादि महारोगान् निवारय निवारय ॥ सर्व शत्रुकुलं संहारय संहारय ॥१२॥
नागपाशं निर्मूलय निर्मूलय । ॐ अनंतवासुकीतक्षककर्कोटक कालगुलिकयपद्ममहापद्मकुमुदजलचर रात्रिंचरदिवाचरादि सर्व विषं निर्विषं कुरु निर्विषं कुरु ॥१३॥
सर्व रोग निवारणं कुरु निवारणं कुरु । सर्व राजसभा मुख स्तंभनं कुरु स्तंभनं कुरु । सर्वराजभयं चोरभयं अग्निभयं प्रशमनं कुरु प्रशमनं कुरु ॥१४॥
सर्व परयंत्र परमंत्र परतंत्र परविद्या प्राकट्यं छेदय छेदय संत्रासय संत्रासय । मम सर्व विद्यां प्रगट्य प्रगट्य पोषय पोषय सर्वारिष्टं शामय शामय । सर्व शत्रून् संहारय संहारय ॥१५॥
सर्व रोग पिशाश्चबाधा निवारय निवारय । असाध्य कार्यं साधय साधय । ॐ र्‍हां र्‍हीं र्‍हूं र्‍हैं र्‍हौं र्‍हः हुंफट् घेघेघे स्वाहा ॥१६॥
य इदं कवचं नित्यं य: पठेत्प्रयतो नर: । एकवारं जपेनित्यं सर्व शत्रुविनाशनम् । द्विवारं तु जपेन्नित्यं सर्व शत्रुवशीकरम् । त्रिवारं य: पठेनित्यं सर्व संपत्करं शुभं । चतुर्वारं पठेनित्यं सर्व रोग निवारणम् । पंचवारं पठेनित्यं पुत्रपौत्रप्रवर्धनं । षड्वारं तु पठेनित्यं सर्व देव वशीकरम् । सप्तवारं पठेनित्यं सर्व सौभाग्यदायकं । अष्टवारं पठेनित्यं इष्ट कामार्थ सिद्धिदं । नववारं सप्तकेन सर्व राज्य वशीकरम् । दशवारं सप्तकयुगं त्रिकाल ज्ञानदर्शनं । दशैक वारं पठणात् इमं मंत्रं त्रिसप्तकं । स्वजनैस्तु समायुक्तो त्रैलोक्य विजयी भवेत् । सर्वरोगान् सर्वबाधान् । सर्व भूत प्रेतपिशाच ब्रह्मराक्षस वेताल ब्रह्महत्यादि संबंध सकलबाधान् निवारय निवारय । हुंफट् घेघेघे स्वाहा । कवच स्मरणादेवं महाफलमवाप्नुयात् । पूजाकाले पठेद्यस्तु सर्व कार्यार्थ सिद्धिदं । इति श्रीसुदर्शन संहितायां रुद्रयामले अथर्वण रहस्यं श्रीसीताराम मनोहर पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवचस्त्रोत्रंसंपूर्णम् ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

श्री गणेशाय नम: | ॐ अस्य श्रीपञ्चमुख हनुम्त्कवचमंत्रस्य ब्रह्मा ऋषि:| गायत्री छंद:| पञ्चमुख विराट हनुमान देवता| र्‍हीं बीजम्| श्रीं शक्ति:| क्रौं कीलकम्| क्रूं कवचम्| क्रैं अस्त्राय फ़ट्| इति दिग्बंध्:| श्री गरूड उवाच्||

अथ ध्यानं प्रवक्ष्यामि| श्रुणु सर्वांगसुंदर| यत्कृतं देवदेवेन ध्यानं हनुमत: प्रियम्||१||
पंचवक्त्रं महाभीमं त्रिपंचनयनैर्युतम्| बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिध्दिदम्||२||
पूर्वतु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम्| दंष्ट्राकरालवदनं भ्रुकुटीकुटिलेक्षणम्||३||
अस्यैव दक्षिणं वक्त्रं नारसिंहं महाद्भुतम्| अत्युग्रतेजोवपुष्पंभीषणम् भयनाशनम्||४||
पश्चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुण्डं महाबलम्| सर्वनागप्रशमनं विषभूतादिकृन्तनम्||५||
उत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं दिप्तं नभोपमम्| पातालसिंहवेतालज्वररोगादिकृन्तनम् || ६ ||
ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवान्तकरं परम्| येन वक्त्रेण विप्रेन्द्र तारकाख्यं महासुरम्||७||
जघानशरणं तस्यात्सर्वशत्रुहरं परम्| ध्यात्वा पंचमुखं रुद्रं हनुमन्तं दयानिधिम्||८||
खड्गं त्रिशुलं खट्वांगं पाशमंकुशपर्वतम्| मुष्टिं कौमोदकीं वृक्षं धारयन्तं कमण्डलुं||९||
भिन्दिपालं ज्ञानमुद्रा दशभिर्मुनिपुंगवम्| एतान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम्||१०||

प्रेतासनोपविष्टं तं सर्वाभरण्भुषितम्| दिव्यमाल्याम्बरधरं |
दिव्यगन्धानु लेपनम् | सर्वाश्चर्यमयं देवं हनुमद्विश्वतोमुखम्||११||

पंचास्यमच्युतमनेकविचित्रवर्णवक्त्रं शशांकशिखरं कपिराजवर्यम्|
पीताम्बरादिमुकुटै रूप शोभितांगं | पिंगाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि||१२||

मर्कटेशं महोत्साहं सर्वशत्रुहरं परम्| शत्रुं संहर मां रक्ष श्री मन्नापदमुध्दर||१३||

ॐ हरिमर्कट मर्कट मंत्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले |
यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं यदि मुञ्चति मुञ्चति वामलता ||१४||

ॐ हरिमर्कटाय स्वाहा | ॐ नमो भगवते पञ्चवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंहारकाय स्वाहा |
ॐ नमो भगवते पञ्चवदनाय दक्षिणमुखाय करालवदनाय नरसिंहाय सकलभूतप्रमथनाय स्वाहा |
ॐ नमो भगवते पञ्चवदनाय पश्चिममुखाय गरूडाननाय सकलविषहराय स्वाहा |
ॐ नमो भगवते पञ्चवदनाय उत्तरमुखाय आदिवराहाय सकलसंपत्कराय स्वाहा|
ॐ नमो भगवते पञ्चवदनाय उर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनवशकराय स्वाहा|

||ॐ श्रीपंचमुखहनुमंताय आंजनेयाय नमो नम:||

कुटुम्बावरिल त्या विशिष्ट "सन्कटाचे" नामोनिशाणही राहिले नाही/परस्पर पारिपत्य झाले.

ज्याचे पारिपत्य करायचे आहे तोसुद्धा हाच मंत्र म्हणत असेल तर काय होते? ( कुणाचे पारिपत्य होणार, दोघेही म्हणत असतील तर? ही शंका आहे मला खूप दिवसापासून.. बुप्रावादी असे म्हणून झिडकारु नये. )

जामोप्या, तुम्ही सरळ हेतूने हे विचारताय असं गृहित धरते (इतर बाफांसारखा धुरळा इथे उडू नये याची खबरदारी आपण सगळेच घेऊ).

अन अर्थातच, तुमचा हेतू रास्त/न्याय्य आहे असे गृहित धरुन >>> लिंबूंनी त्यांच्या पोस्टमध्ये हे लिहिलं आहे. हे कुणा व्यक्तीविरुद्धच असेल असं नाही. स्वतःमधल्याच एखाद्या दोषाबद्दल असू शकतं. खरंतर कुणा व्यक्तीविरुद्ध काहीच करु नये. आपल्याला कसला त्रास होऊ नये असं वाटत असेल तर आपले सामर्थ्य वाढवावे म्हणजे आपोआप आपल्याला ज्या वृत्ती त्रासदायक असतात त्या निष्फळ ठरतात.

...

...

..

सॉरी सॉरी...विनोदाच्या धाग्यावरचे मॅटर इथे आले.. सॉरी. थोडा वेळ द्या करेक्शनला.

माझा तो प्रश्न देक्झील साडेसातीच्या धाग्यावर हलवत आहे. इथे उत्तरे देउ नयेत.

Pages