स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>ज्याचे पारिपत्य करायचे आहे तोसुद्धा हाच मंत्र म्हणत असेल तर काय होते? ( कुणाचे पारिपत्य होणार, दोघेही म्हणत असतील तर? ही शंका आहे मला खूप दिवसापासून.. बुप्रावादी असे म्हणून झिडकारु नये. )

१) मूळात "ज्याचे पारिपत्य करायचे" या शब्दयोजनेद्वारे तुम्ही "विशिष्ट व्यक्ति/समुह" गृहित धरता आहात. मी संकट व संकटाच्या पारिपत्याबद्दल बोलतोय, व्यक्तीगत शत्रू माहित असेल तरीही "युद्धात वगैरे करतात" तशा पारिपत्याचा हेतू अपेक्षित नाही, तर "शत्रुबुद्धि विनाशाय" असे अपेक्षित असते.
संपूर्ण स्तोत्रात, अमुक संकटाचे असे पारिपत्य कर, तमुक संकटाचे तसे कर अशी अपेक्षा व्यक्त आहे, मात्र "व्यावहारीक जीवनात" ज्या पद्धतीने शत्रूत्व निभावले जाते तसे ईश्वरास करण्यास सांगणे मुळातच अपेक्षित नाही. जे काय करायचे ते "तो देव" बघुन घेईल.
२) समजा, संकटामधे एक वा अनेक व्यक्ती कारणीभूत असतील, तर जातक व त्या त्या व्यक्ती, दोघेही म्हणत असतील असे संभवत नाही. कारण, वरील स्तोत्र म्हणण्याची उन्का होण्यास देखिल आधी व्यक्तितील "राक्षसी" "आसुरी" ताकदीचे परिमार्जन झालेले असणे आवश्यक असते, जर एखादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीस जाणूनबू़जून "त्रासदायक" होत असेल, तर अशी व्यक्ति वरील स्तोत्र म्हणत असणे शक्यच नसते, अन जरी बुप्रावादी ओढूनताणून म्हणू लागलीच तर "योग्य/रास्त" कारणे ही कसोटी असतेच. जर असे कुणी वाईट हेतूने केलेच, तर त्यालाही तत्काळ महिन्याचे आत "फटके खावे" लागतातच.
३) तरीही तुम्ही म्हणता, त्यातिल तथ्य वेगळ्याप्रकारे, याच स्तोत्राचे बाबतीत नव्हे, तर जनरल शिव्या-शाप देतानाही घडू शकते. गैरसमजातुन, व्यक्तिगत अभिनिवेशातून, तळतळाटातुन, रागाचे भरात वा कसेही, दुसर्‍या व्यक्तिस विशिष्ट शाप उच्चारले, अन जर ती दुसरी व्यक्ति त्या शापालायक नसेलच, तर, किन्वा, शापालायक असेल वा नसेल, पण त्या व्यक्तिचीही पूर्वपुण्याई/अध्यात्मिक ताकद जागलेली असेल, तोडीस तोड असेल, तर असे शाप बुमरॅन्ग प्रमाणे उलटलेलेही दिसतात. (माझ्याकडे, मी अमुक व तमुक व्यक्तिबाबत अशाच शिव्याशापाबद्दल आंतरिक जाणिव झाल्याने लिम्बीशी बोललो होतो, की या अमुक व्यक्तिने त्या तमुक व्यक्तिबद्दल रागाच्या भरात देखिल अस्ले शाप उच्चारु नयेत, जर तो शाप उलटला, तर? अन झालेही शब्दशः तसेच. असो. इथे अर्थातच अधिक तपशील देऊ शकत नाही)
मला वाटते तुमच्या "शन्केचे" समाधान होईल, न होईल, तर थोडा अधिक विचार करीत रहा. Happy इश्वरेच्छा असेल, तर तुम्हाला ते उमगुनही जाईल.


॥ श्री महालक्ष्मी माहात्म्य ॥
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥१॥
नमस्त् गरुडारुढे कोलासुर भयंकरि । कुमारि वैष्णवि ब्राह्मि महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥२॥
प्रथम वंदितो श्रीगजाननाशी । जो नाशी विघ्नराशी । सद्भावे त्याच्या चरणांशी । कृपा भाकितो । ग्रंथ सिद्ध्यर्थ ॥१॥
कार्यारंभी गणेशाचे पूजन स्मरण । विघ्नांचे हो‌ई हरण । आणि कार्यसिद्धी जाण । होत असे निश्चये ॥२॥
माझिये अंतरी वसावे । सर्वकाळ वास्तव्य करावे । मज वाकशून्यास वदवावे । कृपाकटाक्षे ॥३॥
आता नमन माझे श्रीशारदेशी । जी सर्व विद्यांची स्वामिनी । ब्रह्मादिकांची जननी । प्रणवरूपिणी जगन्माता ॥४॥
व्यास वाल्मिक तुकाराम । ज्ञानेश्वर भगवंताचे अवतर । ज्यांचे अवतार कार्य थोर । त्यांसि नमितो अत्यादरे ॥५॥
स्वामी समर्थ दत्तावतार । भक्तकार्यार्थ झाला भूवर । त्यांचे स्मरण करता वरचेवर । भक्तोद्धार होतसे ॥६॥
माझे साष्टांग नमन त्यांचे चरणी । कृपा करोनी चालावी लेखणी । ऐशी करितो विनवणी । लक्ष्मी माहात्म्य वर्णावया ॥७॥
आता महात्म्य वर्णावयास । शरण तिच्या चरणास । वंदितो स्फूर्ति देण्यास । माहात्म्य गावे म्हणून ॥८॥
जय जय जगज्जननी । तू भवभयहरिणी । भक्तांसी संकट तारिणी । तुज वंदितो मनोभावे ॥९॥ अनेक अवतार धरून । तू केलेस भक्त पालन । आणि दुष्टांचे संहरण । म्हणून सुखनिधान आम्हासी ॥१०॥
तू सकळ जगाची माता । चराचरावर तुझी सत्ता । भक्तांवरी माया सर्वथा । आम्हालागी प्रसन्न हो ॥११॥
तू अनंत । तुझी नामे अनंत । त्यातून आठवून काही एक । प्रार्थना तुजसी करतसे ॥१२॥
लक्ष्मी लज्जे महाविद्ये । श्रद्धे पुष्टि स्वधे ध्रुवे । महारात्री महामाये । नारायणि नमोस्तुते ॥१३॥
मेधे सरस्वती वरे । भूति बाभ्रवि तामसी । नियते त्वं प्रसीदेशे । नारायणि नमोस्तुते ॥१४॥
पूर्वी मार्कण्डेय मुनींनी । शिष्यांस जी कथन केली । सुतांनी शौनकास कथिली । तीच अनुवादिली कथा येथं ॥१५॥
महालक्ष्मीचे महात्म्य । पुण्यफलद प्दमपुराणात वर्णन । केले आहे आवर्जुन । सारांश त्याचा हा असे ॥१६॥
पूर्वी द्वापारयुगा माझारी । पवित्र सौराष्ट्र भूमिवरी । जे कथा घडली अवनीवरी । तीच आता श्रवण करी ॥१७॥
त्या सौराष्ट्र राज्यावरी । राजा भद्रश्रवा राज्य करी । शूर वीर कीर्तिमंत । समुद्र स्वामी तो होता ॥१८॥
त्यासी वेदांचे ज्ञान होते । प्रजाहितात लक्ष होते । संत ब्राह्मण संतोषते । केले त्याने ॥१९॥
त्याची पत्नी सुरतचंद्रिका । लाखात सुलक्षणी हो का । अष्टपुत्रा पतिव्रता वैभवी नांदतसे ॥२०॥
राणीस होते पुत्र सात । वरी कन्या एक । शामबाला नामक । अत्यंत भाविक ती ॥२१॥
एकदा काय झाले । महालक्ष्मीच्या मनात आले । तिच्या राज्यात जावे । आठवण आहे का पहावे । पूर्वजन्मीची ॥२२॥
राजवैभव वाढवावे । प्रजेत ते पोहोचवावे । म्हणून राजास द्यावे । कृपादान ॥२३॥
गरिबावर करितां कृपा । तोच खा‌ईल एकटा । इतरेजनांस वाटा । कैसा मिळे ॥२४॥
म्हणोनि लक्ष्मीने काय केले । आपले रूप पालटले । म्हातारीचे रूप घेतले । चाले काठी टेकित ॥२५॥
दीनपणे राजद्वारी पोचली । तोच एक दासी आली । कोणास भेटाण्या आली । विचारी तीस ॥२६॥
काय तुझे नाव आहे । कोण तुझे पती असती । कोण्या गावे करिसी वसती । काम काय आहे ॥२७॥
वृद्धा म्हणे माझे नाव कमला । भुवनेश पति मजला । द्वारकेत असते वस्तीला । राणीस भेटणे असे ॥२८॥
तुझ्या राणीस ओळखते । लक्ष्मीकृपे वैभव भोगते । काय लक्ष्मीस स्मरते । पहाण्यास आले मी ॥२९॥
राणी रमली महालात । मैत्रिणीच्या समवेत । आपुल्या निरोपे ये‌ईल क्रोधात । जाय परतोनी म्हणे दासी ॥३०॥
वृद्धा म्हणे दासीला । ऐक तिच्या पूर्ववृत्ता । दारिद्र्य जावोनी ऐश्वर्यमत्ता । कैशी आली ॥३१॥
राणीला गर्व झाला दिसे । श्रीमंतीने लाविते पिसे । गरिबा भेटण्या न दिसे । एकही पळ ॥३२॥
धुंदी चढली वैभवाची । उतरली पाहिजे साची । हीच प्रजाकल्याणाची । वाट दिसे ॥३३॥
पूर्वजन्मीचे विसरली । लक्ष्मीने कृपा केली । दारिद्रयातून वर आली । राजवैभव भोगिते ॥३४॥
पूर्वजन्मीची वैश्य पत्नी । दारिद्रये गेली गांजोनी । पतिपत्नी नित्य भांडोनी । संसारसुखा आंचवले ॥३५॥
पती मारहाण करी । नित्य संतापे भाष्य करी । पत्नी मनी विचार करी । धन जवळ करावे ॥३६॥
घर सोडोनि जाण । गेली वनात निघोन । तेथे कष्ट दशा दारूण । वणवण फिरता भोगितसे ॥३७॥
कंटक रूतती पायात । अश्रू दाटती नेत्रात । घास नसे पोटात । ब्रह्मांड आठवे ॥३८॥
बसली एका दगडावर । रूदन करी अपार । नेत्री संतत धार । अश्रूंची होती ॥३९॥
लक्ष्मी देवीस करूणा आली । तेथ्ं ती प्रगटली । धीर दे‌ऊन वदली । चिंता न करी बाळे ॥४०॥
तिला लक्ष्मीव्रत सांगितले । सुखसंपत्ति आशिर्वाद दिले । कळवळ्याने वाचविले । तिजला ॥४१॥
मार्गशीर्ष महिन्यात । प्रति गुरुवारी अखंडित । निष्ठा ठे‌ऊन मनात । व्रत अन् उद्यापन केले तिने ॥४२॥
त्या व्रताच्या प्रभावाने । लक्ष्मी मातेच्या कृपेने । वैश्यगृह विपुल धनाने । गेले भरून ॥४३॥
दैन्य दु:खे पळाली । भांडणे ती संपली । सुखे उभी राहिली । पुढे हात जोडोनी ॥४४॥
मग लक्ष्मीचे व्रताचरण । अखंड केले धारण । वर्षानुवर्षे पालन । मनोभावे करीतसे ॥४५॥
आयुर्मर्यादा संपता । ते गेले लक्ष्मीलोका । जितुके वर्षे आचरिले व्रता । तितकी सहस्त्र वर्षे सुखे । राहिले तेथे ॥४६॥
त्या पुण्ये पुढले जन्मी । वैश्यपत्नी झाली राणि । वैभव विलास भोगुनि । अहंकार प्रवर्तला ॥४७॥
उतली आणि मातली । घेतला वसा विसरली । आठवण देण्यास तिला भली । येणे हे जाहले असे ॥४८॥
असो कर्म गती गहन । तिला व्रताचे विस्मरण । बोलण्यास तिला नाही क्षण । मी जाते ॥४९॥
दासी म्हणे आजीबा‌ई थांबा । मलाही लक्ष्मीव्रत सांगा । मी ही करेन मले सांगा । दारिद्रय दु:खे पिडले मी ॥५०॥
उतशील आणि मातशील । घेतला वसा टाकशील । धनसंपदा येता वर्तशील । अहंकारे ॥५१॥
तसे होणार नाही । शब्दाला जागेन मी । श्रद्धापूर्वक नमते मी । माते कथी आता ॥५२॥
लक्ष्मी वृद्धारूप नारी । वचने प्रसन्न दासीवरी । व्रताची महती सारी । कथन करी संक्षेपे ॥५३॥
मासा माजी मार्गशीर्ष । त्यास असे ईश्वरी अंश । सुयोग्य लक्ष्मी व्रतास । श्रेष्ठ सर्वि मानला ॥५४॥
मार्गशीर्षी प्रथम गुरूवार । आरंभ करावे व्रत हे थोर । प्रत्येक गुरूवारी महिनाभर । नेमे पूजा करावी ॥५५॥
पहाटे करावे स्नान । निर्मळ असावे तनमन । जागा गोमये सारवून । पाट वा चौरंग मांडावा ॥५६॥
फरशी असता नको सारवण । घ्यावे फडक्याने पुसुन । मग चौरंग ठे‌ऊन । त्यावरी धान्यराशी ठेवावी ॥५७॥
गहू अथवा तांदूळ । रास असावे वर्तुळ । त्यावर ठेवावा कलश । आत जल असावे ॥५८॥
त्यामाजी पैसा सुपारी । दूर्वा तैशा त्यात घाली । हळदकुंकू बोटे ओढावी । आठदिशांनी कलशावर ॥५९॥
पंचवृक्षाचे डहाळे घ्यावे । सर्व बाजूंनी कलशात रचावे । रंगवल्लीने करावे । सुशोभन ॥६०॥
चौरंगावरी देठाची दोन पाने । त्यावर सुपारी नि नाणे । शेजारी मूठभर तांदूळदाणे । त्यावर सुपारी गणपती । स्थापावा ॥६१॥
देवीचे चित्र साजिरे । कलशाजवळ ठेवावे । तैसेच लक्ष्मीयंत्रहि असावे । त्याजवळी ॥६२॥
धातूची मूर्ति असल्यावर । चित्राची नाही जरुर । पूजेस आता सत्वर । लागावे ।६३॥
सम‌ई नीरांजन उदबत्ती । प्रज्वलित करावी । वडील माणसे नमस्कारावी । पूजेपूर्वी ॥६४॥
प्रथम आचमन करावे । विड्यावर पाणी सोडावे । श्रीगणपतीस पूजावे । निर्विघ्नतेसाठी ॥६५॥
मग फुले तुळशी घे‌ऊन । त्याने जलसिंचन करून । लक्ष्मीदेवी पूजावी ॥६६॥
मूर्ति असल्या पूजेत । स्नान घालावे ताम्हनात । मग पुसोनि त्वरित । चौरंगावरी ठेवावी ॥६७॥
हळदकुंकु आदि वाहून । सुगंधी पुष्पे अर्पून । धूप नीरांजन ओवाळून । फलनैवेद्य दाखवावा ॥६८॥
सकर्पूर तांबूल अर्पावा । मनींच्या इच्छा पुरविण्यास । देवीस विनवावे ॥६९॥
बसोनि पाटावर सत्वर । व्रतकथा वाचावी सुम्दर । त्यावर माहात्म्य पोथी मनोहर । दूध फळे नैवेद्य अर्पावा ॥७०॥
मग वाचावे महालक्ष्म्यष्टक । सर्वसिद्धीदायक । पूर्णपणे वरदायक । भक्तांसी ॥७१॥
मग नीरांजन उजळावे । उदबत्ती कर्पूर लावावे । आरतीसी करावे । मनोभावे ॥७२॥
आरती झाल्यावरी । मनोभावे प्रार्थना करावी । माते मान्य करी । यथाशक्ति पूजा ही ॥७३॥
काही चूक असल्यास । माते घे‌ई पदरात । निष्ठाभाव आहे मनात । हे जाणुनि ॥७४॥
आमुचे घरी अखंड रहावे । दारिद्रय दु:ख निवारावे । संततिसंपत्तीने भरावे । घर आमुचे ॥७५॥
सुखशांती असावी । तुझे नामी मती रहावी । चित्ती कृतज्ञता रहावी । सदोदित ॥७६॥
मनोभावे करिता प्रार्थना । आ‌ईस येते करूणा । ठेवावे मनी वचना । आणि प्रार्थावे ॥७७॥
दिवसा उपवास करावा । दुग्ध फलाहार घ्यावा । रात्री मिष्टान्न नैवेद्य दाखवावा । आरतीचे वेळी ॥७८॥
गोग्रास नैवेद्य काढावा । तो गा‌ईस घालावा । आपुल्या सो‌ईने ॥७९॥
सुवासिनी ब्राह्मण । उद्यापनी भोजन । दक्षिणा दून । संतुष्ट करावे ॥८०॥
त्यानंतर आपण । घे‌ऊन प्रसादाचे पान । करावे प्रसाद भोजन । नामपूर्वक ॥८१॥
दुसरे दिवशी स्नानोत्तर । घे‌ऊनि दूध साखर । नैवेद्यानंतर । पूजा विसर्जन करावि ॥८२॥
कलशातील जल सर्व । तुळशीत करावे विसर्जन । पाच पर्णफांद्या । घे‌ऊन निघावे ॥८३॥
त्या ठेवाव्या पाच ठिकाणी । आणि यावे पूजास्थानी । हळदकुंकू अक्षता दोनदा वाहुनी । नमस्कार करावा ॥८४॥
मार्गशीर्षातील सर्व गुरूवारी । पूजन ऐसे करी । शेवटच्या गुरूवारी । उद्यापन करावे ॥८५॥
उद्यापनाचे दिवशी । पूजा आरती करोनी । सात कुमारी अथवा सुवासिनी । ह्यांसी पाचारावे ॥८६॥
त्यांना आसन द्यावे । हळदकुंकू लावावे । महालक्ष्मी म्हणोनि नमस्कारावे । एकेक फळ नि हे माहात्म्य दे‌ऊनि ॥८७॥
वृद्धा एवढे बोलून । वेगे निघाली जाण । दासी म्हणे आ‌ई एक क्षण थांब । निरोप देते राणीस ॥८८॥
निरोप मिळता राणीला । क्रोध अनिवार झाला । ये‌ऊन म्हणे तू कोण थेरडे । आली कशास इकडे ॥८९॥
वृद्धा म्हणे माजलीस । उन्मत्तपणे वागलीस । पूर्वस्थिती आठव ॥९०॥
आजच्या शुभदिनी । करुन एका स्त्रीची हेटाळणी । विपत्ति घेतलीस ओढवूनि । भोगावे लागेल ॥९१॥
शापवाणी ऐकून । राणी गेली संतापून । आणि धक़्काबुक़्की करून । वृद्धेस तिने अवमानिले ॥९२॥
महालक्ष्मी वेगे निघाली जाण । शामबाला तो समोरून । येती झाली जाण । दैव भले म्हणून ॥९३॥
ती गेली होती उद्यानात । मैत्रिणींच्या समवेत । त्याच वेळी राजमहालात । घटना ही घडली असे ॥९४॥
शामबालेने वंदन करून । आपली दिली ओळख करून । मग वृद्धेने घडले वर्तमान । कथन केले तिजसी ॥९५॥
शामबाला दु:खी झाली । तिने विनये क्षमा याचिली । कारूण्ये माय हेलावली । म्हणे तुझे कल्याण हो‌ईल ॥९६॥
सुखसंपन्नता यावी । वैभव कीर्ति लाभावी । विनयशील संतती व्हावी । म्हणून त्वां व्रत हे करावे ॥९७॥
महालक्ष्मीने तिजसी । सांगितले ह्या व्रतासी । आणि म्हटले सुखशांति । कुटुंबी नांदेल ॥९८॥
संकल्प सिद्धिस जातील । समृद्धी भाग्य येतील । पद्मावतीच्या कृपेने जाण । संपूर्ण कल्याण हो‌ईल ॥९९॥
मार्गशीर्ष महिन्यातला । तोच होता गुरूवार पहिला । शामबाला करून उपवासाला । पूजन करीत त्या दिनी ॥१००॥
शेवटचे गुरूवारी । ती उद्यापन करी । प्रसन्न झाली महालक्ष्मी । तिजवरी ॥१०१॥
इच्छा मनातली सारी । पूर्ण झाली लवकरी । लक्ष्मी प्रभावास नाही सरी । हेच खरे ॥१०२॥
कीर्तिमंत राजा सिद्धेश्वर । त्याचा सुपूत्र मालाधर । शामबालेस अनुरूप वर । विवाह मंगल जाहला ॥१०३॥
लक्ष्मीचा वरदहस्त लाभला । राजैश्वर्यात शामबाला । परि न सोडले नम्रतेला । भाग्यवान खरीच ती ॥१०४॥
महालक्ष्मीच्या अवकृपेने । भद्रश्रवाचे राज्य गेले । ऐश्वर्य सारे नष्ट झाले । दारिद्री झाले गोघेही ॥१०५॥
आधी दशा । मग अवदशी । नंतर अन्नानदशा । झाली त्यांचि ॥१०६॥
सुरतचंद्रिका मग पतीस । म्हणे जा‌ऊन भेटावे शामबालेस । सांगावे आपुला दुर्दशेस । समजावूनी ॥१०७॥
जाव‌ई आपुला धनवान । राखाया आपुला मान । धनसहाय्य दे‌ईल महान । संकट टळण्या ॥१०८॥
भद्रश्रवा जरी स्वाभिमानी । तरी परिस्थिती जाणॊनी । जावयाचे राज्यालगोनी । प्रयाण करिता जाहला ॥१०९॥
तळ्याकाठीं राजा बसला । तो होता थकलेला । विश्रांतिसाठी टेकला । तो दासी आल्या काही पाणी नेण्यास ॥११०॥
राजाकडे दृष्टी गेली । विनये चौकशी केली । राजाची ओळख पटली । भेटण्यास स्वारी आली । शामबालेस ॥१११॥
दासी गेली लगबगीने । शामबालेस कथन केले । पिताश्रीचे आगमन झाले । आपुल्या राज्यात ॥११२॥
अत्यादरे वडीलांस । शामबालेने राजमहालास । आणून गौरविले । वस्त्रालंकारे ॥११३॥
अल्पकाळ तेथे राहून । आपली व्यथा कथन करून । तिचे वैभव पाहून । राजा म्हणे निघतो आता ॥११४॥
राजा निघता तेथून । मालाधरे दिला भरून । हंडा सुवर्ण मोहरांनी ॥११५॥
संगे दिले नोकर । मग राजा निघाला सत्वर । चंद्रिकेस भेण्या अधिर । वेगे चाले ॥११६॥ पाहता राणिने राजास । हर्ष झाला मनास । हंडा पाहता उल्हास । मनी दाटे ॥११७॥
राजाने भेट कथन करून । हंडा दाविला उघडून । कौतुके पाहे डोकावून । तो आत काळे कोळसे ॥११८॥
राजा राणी भांबावली । काय लिहिले आहे कपाळी । भद्रश्रवा अश्रू ढाळी । दु:ख नावरे दोघांना ॥११९॥
मुलीविषयी अढी मनात । परंतु जाणे तिच्या राज्यात । मदतीचा मिळेल हात । आशा मोठी ॥१२०॥
म्हणून दु:ख आवरून । राणीने केले गमन । आली तिच्या राज्यालागून । लेकीस भेटावया ॥१२१॥
आली नदीतीरास । पाय उचलेना पुढे जाण्यास । मिटुनी आपल्या नेत्रास बसती झाली ॥१२२॥
एका दासीने देखिले । शामबालेस कथन केले । मातेने थकुनि नेत्र मिटले । बैसलीसे नदीतीरी ॥१२३॥
सत्वरि निघाली घे‌ऊनी रथ । वेगे चाले वाटे लांब पथ । सत्वर उतरून तेथ । वंदिले मातेस ॥१२४॥
बसवून रथात । आणीली राजमहालात । स्नान घालून त्वरित । वस्त्रालंकार दिधले ॥१२५॥
तो होता प्रथम गुरूवार । मार्गशीर्ष महिना खरोखर । मनोभावे मनोहर । पूजा करी शामबाला ॥१२६॥
शामबाला मस्तक लववी । अति‌आदरे वंदन करीं । पूर्वजन्मस्थिती जागी करी । सुरतचंद्रिकेस ॥१२७॥
माथा लववी परोपरी । लक्ष्मीव्रत पुन्हा आचरी । राहून लेकीचे घरी । करी उद्यापन ॥१२८॥
लक्ष्मी होता पुन्हा प्रसन्न । स्थिती पालटे परिपूर्ण । आनंदे फुलले मन । लक्ष्मीकृपेने ॥१२९॥
मालाधरास बुद्धि झाली । भद्रश्रवास बोलवावयास भली । तो येताच मसलत शिजली । जिंकणे राज्य पुनरपि ॥१३०॥
मग झाले भीषण । शत्रुसंगे रणकंदन । मग भद्रश्रवास सिंहासन । पुनश्च प्राप्त होय ॥१३१॥
राजधर्म पाळुनि नेटका । भद्रश्रवा जपे प्रजाहिता । प्रजा गौरवे राजसत्ता । दुवा देती ॥१३२॥
राजाचे पुत्रहि सात । परागंदा होते अज्ञात । ते सर्व परत राज्यात । आले लक्ष्मीकृपे ॥१३३॥
शामबालाही भेटण्या आली । राजाराणी मनी धाली । आनंदे ॥१३४॥
परी राणीच्या मनात । किल्मिष एक सलत । हिने संकट कालात । कोळसे दिले ॥१३५॥
म्हणुन राणी नच संभाषी । तरी शामबाला संतोषी । राहिली अल्पमुक़्कामे ॥१३६॥
मग निघता घरी । तोच हंडा मिठाने भरी । घे‌ऊन गेली घरी । आपुल्या समवेत ॥१३७॥
घरी पोहोचल्यावर । प्रश्न करी मालाधर । माहेर-भेट आणली काय् । दाखवी ॥१३८॥
राजसा थांबा थोदे तरी । मग दाखविते सत्वरी । राज्याचे सार खरोखरी । आणले आहे ॥१३९॥
मग सांगे आचाऱ्यास । स्वयंपाक अळणी करण्यास । भोजनी घेता घासास । अन्न बेचव वाटले ॥१४०॥
शामबालेने तरा करून । सर्वा मीठ वाढले पानातून । चवदार लागले सगळे अन्न । म्हणे राज्याचे सार हे ॥१४१॥
मग पतीस म्हणे प्रेमे । मीठ सौराष्ट्राचे सोने । राज्य पित्याचे सागरासम । विशाल ॥१४२॥
अन्नास चव आणि मीठ । सेवक मिठाशी जागती नित्य । मीठ खाता इमान । जागते प्राणसंकटी ॥१४३॥
राजा डोलवी मान । म्हणे ही इमानाची खूण् । मनी जतन करी जाण । सुनिश्चये ॥१४४॥
राजाराणीस लक्ष्मी पावली । दु:स्थिती दुरावली । वैभवे पुन्हा सरसावली । व्रते लक्ष्मीच्या ॥१४५॥
म्हणू लक्ष्मीदेवीस । सतत स्मरावे रात्रंदिवस । दे‌ईल तीच सौख्यास । भावबळे पूजिता ॥१४६॥
हे माहात्म्य जणू कल्पतरू । इच्छित लाभेल वरू । उतरेल पलपारू । व्रत मनोभावे आचरिता ॥१४७॥
देशपांडे नामे कुळात । माधवसुत रंगनाथ । लक्ष्मी माहात्म्य वदत । लोकमङ्गल व्हावया ॥१४८॥
शके अठराशे अठरात । फाल्गुन वद्य पक्षात । लक्ष्मीमाहात्म्य समाप्तीस । रंगपंचमीस आले असे ॥१४९॥
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥१५०॥
इति श्री महालक्ष्मीव्रत माहात्म्य कथा संपूर्णम् ॥

लिंबू, तुम्ही वर लिहिलेला अनुभव नवविधा भक्तींपैकी एक आहे. भक्ती बाफवर हलवाल का? तिकडे तो जास्त योग्य वाटेल.

गुरू महाराज गुरू जय जय परब्रम्ह सदगुरू.
याच्या पुढच्या ३ ओळी कोणाला माहीत आहेत का?

गुरू महाराज गुरू जय जय परब्रम्ह सदगुरू.

पराडकरांच्या दत्त गीतांमध्ये हे आहे बहुतेक..

माझा या बीबीशी कुठूनही दूरदूरचाही संबंध नाही, पण परवा कामासाठी काही माहिती नेटवर शोधताना या दोन लिंक्स दिसल्या. इथल्या लोकांना उपयोगी पडतील असं वाटलं म्हणून टाकतेय.
दोन्हीवरही बरीचशी संस्कृत स्तोत्रे अगदी शुद्ध आणि अचूक दिली आहेत. शिवाय काही वेदपठणाचे भागही वाचायची ऐकायची सोय आहे.. काही ठिकाणी उच्चार वेगळे वाटले तर एवढेच लक्षात ठेवा की भारतात वेद सोडून इतर संस्कृत उच्चारणातही दक्षिण, उत्तर, पूर्व असे काही सूक्ष्म भेद असतात. त्यांच्यात्यांच्यासाठी ते बरोबरच असतात....

http://sanskritdocuments.org/doc_devii/doc_devii.html

http://sanskrit.safire.com/

माझ्या आजीकडून ऐकलेला काकडआरतीतला हा अभंग आहे, पाठभेद असण्याची खूप शक्यता आहे, जाणकारांनी कृपया योग्य ते पाठभेद सुचविणे. संत नामदेवांचा का संत जनाबाईंचा - हे देखील शेवटच्या दोन चरणांमुळे जरा गोंधळात टाकणारे आहे - पण भाव खूपच गोड आहे या अभंगातला.

हाटाचे तातडी दामा शिंपी गेला |
नैवेद्य पाठविला | नाम्यासंगे ||

नैवेद्य घेऊनि राऊळासि गेला |
हाका मारी त्याला | 'विठ्या' 'विठ्या' ||

नाम्याने नैवेद्य कुंचीखाली झाकिला |
आणुनी ठेविला | देवापुढे ||

नाही अमंगळ | नाही हो ओंगळ |
केली मी आंघोळ | चंद्रभागे ||

ऊठ झडकरी जेवी लवकरी ||
माता माझी घरी वाट पाहे ||

नेणता म्हणोनी का रे जेविनासी |
करीन प्राणासी घात माझ्या ||

पाषाणाची मूर्ती कापे थराथरा |
जेवी भराभरा नाम्यासंगे ||

पाषाणाची मूर्ती नाम्यासंगे जेविली |
जगी कीर्ती झाली जनी म्हणे ||

नामा म्हणे माझी वडिलांची ठेव |
उभा आहे देव विटेवरी ||

खरंच खूप सुंदर आहे Happy 'वडिलांची ठेव' म्हणजे नक्की काय? देव विटेवरी उभा आहे तो पुंडलिकामुळे. पुंडलिक वडिलधारे म्हणून म्हटले आहे का?

'वडिलांची ठेव' म्हणजे नक्की काय?>>>>> - नामदेवांच्या घराण्यात परंपरेने विठ्ठलभक्ति चालत आलेली असावी किंवा तुम्ही म्हटलंय तसं - देव विटेवरी उभा आहे तो पुंडलिकामुळे - त्या पुंडलिकाला वडिलकीचा मान देऊनही म्हटले असावे.
अवांतर - एकंदरीत नामदेव, जनाबाई हे सगळे महाभक्तच - त्यांचे अभंग भावभरले, भक्तिमयच ...... त्यामुळे फार गोड वाटतात.

जनाबाई नामदेवांच्याच काळातल्या. त्या नामदेवांकडेच सेवा करत रहात होत्या.

आहे त्याच क्रमाने कडवी घेतली तर मला अभंग नामदेवांचा वाटतो.

अभंगात वर्णिलेला प्रसंग जनाबाईंनी पाहिला होता म्हणून त्याच प्रसंगाने नामदेवांची किर्ती पसरली असे त्या म्हणाल्या. त्यावर नामदेव उत्तर देतात, "ह्यात माझे काहीच महत्व नाही. जे काही झाले ती सगळी विटेवर उभ्या असलेल्या 'बापा'ची कृपा (ठेव)"

कुणाकडे 'त्रिपुरा रहस्य' (हरितायन संहिता) ची पीडीएफ असल्यास कृपया इथे द्यावी. नेटवरुन डाऊनलोड करता येत नाहिये. संस्कृत तसेच मराठीतही मिळू शकल्यास उत्तम.

अश्विनी ही घे. नसेल डाऊनलोड होत तर सांग मी करून ठेवली आहे डाऊनलोड. पण कोणाची संहिता आहे ते पटकन कळत नाहीये. मुख्य श्लोकातच नाव असेल का?

II अन्नपूर्णा स्तोत्रम II

नित्यानन्दकरी वराभय्करी soundarya ratnakari
nirghutakhil ghor paavankari maheshwari
praleyaachalvansh paavankari kashipuradhishwari
bhiksham dehi krupavalambankari matanna purneshwari II 1 II

nanaratna vichitra bhushan kari hemaambradambri
muktahaar vilambmaan visad vakshoj kumbhantari
kashmira guruvaasita ruchikari kashipuradhishwari II bhikshaam. II 2 II

yoganandkari ripukshaykari dharmarthnishthakari
chandrakarjal bhasmaanlahiri trilokya rakshakari
sarveshvarya samast vachankari kashipuradhishwari II bhikshaam. II 3 II

kailaasachal kandraalaykari gauriumashankari
kaumaari nigmaarth gocharkari aumkarbijakshri
mokshdwarkapaatpaatankari kashipuradhishwari II bhilsham. II 4 II

drushyadrushvibhut vahaankari brahmand bhandodari
lilanataksutra bhedankari vidyandeepangkuri
shrivishveshmanaah prasaadankari kashipuradhishwari II bhiksham. II 5 II

urvi sarvajaneshwari bhagvatimatannapurneshwari
venineelsamaan kuntalahiri nityaannadaneshwari
sarvaanandkari sadaashubhkari kashipuradhishwari II bhiksham. II 6 II

aadikshaanti samastvarnankari shambhostreebhavaakari
kashmira tripureshwari trinayani nityaankushsharvari
kamaakaakshkari janodaykari kashipuradhishwari II bhiksham. II 7 II

devi sarvavichitraratnarachitaa daakshaayanee sundari
vaamaaswaadupayodharpriyakari soubhagyamaaheshwari
bhataabhishtakari dashaashumbhhari kashipuradhishwari II bhiksham. II 8 II

chandrarkaalay kotikoti sadrushaa chandraanshubimbashwari
chandraarkaagnisamaan kundaldhari chandraarkvarneshwari
maalapustakpaashsaankushdhari kashipuraadhishwari II bhiksham. II 9 II

kshtratraankari mahaaS bhaykari maataa krupaasaagari
saakshaanmokshkari sadaa shivkari vishveshwai shreedhari
dakshaakrandkari niramaykari kashipuraadhishwari II bhiksham. II 10 II

bhagwati bhavrogaatpiditam dushkrutotyat
sutduhitrukaltropdraveNaanuyaatam
vilasadmrutdushtya vikshya vibhraantchittam
sakal bhuvanmatstraahimamoo namaste II 11 II

maaheshwarimashritkalpvalli - mahambhavochedkari bavaneem
kshudhaartjaayaatanayaadyupet - stavaamannpurNe sharNam prapadye II 12 II

daridryadaavaanaladhyamaanam paahyannapurNe giriraj kanye
krupambudhou majjay maa tvadeeye tvatpaadpadmaarpit chittavruttim II 13 II

annapurNe sadaapurNe shankar pranvallabhe
dnyanvairaagya siddhyartham bhiksham dehi cha paarvatee II 14 II

maataa cha paarvatee devee pitaa devo maheshwar
bhandhavaa shivbhaktaach swadesho bhunatrayam II 15 II

II iti shreemachshankaraachaarya virachitam annapurNaastotram sampurnam II

हे स्तोत्र दर्रोज स्वयपाक करताना किन्वा मोठ्या प्रमाणात स्वयपाक करताना म्हणावे. भक्तिसागर ह्या पुस्तकातुन हे घेतले आहे. मराठी लिहिण्यचा प्रयत्न करते आहे. पण एवढे मोठे स्तोत्र लिहायला जमले नाहि.

महालक्ष्म्याष्टक स्तोत्राचे हे अतिशय मधुर गायन. यातले र्‍हस्व उच्चार अगदी लक्षणीय आहेत.
पान ८ वर जागू यांनी हे स्तोत्र दिले आहे. त्यात सहाव्या ओळीत स्थूलसुक्ष्महारौद्रे हे स्थूलसूक्ष्ममहारौद्रे असे हवे आहे ना?

नामदेवाचा तो प्रसंग नामदेव लहान असतानाचा आहे ना? तेंव्हा कुठे जनी तिथे होती? चु भु दे घे. खात्री करावी

Pages