सर्वात आधी मी हे सांगु ईच्छितो कि हा लेख लिहिण्यामागे कोणत्याही एका लेखकाची वा त्याच्या लेखाची मापे काढणे हा हेतू नाही. बर्याच दिवसांपासुन ह्या विषयावर लिहायचं मनात होतं पण काही ना काही कारणानी राहुनच जात होतं. काल "डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा" हा लेख वाचला आणि माझ्यातला पुणेरी बाणा जागा झाला!.. आणि मग ठरवलं कि आज लिहुनच टाकुयात मनातल. तेव्हा कविताबाई, तुमचा लेख हे फक्त निमित्त झालय.. तुमची लिहिण्याची शैली, लेखाची मांडणी उत्तम आहे. मी फक्त विषयावर थोड भाष्य करु ईच्छितो...
*****************************************************
तर मी पक्का पुणेकर. वयाची पहिली २५ वर्ष पुण्यातच काढली आणि मग थेट अमेरिकेत येऊन पोचलो. इथे आल्यावर मला पहिल्यांदाच कळालं कि पुणेकर प्रचंड special असतात. कारण आजुबाजुचे मराठी मित्रसुद्धा बोलताना वाक्याची सुरुवात "तुम्ही पुणेकर.." अशी करत होते. आणि मग "तुमच्या पुण्यात / पुण्या-मुंबई कडे" असे टोमणे येता जाता ऐकू यायला लागले. अगदी महाराष्ट्र मंडळात पण असेच उल्लेख ऐकायला मिळाले. वर जाता जाता पु.लं.च्या 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मधली वाक्य पण लोक ऐकवत होते.
तसे कॉलेजमधे असताना माझे अनेक मित्र नांदेड, नागपुर, नाशिक (माफ करा 'नासिक'), जळगाव, धुळे (माफ करा 'धुलिया') चे होते. तसेच इथेही आहेत. पण आम्ही कधी त्यांना कोणाला त्यांच्या गावावरुन एवढं 'गौरवल्याच' आठवत नाही. मग प्रश्न असा पडला कि केवळ पुणेकरांना का एवढा 'मान' मिळतो? बरीच मंडळी आधी सांगताना जोरात सांगतात कि "आम्ही अमुक अमुक गावचे, पण आता रिटायर झाल्यावर आई बाबा पुण्याला असतात." किंवा "परवाच पुण्यात फ्लॅट बूक केला बर का"... आणि मग येतं, 'काय हो तुमच्या पुण्याचा ट्रॅफिक!, काय पण पुण्याचे रिक्शावाले!, काय ते पुण्याचे दुकानदार!, काय चितळ्यांसमोरच्या रांगा!, काय हो पुण्याचे रस्ते!, वगैरे..वगैरे'. हल्ली महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपर्यातून आलेल्या प्रत्येकाला पुण्यातच का घर घ्यायच असतं? आणि एवढाच पुण्यात त्रास आहे तर का एवढा पुण्यात रहाण्याचा अट्टाहास? मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच, पुण्यात रहायला यायचच कशाला?
तो 'मुंबई पुणे मुंबई' चित्रपट लोकांना प्रचंड आवडला पण मला त्या नायकाची (पेक्षा लेखकाची) कीव आली. आजपर्यंत कोणीही पुणेकर असा जाता येता 'मग जाज्वल्य अभिमान आहे' असं म्हणताना मी बघितला नाहिये. "तो चित्रपट आहे, त्यात जरा मेलोड्रामा असणारच," असं म्हणुन स्वतःची समजुत काढली तर लोक नंतर तो संवाद ऐकवून आमचीच टिंगल करत होते. तसच आता हा 'डोंबिवली स्पेशल....' लेख. गेली अनेक वर्ष डोंबिवलीमधे रहाणार्या आणि तिथेच व्यवसाय करणार्या त्या मूनमून मिसळवाल्या बाईंना 'पुणेरी' बाणा का चिकटवायचा? डोंबिवलीतच तशाच तिखट जिभेच्या कोणी बटाटेवडा विकणार्या बाई आहेत हि माहिती प्रतिसादांमधुन कळाली. म्हणजे प्रत्येक शहरात अशी मंडळी असतातच. मग त्यांना 'पुणेरी' बाणाच का नेहेमी चिकटवायचा? पु.लं. नी 'पुणेकर, मुंबईकर..' लिहुन आता ४० वर्ष झाली. पण तेव्हाचा पुणेकर आणि आत्ताचा पुणेकर बराच वेगळा आहे. किती वर्ष हे stereotyping करत रहाणार आपण? गावोगावी असे लोक सापडतातच.
आता उदाहरण म्हणून "टायगर ऑईल कंपनी, ह्युस्टन" असं गूगल करा. त्या कंपनीच्या मालकानी त्याच्या कर्मचार्याना लिहिलेले मेमो तुम्हाला दिसतील. (आणि ते वाचून कृपया "मालक पुण्याचे दिसतात" असा निष्कर्श काढु नका!!) त्यातल्या त्यात जमेची बाजु म्हणजे 'आता पुणं कात टाकतय' हे पण 'डोंबिवली स्पेशल....' लेखात वाचयला मिळालं. म्हणजे पुणं आता बदललय हे आता लोक जरातरी मान्य करायला लागलेत.
मी असं अजिबात म्हणत नाही कि पुणेकर चिकित्सक नसतात. ते जरा जास्त चिकित्सक असतातच आणि ते तसे असतात कारण अगदी काही वर्ष आधीपर्यंत पुणं महाराष्ट्रातलं एकमेव सांस्कृतिक केंद्र होतं. तिथल्या लोकांनी नेहेमी जर का जागतिक किर्तीच्या कलाकारांना (ह्यात लेखक, गायक, नट, नाटककार, कवी सगळे आले) बघितलं असेल तर आपोआप अपेक्षा ऊंचावणारच. आणि मग ते साध्या कलाकारांच्या चुका काढताना दिसतात. कदाचित म्हणूनच अनेक कलाकार म्हणतात कि पुण्यात टाळी मिळणं सगळ्यात अवघड आहे. पण आता इतर सगळीकडे मोठे मोठे कार्यक्रम होतात. दूरचित्रवाणीमुळे सगळीकडच्या प्रेक्षकांना आता उत्तमोत्तम कलाकारांच्या कलाकृती बघायला मिळतात. पण अजुनही कोणी एखाद्या कार्यक्रमावर जरा टिका केली कि बाकिचे विचारतात,"तुम्ही पुण्याचे का हो?". माझं त्यातल्या गंमतीशी काही वाकड नाही, मला टोचतो तो त्यातला कुत्सित्पणा.
चितळ्यांच्या दुपारी दुकान बंद ठेवण्याला नावं ठेवणारे लोक त्याच चितळ्यांच्या बाकरवड्यांवर तुटुन पडतात. कोणी पुण्याहुन येत असेल तर बाकरवड्या, आंबा बर्फी अगदी मागवुन घेतात. आणि परवाच एक जण अत्यंत चिडुन सांगत होता कि चितळे हल्ली प्लॅस्टिकच्या पिशव्या देत नाहीत. आता तक्रार करायची म्हणून काहीही करायची का? ते चांगले प्लॅस्टिक कमी करायला मदत करत आहेत असं का बघायचं नाही? पुणेरी पाट्या ह्या नावाखाली कोणत्याही गावतल्या पाटया टाकतात हल्ली लोक. त्यातल्या बर्याच पुण्यात नसतातही पण लिखाण जरा खोचक असलं कि त्या पाटीला पुणेरी म्हणायचा शिरस्ताच पडला आहे.
हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच कि ह्याचा मनाला त्रास होतो. आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का?
*****************************************************
ता.क. - मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. चुक भूल द्यावी घ्यावी..
कळावे,
लोभ असावा.
हेमाशेपो.
हेमाशेपो.
फक्त पु.लंचे पुणेकरांवरचे
फक्त पु.लंचे पुणेकरांवरचे विनोद वाचून/ऐकून पुण्याची मापं काढणार्यांना पुलंनी पुण्याबद्दल जे पॉझिटिव्ह लिहिलेलं दिसत नसेल तर उपयोग काय?>>> दक्षीणा.. या इन्स्टंटच्या जमान्यात मराठीच न्हवे तर सर्व लोकांची प्रगल्भता कमी झाली आहे... लोकांच्या काळज्या विवंचना एवढ्या वाढल्या आहेत आजकाल की लोक सर्वच गोष्टींमध्ये विनोद आणी विरंगुळाच शोधतात.. त्यामुळे पुलंचा विनोद लक्षात रहातो बाकीचे लिखाण नाही..

मंदार.. पुणेकराना चेष्टा मस्करीच काय पण टीकेची सुद्धा सवय झाली आहे.. मराठी लोकांकडे हा एकमेव चावुन चोथा झालेला विषय आहे याची सर्व पुणेकराना कल्पना आहे त्यामुळे ते टीका सुद्धा अत्यंत पॉझीटीव्हलीच घेतात.. एक पुणेकरच पुणेरी पाट्या डॉट कॉम काढु शकतो आणी ते पुणेकरांमध्ये सुद्धा लोकप्रीय होउ शकते..
आणखीन एक चांगली पोस्ट रामभाऊ!
आणखीन एक चांगली पोस्ट रामभाऊ!
हेमाशेपो असं लिहून गेला होतास
हेमाशेपो असं लिहून गेला होतास ना? पोष्ट एडिटलिस ना (नेहमीप्रमाणे):हाहा:
राम मस्त थुत्तरफोड पोष्ट...
राम मस्त थुत्तरफोड पोष्ट...
दक्षिणा, थुत्तरफोड म्हणजे
दक्षिणा, थुत्तरफोड म्हणजे काय? पहिल्यांदाच ऐकतोय हा शब्द! शब्द पुणेरी की कोल्हापुरी?
राम माफ करा...आपले सर्वच
राम माफ करा...आपले सर्वच प्रतिसाद मी वाचले आणि याच निष्कर्षावर पोहचलो की आपणही एकतर्फिच प्रतिसाद देत आहात. म्हणजे 'मीच' ग्रेट असे. आणि कसे 'ग्रेट' असे.
आपला प्रथम प्रतिसाद आवडलेला... त्या पुढचे सर्व स्वार्थि, एकांगी.
आता मंदाररावांना जो प्रोब्लेम आहे तो आहेच त्यांनी सांगीतले नाही तर ते नसणार असे होणर आहे का? आणि त्यांचे (बोट)विचार विकासाकडेच आहेत....मलाही वाटते 'मुंबई' मध्ये सर्वच बेस्ट्या (BEST) वातानुकुलीत असाव्या....पण मग विचार येतो ती काही दुबई नाही....पण होईल अशी आशा.....आता पुणे सुविधा जनक असावे असं त्यांना वाटले तर त्यात काय एवढे वाईट वाटुन घ्यायला. तुम्हालाही अशी इच्छा झाली पाहीजे असे मला तरी वाटुन गेले.
आपण इतके त्रागा करत आहात म्हणुन हा प्रतिसाद.
थुत्तर म्हणजे थोबाड...
थुत्तर म्हणजे थोबाड...
आय सी!
आय सी!
पुण्याला कितीही शिव्या
पुण्याला कितीही शिव्या दिल्या, पुणेकरांच्या कंजूषपणाची कितीही टिंगल उडवली, तरी, मुंबईच्या तुलनेत, किंबहुना भारतातल्या बर्याच शहरांच्या तुलनेत (दिल्ली, मद्रास, कलकत्ता, जयपूर वगैरे) पुणे हे वास्तव्यासाठी अधिक चांगले शहर आहे याविषयी दुमत नसावे.
आणखीन एक सुंदर पोस्ट
आणखीन एक सुंदर पोस्ट मास्तुरे!
(जयपूर सोडून)
एखाद्याच्या सवईंप्रमाणे
एखाद्याच्या सवईंप्रमाणे दुसर्याने उच्चारण करण्यात येणारे शब्द...
ही घाटी लोक, - घाटावर राहणारे.
ते बिहारी लोक, - बिहार राज्यात राहणारे.
तो युपी वाला भैया, - उत्तर प्रदेशात राहणारे.
राजस्थानी, - राजस्थानात राहणारे.
ए मारवाड्या, किंवा मारवाडीच आहेस - मारवाड देशात राहणारे.
ये 'कश्मिर की कली' अहाहा,- काश्मिर मध्ये राहणारी.
हा 'मुंबैया' किंवा 'हा मुंबईकर आहे ना? तेव्हाच'. - मुंबापुरीत राहणारे.
ओ 'गुज्जु' - गुजरात राज्यात राहणारे.
ए 'मल्लु', - दक्षिण भारतात राहणारे.
ते मालवणी, - मालवनात राहणारे.
ते 'गोवानिस' - गोव्यात राहणारे
मग
हा तुमचा पुणेरी बाणा - पुण्यात राहणारे पुणेकर म्हटले तर इतके का चिडलात...इतके डोक्याला ताप करुन का घेतलात हेच कळत नाही बुवा! स्पेशीअली असं काही आहे का?
(या प्रकारे आंतराष्ट्रीय नामावलीही बनवली जाणे शक्या आहे. )
>>> पुण्यात राहणारे पुणेकर
>>> पुण्यात राहणारे पुणेकर म्हटले तर इतके का चिडलात
अहो, ते पुणेकर म्हणाले म्हणून नाही चिडले. काही जणांनी (पुण्यात राहूनसुध्दा) पुण्याला नावे ठेवली म्हणून ते कोपिष्ट झाले. पुलंनी म्हटलंच आहे ना की पुणेकरांना पुण्याचा साधासुधा नव्हे तर जाज्वल्य अभिमान असतो.
पुण्याप्रमाणे कोल्हापूरवासीयांना सुध्दा कोल्हापूरचा जाज्वल्य अभिमान असतो असा माझा अनुभव आहे. "कोल्हापूर" असे शब्द कानावर पडले की त्यांना एकदम भरून येते आणि मग कोल्हापूरची अफाट स्तुती सुरू होते. पुणेकरांचं तसंच आहे.
(आता पुणे X कोल्हापूर असा वाद सुरू करू नका)
मनोरंजक चर्चा, पुलं हे
मनोरंजक चर्चा, पुलं हे कालातित लिखाण करुन गेले हेच खरं.
दक्षे तुला रिणांगणात पाहुन मज्जा वाटली... तू लढ आपला सपोर्ट आहे.
च्यायला लैच पेट्लय की रान !
च्यायला लैच पेट्लय की रान !
पुण्याचा साधासुधा नव्हे तर
पुण्याचा साधासुधा नव्हे तर जाज्वल्य अभिमान असतो. >>>हे काय? असा? अश्या प्रकारे? दुसर्याला खाली दाखवुन म्हणणे की मी 'मोठा' अभिमानी.
(तर्क म्हणते स्वतःला मोठा करायचे असेल तर दुसर्याला लहान दाखवा. यानुसार असेल.)
मास्तुरे, कोल्हापूरचा
मास्तुरे,
कोल्हापूरचा जाज्वल्य अभिमान मी गेली १९ वर्षे माझ्या घरात माझी पत्नी म्हणून वावरताना पाहात आहे.
त्यामुळे आपल्याशी सहमत आहे. प्रपोज मीच केलेले असल्याने आता मलाही दोन दोन शहरांचा जाज्वल्य अभिमान पाळावा लागत आहे.
हे काय? असा? अश्या प्रकारे? दुसर्याला खाली दाखवुन म्हणणे की मी 'मोठा' अभिमानी>>
चातकराव, पुणेकरांना दुसर्यांनी खाली दाखवलेले आहे असा मूळ लेख आहे याची आपली एक आठवण करून देतो.
पुणे हे वास्तव्यासाठी अधिक
पुणे हे वास्तव्यासाठी अधिक चांगले शहर आहे याविषयी दुमत नसावे.
>>> मास्तुरे साहेब १००% चोखा जवाब
प्रतिसादावरुन तर असेच वाटते...तिथे काहीच हालचाल नसावी. सर्व एकाच जागी. तेच रामायण तेच महाभारत या पुढे काही नाही.
अय्या, लोकं कित्ती कित्ती
अय्या, लोकं कित्ती कित्ती उदबोधक चर्चा करतायत नाही ? चर्चेतले मुद्दे वाचून मला तं बै मुंबई आणि पुणं दोन्ही शहरं लै डेंजर वाटायला लागलैत. झुमरीतलैय्याला शिफ्ट व्हावं म्हंते.
(No subject)
पुणेकरांना दुसर्यांनी खाली
पुणेकरांना दुसर्यांनी खाली दाखवलेले आहे असा मूळ लेख आहे याची आपली एक आठवण करून देतो. >>>म्ह्हं बरोबर आहे लक्षात आहे ते... धन्यवाद भुषणराव! पण त्यात खाली दाखवण्यासारखे तरी काही नाही...असे मला वाटते. पण अनेकांनी वेगळ्या प्रदेशाची भौगोलीक आणि सामाजीक उदाहरणे दिली आहेत. म्हणुन म्हटले.
झुमरीतलैय्याला शिफ्ट व्हावं
झुमरीतलैय्याला शिफ्ट व्हावं म्हंते. >> अगं मामे तिथल्या लोकांनाही एक वाक्प्रचार आहे. कुणी काही यडचाप्गीरी केली की 'झुमरीतलय्या से आया है क्या?' असा.
कालांतराने या वाक्यावरही वाद होतील. कोण जाणे.
माझे या लेखावरील
माझे या लेखावरील प्रतिक्रियांमध्ये प्रामुख्याने नीधप यांना अनुमोदन आहे. तेही तसेच, जोरदार वगैरे!<<<
माफ करा बेफिकीर पण मी कुठेच मुंबईला वा इतर कुठल्याच शहराला नावे ठेवलेली नाहीत. आपल्या तुटपुंज्या अनुभवावरून एखाद्या संपूर्ण शहराला, शहरवासियांना नावे ठेवणे याला कणभरही अर्थ नाही.
जेवढं पुणं सगळ्या गुणदोषांसकट मला प्रिय आहे तेवढीच मुंबईही गुणदोषांसकट प्रिय आहे. जिथे भाकरी कमवायची त्याच शहराला शिव्या घालायच्या हे मला तरी न जमण्यासारखे.
बाकी पुण्यातल्या तथाकथित 'नसलेल्या' अगत्याचे अनेक अनुभव मुंबईत, खुद्द विलेपार्ल्यात(खर्या) पण आलेले आहेत मला.
शर्मिलाचे मुंबईकरांनी पुण्याला स्वतःच्या पंक्तीला बसवू नये या पोस्टमधली पुण्याबद्दलची तुच्छता जी पदोपदी अनेक मुंबईकरांकडून अनेकदा अनुभवाला येते जी वरच्या अनेक पोस्टसमधून आली आहे.
त्याबद्दल असोच.
एक जोडीदार मुंबईकर आणि एक पुणेकर अश्या माझ्यासकट शेकडो जोड्या सुखाने आणि गुण्यागोविंदाने नांदतायत रे योग. भांडायला आमची आमची वेगळी निमित्त आहेत आमच्याकडे पुणे-मुंबई हे त्यामानाने शुल्लक!
इथे वाद घालणारे पुलंच्या
इथे वाद घालणारे पुलंच्या आवडत्या वुडहाउसचे त्यांच्याच एका लेखात आलेले वाक्य विसरले वाटते..(सरसकट पुणेकर आणि मुंबईकरांवर शिक्के मारणे सुरु आहे).
वुडहाउसचा नाझी जर्मनीत अतोनात छळ झाला. त्याला एकदा विचारण्यात आले
"Plum, Don't you hate Germans?"
त्यावर त्याने उत्तर दिले होते
"I don't hate in plurals".
मी मुंबईकर आणि पुणेकर दोन्ही आहे..दोन्हीवर (त्यांच्या गुणदोषासहित) माझे खुप प्रेम आहे. कोणी कितीही नावे ठेवली तरी माझा अभिमान वगैरे दुखावला जात नाही किंवा मला राग येत नाही (हु केअर्स दुसरे काय म्हणतात ते?) . आणि कोणी खवचटपणाने किंवा कुत्सिततेनेही विचारले तरी मी अत्यंत अभिमानाने उत्तर देतो.. "हो मी पुण्याचा आहे"
माफ करा बेफिकीर पण मी कुठेच
माफ करा बेफिकीर पण मी कुठेच मुंबईला वा इतर कुठल्याच शहराला नावे ठेवलेली नाहीत. आपल्या तुटपुंज्या अनुभवावरून एखाद्या संपूर्ण शहराला, शहरवासियांना नावे ठेवणे याला कणभरही अर्थ नाही.>>>
ओक्क्के नीधप!
मला वाटले 'पुण्यात यायचंच कशाला' असे आपण म्हणालात म्हणजे आपण कुणालातरी नावे ठेवत आहात.
अर्थात, आपण कुणालातरी नावे ठेवत आहात म्हणून मी जोरदार अनुमोदन दिले नव्हते तर पुण्याच्या बाजूने बोलत आहात म्हणून! इतकेच काय, मी आपल्याला 'मा.स.तो.' हा पुरस्कारही माझ्यातर्फे जाहीर करणार होतो. (हलके घ्या)
असो! मी मुंबईला नावे ठेवली ती केवळ पुण्यावर टीका करण्याची पारंपारिक वृत्ती दिसल्याने! याही धाग्यात कुणी पाहिले तर प्रामुख्याने मुंबईकरांनीच पुण्याची खिल्ली उडवलेली दिसते व उलटेही तसेच! आणि पुणेकरांनी मुंबईकरांची खिल्ली उडवण्यात माझा सहभाग सर्वात जास्त आहे. कमी जास्त माफ करावे प्रशासकांनी!
बाकी मला तर अजूनही इन्टरेस्ट आहे पुणे डिफेंड करण्यात!
-'बेफिकीर'!
मुंबईत पुणे आणि कोकणातील
मुंबईत पुणे आणि कोकणातील लोकांना जेवढा मान आहे तो इतरांहुन ५०% जास्तच असेल्..असा माझा अनुभव आहे....आमच्या शेजारीच पुणेकर राहत. खुपच गोड होते खरे. पुणेकर म्हटलं की कसं फ्रेश वाटायचे तेव्हा. पण अता माहीत नाही २ वर्षांत...
आणि 'कोकणी' म्हटले की मज्जाच मजा.
बाकी मला तर अजूनही इन्टरेस्ट
बाकी मला तर अजूनही इन्टरेस्ट आहे पुणे डिफेंड करण्यात! >>>
गुड
दॅट्स अ स्पिरीट.
चला झाले का सगळ्यांचे
चला झाले का सगळ्यांचे भांडुन?? उगाच नाही मुंबई-पुणे-मुंबई (डुआयने लक्षात आणुन दिल्याने बदल केला. सवयीने व पुणेकर असल्याने पुणे-मुंबई-पुणे असे लिहीले होते.
) असा चित्रपट निघाला. या वेळच्या वविला कुस्त्या ठेवायच्या का? चंबा मुतनाळ व दिनानाथ सिंग वगैरे टाईप. संयोजक एक लाल मातीचा आखाडा बनवुन घ्याच.
हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच कि ह्याचा मनाला त्रास होतो. आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का?>>>>
हा शेवटचा पॅरा लोकांनी वाचलाच नाही म्हणजे. व त्या शापाला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत सगळे.
केपीजी, ओके! आता मी
केपीजी,
ओके! आता मी पुणेकरांवर टीका करणार्यांशी वाद घालणार नाही.
-'बेफिकीर'!
चातक.. सर्वात प्रथम म्हणजे मी
चातक.. सर्वात प्रथम म्हणजे मी माझ्या पोस्ट्मधुन कुठल्याही शहराला नावे ठेवलेली नाहीत.. किंवा पुणे हे इतर शहरांपेक्षा ग्रेट आहे असा माझा कसलाही दावा नाही.. पण मला पुण्याचा अभिमान नक्कीच वाटतो आणी तो मी पुण्यात जन्मलो नसताना केवळ पुण्यातील वास्तव्यात मला पुणेकरांच्या सुसंस्कृत आणी सभ्य वागणुकीचे अनुभव आले या शहराने जो जिव्हाळा जी आपुलकी दाखवली त्यामुळेच वाटतो. याचा अर्थ मी पुणे हे शहर मुंबईपेक्षा भारी आहे किंवा पुणेकरच ग्रेट आहेत असे कधीच म्हणणार नाही.. माझ्यामते पुणे पुण्याच्या ठीकाणी आहे आणी मुंबई ही मुंबईच्या ठीकाणी.. दोन्हीकडे चांगल्या वाईट गोष्टी आहेत आणी असणारच.. पण केवळ काही पुस्तकातुन लिहलेले वाचुन किंवा काही पुणेरी पाट्या वाचुन लोकानी पुणेरी बाणा किंवा समस्त पुणेकर यांच्याविषयी गैरसमज करुन घेतलेला दिसला म्हणुन ते सर्व लिहण्याची पाळी आली... मंदार याना पुण्यात जो अनुभव आला तो कुठल्याही शहरात येउ शकतो पण तो पुण्यात आला म्हणुन त्याच्याकडे त्याच त्या पुलंच्या चश्म्यातुन बघीतले जाते याचेच खरेच दुखः होते.. मी स्वता सुद्धा पुणेरी पाट्या वाचुन बर्याच ओरिजीनल पुणेरी लोकांची चेष्टा मस्करी केली आहे पण एखाद्याची कुठल्याही विषयावरुन मस्करी करताना त्याचा स्वाभिमान दुखवला जाणार नाही याचे तारतम्य ठेवणे अत्यंत जरुरी आहे.. आपल्या शहराचा आपल्या संस्कृतीचा अभिमान असणे यात वाईट काहीच नाही, वाईट आहे ते त्याचा दुराभिमान असणे त्यामुळेच आमचे ते चांगले आणी दुसर्याचे ते वाईट ही वृत्ती जोपासली जाते... माझ्या बाबतीत म्हणाल तर मी सांगली, कोल्हापुर औरंगाबाद आणी मुंबईतसुद्धा राहीलो आहे. आणी ह्या सर्व शहरांशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जुळलेले आहेत.. माझे या शहरांपेक्षा पुण्यात ज्यास्ती वास्तव्य असल्यामुळे पुण्याविषयी थोडे अधीक प्रेम असणे नक्कीच योग्य आहे.. पण म्हणुन मी इतर शहराना पुण्यापेक्षा कधीच कमी समजत नाही.. माझ्या पोस्ट मधुन तुमचा जर असा गैरसमज झाला असेल तर तो माझा लेखनदोश समजावा..
Pages