सर्वात आधी मी हे सांगु ईच्छितो कि हा लेख लिहिण्यामागे कोणत्याही एका लेखकाची वा त्याच्या लेखाची मापे काढणे हा हेतू नाही. बर्याच दिवसांपासुन ह्या विषयावर लिहायचं मनात होतं पण काही ना काही कारणानी राहुनच जात होतं. काल "डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा" हा लेख वाचला आणि माझ्यातला पुणेरी बाणा जागा झाला!.. आणि मग ठरवलं कि आज लिहुनच टाकुयात मनातल. तेव्हा कविताबाई, तुमचा लेख हे फक्त निमित्त झालय.. तुमची लिहिण्याची शैली, लेखाची मांडणी उत्तम आहे. मी फक्त विषयावर थोड भाष्य करु ईच्छितो...
*****************************************************
तर मी पक्का पुणेकर. वयाची पहिली २५ वर्ष पुण्यातच काढली आणि मग थेट अमेरिकेत येऊन पोचलो. इथे आल्यावर मला पहिल्यांदाच कळालं कि पुणेकर प्रचंड special असतात. कारण आजुबाजुचे मराठी मित्रसुद्धा बोलताना वाक्याची सुरुवात "तुम्ही पुणेकर.." अशी करत होते. आणि मग "तुमच्या पुण्यात / पुण्या-मुंबई कडे" असे टोमणे येता जाता ऐकू यायला लागले. अगदी महाराष्ट्र मंडळात पण असेच उल्लेख ऐकायला मिळाले. वर जाता जाता पु.लं.च्या 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मधली वाक्य पण लोक ऐकवत होते.
तसे कॉलेजमधे असताना माझे अनेक मित्र नांदेड, नागपुर, नाशिक (माफ करा 'नासिक'), जळगाव, धुळे (माफ करा 'धुलिया') चे होते. तसेच इथेही आहेत. पण आम्ही कधी त्यांना कोणाला त्यांच्या गावावरुन एवढं 'गौरवल्याच' आठवत नाही. मग प्रश्न असा पडला कि केवळ पुणेकरांना का एवढा 'मान' मिळतो? बरीच मंडळी आधी सांगताना जोरात सांगतात कि "आम्ही अमुक अमुक गावचे, पण आता रिटायर झाल्यावर आई बाबा पुण्याला असतात." किंवा "परवाच पुण्यात फ्लॅट बूक केला बर का"... आणि मग येतं, 'काय हो तुमच्या पुण्याचा ट्रॅफिक!, काय पण पुण्याचे रिक्शावाले!, काय ते पुण्याचे दुकानदार!, काय चितळ्यांसमोरच्या रांगा!, काय हो पुण्याचे रस्ते!, वगैरे..वगैरे'. हल्ली महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपर्यातून आलेल्या प्रत्येकाला पुण्यातच का घर घ्यायच असतं? आणि एवढाच पुण्यात त्रास आहे तर का एवढा पुण्यात रहाण्याचा अट्टाहास? मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच, पुण्यात रहायला यायचच कशाला?
तो 'मुंबई पुणे मुंबई' चित्रपट लोकांना प्रचंड आवडला पण मला त्या नायकाची (पेक्षा लेखकाची) कीव आली. आजपर्यंत कोणीही पुणेकर असा जाता येता 'मग जाज्वल्य अभिमान आहे' असं म्हणताना मी बघितला नाहिये. "तो चित्रपट आहे, त्यात जरा मेलोड्रामा असणारच," असं म्हणुन स्वतःची समजुत काढली तर लोक नंतर तो संवाद ऐकवून आमचीच टिंगल करत होते. तसच आता हा 'डोंबिवली स्पेशल....' लेख. गेली अनेक वर्ष डोंबिवलीमधे रहाणार्या आणि तिथेच व्यवसाय करणार्या त्या मूनमून मिसळवाल्या बाईंना 'पुणेरी' बाणा का चिकटवायचा? डोंबिवलीतच तशाच तिखट जिभेच्या कोणी बटाटेवडा विकणार्या बाई आहेत हि माहिती प्रतिसादांमधुन कळाली. म्हणजे प्रत्येक शहरात अशी मंडळी असतातच. मग त्यांना 'पुणेरी' बाणाच का नेहेमी चिकटवायचा? पु.लं. नी 'पुणेकर, मुंबईकर..' लिहुन आता ४० वर्ष झाली. पण तेव्हाचा पुणेकर आणि आत्ताचा पुणेकर बराच वेगळा आहे. किती वर्ष हे stereotyping करत रहाणार आपण? गावोगावी असे लोक सापडतातच.
आता उदाहरण म्हणून "टायगर ऑईल कंपनी, ह्युस्टन" असं गूगल करा. त्या कंपनीच्या मालकानी त्याच्या कर्मचार्याना लिहिलेले मेमो तुम्हाला दिसतील. (आणि ते वाचून कृपया "मालक पुण्याचे दिसतात" असा निष्कर्श काढु नका!!) त्यातल्या त्यात जमेची बाजु म्हणजे 'आता पुणं कात टाकतय' हे पण 'डोंबिवली स्पेशल....' लेखात वाचयला मिळालं. म्हणजे पुणं आता बदललय हे आता लोक जरातरी मान्य करायला लागलेत.
मी असं अजिबात म्हणत नाही कि पुणेकर चिकित्सक नसतात. ते जरा जास्त चिकित्सक असतातच आणि ते तसे असतात कारण अगदी काही वर्ष आधीपर्यंत पुणं महाराष्ट्रातलं एकमेव सांस्कृतिक केंद्र होतं. तिथल्या लोकांनी नेहेमी जर का जागतिक किर्तीच्या कलाकारांना (ह्यात लेखक, गायक, नट, नाटककार, कवी सगळे आले) बघितलं असेल तर आपोआप अपेक्षा ऊंचावणारच. आणि मग ते साध्या कलाकारांच्या चुका काढताना दिसतात. कदाचित म्हणूनच अनेक कलाकार म्हणतात कि पुण्यात टाळी मिळणं सगळ्यात अवघड आहे. पण आता इतर सगळीकडे मोठे मोठे कार्यक्रम होतात. दूरचित्रवाणीमुळे सगळीकडच्या प्रेक्षकांना आता उत्तमोत्तम कलाकारांच्या कलाकृती बघायला मिळतात. पण अजुनही कोणी एखाद्या कार्यक्रमावर जरा टिका केली कि बाकिचे विचारतात,"तुम्ही पुण्याचे का हो?". माझं त्यातल्या गंमतीशी काही वाकड नाही, मला टोचतो तो त्यातला कुत्सित्पणा.
चितळ्यांच्या दुपारी दुकान बंद ठेवण्याला नावं ठेवणारे लोक त्याच चितळ्यांच्या बाकरवड्यांवर तुटुन पडतात. कोणी पुण्याहुन येत असेल तर बाकरवड्या, आंबा बर्फी अगदी मागवुन घेतात. आणि परवाच एक जण अत्यंत चिडुन सांगत होता कि चितळे हल्ली प्लॅस्टिकच्या पिशव्या देत नाहीत. आता तक्रार करायची म्हणून काहीही करायची का? ते चांगले प्लॅस्टिक कमी करायला मदत करत आहेत असं का बघायचं नाही? पुणेरी पाट्या ह्या नावाखाली कोणत्याही गावतल्या पाटया टाकतात हल्ली लोक. त्यातल्या बर्याच पुण्यात नसतातही पण लिखाण जरा खोचक असलं कि त्या पाटीला पुणेरी म्हणायचा शिरस्ताच पडला आहे.
हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच कि ह्याचा मनाला त्रास होतो. आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का?
*****************************************************
ता.क. - मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. चुक भूल द्यावी घ्यावी..
कळावे,
लोभ असावा.
ताजवर झालेला हल्ला मुंबई वर
ताजवर झालेला हल्ला मुंबई वर झालेला हल्ला नव्हता...>>
मंदार यांनी 'समाजविरोधी कारवाईत पुणेकर जाब विचारतात का' हा प्रश्न काढला होता, लगेच आठवले म्हणून तो उल्लेख केला इतकेच! .
.पक्षी तो 'देशावर' झालेला हल्ला होता....>> अर्थातच!
आणि आपण.>>> मी पुन्हा म्हणतो की केवळ समाजाची मानसिकता याच संदर्भात माझा तो उल्लेख घ्यावात.
तो 'देशावर' झालेला हल्ला होता
तो 'देशावर' झालेला हल्ला होता > बरोबर.

पण आता त्यावर चर्चा नको.
पुणे आणि पुणेकरांवर केंद्रित करुया.
सहमत आहे मंदार! चर्चा जर
सहमत आहे मंदार!
चर्चा जर थोडीफार इकडे तिकडे गेली असल्यास मी आपला एक प्रयत्न कर्न पाहतो मूळ मुद्दा पुन्हा लिहिण्याचा!
पुणे व पुणेकरांवर वर्षानुवर्षे जी टीका केली जाते ती योग्य आहे की नाही? यात पुणे व पुणेकर म्हणजे मायबोलीवरील पुण्यातील पुणेकर हे अभिप्रेत नाही.
(हे आपले उगाचच सांगीतले, राग नसावा)
भुषणराव, मंदारराव मला काही
भुषणराव, मंदारराव मला काही सांगायचे आहे....
जेव्हा ताजवर हल्ला झाला मी तिथे होतो...(मरिन ड्राईव्हवर).
जेव्हा जोगेश्वरी स्टेशन सोडुन गाडी निघताच्...स्फोट झाला मी तिथे होतो.... ऑफिस स्टेशन रस्त्यावरच होते. लोकांचे तुट्लेले अवयव...रक्त मांसाचा पडलेला सडा आणि स्वत:चेच तुडलेले अवयव पाहुन विव्हळाणरे ते जिव्...काही वेळासाठी प्राण सुन्न करुन गेले...तरी तुडलेल्या अवयवांनीशी लोकांना कपड्यात (जे रेल्वे ट्रॅक शेजारच्या चाळीत सुकायला घातलेले) झेलुन ....रुग्णवाहीका....रिक्षा....टॅक्सी...बस जे मिळेल त्या वाहनात ठेवुन हॉस्पीटलकडे धाडले आहे.
प्रत्यक्षात पहिलेल्या त्या घटनेचा शब्दांत अनुभव सांगणे फारच कठीण आहे....आज ही डोळे पाणावतात त्या लोकांचे चेहरे समोर येतात.
टीका बर्याच प्रमाणात योग्य
टीका बर्याच प्रमाणात योग्य आहे.
काय हे ! केवढी चर्चा आधी
काय हे ! केवढी चर्चा
आधी टाईमपास म्हणून वाचायला बरे वाटले पण आता कंटाळा आला.
बाकी सुधारणेसाठी प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून सुरूवात करावी म्हणजे कालांतराने दुनिया सुधारेल / शहर सुधारेल हे पण माझे वै. मत. असो 
मला दोन्ही शहरांचा खूप कमी अनुभव. पण आपली रोजीरोटी ज्या शहराने दिली आहे त्याला नावं ठेवू नये हे माझे वै.मत.
चातकराव, फारच हृदयद्रावक!
चातकराव, फारच हृदयद्रावक!
यावर काय बोलणार म्हणा!
की जेथे मला वाटते शासनाला
की जेथे मला वाटते शासनाला मुंबईकरांनीही जाब विचारण्यासाठी रस्त्यावर यायला हरकत नाही, नुसतेच 'वेनस्डे' सारखे चित्रपट काढण्याऐवजी >>>> माझ्या अनेक मुंबईकर व नॉनमुंबईकर मित्र मैत्रिणींनी आणि मी स्वतः पंतप्रधान व मंत्रिमंडळ, इतर पदाधिकारी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळे, मुंबई पोलिस व अग्निशमन दल, आपली संरक्षण दले यांना पोस्टकार्डांवर अनेक पत्रे लिहिली आहेत स्वाक्षरी, नाव, पत्ता व फोन नंबरसकट. फक्त यात जाब विचारला नव्हता कारण ती वेळ जाब विचारायची नव्हती. या पत्रांमध्ये आम्ही पाकिस्तान विरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे व यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे आश्वासन दिले होते. पोलिस, संरक्षण दले व अग्निशमन दलांना लिहिलेल्या पत्रांमध्ये आम्ही त्यांचे ऋणी असल्याचे व त्यांच्यामुळेच आपल्या मातृभुमीचे संरक्षण होत आहे अशी कृतज्ञता व्यक्त केली होती. चौपाटीवर हुतात्मा झालेले तुकाराम ओंबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेटही काही जणांनी घेतली होती.
अश्या पत्रांचा मारा होत असल्याची लोकसभेतही दखल घेतली गेली होती. त्यासंबंधीच्या क्लिपिंग्जही यूट्यूबवर उपलब्ध होत्या. आता आहेत की नाही माहित नाही. ठाण्याच्या खासदारांनी वाचून दाखवलेल्या काही पत्रांत सुप्रिया नावाच्या माझ्या ठाण्यातील मैत्रिणीचे व अश्विनी या नावाने (ती मीच आहे की दुसरी कुणी अश्विनी ते माहित नाही) आलेल्या पत्रांचा उल्लेख मला स्पष्ट आठवतो आहे. विरोधी तसेच सत्ताधारी पक्षाच्या सगळ्यांनी अशी पत्रे आल्याचे मान्य केले होते.
ही पोस्ट अवांतर असेल पण वरील वाक्यावरुन लिहावेसे वाटले. यात मुंबईकरांबरोबर काही अंशी पुणेकर व इतर शहरांतील गावांतील लोकांचाही सहभाग होता.
पुण्यातील लोकांचा किंवा
पुण्यातील लोकांचा किंवा पुण्याचा कसलाही अनुभव नसताना, केवळ पुस्तके वाचुन किंवा ऐकीव माहीतीवर पुण्याला आणी पुणेकराना नावें ठेवणे हे जगभरातील मराठी माणसाचे आवडते काम आहे.. या सारखेच उदाहरण म्हणजे पुण्यातील लोक घरी आलेल्या पाहुण्याला, 'चहा घेउन आलाच असाल' किंवा 'पुढच्या वेळी अर्धा कप चहा घेउन जावा' असे बोलतात हा विनोद सांगीतला जातो. खरेतर कुणालाच पुण्यात असा अनुभव आलेला नसतो, पण केवळ सगळे विनोद करतात म्हणुन आपण सुद्धा आपल्या बुद्धीने त्यात मालमसाला भरायचा आणी ठोकुन द्यायचे की पुण्यात असे होते आणी तसे होते.. पुणेकर काटकसरी आहेत ,पण कंजुस नाहीत याचे उत्तम उदाहरण म्हणजे पालखी सोहळा.. दरवर्षी या सोहळ्यात वारकर्यांच्या आरोग्यापासुन ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व सोय पुणेकर करतात . आणी मुख्य म्हणजे मनापासुन करतात.. तसेच पुण्यातील गणपती बघायला महाराष्ट्राच्या अनेक भागातुन लोक त्यांच्या नातेवाईकांकडे येतात त्या कोणीच पुण्याच्या आदरातिथ्याबद्दल अवाक्षर काढले नाही..
हां अर्थात काही हाताच्या बोटावर मोजणारे पुणेकर्स असतील तुसडे ,उद्धट आणी कंजुश पण केवळ हे काही लोक म्हणजे पुणे न्हवे... अश्या प्रकारचे लोक सर्वच शहरात असतात, मग पुणे कसे अपवाद असेल?? पण अश्या काही लोकांची उदाहरणे घ्यायची आणी पुण्याच्या नावावर वाट्टेल ते खपवायचे हा जगभरातील लोकांचा आवडता उद्योग..
सगळ्यात महत्वाचे म्हणजे पु.ल. नी तो लेख लिही पर्यंत आणी त्या नंतर ही पुणे सांस्कृतीक दृष्ट्या आहे तसेच आहे उलट पुण्याची आणी सांस्कृतीक चळवळीची भरभराटच झाली आहे. पण पु.ल. नी म्हंटले ना मग आपण सुद्धा तसेच म्हंटले पाहीजे, नाहीतर आपण मागास किंवा अडाणी असा एक फार मोठ्ठा गैरसमज जगभरातील मराठी समाजाने करुन घेतला आहे.. त्याना हेच कळत नाही की मोठमोठ्या लोकांची मते स्वताच्या मनावर लादुन घेण्यापेक्षा, कुठल्याही बाबतीत अनुभवाने आणी ज्ञानाने स्वताचे मत स्वता ठरवणे हे सुसंस्कृत आणी सुशीक्षीत पणाचे खरे लक्षण आहे..
पुण्यातील इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इतर मुलभुत सुविधा या सुद्धा भारतातील इतर विकसनशील शहराप्रमाणेच आहेत. बर्याच त्रुटी आहेत आणी थोडीफार प्रगती आहे . पण हे चित्र फक्त पुण्याचेच आहे का? भारतातील इतर शहरांचा या बाबतीत अभ्यास केला तर जवळपास सारखेच चित्र दिसेल. एखादा अपवाद असेलही पण तो अपवादच..
पुण्यातील राजकारणी लोक जितके भ्रष्टाचारी आहेत तितके इतर शहरातील नाहीत का? खरेतर राजकारणात सब घोडे बारा टक्के हेच खरे पण पुण्याच्या राजकारण्याला तो पुण्याचा म्हणुन थोडी ज्यास्ती नावे ठेवायची का?
इथे बरेच जण पुण्याची आणी मुंबईची तुलना करत आहेत.. पण मुंबई हे त्याला लाभलेल्या भौगोलीक स्थानामुळे आणी समुद्रकिनार्यामुळे प्रथमपासुन एक व्यापारी शहर होते त्यामुळे त्या शहराची प्रगती आणी प्रॉब्लेम्स याची पुण्याशी तुलना सर्वस्वी अनाठायी आहे..
>>या सारखेच उदाहरण म्हणजे
>>या सारखेच उदाहरण म्हणजे पुण्यातील लोक घरी आलेल्या पाहुण्याला 'चहा घेउन आलाच असाल' किंवा 'पुढच्या वेळी अर्धा कप चहा घेउन जावा' असे बोलतात हा विनोद सांगीतला जातो.
अगदी बरोबर. पुण्यात असं कुणीही म्हणत नाही. कारण चहाच विचारत नाहीत
>>. त्याना हेच कळत नाही की मोठमोठ्या लोकांची मते स्वताच्या मनावर लादुन घेण्यापेक्षा कुठल्याही बाबतीत अनुभवाने आणी ज्ञानाने स्वताचे मत स्वता ठरवणे हे सुसंस्कृत आणी सुशीक्षीत पणाचे खरे लक्षण आहे..
स्वत:चेच अनुभव सांगितलेत इथे. आता ते पुलंच्या लेखनाशी जुळतात त्याला आम्ही काय करणार?
कारण चहाच विचारत नाहीत>>>
कारण चहाच विचारत नाहीत>>> ?????
काय बोलताय मंदारराव?
पुन्हा......अपवाद असतातच
पुन्हा......अपवाद असतातच
हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश
हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच कि ह्याचा मनाला त्रास होतो. आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का? >>>>
हा होता लेखकाचा मूळ उद्देश.. सर्व प्रतिसाद पाहून वाटतंय की त्याला जे होऊ नये असे वाटत होते, नेमके तेच होतय!
मुंबई-पुणे वाद रंगलाच आहे तर, मुंबईकरांनो.. प्रामाणिकपणे सांगा, की तुम्हाला आजपर्यंत मुंबईत कधीच कुठलाच वाईट अनुभव आला नाही. हीच विनंती सर्व पुणेकरांना पुण्याबाबत. केवळ अशक्य आहे हे!
जितक्या व्यक्ति तितके स्वभाव... हा मुलभूत नियम का विसरताय... हा नियम जगाच्या पाठीवर कुठेही लागू होतो.
राम, पोस्ट आवडली. बाकी
राम, पोस्ट आवडली.
बाकी स्वतःच्या एक दोन वैयक्तित अनुभवावरुन समस्त पुणे-मुंबई शहरालाच वाईट समजण्याचा किंवा तशी समजूत घालण्याचा जो प्रयत्न चाललाय तो चालुदे.
राम, सॉलीड पोस्ट!
राम,
सॉलीड पोस्ट!
एक दोन वैयत्तिक अनुभव इथे
एक दोन वैयत्तिक अनुभव इथे सांगितलेत. सगळे सांगितले तर ग्रंथ होईल.
राम उत्तम पोस्ट.. फक्त
राम उत्तम पोस्ट..
फक्त पु.लंचे पुणेकरांवरचे विनोद वाचून/ऐकून पुण्याची मापं काढणार्यांना पुलंनी पुण्याबद्दल जे पॉझिटिव्ह लिहिलेलं दिसत नसेल तर उपयोग काय?
या बीबीचा उद्देश पुणे विरूद्ध मुंबई असा मुळात नव्हताच, पण काही जणांनी येऊन ते सुरू केलं, हा त्यांच्या बुद्धीचा दोष आहे... कुणिकडून चर्चेला वेगळे वळण लावणे व आपल्या शब्दांची वर्णी लावणे... हेच योग्य वाटते अशा लोकांना..
प्रत्येक शहरात राहणार्या माणसाला त्या शहराच्या उण्या-अधिक गोष्टी माहीत असतात. त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसर्याचं ते कार्टं अशा प्रकारची विधानं केली तरिही कळतंच की लढाई में बढाई असली तरिही खजिनेमें गोवर्याच आहेत ते.
मंदार, पुणं जर इतकं वाईट असेल तर इथे नोकरी कशाला करतोस? मुंबईत जाऊन रहा की. एका चहाच्या कपाच्या दानतीवरून तु पुणेकरांचं मोजमाप करणार असशील तर तुझ्या कुपमंडूक बुद्धीची खरंच किव करायला हवी...
लढाई में बढाई असली तरिही
लढाई में बढाई असली तरिही खजिनेमें गोवर्याच <<< दक्षिणा, हे आधी ऐकलं नव्हतं कधी, कसली झाडते आहेस? LOL!
दक्षे, इथे नोकरी करण्याची
दक्षे, इथे नोकरी करण्याची काही वैयत्तिक कारणं आहेत. ती नसती तर कधीच आलो नसतो इथे.
आणि माझी वरची पोस्ट नीट वाच. फक्त चहा नाही, इतर क्षेत्रातही दानतीची बोंब आहे. वारीत जेवायला घातलं की सगळी पापं धुतली जातात असं वाटतं बहुतेक.
इतर अनेक अनुभव टाकलेत मी इथे. आणि रोज अगदी ठायी ठायी अनुभव येताहेत अनेक क्षेत्रात, अनेकांकडून.
तेव्हा एकच अनुभव नाही...................
दक्षे तुझ्या म्हणींचा
दक्षे
तुझ्या म्हणींचा तोफखाना सुरु झाला तर!!!
आणि जरा टीका झोंबली की
आणि जरा टीका झोंबली की दुसर्यांना कूपमंडूक म्हणण्यापेक्षा आम्ही सुधारू असं कुणीच म्हणत नाहीये ते.............तुम्हाला चांगले अनुभव येतील असे आम्ही प्रयत्न करू असं कुणीच म्हणत नाहीये ते..........यावरुनच तुमच्या म्हणीतल्या खजिन्यात गोवर्या कुणाकडे आहेत कल्पना आली....
घ्या, आम्हाला सुधारवायला
घ्या, आम्हाला सुधारवायला तुम्हाला आम्ही काय नारळ सुपारीचं आमंत्रण दिलं की काय, की या आणि आम्हाला सुधारा म्हणून?
आणि आम्ही बिघडलोय कि सुधारलोय हे ठरवायचा आधिकार कुणालाच नाहिये.
मंदार कृपया मी मुंबई विरूद्ध पुणे या वादात नाही त्यामुळे तु मला जबरदस्तीने त्यात ओढू नकोस. इतकं सगळं पुणंच ठायीठायी तुला वाईट दिसत असलं आणि या पुण्याने तुला घराची किल्ली, चहाचा कप.. अशा फुटकळ वस्तू ऑफर केल्या नसल्या तरिही... गेली ३ वर्षं तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुरक्षितपणे स्वत:त सामावून घेतलंय हे विसरू नकोस..
दक्षे मी ओढत नाहीये. वरच्या
दक्षे मी ओढत नाहीये. वरच्या पोस्टीत तू पहिल्यांदा माझं नाव टाकलंस म्हणून बोलायची वेळ आली.
>>... गेली ३ वर्षं तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुरक्षितपणे स्वत:त सामावून घेतलंय हे विसरू नकोस..
लय विनोदी बुवा तू
हायला इतर शहरात सुरक्षितता नसतेच जनू 
कुठे असते
कुठे असते मुंबईत?
(सुरक्षितता)
सुरक्षितता ही रिलेटिव्ह गोष्ट
सुरक्षितता ही रिलेटिव्ह गोष्ट आहे. सुरक्षित रहायला बांद्र्याच्या बेहरामपाड्यात सुद्धा सुरक्षित राहू शकतो माणुस आणि मरायला कोणतेही ठिकाण चालते.
मंदार, हा विनोद आवडला. मागे
मंदार, हा विनोद आवडला.
मागे एकाने 'मुंबईतील उकडणे मानसिक असते' असे म्हंटले होते ते आठवले.
झालं, काहिहि उद्योग नाहियेत
झालं, काहिहि उद्योग नाहियेत लोकाना हे कितीवेळा दिसतं..
चालुद्या.. ज्याचं काहिही तात्पर्य निघणार नाहि..
(No subject)
सुरक्षित हा एकच शब्द दिसला
सुरक्षित हा एकच शब्द दिसला तुला.. या वृत्तीलाच कूपमंडूक म्हणाले होते मी. बाकी मला काय म्हणायचे आहे ते इतकी उरस्फोड करून सांगण्याची गरज नाही ते तुला समजणार नाही कारण खरंच झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं कसं करावं?
सुरक्षित या एका शब्दाबाबत
सुरक्षित या एका शब्दाबाबत फक्त बोललो मी. दिसलं सगळंच.
>>कारण खरंच झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं कसं करावं?
अगदी बरोबर दक्षे, हेच मी म्हणत होतो
Pages