एक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन )

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं

तो- या आकांताचा तुला इशारा कळला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं

तो- नको बाई नको रडू, खड्ड्यामध्ये नको पडू
ती- इथनं नको, तिथनं जाऊ, रस्ता गावतोय का ते पाहू
तो- का????
ती- पडत्यात...

तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं

ती- ब्रेक सारखा, गाडीस सजना नका हो कचकन् मारू
हाडं खिळखिळी झाली समदी, पाठ लागलीया धरू

तो- कशी सांग मी हाकलू गाडी, ट्र्याफीक कसला गं

ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ||
---

ती- बेजार झाले पाहून सजना, ट्र्याफीकची ही कोंडी
कुनी बोंबले पी पी, प्या प्या, शिव्या कुनाच्या तोंडी

तो- क्षणात राणी अंगावरती चिखल उडला गं

ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ||

तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं

~मिलिंद छत्रे
चाल : एक लाजरा न् साजरा मुखडा
(कॉपी-पेस्ट करून मित्रांना पाठवायचे असेल तर नावासकट पाठवावे ही विनंती) Happy

प्रकार: 
शब्दखुणा: 

.. पडत्यात.. Proud

इधर खुदा उधर खुदा
आगे खुदा पीछे खुदा..

सब जगह खुदा ही खुदा !
जहाँ आज नही है खुदा, उधर कल जरुर होगा खुदा .. ! Proud

धम्माल ! भारी आहे ! खरच पुण्यातल्या सगळ्या पेपरांत अन प्रत्येक चौकात मोठी होल्डिग्ज लावली पाह्जेत याची Happy

Pages