एक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन )
तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं
तो- या आकांताचा तुला इशारा कळला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं
तो- नको बाई नको रडू, खड्ड्यामध्ये नको पडू
ती- इथनं नको, तिथनं जाऊ, रस्ता गावतोय का ते पाहू
तो- का????
ती- पडत्यात...
तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं
ती- ब्रेक सारखा, गाडीस सजना नका हो कचकन् मारू
हाडं खिळखिळी झाली समदी, पाठ लागलीया धरू
तो- कशी सांग मी हाकलू गाडी, ट्र्याफीक कसला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ||
---
ती- बेजार झाले पाहून सजना, ट्र्याफीकची ही कोंडी
कुनी बोंबले पी पी, प्या प्या, शिव्या कुनाच्या तोंडी
तो- क्षणात राणी अंगावरती चिखल उडला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ||
तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं
~मिलिंद छत्रे
चाल : एक लाजरा न् साजरा मुखडा
(कॉपी-पेस्ट करून मित्रांना पाठवायचे असेल तर नावासकट पाठवावे ही विनंती)
मी ही सुन्दर विडम्बन कविता
मी ही सुन्दर विडम्बन कविता माझ्या बर्याच ओळखीच्या लोकाना पाठवली. त्यातील खूप जणाने ही कविता आवडल्याचे कळविले आहे. तुम्ही सान्गितल्याप्रमाणे तुमच्या नावासकट कॉपी पेस्ट करुन पाठ्वली. मला त्यातील पडत्यात हा शब्द खूप भावला. एकूण मस्त आहे विड्म्बन!
सहीच
सहीच
सुपर विडंबन अमोल केळकर
सुपर विडंबन
अमोल केळकर
परत एकदा
परत एकदा
मिल्या केवळं उच्च रे! जबरा
मिल्या
केवळं उच्च रे! जबरा जमलीये कट टू कट!
Pages