ग्रॅफाईट आणि रंगीत पेन्सिल्स- सफरचंद

Submitted by वर्षा on 13 June, 2011 - 16:08

रंगीत पेन्सिल्स वापरुन चित्र काढण्याआधी चित्रातील छाया-प्रकाशाचा अंदाज यावा म्हणून आधी ग्रॅफाईट पेन्सिलने सराव केला.
Apple B&W resize-1.jpg

गडद्/फिकट रंगकामाच्या जागा निश्चित झाल्यावर, सफरचंदाचा आकार बदलू नये या हेतूने सफरचंदाची फक्त आउटलाईन ट्रेसिंग पेपरसदृश्य कागद वापरुन ट्रेस केली. त्यानंतर रंगकाम केले.
तरी टिपिकल सफरचंदी रंग करता आला नाही. मूळ चित्रात सफरचंद जास्तच लालभडक (केशरीकडे झुकणारे) आहे. म्हणून मी गुलाबी+लाल अश्या दोन्ही पेन्सिल्स वापरल्या. तरी मला पाहिजे तो रंग जमला नाही. असो. Happy
Apple Color resize-1.jpgरंगीत पेन्सिल्स वापरुन काढलेली आधीची चित्रे: पक्षी व डिझाईन

गुलमोहर: 

Like

धन्यवाद सर्वांना.
@सँन्की, नक्कीच. मी खूप गॅपनंतर पुन्हा चित्र काढायला लागले आहे. सरावाला पर्याय नाही हे खरंच आहे.

छान!

Pages