Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होय अस्मानी....पण तुमच्या
होय अस्मानी....पण तुमच्या गणपतरावांच्या वखारीचे काय झाले ?
कोडे क्र.६३ : राजा
कोडे क्र.६३ : राजा त्यांच्यासाठी कोणते गाणे म्हणतील?
"पुछो ना कैसे मैने रैन बिताई,
एक पल जैसे एक युग बिता, युग बिते मोहे निंद ना आई..."
काय धावतोय हा धागा ! अंजली,
काय धावतोय हा धागा !
अंजली, भरत आणि उल्हास, प्रयत्न चांगला होता पण नेहमीप्रमाणेच स्वप्नाला पैकीच्या पैकी मार्क्स!
कोडं क्र. ५४-- गणपतरावांच्या वखारीला ऐन पावसाळ्यात आग लागली . त्यांच्या मनाची तडफड झाली. खूप शोधूनही त्यांना आगीचे कारण सापडेना. आपली उद्विग्नता ते कशी व्यक्त करतील ?
उत्तर : रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन,
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
प्रतीक, उत्तर टायपेपर्यंत
प्रतीक, उत्तर टायपेपर्यंत पुढचं पान सुरु देखील झालं. मग नव्या पानावर पुन्हा लिहिलंय .
राईट....ते मी पाहिले,
राईट....ते मी पाहिले, अस्मानी....आणि खरंच वार्याच्या वेगाने धावतोय हा धागा ! विचार करे करे पर्यंत नवे पान येतेच येते.
शायद सब पागल हो गये है, ऐसा लगता है |
मी आज इथे येउ शकलो नाही
मी आज इथे येउ शकलो नाही त्यामुळे माझ्या वाटणीची भजी आणी पेढे सर्वानी न भांडता वाटुन घ्यावेत .. हुकुमावरुन..
प्रतीक बरोब्बर! ६३ डी राजा
प्रतीक बरोब्बर!
६३ डी राजा यांनी पोलिस कोठडीत एक दिवस घालवल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी कोर्टात जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी नेण्यात येत होते. तिथे अर्थातच न्युज चॅनेल वाल्यांची गर्दी होती. आनि त्यांना राजा यांच्या कोठडीतील वास्तव्याबद्दलच कुतूहल होते.
तर राजा त्यांच्यासाठी कोणते गाणे म्हणतील?
पूछो न कैसे मैंने रैन बितायी
एक पल जैसे एक युग बीता
युग बीते मोहे नींद ना आयी
अहो राम.....ते कंदी पेढे,
अहो राम.....ते कंदी पेढे, कांदा भजी आणि गवती चहा दुपट्ट्यात बांधून घेऊन ती स्वप्ना घरी पळाली देखील....!! आता कुठली वाटणी आणि चाटणी !!
मी अधून मधून येऊन वाचून जातोय
मी अधून मधून येऊन वाचून जातोय बरं का ! (पावसाने सगळ्यांचीच डोकी सुपीक झालीयेत. काय्काय कल्पना उगवताहेत !!)
रसिया स्वप्ना आणि अनाडी भरत
रसिया स्वप्ना आणि अनाडी भरत ... ____/\_____
५७. व्यवसायाने डॉक्टर
५७. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या महिलेला आपल्या मुलीचं प्रेमप्रकरण अजिबात मंजूर नव्हतं. त्या मुलाला तंबी देऊन त्या स्त्री ने ते प्रकरण संपवलं. पण त्या मुलाने तिच्यावाचून काय जगायचं म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी वेळीच पाहील आणि त्याला दवाखान्यात आणलं.. तर अपरिहार्यरित्या तीच एक डॉक्टर शहरात ख्यातनाम होती..
तिला समोर पाहून मुलाच्या वडिलांनी कुठलं गाणं म्हटलं असेल ?
क्ल्यू : मुलाची होणारी सासू आत्ता त्याचे बंद होउ पाहणारे श्वास चालू ठेवू शकत होती पण त्यानंतर काय ? जगण्याचं कारणही तिच्याच हातात होतं कि
सांसो को सांसो मे ढलने दो
सांसो को सांसो मे ढलने दो जरा
धीमी सी धडकन को बढने दो जरा
लम्हो कि गुजारिश है ये
पास आ जाये हम तुम
(पडद्यावरची सिचुएशन वेगळी असली तरी मला हेच गाणं आठवलं एक्दम)
अधून मधून येऊन वाचून जातोय
अधून मधून येऊन वाचून जातोय बरं का ! >>>>दिनेशदा, नुसतं वाचून नका जाऊ
काही कोडीपण घाला. तुमची कोडी ओळखता आली नाही म्हणुन काय झाले, त्यानिमित्ताने आम्हाला जुन्या गाण्यांची नव्याने ओळख होतेय. 
सुप्रभात मंडळी. आज आत्ता ९ ते
सुप्रभात मंडळी. आज आत्ता ९ ते १० मुंबई एफेम गोल्डवर मधुबालाची गाणी आहेत.
मामी वेलकम बॅक. अनाडी मी नाही, माधव बरं का.
आता कोणकोणती कोडी उरलीत? डॉक्टर सासू हे एक.
कोडं क्रं ५७ : अंजली छान आहे
कोडं क्रं ५७ :
अंजली छान आहे गाणं...
माझ्या मनात वेगळं गाणं होतं..
सासों कि जरूरत है जैसे
जिंदगी के लिये
हा एक सनम चाहीये
आशिकी के लिये
>>मी आज इथे येउ शकलो नाही
>>मी आज इथे येउ शकलो नाही त्यामुळे माझ्या वाटणीची भजी आणी पेढे सर्वानी न भांडता वाटुन घ्यावेत
पेढे आणि भजी ही न भांडता वाटता येणं अशक्य आहे
६४. दोन शेजारी. दोघेही कदम.
६४.
दोन शेजारी. दोघेही कदम. त्यांच्या मुलामुलींचं आपापसात प्रेम जमतं. दोघेही एकमेकांच्या आयांना सासू मानायलाही लागतात. एकदा हे सगळे त्यांच्याच मजल्यावर राहणार्या 'दुनिया' नावाच्या लहान मुलीशी खेळत असतात. दुनिया नुकतीच पावलं टाकायला लागलेली असते. हे सगळे तिला चालायला शिकवत असतात. दोन्ही आया प्रयत्न करतात पण ती काही चालत नाही. मग दोन्ही वडिल प्रयत्न करतात पण ती काही चालत नाही. मग हे दोघे प्रेमी प्रयत्न करतात तर ती छोटी मुलगी चालायला लागते. मग हे प्रेमी कोणतं गाणं म्हणतील? (सोप्प केलय ना?)
दो कदम तुम भी चलो दो कदम हम
दो कदम तुम भी चलो
दो कदम हम भी चले
नोप, केके.
नोप, केके.
६५.ओर्थोपेडिशियन पेशन्टला
६५.ओर्थोपेडिशियन पेशन्टला सर्व्हायकल झालाय हे कळाल्यावर कुठले गाणे म्हणेल?
६५ अ.लाइट गेल्यावर बायकोला/प्रेयसीला शोधताना तो कुठले गाणे गाईल?
रेव्हु तुझ्या कोड्याला नं ५९
रेव्हु तुझ्या कोड्याला नं ५९ टाक ना.
मामी टाकले
मामी टाकले
नवीन गाणंच लिहीतो गर मिले दिल
नवीन गाणंच लिहीतो
गर मिले दिल से दिल
तो जमाना हिलने लगे
गर मिले कदम से कदम
तो दुनिया चलने लगे
किरण्य ये दुनिया येह मेह्फिल
किरण्य

ये दुनिया येह मेह्फिल मेरे कामकी नही
मामी, तुमच्या कोड्याचा
मामी, तुमच्या कोड्याचा क्रमांक ६४ हवा. रेव्ह्यु :६५
६६ : नारदमुनी पृथ्वीचा फेरफटका मारून इंद्रदेवाच्या दरबारी रुजू झाले, त्यांच्या `भूलोकी काय विशेष' या पृच्छेच्या उत्तरार्थ वदले, की `सांप्रत महाराष्ट्र देशी सकळ जन सारेगमप नामक गायन स्पर्धेत मग्न आहेत'. नारदांनी केलेले वर्णन ऐकून इंद्रदेवांनाही स्वर्गात अशीच स्पर्धा घ्यायची इच्छा झाली. स्पर्धकांची कमतरता नव्हतीच. पण परीक्षक आणि सूत्रसंचालक या जबाबदार्या स्वीकारण्यास कोणी आत्मा तयार होईना. शेवटी या दोन्ही पदी किशोरकुमार यांची नियुक्ती झाली. स्पर्धा सुरू झाली.
एकदा एका स्पर्धकाने छानसे प्रेमगीत म्हटल्यावर परीक्षकांना पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्टाइलमध्ये 'गाणं तू छान म्हटलंस, पण गाण्यात अजून थोSSSSडं प्रेम हवं होत' असं म्हणायचं होतं. मग सूत्रसंचालकाने पल्लवी जोशी स्टाइलमध्ये आधीच्या स्पर्धकाला निरोप आणि नवीन स्पर्धकाचे स्वागत करायचे होते.
किशोरकुमारनी ही दोन्ही कामे एकाच गाण्यात केली. कशी?
रेव्ह्यु.. ५८ चं उत्तर होतं
रेव्ह्यु.. ५८ चं उत्तर होतं ते. सिनेमा अजून रिलीज व्ह्यायचाय. गीतकार सध्या तुमच्याशी गप्पा मारताहेत
५८/६४ : बडे अरमानों से रखा है
५८/६४ : बडे अरमानों से रखा है सनम तेरी कसम
प्यार की दुनिया में ये पहला कदम
अरे बापरे ६४ का? बदलते हं.
अरे बापरे ६४ का? बदलते हं. धन्स भरत.
गीतकार सध्या तुमच्याशी गप्पा
गीतकार सध्या तुमच्याशी गप्पा मारताहेत .... केके
६४.
दोन शेजारी. दोघेही कदम. त्यांच्या मुलामुलींचं आपापसात प्रेम जमतं. दोघेही एकमेकांच्या आयांना सासू मानायलाही लागतात. एकदा हे सगळे त्यांच्याच मजल्यावर राहणार्या 'दुनिया' नावाच्या लहान मुलीशी खेळत असतात. दुनिया नुकतीच पावलं टाकायला लागलेली असते. हे सगळे तिला चालायला शिकवत असतात. दोन्ही आया प्रयत्न करतात पण ती काही चालत नाही. मग दोन्ही वडिल प्रयत्न करतात पण ती काही चालत नाही. मग हे दोघे प्रेमी प्रयत्न करतात तर ती छोटी मुलगी चालायला लागते. मग हे प्रेमी कोणतं गाणं म्हणतील?
उत्तरः सांसो से नही, कदमोंसे नही, मुहोबत से चलती है दुनिया
६५ अन ६५ अ चं उत्तर सापडलं का
६५ अन ६५ अ चं उत्तर सापडलं का मन्डळी?
की देवू?
Pages