एम.एफ.हुसैन यांना आदरांजली...

Submitted by dr.sunil_ahirrao on 10 June, 2011 - 09:27

कलाकार हा फक्त कलाकार असतो. तो जेव्हा स्वत्व हरवून एखादी कलाकृती निर्माण करतो,तेव्हा त्याच्यात आणि त्याच्या कलाकृतीत द्वैत उरत नाही. शक्य आहे त्यातून एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,पण याचा अर्थ असा होत नाही,की कलाकाराने जाणीवपूर्वक ते घडविले! खऱ्या कलाकाराकडून नेणिवेच्या पातळीवर महान कलाकृती घडतात.त्याचा संबंध धर्म,देव वगैरेंशी नसतो.तो फक्त स्वतःला मूर्त-अमूर्त जगाच्या सीमारेषेवर फरफटत नेत असतो. एम.एफ.हुसेन यांना विनम्र आदरांजली...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

डॉक्टरसाहेब, बीबी हुसैनला श्रद्धांजलीचा आहे ना? मग इथे विनाकारण धर्माचे प्रश्न का विचारताय, नविन बीबी काढा त्यासाठी.

hindu hota.....paigamber cha....karan...makket ajun hi shankara chi pind aahe ...... Happy

डॉक्टरसाहेब, आज जे स्वतःला हिन्दु समजतात - व ज्याना तसं संबोधलं जातं - त्यांच्या , अपवाद वगळतां, याबाबतच्या श्रद्धा वरील मुद्द्यांच्या उत्तरांवर अवलंबून नाहीत, असं मला वाटतं. [ तो चर्चेचा वेगळा विषय होऊं शकतो ]. हुसेन यानी केवळ आपण चित्रकार आहोत म्हणून अशा श्रद्धा दुखावणं योग्य कीं अयोग्य, एवढाच मर्यादित मुद्दा इथं औचित्यपूर्ण आहे, असं नाही वाटत ?

@नंदिनीजी , आपण सर्व प्रतिक्रिया वाचल्या तर आपल्या लक्षात येईल, इथे श्रद्धांजली ऐवजी धर्माचेच राजकारण सुरु आहे.चर्चांना पाय फुटले आहेत आणि आता ते आदिमानवाच्या उत्क्रांतीशी जाऊन पोचले आहेत.इथे काय कींवा माबोवर इतरत्रही असाच प्रतीसाद मिळणार असेल,तर इथेच ती चर्चा झालेली बरी.

डॉक्टरसाहेब, आपल्या वरील सर्व प्रश्नाची मायबोलीवर या आधीच चर्चा झालेली आहे. (जुन्या मायबोलीवरचा व्ही अँड सी हा विभाग नजरेखालून घाला.)

खऱ्या कलाकाराकडून नेणिवेच्या पातळीवर महान कलाकृती घडतात.त्याचा संबंध धर्म,देव वगैरेंशी नसतो.तो फक्त स्वतःला मूर्त-अमूर्त जगाच्या सीमारेषेवर फरफटत नेत असतो. एम.एफ.हुसेन यांना विनम्र आदरांजली...

आणी

इथे श्रद्धांजली ऐवजी धर्माचेच राजकारण सुरु आहे.चर्चांना पाय फुटले आहेत आणि आता ते आदिमानवाच्या उत्क्रांतीशी जाऊन पोचले आहेत.

आपल्याच प्रतिसादातील दोन वाक्ये. पहिले वाक्य तर कोणी काही बोलायच्या आधीच आपण लिहिलेले आहे. कदाचित आपल्या या बीबीचा उद्देशच "वादावादी सुरू करणे" असा दिसतोय. अन्यथा, दु:खद घटना या बीबीवर श्रद्धांजली वाहता येत असूनदेखील हा वेगळा बीबी काढण्याचे प्रयोजन काय?

मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणे हा प्रकार ऐकला होता. इथे मात्र मेलेल्या माणसाला श्रद्धांजली वाहण्याच्या नावाखाली सेन्सेशनल बीबी उघडणे हा प्रकार पाहिला.

ता.क्.मला हुस्सैनशी काहीही देणेघेणे नाही, त्यानी काही वादग्रस्त चित्र काढली असतील, काही छान चित्र काढली असतील. जगाच्या दृष्टीने तो महान चित्रकार असेल. मला चित्रकलेतले काहीही समजत नाही त्यामुळे मी त्याची वावा करणार नाही. तरीही मृत व्यक्तीला शिव्या घालणे माझ्या धर्मात बसत नाही. म्हणून मी त्याला शिव्याही देणार नाही.

@नंदिनीजी, होय दुसरे वाक्य माझेच आहे. आणि संबन्धित प्रश्नांची उत्तरे तेथूनच सुरु होतात. मला आश्चर्य वाटते, माबोवर एकही व्यक्ती अशी सापडू नये,की एम एफ .च्या मृत्युनंतर त्यांच्या कलेबद्दलतरी आदर आहे.मेलेल्या माणसाच्या नावाखाली उघडलेला सेन्सेशनल बीबी! धन्यवाद,म्हणजे आपण सारा दोष माझ्याच माथी मारू इच्छिता! मृत व्यक्तीला शिव्या घालण्याचा प्रकार इथे अनेक पोस्ट्समध्ये घडला आहे. आपण त्यावेळी कोणतीही कॉमेंट का केली नाही? मी स्वतः हिंदुधर्मीय असलो तरी फक्त मानवता आणि भारतीय संविधान यांना धर्म मानतो.या प्रश्नांवर चर्चा झाली असेल,नसेल मला माहित नाही.माझे प्रश्न टाकले गेले आहेत.ज्यांना उत्तरे द्यायची असतील त्यांचे स्वागत.उत्तरे नसतील द्यायची तर ही चर्चा इथेच थांबली आहे असे समजावे.आपण दिलेल्या सर्व बऱ्यावाईट प्रतिसादांबद्दल मी आपला आभारी आहे.

गेले ते आता, आपल्याकडे गेल्यावर त्याला चांगलं म्हणण्याची पध्दत आहे!

माबोवर एकही व्यक्ती अशी सापडू नये,की एम एफ .च्या मृत्युनंतर त्यांच्या कलेबद्दलतरी आदर आहे>>> ज्या व्यक्तीना हुसैन्बद्दल आदर होता त्यानी योग्य त्या ठिकाणी त्यानी श्रद्धांजली वाहिलेलीच आहे. परत इथे येऊन त्यानी लिहावं अशी आपली अपेक्षा का? किंबहुना, तिथे लागत असलेले वादग्रस्त वळण पाहता हा बीबी उघडायची काही गरज होती का?

बरं, स्वतःला आदरांजली वहायचीच आहे, तर किमान हुस्सैनच्या कारकीर्दीबद्दल, त्याच्या चित्राबद्दल, त्याच्या शैलीबद्दल स्वतः काही लिहावे!! ते नाही, चार ओळी कश्यातरी खरडल्या, त्यातली एक देव्-धर्माची लिहिली आणी लगेच मोकळे झाले!!!

श्रद्धांजलीचा वेगळा स्वतंत्र धागा काढायला मायबोलीने पाच हजार रुपये मागीतले असते तर एम एफ हुसेन मेला काय आणि जिवंत राहिला काय, कुणालाही फरक पडला नसता.

-'बेफिकीर'!>>>

हा माझाच प्रतिसाद (बहुधा प्रतिसाद क्रमांक ५ असावा) कोट करण्याचे कारण म्हणजे:

१. एक चित्रकार मरतो.

२. त्याने आयुष्यात कुणाच्या तरी भावना कलेच्या माध्यमातून दुखावलेल्या असतात.

३. तो महान चित्रकार आहे असे काहींचे ठाम मत असते.

४. एक संकेतस्थळ असते जेथे श्रद्धांजलीचा एक छानपैकी धागा असतो ज्यावर परलोकवासी झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करता येते. तसेच त्या संकेतस्थळावर फुकट लॉगीन करणे व योग्य भाषेत वाट्टेल ते धागे काढणे हेही फुकट शक्य असते.

५. त्या धाग्यावरच भावना दुखावलेले व चित्रकला कळणारे तो चित्रकार मेल्यामेल्या भांडू लागतात.

६. हे माहीत झाल्यावर किंवा हे माहीत असल्यामुळेच एक जण एक स्वतंत्र धागा काढून त्या चित्रकाराला श्रद्धांजली अर्पण करतो.

७. मग ती भांडणे तेथे शिफ्ट होतात.

८. मग कलाकाराला कलाकार म्हणून पाहा आणि का म्हणून असे पाहायचे यावर, तसेच, दोन चार वर्षांपुर्वी आपले येथे कुणाशी वाजलेले होते याची व्यवस्थित आठवण असल्यामुळे त्याच्यावर फुकटचे तोंडसुख घेता येईल म्हणून काही जण पराकोटीला पोचतात.

९. मग पार हिंदू म्हणजे काय आणि पैगंबर कोण होता आणि आदिमानव आधी-मानव की देव आधीचा वगैरेवर वाट्टेल त्या चर्चा होतात.

हे सगळे का?? तर मानसिक कंड आणि ती भागवण्यासाठी एक धागा उपलब्ध आहे.

सरस्वतीची उत्पत्ती, राम कोण होता, गांधीजींचा 'हे राम' कोण होता, हिंदु हा शब्द कधी आला, इंद्र अप्सरा का नाचवतो? ...... अगागागागा काय हे प्रश्न !!! Proud आणि या सगळ्याचा एम एफ हुसेन याच्याशी काय संबंध?

डॉक्टरसाहेब, मधुकर कडून दिक्षा घेऊन आलात की काय? Proud

हे सगळे प्रश्न खरे असो वा अनुत्तरीत असोत , हिंदु देवतांचा अपमान करायचा कुणालाही अधिकार मिळत नाही...

itar mahiti mazya itar comments madhye aaleli aahe. moolat hya char oleenche evhadhe bhandwal kele jail hyachi mala kalpana navhati. hyach char olee mi facebook,e sakal ,maharashtra times ityadi thikani takalya aahet. tithe agadi shant sanyat pratikriya aalya. ithe matr gondhalach gondhal hota.

itar mahiti mazya itar comments madhye aaleli aahe. moolat hya char oleenche evhadhe bhandwal kele jail hyachi mala kalpana navhati. hyach char olee mi facebook,e sakal ,maharashtra times ityadi thikani takalya aahet. tithe agadi shant sanyat pratikriya aalya. ithe matr gondhalach gondhal hota.
>>> याच चार ओळी जर आपण दु:खद घटनाच्या बीबीवर लिहिल्या असत्या तर!! त्यासाठी वेगळा धागा काढायचे प्रयोजन काय? हुस्सैनच्या चित्रशैलीबद्दल जर लेख अस्ता तर सर्वानीच वाचला असता. त्यापद्धतीने मते व्यक्त झाली असती. मात्र देव्-धर्म याचे मुद्दे घेऊन तुम्ही बीबी काढता आणि वर सर्व दोष माझ्याच माथी का असं विचारता होय?? तुम्ही इतर माहिती कमेंटमधे देऊन उपयोग काय? लोकानी लेख वाचावा की तुमच्या कमेंट्स??

moolat hya char oleenche evhadhe bhandwal kele jail hyachi mala kalpana navhati.>>> कशाचे भांडवल करावे अशी अपेक्षा होती???

ithe matr gondhalach gondhal hota.>>> तरी काही "जहाल" आयडीनी अजून प्रतिक्रिया दिल्या नाहीत. ,मग समजेल गोंधळ काय अस्तो ते Light 1 दिवा घ्या!!!

फालतू माणसांना श्रद्धांजली देणे बंद करा.
आता संतश्री महात्मा कुराणेश्वर् स्वामी ओसामा बिन लादेन यांना पण श्रद्धांजली वाहणारा धागा सुरू करा.
>>>
हे तुम्ही कोण आम्हाला हुकूम सोडणारे.? तुम्हाला श्रद्धांजली देणे बन्द करायचे असेल तर करा. आम्हाला कशाला हुकूम सोडताय. ओसामाला श्रद्धांजली वाहनारा धागा सुरू करण्याचा हुकूम तुम्ही आम्हाला कशाला देताय? तुम्हाला फार ** असेल तर तुम्ही करा की चालू...

तुम्हाला जशी नागपूरहून हुकूम घ्यायची सवय आहे तशी आम्हाला कोणाकडूनच घ्यायची सवय नाही. आम्ही आमचे पाहू . उगीच इथे 'प्रचार' करू नका.

तुम्हाला जशी नागपूरहून हुकूम घ्यायची सवय आहे तशी आम्हाला कोणाकडूनच घ्यायची सवय नाही. आम्ही आमचे पाहू . उगीच इथे 'प्रचार' करू नका.>>>
Lol

चला आता खरी धाग्याला सुरूवात झाली. हे बरं आहे एखादा माणूस काही उद्वेगाने इतर ठिकाणी तुमच्या विचारांच्या विरुद्ध लिहितो की दरवेळी "प्रचार" करू नका म्हणायचे, जणू काही त्यासाठीच त्या माणसाची नेमणूक झाली आहे. आणि असा आव आणला की आपण सर्वज्ञात आणि सर्वसमावेशक वगैरे ..

हा आरोप करण्याआधी नागपुरातून तसा आदेश आला आहे का दाखवा अन्यथा हे वाक्य मागे घ्या.

खरतर तुमचे वरचे दोन्ही पोस्ट विषयाला धरून अजिबात नाहीत (ते खूप मोठे असणारे) चित्र समजत नाहीत तरी मी कसा होलियर दॅन दाऊ हा अप्रोच तुमच्या पोस्टीतून दिसतो. (पोस्ट मला आवडली, पण ह्या बाफवर गरज नाही, कलाकार लहरी असतो हे मान्य पण तरीही मी हुसेन ह्यांच्या निषेध करतो

तुम्हाला चित्र आवडली किंवा नाही, माणूस आवडला, श्रद्धांजली दिली विषय संपला! पण नाही!

मला हुसेन ह्यांची इतर चित्रे आवडतात, विविध प्रदर्शनात मी ती पाहीली आहेत. पण त्या माणसाने हिंदू धर्माच्या देवदेवतांबद्दल व स्वतःच्या देशाबद्दल जे हिडीस चित्रे काढली ते पाहून त्यांच्याबद्दलचा आदर कमी झाला. आता मेले किंवा जिवंत राहिले काय फरक पडतो?

पैगंबरांची चित्रे जरी अशी काढली असती तरी मला असाच राग आला असता. गरज नसताना एखाद्या समाजाच्या भावना दुखावणार्‍या बाबी मुळात करायच्याच कशाला? आणि वर परत दुटप्पीपणा पण करायचा.

इथे तर च्यायला देव कोण हे पण चालू आहे? काय फरक पडतो. मी नाही मानत देव, आणि माझ्या सारखे १ लाख जण नाही माणत, पण उरलेले १०० करोड आहेत, ते काय मूर्ख आणि तुम्ही काय अतिशहाणे का? तुम्हाला जसे देव नाही हे म्हणण्याचे स्वातंत्र्य आहे तसे त्यांना हिंदू देव आहेत असे म्हणण्याचे नाही का?

समाजद्रोही कारवाया करायच्या अन वर शहाणपणा मिरवायचा की ही कला आहे. कमाल आहे! उद्या मी तुमच्या मुली / बायकोचे नग्न चित्र काढून ते तुम्हाला दाखवले, तर तुम्ही माझा कलाकार म्हणून आदर सत्कार करणार आहात का? मग ह्या उरलेल्या ८० करोड लोकांना असाच राग येऊ शकतो की नाही? की आपलंच तुणतुण वाजवायचे आणि त्याला "प्रचार" म्हणायचे. दांभिक लोक आहेत मायबोलीवर!

आता बाळू जोशींसारखे खरे दांभिक लोक ह्यालाही प्रचार म्हणू शकतात पण म्हणाले तरी काही फरक पडत नाही. कारण संघाला शिव्या दिल्या की आपली वैचारिक बैठक आहे हे सिद्ध होते. आजकाल फॅशन आहे. दुसर्‍यांच्या जीवावर (तुम्ही प्रचारक आहात असे म्हणून) आपल्या विचरांचा असा प्रचार करायचा हे मला मान्य नाही.

जाता जाता

मंदार जोशी कोणी कोणाला श्रद्धांजली द्यावी हा ज्याचा त्याच्या प्रश्न आणि स्वातंत्र्य आहे, तुम्ही हुकूमशहासारखे ते सांगू शकत नाहीत उलट तुम्ही खरेच संघाचे असाल तर संघाची बदनामी होत आहे हे ध्यानात घ्या. तुम्ही फार तर त्याला श्रद्धांजली का देऊ नये हे एक वेळ नीट मांडू शकता आणि दॅट्स ऑल!

बाळू जोशीसाहेब हे पर्सनल पोस्ट झाले आहे, पण त्याची गरज आहे. तुम्ही खरच विचार केला तर मी हे पोस्ट का लिहिले ते कळेल. माझा ते कोण मंदार जोशी आहेत किंवा त्यांची काय विचारसरणी आहे ह्याचा काही संबंध नाही, शिवाय मी आणि तो एक आयडी नाही आहोत. तसेच मी संघ, भाजपा, काँग्रेस, जनता दल इ इ शी संबंधीत नाही! हिंदू असणे पण लांब मी आधी माणूस आहे. तरीपण मला हुसेन ह्यांच्या चित्रांचा राग येतो. कारण मी समाजात राहतो. आणि ज्या समाजात राहतो त्याची बांधिलकी ठेवावी असे मला वाटते. मला हे पोस्ट लिहायला १० जनपथ किंवा नागपूर ह्या दोन्हीं कडून आदेश झालेला नाही. स्वतःच्या स्वंतत्र्यवृत्तीने मी हे पोस्ट लिहिले आहे.

@nandini, mi jari did varshapasun mb cha sabhasad asalo, tari mi magil 15-20 diwasanpasunch yethe lihit aahe. tyamule mala yethe shraddhanjalicha vegala dhaga vagaire mahit nahi. mala mazya sudhh hetunvishayi jast spastikarnachi garaj watat nahi. godhal ghalnaryanche avhaan mi swikarato. tyanni mazya prashanchi uttare dyavit. aani tee muddesud asavit. hya charchet tyanchi sarashi zali tar mi mabo nehmisathi sodun jaain. aani tyanche pital ughade padlyas mi tyanna mabo sodayala vagaire sangnar nahi. matr acharatpana karayacha nahi. yasathi mazi at ekach tee mhanje tathakathit dharmandhanni charchedarmyan mazyavar hinduvirodhi kinwa tatsam aarop karu nayet. jyanna dharm mhanje kay hech mahit nasel tar mag te tawalakya karnyapalikade kay karu shaktil?

डॉक्टरसाहेब,

मी माझ्या अल्पमतीनुसार काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मी यातला तज्ज्ञ नाही. केदार जोशी नावाच्या मायबोलीकरांचा यावर बराच अभ्यास आहे. खरं तर या प्रश्नांचा व या धाग्याचा तसा काही संबंध नाही. तरीसुध्दा मी उत्तरे द्यायचा प्रयत्न केलेला आहे.

१)सरस्वती या देवतेचा काळ कोणता?

ही वेदकालीन देवता आहे. वेदांचा काळ इ.स.पूर्व ८ ते १० हजार वर्षे मानण्यात येतो.

२)सरस्वतीच्या वेळेला हिंदू धर्म अस्तित्वात होता का?

होय.

३)हिंदू धर्माचा काळ कोणता? हिंदू हा मुळात धर्म होता की संस्कृती?

नक्की सांगता येणार नाही. पण वेदकालापासून हिंदू धर्म अस्तित्वात आहे. हिंदू हा धर्म व संस्कृती दोन्ही आहे.

४)हिंदू हा शब्द रामायण ,महाभारत आदी काव्यांत आहे का?

माहिती नाही.

५)परमेश्वर आणि ३३ कोटी देवता यांच्यात नेमका काय फरक आहे?

देवता ह्या एकाच परमेश्वराची वेगवेगळी रूपे आहेत. जशी ऊर्जा ही ध्वनी, प्रकाश, बल इ. अनेक प्रकारात व्यक्त होते, त्याचप्रमाणे परमेश्वर अनेक स्वरूपात असतो.

६)वेद कुणी लिहिले,की ते अपौरुषेय आहेत?

पुराणकालीन ऋषींनी उच्च ध्यानमग्न अवस्थेत वेद लिहिले.

७)मानवाची निर्मिती देवाने केली की निसर्गाने?

देव ही एक अनंत शक्ती आहे किंवा देव म्हणजे अखंड उर्जास्त्रोत असेही म्हणता येईल. मानव हा निसर्गाचाच भाग आहे. देव नावाच्या शक्तीतूनच निसर्ग निर्माण झाला.

८)एकंदरीत वेदिक संस्कृतीला किती वर्षांचा इतिहास आहे?

८-९ हजार वर्षांहून अधिक असावा.

९)आधी आदिमानव निर्माण झाला की देवता?

माहित नाही.

१०)आदिमानवाचा धर्म कोणता होता?आदिमानव कधीपासून अस्तित्वात होता?

माहित नाही.

११)धर्म म्हणजे काय?

धर्माची अशी ठराविक व्याख्या नाही. एक विशिष्ट जीवनपध्दती, एक विशिष्ट उपासनापध्दती म्हणजे धर्म असे ढोबळमानाने म्हणता येईल.

१२)हिंदू शब्द कशावरून आलेला आहे?पूर्वी तो कोणत्या अर्थाने वापरला जात होता?

सिंधू नदीवरून हे नाव मिळाले असावे.

१३)हिंदू शब्द धर्म या अर्थाने पहिल्यांदा कधी वापरण्यात आला?

सावरकरांच्या कोणत्या तरी पुस्तकात याबद्दल माहिती आहे. मला आता आठवत नाही.

१४)रामायण महाभारत या कथा आहेत की इतिहास?

खर्‍या इतिहासावर आधारित लिहिलेल्या त्या कथा आहेत.

१५)रामायणातील 'राम' माझा नाही,असे म.गांधी यांनी का म्हटले असावे?

त्यांनी असे कोठे म्हटले आहे? मी तरी हे कधी वाचले नाही. म्हटले असल्यास असे का म्हटले हे त्यांनाच ठाऊक.

१६)देवाची निर्मिती कोणी केली?

माहिती नाही.

१७)आपले देव (मी सुध्दा हिंदूच आहे) इंद्र वगैरे यांना स्वर्गाचे राज्यपद मिळूनही आपल्या इंद्रियांवर ताबा का ठेवता आला नाही?

माहित नाही.

१८)रामायणातील राम एकपत्नी होता का?

होय.

१९)रामाने शम्बुकाची हत्या का केली?

माहिती नाही. काही संशोधकांच्या मते अशी घटना झालेलीच नव्हती व हा भाग प्रक्षिप्त आहे.

२०)रामाने इतर किरकोळ लोकांच्या सांगण्यावरून सीतेला छळले हे खरे आहे का?

माहिती नाही. काही संशोधकांच्या मते अशी घटना झालेलीच नव्हती व हा भाग प्रक्षिप्त आहे.

२१)राम हा राजा असूनही तत्कालीन समाजव्यवस्थेचा बळी होता का?

तत्कालीन समाजव्यवस्थेचा बळी म्हणजे काय?

aankhi jya kunala aapali mate vyavsthit mandavayachi asateel tyanni tee jarur mandavit karan barech prash anuttarit aahet.j@masture pranjalpane mate mandlyabaddal dhanyavad. mi sarvanchya comments sampalyavar maze mat vyakt karen.

(फक्त) हिंदु धर्म, देवतां विषयी बाळबोध प्रश्न विचारुन स्वतःचे विचार ईतरंच्या माथी मारण्याचा अट्टाहास केवळ हास्यास्पद. असो लेखकानी विचारलेल्या सर्व (फक्त) हिंदु धर्माविषयीच्या प्रश्नांची उत्तर अशी मायाजालावर चर्चा करुन नाही समजणार. त्यासाठी संस्क्रूत भाषेतील वेदांतुन बरेच लिखाण झालेय. तेच का ज्ञानेश्वरांनी लीहिलेल्या ज्ञानेश्वरीतुनही त्यांची उत्तर मिळतील. (जर ते कळण्यासाठीची प्रगल्भता असल्यास). त्याचा अभ्यास लेखकाने करावा.

असो, लेखकाने एवढच सर्वांची मते मनाला लावुन घेण्यापेक्षा आणि ईतरांकडुन (फक्त) हिंदु ध्रर्मा विषयी काही स्पष्टीकरणे मागण्यापेक्षा स्वतः जे बीबी मधे सुरुवात केलेल लिखाण आहे त्याबद्द्ल स्पष्टीकरण द्याव. हुसेनच्या वादग्रस्त नसलेल्या आणि वादग्रस्त असलेल्या चित्रांचे फोटो आणि त्या चित्राचा अर्थ (जर कळला असेल तर आणि दुसरीकडुन न चोरता) ईथे लिहावा व स्वतःचे विचार पटवण्याच प्रयत्न करावा. माबोवरचा प्रेक्षकवर्ग हा सुजाण आहे आणि प्रत्येकाची स्वतंत्र मते आहेत. उगीच स्वतःच्या विचारांना ईतरांनीही सहमती दर्शवली पाहीजे असा विचार करु नये. तसा हुसेनच्या कलेचा फक्त त्यालाच आर्थिक लाभ झालाय समाजाला त्याच्या कलेने काहीही दिलेल नाहीय. तो वादांमुळेच चर्चेत आलाय नाहीतर तो मेल्याची फक्त एक दिवसच बातमी झाली असती.

no comment.

no comment.
---- no comment पण कॉमेंटच नाही कां?

शक्य आहे त्यातून एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,पण याचा अर्थ असा होत नाही,की कलाकाराने जाणीवपूर्वक ते घडविले!
---- कुठलाही हाडाचा कलाकार असे करणार नाही... आता पैगंबर्वासी हुसेन यांनी जाणतेपणी हा खोडसाळ अनेकवेळा केलेला आहे त्यामुळे ते कलाकार असुच शकत नाही.

तरी काही "जहाल" आयडीनी अजून प्रतिक्रिया दिल्या नाहीत. >>>

अजुन संयम ठेवुन आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?

Pages