एम.एफ.हुसैन यांना आदरांजली...

Submitted by dr.sunil_ahirrao on 10 June, 2011 - 09:27

कलाकार हा फक्त कलाकार असतो. तो जेव्हा स्वत्व हरवून एखादी कलाकृती निर्माण करतो,तेव्हा त्याच्यात आणि त्याच्या कलाकृतीत द्वैत उरत नाही. शक्य आहे त्यातून एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,पण याचा अर्थ असा होत नाही,की कलाकाराने जाणीवपूर्वक ते घडविले! खऱ्या कलाकाराकडून नेणिवेच्या पातळीवर महान कलाकृती घडतात.त्याचा संबंध धर्म,देव वगैरेंशी नसतो.तो फक्त स्वतःला मूर्त-अमूर्त जगाच्या सीमारेषेवर फरफटत नेत असतो. एम.एफ.हुसेन यांना विनम्र आदरांजली...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

मास्तुरे यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे प्रातिनिधिक स्वरुपात देण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यामुळे 'कुणी ठरवलय'? ह्या प्रश्नाला अर्थ नाही.मी फक्त यासाठी थांबलो आहे,की आणखी कुणाला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असल्यास त्यांना वेळ मिळावा!
'शब्दच्छल' हा येथील बहुतांश लोकांचा आत्मा आहे,असे दिसून येते.त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कॉमेंट्सची अपेक्षा करणे चूक आहे. यथावकाश मीच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे (आपणाकडून ती मिळाली नाहीत तर ) मीच देईन आणि एम.एफ. बद्दल मला जे काही ज्ञात आहे,ते लिहून मी आपला निरोप घेईन.त्यामुळे माझे आणि तुमचेही काहीच बिघडणार नाही,हे मला माहित आहे.
सहज ओघात काही आणखी प्रश्न पडतात-
सुरेश भटांनी असे का म्हटले असेल,
"तुमची तुम्ही करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे,
तुमच्यात मी येऊ कसा,बदनाम झंझावात मी!
किंवा
जमणारच नव्हते माझे,या माझ्या चोरपिढीशी
मी येणाऱ्या काळाची अनमोल अमानत होतो!
असे का म्हटले असेल?

किंवा आंबेडकरांनी स्वतः हिंदू असूनही बौध्द धर्म का स्वीकारला असेल?
आज भारत निधर्मी राष्ट्र असताना इथे इतकी धर्मांधता,जातीयता,वर्णभेद उघडपणे पाळले जातात.एखाद्या व्यक्तीचे केवळ 'भारतीय' असणे पुरेसे वाटत नाही.धर्म विचारला जातो. आंबेडकरांच्या वेळी किती भीषण परिस्थिती असेल,याची कल्पना येते.

आता हुसैन, हिंदू धर्म, २१ अपेक्षित प्रश्नसंच इत्यादि संपलं म्हणून बौद्ध धर्म.. धन्य!!!!

यथावकाश मीच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे (आपणाकडून ती मिळाली नाहीत तर ) मीच देईन आणि एम.एफ. बद्दल मला जे काही ज्ञात आहे,ते लिहून मी आपला निरोप घेईन.<<< लिहा ना मग उत्तरे. बघू या तुमचा किती अभ्यास आहे (कुठल्याही) धर्माबद्दल ते. हुस्सैनबद्दल पण लिहा. आम्ही तेही वाचू. चांगले वाटल्यास त्यावर प्रतिक्रिया देऊ, अजून काही माहिती हवी असल्यास विचारू.

मास्तुरे यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे प्रातिनिधिक स्वरुपात देण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यामुळे 'कुणी ठरवलय'? ह्या प्रश्नाला अर्थ नाही.मी फक्त यासाठी थांबलो आहे,की आणखी कुणाला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असल्यास त्यांना वेळ मिळावा!
>> मास्तुरे हा आयडी अख्क्ख्या मायबोलीचे प्रतिनिधीत्व करतो असे म्हणणेच ग्रेट आहे. मास्तुरे हा आयडी स्वतःची मते लिहितो. त्याचा आणि इतर मायबोलीकराचा काय संबंध? तुमच्या बहुतेक प्रश्नाची चर्चा इथेच मायबोलीवर झाली असल्याने तुम्हीच थोडा वेळ काढा आणी ती चर्चा वाचाल तर बरे होइल.

बरं मला एका प्रश्नाचे उत्तर द्याल का?? हुस्सैनच्या आदरांजली बीबीवर तुम्ही विनाकारण "मी आणि इतर मायबोलीकर" असा एकहाती सामना का रंगवताय????

>>> सुरेश भटांनी असे का म्हटले असेल,

ते फक्त सुरेश भटच सांगू शकतील.

>>> किंवा आंबेडकरांनी स्वतः हिंदू असूनही बौध्द धर्म का स्वीकारला असेल?

हिंदू धर्म सोडताना आंबेडकरांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म का स्वीकारला नसेल?

>>> आज भारत निधर्मी राष्ट्र असताना

भारत निधर्मी राष्ट्र आहे हा भ्रम आहे.

>>> इथे इतकी धर्मांधता,जातीयता,वर्णभेद उघडपणे पाळले जातात.एखाद्या व्यक्तीचे केवळ 'भारतीय' असणे पुरेसे वाटत नाही.धर्म विचारला जातो. आंबेडकरांच्या वेळी किती भीषण परिस्थिती असेल,याची कल्पना येते.

हुसेनच्या श्रध्दांजलीच्या मूळच्या ट्रॅकवरून तुमची गाडी "धर्मांधता, जातीयता, वर्णभेद, आंबेडकरांचे धर्मांतर, हिंदू धर्म, पुराणे, गांधीजी, रामायण, इंद्र " अशा अनेक वेगवेगळ्या ट्रॅकवरून गोलगोल फिरत आहे.

डॉक्टर..

फलंदाज एकदा मैदानात उतरला कि तो निष्णात आहे असंच समजून त्याला बाऊन्सर्स वगैरेंचा मारा केला जातो. तेव्हां फलंदाज तक्रार करायला लागला कि जोरात टाकू नका, फसवे चेंडू टाकू नका मला खेळता येत नाहीत ...तर चालेल का?

धागा सुरू केल्यावर प्रतिक्रिया येणारच. आपल्याला अपेक्षित त्याच प्रतिक्रिया याव्यात हा आग्रह कशासाठी ? तुम्हाला चर्चांचा पूर्वानुभव नसावा असं दिसतय. त्यात मुद्दे मांडताना केवळ ईसकाळ वरच्या प्रतिक्रियांनी अस्वस्थ केलं म्हणून इकडं चर्चा सुरू केली. बरं तसा संदर्भही दिला नाही. या धाग्यावर प्रतिक्रिया काय येतील याचा अंदाज न घेता काय याव्यात याचीच अपेक्षा ठेवलीत. तुम्हाला काय मांडायच आहे याचा अंदाज येऊ शकतो. पण तसं एकतर थेटपणे लिहा किंवा आधी इतरांनी सुचवल्याप्रमाणे ती चित्र आक्षेपार्ह कशी नाहीत याच माहीत देऊन शांत रहा.

हा मित्रत्वाचा (कटू नसलेला) सल्ला आहे. विरोधी पक्ष समजू नये ही नम्र विनंती.

धर्मांधता, जातीयता, वर्णभेद, आंबेडकरांचे धर्मांतर, हिंदू धर्म, पुराणे, गांधीजी, रामायण, इंद्र

समलैंगिकता लिहायचं राहिलं बघा.. तेही इथं डिस्कस झालय Proud हा बीबी हुसेन्च्या चित्रापेक्षाही जास्ती दुर्बोध झालाय

धर्मनिरपेक्षता म्हणजे फालतुपणा आहे, नुसते म्हणायला काय जाते मी धर्मनिरपेक्ष आहे. खर तर हे पळपुटे असतात. यांना अन्यायाविरुध्द आवाज नाही उठवता येत आणी मग आपला पळपुटे पणा लपवण्यासाठी आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत अशी बोंब मारतात. जे चुक आहे ते चुक आहे हे मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे.
भारत माता, आपल्या आईचे चित्र घाणरडे काढणे यांना काहीच वाटत नाही वरुन धर्मनिरपेक्षतेचा आव आणत चित्र काढले तर काय झाले? माणुस चांगला होता असे म्हणतात. षंढ प्रवॄत्ती वारंवार असले फालतु विषय चघळत बसतात यांना ठेचले तरी लागले नाही म्हणुन हसतात? यांनी धर्मनिरपेक्षेच्या बुरखा पांघरला आहे आणी तो बुरखा फक्त एकाच धर्मांविरुध्द तोंडावरुन काढतात,

हिंदू धर्म सोडताना आंबेडकरांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म का स्वीकारला नसेल?>> मुस्लिम धर्म स्विकारल्यास प्रत्येक गावात, प्रत्येक शहारात, खेडोपाडी जिकडे तिकडे मशिदी दिसल्या असत्या......... मग या देशाला बडा-पाकिस्तान असे नाव पडले असते. बहुतेक आंबेडकराना पाकिस्तान हे नाव आवडत नसावे म्हणुन.
ख्रिश्चन धर्म स्विकारण्याची गरज नव्हती कारण तेंव्हा ब्रिटिश व आत्ता रोमणबाई....... हि विदेशी धेंडं आंबेडकराना आवडत नसावीत.

>>>> किंवा आंबेडकरांनी स्वतः हिंदू असूनही बौध्द धर्म का स्वीकारला असेल?>>>>>

त्यांना मुस्लिम व्हायच नव्हते म्हणून... किंवा ख्रिश्चनही व्ह्यायचे नव्हते म्हणून!

Happy

हुसैन च्या विरोधत १००% अनुमोदन..
@ चाणक्य -- वीर सावरकरांचा किस्सा खरा आहे की नाही याचा संदर्भ अजूनतरी कुठे मिळाला नाही त्यामूळे तो जोडलेला संदर्भ मागे घेत आहे.. आणि त्याबद्दल क्षमस्व..
पण संत एकनातथां ची ती गोष्ट मात्र खरी आहे.. (आता कदाचित वेगवेगळ्या लिंक्स वर वेगवेगळी माहीती उपलब्ध असल्याने कूठली खरी आणि कूठली खोटी हे ज्याचे त्याने ठरवलेले उत्तम..) संदर्भांकरीता खालील लिंक्स पाहाव्यात..

https://picasaweb.google.com/103818450858963008233/ShreeSantEkanathMahar...

http://www.indiadivine.org/audarya/hinduism-forum/238776-life-saint-ekna...

पण संत एकनातथां ची ती गोष्ट मात्र खरी आहे.. (आता कदाचित वेगवेगळ्या लिंक्स वर वेगवेगळी माहीती उपलब्ध असल्याने कूठली खरी आणि कूठली खोटी हे ज्याचे त्याने ठरवलेले उत्तम..) >>>>

मग आपण कोणीच त्याबद्दल बोलु नये हे उत्तम. एकनाथांनच माहिती खरे खोटे. त्यामुळे कोणतीच गोष्ट पसर्वु नये.

Lol Lol

मी काय श्रद्धान्जली वगैरे वहाणार नाही! तेवढ्या लायकीचा तो नव्हता
अन "चित्रकार्/कलाकार" तर त्याहूनही नव्हता! आमच्याच येड्या पब्लिकनी (बजाज ऑटो म्यानेजमेण्ट सहित) त्याला डोक्यावर घेऊन नाचिवला होता! पण असो.

काय झालेय जामोप्या अचानक?
---- जामोप्या हे ज्वालाग्रही पदार्थांच्या नेहेमीच शोधात असतांत... रॉकेल दिसले की काडी टाकतात... योग्य वार्‍याची दिशा मिळाली आणि बाफ वर आल्यावर पुढच्या बाफच्या शोधात असतांत किंवा नवीन काढतात. कल्पनांची त्यांच्याकडे वानवा नाहीच आहे. Happy

माबो च्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकप्रियतेचा आणखी एक पुरावा म्हणजे साक्षात मा दिग्विजय सिंग यांनी जामोप्या हा आयडी घेऊन माबो प्रवेश केला आहे Happy ( दिवे घ्या , एवितेवी दिवाळीही आहेच)

>>> माबो च्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकप्रियतेचा आणखी एक पुरावा म्हणजे साक्षात मा दिग्विजय सिंग यांनी जामोप्या हा आयडी घेऊन माबो प्रवेश केला आहे

Rofl

विजय Rofl

हिज मास्टर्स व्हॉइस चा आदेश असल्यासारखे भुंकणे हा समानधर्म म्हटल्यावर ते होणारच होते.

माझ्या मते जामोप्या चांगले विद्वान गृहस्थ आहेत. त्यांना विनोदबुद्धीहि मोठ्या प्रमाणावर आहे.पण त्यांची विनोदबुद्धि एम. एफ. हुसेनच्या चित्रांसारखी आहे. फार थोड्या लोकांना समजते ते काय म्हणतात ते. (त्यात त्यांचा स्वतःचा अंतर्भाव नाही). त्यामुळे पुकळांना त्यांचे लिहीणे ऑफेन्सिव्ह वाटते. त्यांच्या लिखाणात पुरावे, लॉजिक वगैरेची अपेक्षा करणे म्हणजे विनोद समजत नसल्याची लक्षणे आहेत.

त्या लोकांचा मेंदू सडला आहे हे त्यांनाच अचूक समजते. व तसे ते निर्भीडपणे सांगतात.

शेवटी काय, तास दोन तास बोटांना व्यायाम द्यायला मायबोलीवर यायचे. संधिवातावर चांगला उपाय आहे.

झक्की तुम्हाला जामोप्या नीट समजले आहेत असे तुमचे पोस्ट वाचून वाटतेय पण तुम्हीच म्हणताय "त्या लोकांचा मेंदू सडला आहे हे त्यांनाच अचूक समजते. व तसे ते निर्भीडपणे सांगतात."..... Lol

एव्हढी मोठी slip of tongue झक्की ? Wink

Pages