एम.एफ.हुसैन यांना आदरांजली...

Submitted by dr.sunil_ahirrao on 10 June, 2011 - 09:27

कलाकार हा फक्त कलाकार असतो. तो जेव्हा स्वत्व हरवून एखादी कलाकृती निर्माण करतो,तेव्हा त्याच्यात आणि त्याच्या कलाकृतीत द्वैत उरत नाही. शक्य आहे त्यातून एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,पण याचा अर्थ असा होत नाही,की कलाकाराने जाणीवपूर्वक ते घडविले! खऱ्या कलाकाराकडून नेणिवेच्या पातळीवर महान कलाकृती घडतात.त्याचा संबंध धर्म,देव वगैरेंशी नसतो.तो फक्त स्वतःला मूर्त-अमूर्त जगाच्या सीमारेषेवर फरफटत नेत असतो. एम.एफ.हुसेन यांना विनम्र आदरांजली...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

मला मॉडर्न आर्ट कळालं नाही, ग्रेसजींची कविताही कळाली नाही. त्या आघाडीवर जाणिवा थिट्याच पडत आल्या. कोलाज पेंटिंग्जमधून व्यक्त होणा-या भावनांशी मन कधी तादात्म्यच पावलं नाही. मला रोखठोक व्यवहार कळत आला. गझलेपेक्षा कविता आपल्याशी बोलते तसंच पिकासोपेक्षा सरधोपट रविवर्मा मला भावला. जे कळत नाही त्याला दाद देणंही जमलं नाही खरंतर..

हा झाला माझा हतबल चष्मा. पण याचा अर्थ असा नाही कि हुसैनी कला टाकाऊ आहे. मला समजत नाही इतकंच. पण इतक्या दिवसात मला जे समजलं ते हे कि कला कितीही महान असो, जर ती माझ्या श्रद्धास्थांना दुखावत असेल त्या वेळी माझी प्रतिक्रिया नॉर्मल असेल का ? जर ती तशी असेल तर मला नैतिक अधिकार पोहोचतो कलेची बाजू घेण्याचा. दुर्दैवाने मी स्वतःला हा प्रश्न विचारला तेव्हां अशी प्रगल्भता माझ्यात नसल्याचं जाणवलं.

मग हिंदुत्ववाद्यांना तुम्ही (माझ्यासारखे सर्व ) कुठल्या तोंडाने आवाहन करणार आहात ?

हिंदु कलाक्रुति मध्येच फक्त कसे काय वस्त्रहिन देव दाखवले जातात. मुस्लिम स्त्री मात्र पुर्ण कपड्यांसहित!!! दुटप्पिपणा .........

म्हातारा चप्पल न घालता फिरायचा असे ऐकले आहे, ते खरे आहे का? ( धागा आदरांजलीचा असला तरी चित्रापासून माधुरीपर्यंत काहीही लिहायला आडकाठी नसावी असे वाटते.)

श्रद्धांजलीचा वेगळा स्वतंत्र धागा काढायला मायबोलीने पाच हजार रुपये मागीतले असते तर एम एफ हुसेन मेला काय आणि जिवंत राहिला काय, कुणालाही फरक पडला नसता.

-'बेफिकीर'!

श्रद्धांजली म्हणून एम एफ हुसेन यांचं हार घातलेल नागडं चित्र चांगलं वाटेल नाही का एक "modern art" म्हणून? तुम्हाला काय वाटतं अहिरराव साहेब?

pratyekala aapale mat vyakt karnyach swatantrya aahe. kharya kalakarala samjun ghene far awghad asate. mrutyunantar aata m.f.h. vishayi agadi vairbhavana thevun lihu naka, itkech maze mhanane aahe. kalakar lahari asatat. tyanna bhautik jagashi kahi deneghene nasate.

kalakar lahari asatat. tyanna bhautik jagashi kahi deneghene nasate.

Proud मग चित्रं विकून करोडो डॉलर कशासाठी मिळवत होते ?

( कलाकार लहरी असतात, त्यामुळे वरती रेखाटलेल्या कलाकृतीविषयी आता तुम्हीही काही बोलू नये.)

kalakar lahari asatat. tyanna bhautik jagashi kahi deneghene nasate.>>> होक्का? त्यांचा लहरीपणा मुस्लिम पेंटिंगमध्ये का नाही उतरला मग? झाडून सग्गळे हिंदू देव-देवता इतकंच काय आपली भारतमातासुद्धा त्या लहरीपणाच्या विळख्यात अडकावी? आणि आपल्याला त्याकडे अगदी सोयीस्कररित्या दूर्लक्ष करावेसे वाटावे??? धन्य आहे आपली.... ___/\___
http://en.wikipedia.org/wiki/M._F._Husain#Controversies वाचा हे जरा! आणि मगच आदरांजली वाहा!

पण याचा अर्थ असा होत नाही,की कलाकाराने जाणीवपूर्वक ते घडविले >>

हुसेन याने ते जाणीवपूर्वक घडवले यात मला तरी शंका नाहि!

हुसेन याने ते जाणीवपुर्वकच घडवलेल.

त्याना माहीत होत की हिंदु देवदेवताना नग्न दाखवल्याने काही फरक पडत नाही पुर्वीच्या मुर्तींचा दाखला दिला की झाल मग माफीनाम म्हणजे काही हजार रूपये किमतीच चित्र काही लाखात...

इथे जर मुस्लिम / ख्रिश्चन संत महंताना घेतल तर ते ९५ वर्षांचे कसे झाले असते.

शोभा डे च सिलेक्टेड मेमरीज वाचा. त्यात चित्र विक्रीसाठी केलेला सगळा खोटारडेपणा दिलाय.

>>> kalakar lahari asatat. tyanna bhautik jagashi kahi deneghene nasate.

कलाकार लहरी असतात? हुसेन हे लहरी नसून पक्के व्यवहारी होते. त्यांनी निर्माण केलेल्या "मीनाक्षी: ए टेल ऑफ टू सिटिज" ह्या चित्रपटातील एक गाण्यामुळे आपल्या भावना दुखावल्या असे मुस्लिमांनी सांगितल्यावर हुसेननी ते गाणे लगेच चित्रपटातून काढून टाकले होते. त्यावेळी कोठे गेले होते त्यांचे कलाकाराचे स्वातंत्र्य? हिंदू देवदेवतांची नग्न चित्रे काढल्यावर हिंदूनी विरोध केला तेव्हा मात्र ते हिंदूंना आपली चित्रकला कळत नाही असे सांगून माफी मागण्यास देखील नकार दिला. ह्याला लहरीपणा म्हणायचा की बनेलपणा?

त्यांना देवतांची घाण चित्रे काढण्यासाठी फक्त हिंदू पुराणातूनच स्फूर्ती मिळाली? त्यांच्या स्वत:च्या धर्मातून किंवा ख्रिश्चन, शीख, बुध्द इ. धर्मातून का तशी स्फूर्ती मिळाली नाही?

याचे उत्तर खूप सोपे आहे. स्वत:च्या धर्मावर आधारित त्यांनी अशी चित्रे काढली असती तर ते केव्हाच वर पोचले असते आणि हिंदू सोडून इतर धर्मावर आधारित अशा चित्रांना भारत सरकारने त्यांच्या भावना दुखावल्या म्हणून केव्हाच बंदी घातली असती.

हिंदूंना मात्र धार्मिक भावना नसतात. असल्या तरी त्या कधी दुखावत नाहीत. आणि ज्या हिंदूंच्या धार्मिक भावना वगैरे दुखावतात ते जातीयवादीच असतात. अशी हिंदूंच्या धार्मिक भावनांची सरळ सोपी व्याख्या आहे. त्यामुळे हिंदू देवदेवतांची कशीही चित्रे काढली तरी आपल्याविरूध्द कोणीही काही करू शकणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री होती आणि म्हणूनच त्यांनी तशी चित्रे काढली व बिनदिक्कतपणे त्याचे समर्थनही केले.

त्यांनी काढलेल्या एका चित्रातली सिंह व दुर्गादेवी युनियन दाखविण्याची कल्पना अत्यंत किळसवाणी आहे. हनुमान, सीता, लक्ष्मी, पार्वती, शंकर, गणपती, भारतमाता इ. च्या बाबतीतच त्यांना कलाकाराचे स्वातंत्र्य हवे होते. इतर चित्रांमध्ये मात्र त्यांनी हे स्वातंत्र्य घेतल्याचे दिसत नाही. एका नटीबद्दलही त्यांनी विचित्र उदगार काढले होते.

ते स्वत:च्या मतांवर ठाम असते तर त्यांनी खटल्यांना तोंड देऊन आपली बाजू मांडायला पाहिजे होते. त्याऐवजी त्यांनी पलायनाचा मार्ग स्वीकारला.

जामोप्या तुझ्या चित्राची समिक्षा.

ह्या कलाक्रुतीत चित्रकाराने चश्मा मोठा आणि डोळे फक्त टिम्ब दाखविले आहेत त्यामुळे चित्रातील व्यक्ती
कोणतीही गोष्ट डोक्यात न जाउ देता फक्त चष्म्याने जग पाहाते आहे. दाढी आणि केसांचा काळा रंग
व्यक्तिचे चिरतरुण मन दाखवतात. त्याची मिशी छोटी आहे आणि व्यवस्थित राखली आहे पण दाढी करायला वेळ नाही हे व्यक्तिच्या दुटप्पी पणाचे लक्षण आहे. झाकलेले ओठ त्याची मुस्कट्दाबी कशी समाजाने केली हे दर्शवतात.
चित्रात व्यक्तिचा फक्त चेहरा आहे पण शरिराऐवजी झाडुच्या साइझचा कुन्चला आणि इन्द्राधनुश्यी रंग आणि
रंगाची प्लेट दिसते. कुन्चल्याची साइझ व्यक्तिचे चित्रकला क्षेत्रातील अपार परिश्रम दर्शविते तर सर्वत्र विखुरलेले रंग त्याने विविध ठिकाणी केलेल्या graffity चे symbol आहे. शरिराचा अभाव व्यक्ति गेल्यावर पण ग्राफिती आणि रंग रुपाने मागे राहिल याची जाणिव करुन देतात.
उजव्या कोपर्यात असलेले निळा आणि लाल हे union jack वरचे रंग व्यक्तिने शेवटचा श्वास ज्या देशात घेतला त्या देशाच्या झेन्ड्याचे असावेत पण याबाबत काही मान्यवर समिक्श्कान्चे दुमत आहे.

मला आपल्या प्रतिक्रिया वाचून अजिबात आश्चर्य वाटले नाही. एम.एफ.एच. यांच्याबद्दल बरेच वादळी लिखाण झालेले आहे.
प्रश्न इथे त्यांच्यातल्या कलेचा आहे.आता राजा रविवर्मांचेच उदा.घेऊ- त्यांच्या चित्रातल्या स्त्रिया या त्यांच्या प्रेयसी होत्या.जाणकारांना हे माहित असेल,की सरस्वती इत्यादी सुंदर चित्रे जी त्यांनी रंगवली,ती त्यांच्या प्रेयसीची पोर्ट्रेट्स आहेत.म्हणून रविवर्म्याच्या चित्रांवर आपण आक्षेप घेणार का?
कोणतीही कला ही मूर्त-अमूर्त,भासाभास आणि सबकॉन्शस माईंडमध्ये रुतून बसलेल्या खोल संवेदनांची फलश्रुती असते.इथे कलाकार त्याच्या कलाकृतीशी एकरूप झालेला असतो.आणि ती एका प्रखर जाणीवेच्या क्षणी मूर्त रूप धारण करते/पूर्णत्वाला येते,तिथे कलाकाराला वस्तुस्थितीचे भान येते,असे माझे मत आहे.मला वाटते,एमएफ हिंदू असते,तरीही त्यांनी अशीच चित्रे काढली असती.तो त्यांच्या स्वभावाचा साचा होता.कोणताही महान कलाकार सहजासहजी 'मोल्ड' होत नाही.कलाकाराला रसिकांनी समजून घ्यायचे असते.
मला आपण काढलेल्या चित्राविषयी काहीही बोलावयाचे नाही.अभिरुची ही व्यक्तीसापेक्ष असते. आपल्या सर्व सकारात्मक/नकारात्मक विचारांचे स्वागत आहे!

चित्रकाराने प्रेयसीचे चित्र काढले तर वाईट नाही. पण हुसेनने हिंदु देवता या त्याच्या जणू प्रेयसी असाव्यात अशा आविर्भावात चित्रे काढली, त्याला तरी आक्षेप घ्याल की नाही? ( बाकी, तुम्ही आणि हुसेन यांच्यात एक साम्य आहे बघा.. ते वादळी चित्रं काढायचे आणि तुम्ही वादळी धागे काढता.. Happy )

एमएफ हिंदू असते,तरीही त्यांनी अशीच चित्रे काढली असती.तो त्यांच्या स्वभावाचा साचा होता.>>> नक्कीच! त्यामुळेच मुस्लिम असूनही त्यांनी नग्न-चित्रकारीतेसाठी हिंदूच देव निवडले. त्यामुळे ते खरे सहिष्णू!!! फारच चांगले होते एमेफ जी! त्यांनी यातून सर्वधर्मसमभाव साधला आहे.

कोणतीही कला ही मूर्त-अमूर्त,भासाभास आणि सबकॉन्शस माईंडमध्ये रुतून बसलेल्या खोल संवेदनांची फलश्रुती असते.इथे कलाकार त्याच्या कलाकृतीशी एकरूप झालेला असतो.आणि ती एका प्रखर जाणीवेच्या क्षणी मूर्त रूप धारण करते/पूर्णत्वाला येते,तिथे कलाकाराला वस्तुस्थितीचे भान येते,असे माझे मत आहे>>> Lol साक्षात एमेफजींनापण वरुन हे वाचून हसू येत असेल! त्यांनी केलेल्या खोडसाळपणाकडे तुम्ही कित्ती उदात्तपणे पहात आहात! तुम्ही लिहिलेत ते बर्‍याच मनस्वी कलाकारांना लागू होत असेलही! एमेफजींना मात्र........

असो!

मला वाटते,एमएफ हिंदू असते,तरीही त्यांनी अशीच चित्रे काढली असती.तो त्यांच्या स्वभावाचा साचा होता >>>

ते मुस्लिम असुन त्यांनी मुस्लिम धर्मातील व्यक्तींबद्दल मग अशी चित्रे का बरे काढली नाहित ? तीही त्यांच्या सबकॉन्शस माईंडमध्ये रुतून बसलेल्या खोल संवेदनांची फलश्रुती होती का ?

झाकलेले ओठ त्याची मुस्कट्दाबी कशी समाजाने केली हे दर्शवतात.>>
मला तर ते मिस्किल हसताना वाटतात कि कशी मी भारतात राहुन , गम्मत केली

झाकलेले ओठ त्याची मुस्कट्दाबी कशी समाजाने केली हे दर्शवतात.>>
मला तर ते मिस्किल हसताना वाटतात कि कशी मी भारतात राहुन , गम्मत केली>>> 'हो! कसे मी भारतात राहून भारतीयांनाच खिजवले आणि माझी बाजू घेत कसे भारतीयच येतील बघा!!! आणि मलाही न सुचलेले अर्थ काढून त्यांच्याच लोकांना समजावत बसतील, हेही बघा!' असे काहीसे म्हणत असावेत ते !

माझा हुसेन यांच्या चित्राबद्दल काहिही आक्षेप नाही. या चित्रांमुळे माझ्या कुठल्याही भावना दुखावल्या गेल्या नाहीत. पण...
ही चित्रे तुम्ही वर म्हणतात तशी "सबकॉन्शस माईंडमध्ये रुतून बसलेल्या खोल संवेदनांची फलश्रुती"" होती असे वाटत नाही आणि असतील तर त्यान्च्या सबकॉन्शस माईंडमध्ये सवंग प्रसिद्धी मिळायच्या भावना असाव्यात.
मी जर इतर धर्मातील सन्स्थापकांची पशुबरोबर सम्भोग करताना चित्रे काढली तर ती माझ्या मनातील कोणत्या जाणिवांचा अविश्कार असु शकतिल हे मला कळत नाही त्यामुळे ही चित्रे व प्रसिद्धी ही मला कळत नाही. बाय द वे मला पुर्वीची घोड्यांची चित्रे वा गजगामिनीही फार आवडली नाहित.
राजा रविवर्म्याची फक्त भारत आणि महाराश्ट्रिअन बाईची चित्रे चांगली आहेत.
जर "मूर्त-अमूर्त,भासाभास आणि सबकॉन्शस माईंडमध्ये रुतून बसलेल्या खोल संवेदनांची फलश्रुती "
पहायची असेल तर फ्रिदा ची चित्रे जरुर पहा त्यातही हिंसा आहे, लैंगिकता आहे पण प्रत्येक चित्रातील अभिव्यक्तीला काहीतरी पार्श्वभुमी आहे

लेखकाचं काय चुकलं ?
श्रद्धांजलीचा धागा टाकताना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेतला गेला नाही. केवळ ते वादग्रस्त का झाले इतकंच लिहून श्रद्धांजली अर्पण केल्याने खपली काढल्यासारखी झाली. व्यक्तिश: लेखकाचा हेतू तो नाही हे त्यांच्या प्रतिक्रियांवरून जाणवतंय..

सबब.. धाग्याखाली अप्रकाशित करा ही सोय असते तिचा लाभ घ्यावा आणि पुन्हा मेहनतीने दुसरा धागा टाकावा. दु:खद घटना या धाग्यावर नाहीतरी श्रद्धांजली अर्पण केलेली आहेच.

मला हुसेनची चित्रे फारशी म्हणजे जवळ जवळ नाहीच कळली .. हुसेनच्या चित्रांची थीम बर्‍याचदा घोडे असत म्हणे. विविध स्थितीतले, वेगाचे , रंगाचे घोडे. प्रत्येक कलाकाराची अशी आवड असतेच एखादा विषय ,संकेत्,राग वगैरे. जसे ग्रेसच्या कवितात पुन्हा पुन्हा घोडे येतात ते काम वासनांचे प्रतिक म्हणून. आर के लक्षमण यांचा आवडता चित्र विषय आहे 'कावळा' .. मुरली लाहोटींच्या चित्र/म्युरल्स मध्ये बैल प्रामुख्याने दिसतात . बलदंडतेचे प्रतिक म्हणून. लाहोटीनी एकदा फक्त तीनच रेषांत बैल रेखाटलेला पाहिल्यावर मी थक्क झालो वर पुन्हा ब्लेडच्या पात्यावर रंग घेऊन कागदावर फराटा मारताच त्या उधळलेल्या बैलाचा वेगही 'जाणवू' लागला. अवचटांचा 'चित्रकार ' नावाचा लेख वाचाला तर त्याना चित्रे कशी 'पहावीत' हे एका भणंग , गरीब चित्रकार मित्राने शिकवले. 'जग संपूर्ण गुरू दिसे' ... ज्याना आपल्याला चित्रे कळत नाहीत याची रुखरुख असते त्यानी अवचटांचा हा प्रदीर्घ आणि सचित्र लेख जरूर वाचावा...
माझे अरुण शेवते नावाचे एक कवी मित्र आहेत . त्यांचे पहिले कवितांचे पुस्तक होते 'कावळ्यांच्या कविता' त्यात कावळ्यांविषयी छोट्या छोट्या अनेक कविता आहेत. अर्थातच ते नवकाव्य असल्याने आम्हाला उमजत नसे व आम्ही त्याची टवाळी करण्यात धन्यता मानत असू. त्यातील एक कविता खालील प्रमाणे होती

'कावळे ,
कावळे, कावळे..
कावळे , कावळे , कावळे...'
बस. एवढीच . अर्थातच आम्ही त्याला हसलोच. आमच्या दुसर्‍या चांगला प्रसिद्ध कवी असलेल्या मित्राने त्याचा अर्थ सांगितला . की कावळे हे दु:खाचे रूपक आहे कवि कावळ्यांच्या अनुभवाने संपृक्त होत गेला आहे आणि त्या अनुभवाने चरम सीमा गाठली आहे.. मग थोडासा प्रकाश पडला. की कविता समजण्याचेही तंत्रही असते आणि संवेदनाशीलताही असावीच लागते. त्यामुळे बर्‍याचदा चित्र , कविता, संगीत (विशेषतः शास्त्रीय ) समजत नाही, भावत नाही, अपील होत नाही. 'डेड्'.बोअर वाटते. पण हा व्यक्तिमत्वाचा भाग आहे असे मला वाटते..

एक्सपेरिमेन्टल सायकॉलॉजीमध्ये आम्हाला एक प्रयोग होता 'इमेजरी ' (imagery)या सदराखाली ..
त्यात इंक ब्लॉट टेस्ट होती (म्हनजे अजूनही असेल :)) . शाईचे यदृच्छया (रॅन्डमली ) डाग पाडलेली कार्डे दिली असत व त्यात काय काय प्रकारचे आकार दिसतात ते एका कागदावर यादी लिहून काढायचे असे. आपण लहानपणी ढगांत हत्ती, घोडे , कुत्रा असे विविध प्राणी झाडे डोंगर यांचे आकार शोधत असू , अथावा अगदी भज्यात देखील आपल्याला हत्तीची सोंड 'जाणवते ' त्याचाच हा प्रयोग शाळीय आविष्कार असे. काही लोकाना बरेच आकार दिसत त्यांची यादी मोठी व वैविध्यपूर्ण असे. काहीना काहीच 'जाणवत '
नसे . ते म्हणत काही नाही हा एक साधा शाईचा आडवा तिडवा पडलेला डाग आहे. त्यांची यादी कमी असे अथवा काहीच नसे . (असे लोक असतात हं..)
अर्थात काहीही न जाणवणे हे काही न्यूनत्व नव्हे . त्यामुळे खोटी यादी करू नका अशी पूर्व सूचना असेच.
याचे एज्युकेशनल इम्प्लिकेशन असे आहे की ज्याची इमेजरी समृद्ध आहे ,त्याला या शाईच्या डागात अनेक चित्रे दिसत त्याचा कल साधारण क्रिअटिव्व्ह कलाप्रकारांकडे असण्याचा सम्भव जास्त . त्यामुळे ललित कला, आर्किटेक्चर , अभियांत्रिकी यामढ्ये बेसिक तंत्रे शिकल्यावर स्वतःच्या सर्जनशीलतेवर ते कामात्/कलेत/ नवनवी व्हेरिएशन्स आणू शकतात. त्यामुळे अ‍ॅनिमेशनची बेसिक तंत्रे शिकल्यावर ह्या गुणा.वर सर्जनशीलतेत कमीजास्त पणा येतो. व्यवस्थापनेच्या क्षेत्रात एखादी पॉलीसी ठरवताना त्या निर्णयामुळे काय काय परिणाम होऊ शकतात हह्याच्या बर्‍याच शक्यता या इमॅजिनेटीव्ह स्किल मुळे याना दिसतात. अगदी एखादा कायदा बनवताना त्यात काय काय अडचणी , येतील , सिच्युएशन येतील याहा अंदाज अशा लोकाना येऊ शकतो व त्याची काळजी योजना, धोरण, डो़युमेन्ट बनवताना घेतली जाते.. पण याला दुसरी बाजू आहे. अशा लोकाना एकाच गोष्टीच्या अनेक शक्यता दिसत असल्याने त्यातील एक सिलेक्ट करताना , अथवा निर्णय घेताना यांचा फारच गोंधळ उडतो. असे केले तर तसे होईल , पण तसे केले तर असे होईल . याचा हा फायदा तर त्याचा हा तोटा असा वैचारिक गोंधळ यांचा असल्याने कठोर निर्णय घायला अशी माणसे कचरतात्.अगदी रस्त्याने जाताना शिवाजीनगरवरून स्वारगेटला जाताना मंडै मार्गे जाऊ की डेक्कन टिळक रोडमार्गे जाऊ असे द्वन्द्व चालू होते. मंडैत ट्राफिक जाम असला तर अडकू. पण टिळक रोडने वेळ फार लागेल इत्यादी... Proud

मग दुसर्‍या गटातल्या लोकांचे काय ?. हे एकदम माठ असतात काय.? तर तसे नाही या मंडळीना निर्णय घेताना कमी शक्यता दिसत असल्याने/ अथवा वैचारिक गोंधळाला ते थारा देत नसल्याने ते फाटदिशी एक निर्णय घेऊन टाकतात आणि तो कठोरपणे अमलात आणतात .वास्तवाचे ज्ञान त्याना अतिशय कठोर असते. एक घाव दोन तुकडे या स्वभावाचे हे लोक असतात. यांचे यशही मोठे असते आणि पराभवही मोठेच. 'जो भी होगा देखा जायेगा 'अशा वृत्तीचे हे लोक असतात. लष्कर ,पोलीस , अग्नीशमन्,डोक्टर्स, ड्रायव्हर्स, फील्ड ऑफिसर्स, प्लान्ट इनचर्ज अशा स्वरूपाचे लोकांत हा गुण आवश्यक असतो. इथे स्वप्नाळू लोकांचे काम नाही Happy

प्रत्यक्षात चुकीची मानसिक बैठक असलेले लोक मिसमॅच क्षेत्रात काम करतात आणि अयशस्वी ठरतात..
तसेच इतके क्लीअर कट अथवा वाटर टाईट कम्पार्टमेन्ट व्यक्तिमत्वाचे नसतात . आम आदमी यात असाच अधेमधे कुठे तरी असतो. पोलीसात देखील काही घडल्यास रिटायरमेटपर्यन्त काळजाची धडधड वाढणारे अधिकारीही असतात. त्याना मग टेबलवर अथवा बिनतारी सन्देश अशी कामे दिली जातात Proud
सिव्हील डिस्टर्बन्सच्या वेळी मॉब हटवणे हे एकमेव ध्येय आणि रिझल्ट याना दिसतो. व मग लोकांआ झोडपून, गोळीबार करून परिस्थिती नियंत्रनात आणतात . काही मात्र प्रत्यक्ष मॉब कन्ट्रोल करताना लाठीमार/गोळीबार होऊन माणसे मेली तर माझी चौकशी होईल का? माझी नोकरी जाईल का ?असा विचार करतात . त्यांची स्थिती रणावरील अर्जुनासारखी ' सीदन्ति मम गात्राणि , मुखं च परिशुष्यति' अशी होते :)त्याना असेच पूर्वीचे किस्से आठवतात व ते ढेपाळून जातात.म्हणून वरिष्ठ धाडशी आणि इरसाल अधिकार्‍यानाच दंगलीत पाठवतात Happy

हे सर्व सांगायचे कारण एखाद्या कलेशी संवेदनाशीलता असणे/नसणे हे मानसिक जडण घडणीवर अवलम्बून आहे आणि तसे नसेल तर त्यात न्यूनत्व काही नाही. तुम्ही कदाचित चांगले गणितज्ञ, अथवा कुशाग्र अकाउन्टन्ट होऊ शकाल. नाही तरी हुसेनला अकाउन्टमधले काय कळत होते? Proud Proud Proud

(नेटवर या टेस्ट बद्दल बरीच माहिती आहे . अगदी ऑनलाईन टेस्टही आहेत . अर्थात या चाचण्यांच्या मर्यादाही खूपच आहेत...)

त्या डॅनिश वॄत्तपत्रवाल्याने महंमद पैगंबराचे कार्टुन काढ्ले तरी जगभरातुन निषेध होतो, धमक्या येतात, हल्ल्याचा कट रचला जातो. त्यावेळी नाही म्हणत की ही त्या व्यंगचित्रकाराच्या 'सबकॉन्शस माईंडमध्ये रुतून बसलेल्या खोल संवेदनांची फलश्रुती' होती.

वा जोशीबुवा छान विश्लेषण. माझ्या पाहाण्यात काहि लोक आहेत जे अ‍ॅब्स्ट्रॅक्टचा ओ कि ठो जाणत नाहित पण उगाच उसना आव आणतात. असे महानुभाव कुठल्या कॅटेगरीत मोडतात?

भारतात मुस्लिम समुदायाचे जरा जास्तच चोचले पुरवले जातात. अल्लाच नग्न चित्र काढायची त्या हुसेन ने हिम्मत का दाखवली नाही? हिंदुत्ववाद्यांनी फक्त त्याला धमकीच दीली मुसलमान लोकांनी फतवे काढुन त्याचा तेव्हाच अंत्यविधी केला असता. आणि भारतासारख्या देशात जिथे अजुनही धर्मांध राजकारण खेळले जाते तिथे असली म्हातारचळ लागल्यासारखी चित्र का काढावी? लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्यालसुद्धा मर्यादा असतात. आणि कलाकारांना असल्या नग्न कलेचा एवढाच पुळका असेल तर त्यांनी तो स्वतःपुरताच मर्यादीत ठेवावा.

>>> मला वाटते,एमएफ हिंदू असते,तरीही त्यांनी अशीच चित्रे काढली असती.

हुसेन हिंदूच काय, ख्रिश्चन, शीख, बौध्द, ज्यू इ. कोणीही असते तरी त्यांनी फक्त हिंदू देवतांचीच हिडिस चित्रे काढली असती. हिंदूंना धार्मिक भावना नसतातच, त्यामुळे त्या दुखावल्या जायचा प्रश्नच उद्भवत नाही. चुकून काही हिंदूंनी आवाज उठविला तर इतर काही हिंदूच त्यांना जातीयवादी ठरवून किंवा त्यांना चित्रकलेतला गूढ अर्थ कळत नाही असे सांगून हुसेनांनाच समर्थन देतील.

जोशीसाहेब
छान माहिती, प्रश्न तुम्हाला बरोबर कळला.
कावळे या कवितेतील कलकलाट पण जाणवला.
मला यात हे कळत नाही की खरे श्रेष्ठ abstract साहित्य कसे ओळखायचे?
बरेच जण अगदीच काही कष्ट न करता काहीपण लोकांच्या माथी मारतात असे वाटते.
साल्वादोर दालीची fluidity of nature , time ,
वॅन गॉघ ची डिप्रेशनशी फाइट, तन्त्र, "One may have a blazing hearth in one's soul and yet no one ever come to sit" असे तो म्हणतो तेव्हा जाणवणारी वेदना , एकच चित्र पुन्हा पुन्हा काढताना
केलेल्या सुधारणा.
मॉनेट्ची उच्च रन्ग्सन्गती सहज जाणवते.
पण हुसेन यांची चित्र पहाताना जहान्गीर आर्ट मध्ये भरणार्या अनेक सामान्य (अप्रसिद्ध खरेतर सामान्य नाहित) कलाकारांची चित्रे पण छान वाटतात.
भ्रष्टाचार सर्वत्र आहे कलेतही पण बरेचदा खरी उच्च कलाक्रुती काळाच्या ओघात टिकुन राहते त्यामुळे आपण हे काळावरच सोडुयात.

कलाकाराला त्याची अभिव्यक्ती सादर करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते..पण त्याचा त्याने स्वैराचार माजवू नये... एम.एफ.एच. ने नेमके हेच केलं.. अल्लाचं एखादं नग्न चित्र काढलं असतं तर जागीचं मेल असता...
स्वा.सावरकरांचा किस्सा आठवतो(परवाच ई-मेल वर वाचल..)..
"संत एक नाथांची एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले.
शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….?

असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :
१- नाथ किती महान होते ते कळत
२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते
३ - माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत
४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका
५ - रागावून त्रास तुम्हालाच
६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच
७ - दुसर्लाया माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे

अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता. शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली पण, नाथांची हि गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस….,
“कि हिंदू समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे “.
शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस…..?”.
तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसच होत या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही नाथ संत असले तर तो हिंदू समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता नाथांनी जस त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत न कि,
नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण . हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता "
स्वातंत्र्य वीर विनायक सावरकर"-- खरचं आपण झोपलो आहोत की झोपेचं सोंग घेत आहोत...

Pages