एम.एफ.हुसैन यांना आदरांजली...

Submitted by dr.sunil_ahirrao on 10 June, 2011 - 09:27

कलाकार हा फक्त कलाकार असतो. तो जेव्हा स्वत्व हरवून एखादी कलाकृती निर्माण करतो,तेव्हा त्याच्यात आणि त्याच्या कलाकृतीत द्वैत उरत नाही. शक्य आहे त्यातून एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,पण याचा अर्थ असा होत नाही,की कलाकाराने जाणीवपूर्वक ते घडविले! खऱ्या कलाकाराकडून नेणिवेच्या पातळीवर महान कलाकृती घडतात.त्याचा संबंध धर्म,देव वगैरेंशी नसतो.तो फक्त स्वतःला मूर्त-अमूर्त जगाच्या सीमारेषेवर फरफटत नेत असतो. एम.एफ.हुसेन यांना विनम्र आदरांजली...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

केदार जोशी नावाच्या मायबोलीकरांचा यावर बराच अभ्यास आहे >>>

हा चांगला जोक होता. त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नाचे अजुनहि उत्तर दिले नाहि. त्यावरुन त्यांचा अभ्यास समजला. Proud

कोपी पेस्ट (किंवा भाषांतर ) करणे याला माबोवर अभ्यास म्हणतात का ? Proud

@nandini, mi jari did varshapasun mb cha sabhasad asalo, tari mi magil 15-20 diwasanpasunch yethe lihit aahe. tyamule mala yethe shraddhanjalicha vegala dhaga vagaire mahit nahi. mala mazya sudhh hetunvishayi jast spastikarnachi garaj watat nahi. godhal ghalnaryanche avhaan mi swikarato. tyanni mazya prashanchi uttare dyavit. aani tee muddesud asavit. hya charchet tyanchi sarashi zali tar mi mabo nehmisathi sodun jaain. aani tyanche pital ughade padlyas mi tyanna mabo sodayala vagaire sangnar nahi. matr acharatpana karayacha nahi. yasathi mazi at ekach tee mhanje tathakathit dharmandhanni charchedarmyan mazyavar hinduvirodhi kinwa tatsam aarop karu nayet. jyanna dharm mhanje kay hech mahit nasel tar mag te tawalakya karnyapalikade kay karu shaktil?
>>>>

डॉक्टरसाहेब, काय लिहिताय काय? श्रद्धांजलीचा धागा सुरू करण्याची का घाई केलीत? नविन लेखनामधेच दु:खद घटना बीबी दिसत होता. तिथे जाऊन का वाचले नाहीत?? दिड वर्षापासून वाचत होतात तर इतके माहित असायला हवे होते. बरं जाऊ दे!! नविन बीबी काढलाच होता तर"शुध्द हेतू" काय होता तुमचा? "त्याचा संबंध धर्म,देव वगैरेंशी नसतो" या वाक्याची काय गरज होती???

शक्य आहे त्यातून एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,पण याचा अर्थ असा होत नाही,की कलाकाराने जाणीवपूर्वक ते घडविले! भारतीय संविधानानुसार अशा भावना दुखावणे (जाणून बुजून अथवा नकळतपणे) हा गुन्हा आहे. असे असताना देखील परत त्याचेच समर्थन का करताय?? तुमच्या आदरांजलीमधे एकही शब्द हुसेनच्या शैलीबद्दल अथवा चित्राबद्दल नाही. दोन वाक्ये धर्मासंदर्भातच!!! अजून काय स्पष्टीकरण हवे तुमच्या "शुध्ध हेतूचे".

godhal ghalnaryanche avhaan mi swikarato. tyanni mazya prashanchi uttare dyavit.>> का द्यावीत??? ते काय तुमच्या प्रश्नाची उत्तरे द्यायला बांधील आहेत? वरती मास्तुरे यानी काही प्रश्नाची उत्तरे दिलेलीच आहेत. Proud तरीदेखील "सरशी झाली" अथवा "पितळ उघडे पडले" हे कोण ठरवणार? हा बीबी हुसेनच्या श्रद्धांजलीसाठी काढलाय. तिथेच त्याच विषयावरती लिहा. हिंदू धर्माविषयी तुम्हाला काही शंका असल्यास योग्य त्या बीबीवर विचारा. उत्तरे मिळतील.

लोकहो, हुसेनसारख्या माणसाच्या श्रद्धांजली बीबीवर हिंदू धर्माची चर्चा करणे योग्य आहे का? (मी काही हिंदुत्ववादी नाही, पण "योग्य बीबीवर योग्य ती चर्चा करावी" असे मला वाटते.)

उठसूठ नविन बीबी काढणे (आणी त्यावर भलतीच चर्चा करवून स्वतःचा टीआरपी वाढवणे) हाच एक उद्योग आहे सध्या काही लोकाचा!!

नंदिनी म्याडम,
मी दीड वर्षापासून येथील लिखाण वाचत होतो,असे कधी म्हणालो?फक्त सभासद होतो;आपण नीट वाचले नसावे,असो.
"त्याचा संबंध धर्म,देव वगैरेंशी नसतो" ह्यामागे कारण असे की मी ही कॉमेंट ई सकाळवर टाकली तेव्हा काही लोक हुसेन यांच्यावर धर्म वगैरेंच्या आधाराने टीकेच्या पवित्र्यात होते.शक्य आहे त्यातून एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,पण याचा अर्थ असा होत नाही,की कलाकाराने जाणीवपूर्वक ते घडविले- हेही त्यासाठीच लिहिले.
आणि माझी इतर दोन वाक्ये-ती महत्वाची नाहीत का?
आपणास उत्तरे द्यायची नसतील,तर त्यात काय नवीन विशेष? मग उगाच का आज इथे शांतता आहे?बरे इतके वादविवाद चालले होते,तेव्हा तुम्ही कुठे होतात? आपण अचानक उगवलात.वादग्रस्त प्रतीसाद,शिव्या,अपशब्दांचा वापर करणारे यांच्या संदर्भात आपण काहीही कसे लिहिले नाही?याचा अर्थ आपण त्यांचे समर्थन करता,असाच होत नाही का?
एम.एफ.एच यांच्या श्रद्धांजलीच्या मुद्द्यावर धर्म वगैर शब्द तारतम्याने वापरणारे किती लोक होते? म्हणूनच धर्माच्या मुळाशी जाऊन या वादाला पूर्णविराम देऊन नंतर मी पुन्हा एम.एफ.कडे वळणार आहे.त्यासाठीच केवळ धर्माच्या आधाराने एका दु:खद घटनेकडे पूर्वग्रहदूषित आणि आत्यंतिक द्वेषाने पाहणाऱ्या तथाकथित धार्मिक लोकांना म्हणूनच मी हे प्रश्न विचारले आहेत.
मास्तुरे यांनी दिलेली उत्तरे पुरेशी आहेत,असे आपणास वाटते का?हवे तर आपण स्वतः त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता.ती चर्चा इथेच व्हायला हवी.आता आपली तयारी नसेल तर त्याला माझा नाईलाज आहे.
सरशी होणे किंवा पितळ उघडे पडणे,हे (अर्थातच चुकूनमाकून चर्चा झालीच तर) आपोआपच समजते.इथे त्यासाठी परीक्षक नेमण्याची गरज नाही.
टीआरपी वगैरे भानगडीत आपण आजवर पडलो नाही.आणि मला त्याची आवश्यकताही नाही. त्यामुळे आपले यासंदर्भातील वाक्य कदाचित दुसऱ्या कुणासाठी असेल असे मी समजतो.ते वाक्य मला नाटकातील 'स्वगत' असते ना,त्याप्रमाणे 'भासले'. धन्यवाद.

आता नक्किच टाळे लागणार इथे >> हो मग गणू. जिथे जिथे जातो, तिथे तिथे टाळे लागते. हि परंपरा इथे कशी मोडणार?

हो मग गणू. जिथे जिथे जातो, तिथे तिथे टाळे लागते. हि परंपरा इथे कशी मोडणार? >>>

तुम्हि कोण ? कोणाचे डु आय ते तरी कळु द्या. मग उतरवतो तुमची.

तुम्हि कोण ? >> मी कोण? हा प्रश्न तुझ्यासाठी महत्त्वाचा. असणारच श्रद्धांजलीच्या बाफवर इतर, क्रिकेटच्या बाफवर इतर, सर्व बाफंवर इतर महत्त्वाचे असणारा माणूस अजुन काय बोलणार म्हणा?

मग उतरवतो तुमची. >> बघ अजुनही तू काही तुझी पायरी सोडायला तयार नाही! सारखं आपली दुसर्‍यांची उतरवण्यावर असतोस. काय करणार दैव देते, कर्म नेते.!

बरं उतरवयाची तर जॉकी आहे. चांगला ब्रॅण्ड आहे तेंव्हा जरा शरीर / मन लख्ख करून मग उतरव बरं. मला नाहीतरी समलिंगी मध्ये इन्टरेस्ट आहे!

बाफ काय? अन इथले लोक बोलतात काय? धर्म, देव, सरस्वती, आदिमानव अन वर असे हे उतरवणे अन काय काय. च्यायला ह्या लोकांसोबत चर्चा होणेच शक्य नाही. सारखं आपल्या दुसर्‍याला पाण्यात पाहणे अन हिशोब चुकते करणे ही ह्यांची आदत.

.

म्हणूनच धर्माच्या मुळाशी जाऊन या वादाला पूर्णविराम देऊन नंतर मी पुन्हा एम.एफ.कडे वळणार आहे.त्यासाठीच केवळ धर्माच्या आधाराने एका दु:खद घटनेकडे पूर्वग्रहदूषित आणि आत्यंतिक द्वेषाने पाहणाऱ्या तथाकथित धार्मिक लोकांना म्हणूनच मी हे प्रश्न विचारले आहेत. >>

कमाल आहे डॉक्टर साहेब तुमची! धर्माचे मुळे? अन धर्माचे मुळ इथे सांगीतले म्हणजे चर्चा संपणार आहे का? की धर्मावर हजारो पिढ्या युद्ध करत आल्या, त्या मूर्ख आणि आपण मुळाकडे चाललो म्हणजे शहाणे असे काही आहे का? आणि तुमचे मूळ खरे व इतरांचे खोटे असे कोणी परीक्षण करत आहे का?

धर्माच्या आधाराने एका दु:खद घटनेकडे पूर्वग्रहदूषित >> परत तेच अहो त्या हुसेनने धर्मावर आधारितच चित्रं काढली मग पूर्वग्रह कसा होणार नाही? आणि मुसलमान धर्माच्या सगळ्या व्यक्ती कडे पूर्वग्रह ठेवून पाहतात का? मोहमंद रफी, झाकीर हुसेन, अब्दुल कलाम, झहीर खान, युसूफ पठाण ह्या सगळ्यांकडे काही पूर्वग्रह ठेवून येथील लोकं पाहतात का? काही तरी आपलं समजायचे, आपणच गैरसमज करायचा अन त्याची पुंगी वाजवायची. धर्म तुम्ही मध्ये आणत आहात. हुसेन ने ती चित्र हिंदू धर्मियांची भावना दुखवायसाठी काढली नाही असे तुमचे म्हणणे असले तरी भावना दुखावल्या गेल्या हा पूर्वग्रह नाही, सत्यांश आहे. इतरांच्या भावना ठरवणारे आपण (तुम्ही, मी) कोण?

वरचा प्यारा नीट लक्षात घ्या, तिथेच क्रक्स आहे.

तो मेला. त्याला पुरला. तो संपला हेच खरे आहे, हा वाद आयुष्यभरही चालू राहू शकतो. तुम्हाला कशात स्वारस्य आहे? सगळ्यांनी श्रद्धांजली दिली म्हणजे संपणार आहे का हे सर्व? विरोधी मत नसू शकतात का? बेटर लिव्ह विथ इट!

असो आता संध्याकाळ खराब व्हायच्या आधी उठावे हेच खरे.

@देसी, पुन्हा तीच चूक करताय तुम्ही. वाचताना जरा लक्षपूर्वक वाचावे. आशय ध्यानात घ्यावा.आणि मग कॉमेंट्स कराव्यात.

>>>>प्रथम मी भारतीय आहे.माझे हिंदू असणे ही दुय्यम गोष्ट आहे.
शाळेत "मी भारतीय" निबंधात हे वाक्य मराठीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी फार छान आहे. Happy
उगीच अलंकारीक philosophy लिहुन कोणी तत्वज्ञानी, वैचारीक प्रगल्भता गाठलीय हे सिद्ध होत नाही.

@नंदिनी १००% अनुमोदन

लेखक हुसेनच्या चित्रांबद्दल फोटोसकट स्पष्टीकरण देवुन त्याची कला कशी वेगळी आहे याबद्द्ल लिहुन स्वतःची मत पटवण्यासाठी टाळाटाळ का करत आहे ते कळत नाही? लेखकाने हुसेनची चित्र प्रत्याक्षात प्रदर्शनात पाहीलेलीच नाहीत हेच स्पष्ट होतय. उगीच माबोवर अतिउत्साहात काहीतरी लिहायचय म्हणुन खटाटोप केलाय हे ही सिद्ध होतय. लेखकाने तरीही हुसेनच्या चित्रांमधील हिंदु (देवता) आणि मुस्लिम (माणसे) दाखवतानाचा (जाणुनबुजुन) केलेला दुटप्पीपणा (निर्ल्लजपणा) आभ्यासावा. तस का हे स्वतःच स्वत:ला विचाराव आणि मगच ईकडे ईतरांशी वाद घालण्याचा पोरकटपणा करावा.

आणि या बीबीच आता अस झालय की
एखाद्या लहान मुलाला तो घोडा नाहीय गाढव आहे हे १०० वेळा समजवुन/उदाहरण देवुनही ते बिचार लहान मुल सारख सारख त्याला घोडाच म्हणत. आणि मोठी माणससुद्धा मग गंमत म्हणुन पुन्हा पुन्हा त्याला हे काय आहे अस विचारतात? अस या बीबीच झालय....

tharalyapramane mazya prashnanchi uttare dya. baki mi mazya posts madhye liheelele aahech.

मी दीड वर्षापासून येथील लिखाण वाचत होतो,असे कधी म्हणालो?फक्त सभासद होतो;आपण नीट वाचले नसावे,असो.
>>> शक्य आहे, मिंग्लिश वाचायला फारच त्रास होतो.

ह्यामागे कारण असे की मी ही कॉमेंट ई सकाळवर टाकली तेव्हा काही लोक हुसेन यांच्यावर धर्म वगैरेंच्या आधाराने टीकेच्या पवित्र्यात होते.शक्य आहे त्यातून एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,पण याचा अर्थ असा होत नाही,की कलाकाराने जाणीवपूर्वक ते घडविले- हेही त्यासाठीच लिहिले.
>>>> वा, मग तेच वाक्य इथे का म्हणून कॉपी पेस्ट केले??? इथल्या लोकाना ई सकाळचा संदर्भ माहित आहे, असे गृहित धरून तेच इथे लिहिले. (आणि लिहिण्यासाठी नविन बाफ उघडला,-- मला वैताग त्याचा आलाय!! Happy )

आपणास उत्तरे द्यायची नसतील,तर त्यात काय नवीन विशेष? मग उगाच का आज इथे शांतता आहे?बरे इतके वादविवाद चालले होते,तेव्हा तुम्ही कुठे होतात? आपण अचानक उगवलात.वादग्रस्त प्रतीसाद,शिव्या,अपशब्दांचा वापर करणारे यांच्या संदर्भात आपण काहीही कसे लिहिले नाही?याचा अर्थ आपण त्यांचे समर्थन करता,असाच होत नाही का?

मी कुठे आणि कसे उगवायचे ते आपण ठरवायची गरज नाही. आज इथे रविवार असल्याने शांतता आहे, आपण जर हा बीबी उघडलाच नसतात तर इथे वादग्रस्त प्रतिसाद, शिव्या अपशब्द लोकानी वापरलेच नसते. आपली श्रद्धांजलीच्या चार ओळीमधे काहीच नसल्याने (त्यातली दोन वाक्ये धर्मासंदर्भातली, उरलेली दोन वाक्ये "कलाकारासंदर्भात") त्यात हुसैनचा उल्लेखदेखील नाही!!! तुम्हाला स्वतःला हुसैनच्या चित्रशैलीतले किती समजते,किती आवडते, किती भावते याचा काहीच संदर्भ नाही. मला प्रश्न तो पडलाय. हुसैनला श्रद्धांजली देण्यासाठी तुम्हाला हुसैन किती समजलाय ते लिहा ना!! उगाच दुसर्‍याने धर्मासंदर्भात पोस्ट लिहिलेच तर दुर्लक्ष करता आले अस्ते ना. ते सोडून तुम्ही हुसैनसंदर्भात लिहिणे अपेक्षित होते.

aapali mate jarur manda. vaiktik teeka karu naye. lekhkane kalakarachya manovishwache vishleshan kelele aahe. aapan mool post punha ekda vachavi. tyanchya vadgrast chitranche samarthan nasun tyamagil bhumika fakt mandali aahe. ithe mi ek vachak ya drustine lihilele aahe. punha koni mhanatil lekhak pratyek gost swatawar ka gheto?
आपल्या बहुतेक प्रतिक्रिया वाचताना हुसैनचा उल्लेख शून्य!! दर वेळेला फक्त "कलाकार" (मला अचानक "निले निले अंबर पे चांद जब आये!!" ऐकू येतय Proud ) कुठेही मला हुसैनच्या मानसिक्स्थितीचे विश्लेषण आढळले नाही. तुम्हाला हुसैनने येऊन स्वतः अशी वादग्रस्त चित्र काढण्यामागील भूमिका समजावली होती का??

जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा लेखक अस्ता, वाचता तेव्हा वाचक त्यामुळे "मी वाचक दृष्टीने लिहिले" मंजे काय केले? Uhoh

मीनाक्षी चित्रपटात 'कुराणातील' काही वाक्ये घेतल्यामुळे मुस्लिमांनीही त्यांच्याविरुध्द आवाज उठवला होता.आणि त्यांना तो चित्रपटच गुंडाळावा लागला.म्हणजे त्यांनी फक्त हिंदुच्या श्रद्धास्थानांवर आक्षेपार्ह चित्रे वा चित्रपट निर्माण केले असे म्हणणे चुकीचे नाही का?
हा चित्रपट रीलिज झाला त्यामधले नूर उन नूरू या गाण्याच्या शब्दावरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. (हे शब्द महम्मद पैगंबराचे वर्णन करण्यासाठी वापरतात.) त्यामुळे हे गाणे चित्रपटातून काढण्याची "धमकी" मिळाली, आणि अर्ध्या रात्रीमधे हे गाणं पिक्चरमधून काढून टाकलं. कधी टीव्हीवर लागला तर अवश्य बघा, सुंदर पिक्चर आहे.

एखाद्या महान कलाकाराला आपल्याच एखाद्या कलाकृतीमुळे स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घ्यावा लागतो.आणि स्वदेशात परतण्याची इच्छा असूनही ते शक्य होत नाही;आणि एकाकी मरण येते.ही कलाकाराची शोकांतिका नव्हे काय?
एखदी कलाकृती नव्हे, कित्येक कलाकृती आहेत ज्या वादग्रस्त होत्या! देश सोडून जाणे हा त्याचा व्यक्तिगत निर्णय होता, माझ्यावरचे खटले काढून टाका मग मी देशात येतो असा त्याचा हट्ट होता, आणि त्याना एकाकी वगैरे काही मरण आलेले नाही. चांगले लेकराबाळामधे गेलेत.

आणि अशी शिक्षा एकाकी भोगूनही त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना टीकेचे लक्ष्य बनविणे कलाकारावर मृत्यूनंतरही अन्याय केल्यासारखे वाटत नाही का? जरूर वाटते, म्हणूनच हा बीबी का काढला असा मला पडलेला प्रश्न आहे.

खरी गंमत आता आहे!!

dr.sunil_ahirrao | 11 June, 2011 - 23:20 ही डॉक्टरसाहेबाची पोस्ट, यकदम गमतीशीर. याआधीच्या कुठल्याही प्रतिसादामधे आदिमानव, संस्कृती, हिंदू धर्मातील देवता, सरस्वती, वेद कुणी लिहिले, रामाचा, शंबूकाचा याचाही काहीही संबंध आलेला नाही. (अ‍ॅडमिनने उडवले असल्यास माहित नाही, तसे असल्यास सांगा!!)

मात्र, या पोस्टमधे अचानक २१ प्रश्न डॉक्टरानी विचारले आहेत!! आणि वर कृपया शांतपणे विचार करून माझ्या शंकांचे निराकरण करावे.मित्रहो.ही चर्चा आहे.आणि त्यात संयम आवश्यक असतो. नुसताच वितंडवाद काही उपयोगाचा नाही.हे सारे प्रश्न ओघानेच एम.एफ.एच.च्या वादग्रस्त चित्रांवरून आणि आपल्या प्रतिसादांवरून आले आहेत. कृपया गैरसमज नको. इथे कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही,हे पुनश्च सांगतो. कुणीही पांचटपणा केल्यास इथे लिहिण्यात खरोखरच 'राम' नाही,असे समजून संपूर्ण पोस्ट्स डिलीट केल्या जातील,याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद.

हे शेपूट जोडलय. काय संबंध आहे या प्रश्नाचा हुसैनशी??? फॉर दॅट मॅटर कुठ्ल्याही कलेशी? मग अचानक स्टार वर्ल्ड बघत असताना मधेच आस्था चॅनल लावल्यासारखे हे २१ अपेक्षित् प्रश्न कुठून आले? लोकानी हुसैनच्या वादग्रस्त चित्राबद्दल लिहिले होते. मधेच हे प्रश्न का उद्भवले या बीबीवर??? (या प्रश्नासाठी नविन बीबी काढता आला असता, तिथे यावर चर्चा करता आली असती की!!)

dr.sunil_ahirrao | 12 June, 2011 - 00:12 इथल्या प्रतिक्रियेमधे

इथे श्रद्धांजली ऐवजी धर्माचेच राजकारण सुरु आहे.चर्चांना पाय फुटले आहेत आणि आता ते आदिमानवाच्या उत्क्रांतीशी जाऊन पोचले आहेत.इथे काय कींवा माबोवर इतरत्रही असाच प्रतीसाद मिळणार असेल,तर इथेच ती चर्चा झालेली बरी. हे पुढचे गमतीशीर प्रकरण. Happy आदिमानवाच्या उत्क्रांतीशी स्वतः डॉक्टरसाहेब जाऊन पोचले आहेत. दुसर्‍या कुणीही त्याचा उल्लेख केलेला नाही.

इतरत्र हे प्रश्न विचारले असतेत तर "आसेच" प्रतिसाद मिळाले असते हे गृहितक कशाच्या आधारावर? आणि कसली चर्चा होणे अपेक्षित आहे? हुसैनची चित्रकला की हिंदू धर्म???? बीबीचा उद्देश हुसैन आहे की हिंदू धर्म??

उगाचच एखाद्याच्या श्रद्धांजली बीबीवर फालतू प्रश्न विचारून "माझ्या शेंडाना बुडखा प्रश्नाची उत्तरे द्या" असा धोषा लावणे फारच मजेदार प्रकरण आहे.

कुणीही पांचटपणा केल्यास इथे लिहिण्यात खरोखरच 'राम' नाही,असे समजून संपूर्ण पोस्ट्स डिलीट केल्या जातील,याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद.
चालू आहे, तितका पांचटपणा पुरेसा झाला असेल तर पोस्ट डिलीट करायला घ्या!! Light 1 आपण पोस्ट डिलीट केल्याने या मायबोलीचे अपरिमित नुकसान होइल, असं वाटतय का तुम्हाला????

tharalyapramane mazya prashnanchi uttare dya. >>> कुणाचे ठरलय??? कुणी ठरवलय?? कुठे? संदर्भासहित स्पष्टीकरण द्या.

>> tharalyapramane mazya prashnanchi uttare dya.
कुणी ठरवलय? का तुम्ही स्वतःच स्वतःची समजुत काढुन घेण्यासाठी ठरवलय?
असो या बीबीला प्रतिक्रिया न देवुनच संपवण आता अपरीहार्य आहे.

मी कोण? हा प्रश्न तुझ्यासाठी महत्त्वाचा. असणारच श्रद्धांजलीच्या बाफवर इतर >>> हुसेन बद्द्ल इतका पुळका आला असेल तर तुम्हिहि कतारला चालते व्हा.

बघ अजुनही तू काही तुझी पायरी सोडायला तयार नाही! सारखं आपली दुसर्‍यांची उतरवण्यावर असतोस. काय करणार दैव देते, कर्म नेते.! >>>>> दुसरा तयारच होउन बसला म्हणल्यावर उतरावी लागते. तुझा अपेक्षाभंग कशाला ? Proud

बरं उतरवयाची तर जॉकी आहे. चांगला ब्रॅण्ड आहे तेंव्हा जरा शरीर / मन लख्ख करून मग उतरव बरं. मला नाहीतरी समलिंगी मध्ये इन्टरेस्ट आहे! >>> मला नाहि. मी तुमची घमेंड उतरवण्याबद्दल बोललो. आता तुम्हि स्वता:च्या लायकीप्रमाणे, नेहमीच्या सवयीप्रमाणे आणी तुमच्या आजुबाजुच्या माहोलप्रमाणे अर्थ काढलाच, पार
समलिंगी पर्यत जाउन पोहोचलात. काय हे देशी! काय देशी (दारु) घेउन आला का काय ?

धर्म, देव, सरस्वती, आदिमानव अन वर असे हे उतरवणे अन काय काय. >> तुम्हाला उतरवणे याचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे कळले. काहि स्वता:ची अजुन शिल्लक असेल ( लाज शिल्लक असेल असे मला म्हणायचे आहे - तुम्हि काय अर्थ घ्याल माहित नाहि Proud ) तर इथुन कलटी मारा. उतरली आहेच तुमची (लाज) माझ्या एका पोस्ट मध्ये! Proud

Happy

बापरे! २ दिवसात एवढ्या पोस्ट्स????? आणि तरीही डॉक्टरसाहेबांनी हुसेनच्या कलाकृतींविषयी अजूनही भाष्य केलेले नाहीच!!!! उलट विषयाशी काहीही संबंध नसलेले हिंदू धर्माविषयीचे प्रश्न विचारुन मूळ विषयाला कलाटणी दिली...

मी पूर्णपणे धर्मनिरपेक्ष, नास्तिक संस्कारात(?) वाढलेले असूनही मला हुसेननी काढलेली चित्रे हा शुद्ध खोडसाळपणा वाटला. इतर अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रांपेक्षा ही चित्रे नक्कीच वेगळी आहेत. देव-देवतांना नग्न रुपात चित्रीत करुन समजण्याच्या दृष्टीने त्यावर नावेही लिहिलेली आहेत... हो! उगाच गैरसमज नको!हुसेनांची 'वैचारिक स्पष्टता' त्यातून दिसून आलीच, हेतूही समजला, हे वेगळे सांगायला नकोच! गुगल सर्च केल्यास सगळी चित्रे पहायला मिळतातच! प्रत्यक्ष चित्रे, तसेच लिंक दिली असती, पण लिंक दिल्यास अ‍ॅडमीन ती उडवत आहेत, हे लक्षात आल्याने, देत नाहीये!

डॉ़क्टरसाहेबांनी सुरुवातीला अगदी निरपेक्षपणे लिहिल्याचा आव आणला असला तरीही २१ अपेक्षित प्रश्नांमधून त्यांची नेमकी समस्या लक्षात आली! 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या उक्तीनुसार हिंदू धर्माविषयी त्यांना असलेला राग आणि हुसेन यांनी ह्या धर्माच्या आदरस्थानांना आणि पर्यायाने त्या धर्मातील लोकांना खिजवल्यामुळे डॉक्टरसाहेबांना झालेला आनंदच यातून दिसून आला. मग भारतमातेचेही तसले चित्र काढलेले असेना का! ह्या देशाशी, देशातल्या लोकांशी आणि त्यांच्या भावनांशी आपल्याला काय देणे घेणे? आपला राग काढता आला ना, म्हणजे झाले! असा डॉक्टरांचा हेतू दिसतो आहे! त्यांनी कितीही संयमित पोस्टी लिहिल्या, तरीही तो लपत नाहीये...

चर्चांतूनच देवाणघेवाण होत असते. सगळेच शब्द उडून जात नाहीत.. अभिनिवेश गळून पडल्यानंतर त्यातले थोडेतरी घुसतातच. जे योग्य आहे ते नाकारणं अवघड आहे.

सानी यांचे पोस्ट छान आहे... आवडले.

हुसेन बद्दल किंवा त्यांच्या चित्रांबद्दल काहीच मत व्यक्त न करता... अनेक संबंध नसलेले प्रश्न विचारलेले आहेत.

नंदिनी आणि सानीला अनुमोदन, अतिशय कुरापतखोर वृत्तीने काढलेला धागा आहे हे स्पष्ट दिसते आहे.
मला काही लिहायचे आहे. पण इथे नको.

Doctor जरी हुसेन यांनी विशिष्ट धर्मियांना दुखावणारी चित्रे काढली असली तरी धर्माचा उल्लेख न करण्याचा आग्रहच असेल तर "हुसेन ह्यांनी एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावणारी चित्रे काढल्यामूळे ज्यांच्या भावना इतक्या दुखावल्या गेल्या आहेत की, हुसेन ह्यांच्या निधनानंतरही त्यांना त्याबद्दल माफ करावे असे त्यांना वाटत नाहि." असे समजा. सर्वांनी एकाच मापाने वागावे असा दुराग्रह का ? इतरांच्या भावना का दुखावल्या जाव्यात किंवा त्यांच्या इतक्याच का दुखावल्या जाव्यात, ह्या प्रश्नांना काही अर्थ नाहि.

तुम्हाला त्यांना माफ करता येतेय, Good for him and you. आम्हाला त्यांच्यातल्या कलाकारापुढे आलेला प्रश्न दिसतोय. Let it be. We are happy where we are.

डॉक्टर, भारतीय असल्याचे कबूल केलेत अभिनंदन. मग आता भारतमातेच्या चित्राचा रसास्वाद कराच की.
अजूनही एक करु शाता, जर मुद्दे संपलेत तर तसे लिहा. बीबी अप्रकाशित करा किंवा वर सगळे म्हणताहेत तसे एकेक चित्राचा रसास्वाद लिहा.

कोनाला श्रद्धांजली? पळकुट्या आचरटाला? उगाच मोठी मोठी स्पष्टीकरणे देवुन आणि प्रश्न विचरून स्वताला विचारवन्त समजायचे असेल तर जरूर समजा.

Pages