रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून सरकारने काय साधले?

Submitted by dr.sunil_ahirrao on 6 June, 2011 - 00:17

काल रात्री १ वाजता अचानक पोलिसांनी बळाचा वापर करून रामदेवबाबांना अटक करून आंदोलन चिरडून काढले.यावेळी अश्रधुराचा आणि लाठीमाराचा वापर केला गेला.इतकेच नव्हे तर काही 'पोलिसांनी' आंदोलकांवर दगडफेक सुध्दा केल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखवले.किरकोळ तांत्रिक कारणाचा आधार घेऊन पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढले,हे कितपत समर्थनीय आहे? असे करून सरकारने काय साधले?

१)सरकारला हे आंदोलन महागात पडणार होते,म्हणून येनकेनप्रकारेण त्यांना बाबांना तेथून हटवायचे होते? असे करून सरकारने स्वतःची चिंता मिटवली?

२)अण्णा हजारे रामदेवबाबांना पाठींबा देण्यासाठी आंदोलनस्थळी हजेरी लावणार होते,त्यामुळे आंदोलनाची ताकद वाढली असती-जे सरकारला होऊ द्यायचे नव्हते?

३)बाबा आंदोलनस्थळावरून सरकारचे एखादे मोठे बिंग फोडण्याची शक्यता होती?

ती आता नाहीशी झाली?

४)भविष्यात अशी आंदोलने होऊ नयेत यासाठी दहशत बसावी म्हणून? की

५)सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे बनत चालले आहे? असे असेल,तर मग सरकारचे आणि भारताचे भविष्य अंधारमय आहे ,असे नाही वाटत?

Group content visibility: 
Private - accessible only to group members

>>> मनमोहनसिंग मागच्या ४-५ दिवसात कधी नव्हे ते अतिशय निराश हताश वाटले.

मॅडम रागावलेल्या किंवा नाराज असाव्यात!

राजेश्वर, चांगल्या लिंक करता धन्यवाद!! इथे चर्चा/वादविवाद ( अर्थातच, मी करतो ती चर्चा इतर करतात तो वादविवाद Happy ) करणार्‍या सर्वांना विनंती की ही लिंक जरूर पाहा व आपले मत -मग ते काहीही असो- त्या संकेतस्थळावर जरूर व्यक्त करा

बाबा ५००० रु पर हेड घेऊन योगा शिकवतात असं ठमाबाईनी साम्गिलं आहे ना?
हा रेट दिवसचा ? महिन्याचा कि वर्षाचा ?

बी.एस्.के अय्यंगारांचा काय रेट आहे ?

अहो रामदेव बाबा सामान्य माणसांना योग फुकट शिकवतात. स्टेज माईक इ खर्च स्थानिक कार्यकर्ते करतात.

Throwing a new challenge at the UPA government, yoga guru Baba Ramdev has announced that he would give arms training to 11,000 young men and women - for self-defense - if the government repeats the ‘Ramlila Ground incident’ in future

है शाबास !!

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजुए कातिल में है ।

करता नहीं क्यों दुसरा कुछ बातचीत,
देखता हूँ मैं जिसे वो चुप तेरी महफिल मैं है ।

रहबर राहे मौहब्बत रह न जाना राह में
लज्जत-ऐ-सेहरा नवर्दी दूरिये-मंजिल में है ।

यों खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसी के दिल में है ।

ऐ शहीदे-मुल्को-मिल्लत मैं तेरे ऊपर निसार
अब तेरी हिम्मत का चर्चा ग़ैर की महफिल में है ।

वक्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमां,
हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है ।

खींच कर लाई है सब को कत्ल होने की उम्मींद,
आशिकों का जमघट आज कूंचे-ऐ-कातिल में है ।

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजुए कातिल में है ।

है लिये हथियार दुश्मन ताक मे बैठा उधर,
और हम तैय्यार हैं सीना लिये अपना इधर,

खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है!
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है!

हाथ जिनमें हो जुनून कटते नही तलवार से,
सर जो उठ जाते हैं वो झुकते नहीं ललकार से,

और भडकेगा जो शोला सा हमारे दिल में है!
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है!

हम तो घर से निकले ही थे बांधकर सर पे कफ़न,
जान हथेली में लिये लो बढ चले हैं ये कदम,

जिंदगी तो अपनी मेहमान मौत की महफ़िल मैं है!
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है!

दिल मे तूफानों की टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उडा देंगे हमे रोको न आज,

दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंजिल मे है!
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है!!

नितिनचंद्र,५०० आणि १००० रु.च्या नोटा रद्द करा या मागणीमुळे कोणी हवालदिल झाले असेल याची शक्यता अगदीच कमी आहे. कारण काळा पैसा(तोही स्विस बँकांतला,ज्याविषयी प्रामुख्याने हे आंदोलन चालू होते,)या नोटांमध्ये फारसा नसतो.तो अ‍ॅसेट्स च्या स्वरूपात विखुरलेला असतो. तसेच यापूर्वीही हा उपाय योजण्यात आला होता.एक हजार रुपयांची नोट रद्द केली गेली होती.पाचशे रुपयांच्याही पूर्वींच्या सर्व सीरीज(किंवा एक विवक्षित सीरीज) मागे घेऊन नवीन सीरीज छापण्यात आल्या होत्या. त्याचा(फारसा) उपयोग झालेला नाही याचा पूर्वानुभव रिझर्व बँक आणि सरकारकडे दप्तरी नोंद झालेला आहे .

एकच उपाय :

काळा पैसा बाळगला आहे हे सिद्ध करुन गुन्हेगाराला/ भ्रष्टाचारी माणसाला ताबडतोब फाशीची शिक्षा देणे.

जर त्याने देशाला पैसा परत केला तर फाशी रद्द करणे.

fashichi shiksha sarv bhrashtacharyanna dilee gelee tar bhartachi 50% loksankya kami hoil !

जागोमोहनप्यारे ~~
एकच उपाय : काळा पैसा बाळगला आहे हे सिद्ध करुन गुन्हेगाराला/ भ्रष्टाचारी माणसाला ताबडतोब फाशीची शिक्षा देणे.

~ दुर्दैवाने ही कल्पना फक्त चर्चेपुरतीच सीमित राहील, हे नि:संशय. कारण मुळात 'फाशीची शिक्षा' तशा गुन्ह्यासाठी द्यावी अशा स्वरूपाचे बील प्रथम संसदेत मंजूर होणे अत्यावश्यक आहे. मग तीवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी...मग नंतर तिचा घटनेत समावेश...मग त्याचे कायद्यात रुपांतरासाठी व्याख्या करणे....आणि मग त्यावर चर्चाचर्वितण....त्याचे प्रोज अ‍ॅण्ड कॉन्स...इ. इ....किती काळ जावा लागेल, याचा अंदाज बांधू शकतो आपण.

~ आणि हे करणार कोण ? तर आपले महनीय असे ५४० खासदार....म्हणजे तुम्ही जाणतच असाल की या लॉटमधील 'धुतल्या तांदळाचे' किती असतील? करू देतील का ही मंडळी ते बिल पास ? कदापिही नाही.

~ स्वीस बॅन्किंगबद्दल गेले दोन दिवस या धाग्यावर खूप चर्चा झाल्याचे वाचंनात आले. मुळात स्वीस बॅन्क हा एक असा राष्ट्रीय व्यवसाय आहे जो गेली कित्येक शतके अव्याहत चालू आहे. स्विट्झर्लंडने जाणीवपूर्वक आपली तटस्थता (Neutrality) जोपासली आहे. युरोपीय कम्युनिटीनेही त्यास सोयिस्कर मान्यता दिली असल्याने युरोप दोन महायुद्धात पोळत असतानादेखील स्वीसमधील आर्थिक व्यवहाराना कोणतीही ढाळ लागली नव्हती. नाझी गुन्हेगारांवर 'न्युरेंबर्ग खटल्या' दरम्यान ज्या व्हायच्या त्या शिक्षा झाल्याही, पण त्यापैकी कित्येकांची स्वीस बॅन्कांतील खाती विनातक्रार चालू होती....आजही त्या खात्यांना वारस नसल्याने ती खाती त्या त्या बॅन्केत "सस्पेंन्स" अकौंटअंतर्गत जपली गेली आहेत.

तटस्थततेच्या धोरणाचाच पाठपुरावा करीत राहिल्याने त्या देशाने 'युनो' चेही सदस्यत्व घेतले नव्हते....मग त्यांच्यावर दडपण आणायचे म्हणजे मग नेमके काय? हाही अमेरिकेपुढे प्रश्नच होता. २००२-०३ मध्ये याच अमेरिकेच्याच आग्रहापोटी स्विट्सर्लंड कसाबसा युनोचा सदस्य झाला असला तरी प्रत्यक्ष 'पोटाचा' प्रश्न आला की तिथे मूग गिळून चूप बसतो.

आताआता फक्त एका कारणासाठी तेथील अकौंट्सबाबत काहीसे 'उदार' धोरण तेथील बॅन्किंग इंड्स्ट्रीजने (हीच मंडळी सरकार चालवितात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही) ठेवले आहे. ते म्हणजे एखाद्या देशाने "अ" नावाची व्यक्तीने त्या देशात 'टॅक्स' चुकविला असल्यास त्या "अ" चे खाते स्वीस बॅन्केत आहे का? आणि असल्यास त्याचा तपशिल देणे. पण हेदेखील 'ईझी' होते का ? बिलकुल नाही, मुळात त्या 'अ' ने तिथे आपले खाते 'अ' नावानेच ठेवणे क्रमप्राप्त असते. आता अशी 'शहाणी' व्यक्ती कोणत्या नावाने तिथे खाते उघडून आपला पैसा सुरक्षित ठेवत असेल याचा लेखाजोखा त्या संबंधित सरकारकडे असण्याची सुतराम शक्यता नसते. त्यामुळे कितीही डोके आपटले तरी तेथील पैसा जादुची कांडी फिरविल्याप्रमाणे दिल्लीत येऊन पडेल अशी अपेक्षा बाळगणे केव्हाही चूकच.

आज स्वीस सरकार निदान काही उत्तर तरी देऊ करते....त्या त्या सरकारचा 'दबदबा' पाहून...पण दुसरीकडे 'सिंगापूर' आणि 'हॉन्गकॉन्ग' ही दोन प्रबळ ठिकाणे अशा 'सो-कॉल्ड सिक्रसी बॅन्किन्ग बिझिनेस' मध्ये उतरत आहेत. काळा पैसा बाळगणार्‍याना ही दोन नावे जर आकर्षित करीत असतील आणि त्याप्रमाणे त्या गंगेने तिकडे प्रवाह वळविला तर भारत सरकार सिंगापूर आणि हॉन्गकॉन्गला दोन ओळीचे पत्रही पाठवू शकणार नाही.

@जागोमोहनप्यारे,फाशी ही अशक्य कोटीतील गोष्ट वाटते. इथे दहशतवाद्यांनाही फाशी दिली जात नाही,मग आर्थिक गुन्ह्यांसाठी तो कायदा अस्तित्वात येण्याची शक्यता नाहीच! मात्र स्वीस बँकेतील पैसा भारतात आणावयाचा असल्यास त्यासाठी जनतेचा कळवळा असणारे सरकार सत्तेवर असणे आवश्यक आहे.आता जनता जागृत होत आहे, आताच काय ते होऊ शकेल; एकदा विषय मागे पडला की मग तो पैसाही तेथे उरणार नाही. म्हणून सरकार कोणतेही असो आपण हा मुद्दा सतत पुढे आणला पाहिजे.
यापुढे कोणत्याही भारतीय नागरिकांना विदेशी बँकांमध्ये पैसा ठेवावयाचा असल्यास त्यासाठी भारत सरकारची परवानगी आवश्यक करावे;त्यासाठी गरज वाटल्यास कायदा करावा.किंवा हे सर्व देशांच्या दृष्टीने फायदेशीर असल्यामुळे या संबंधी 'आंतरराष्ट्रीय कायदा' करण्यासाठी इतर देशांशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे. हे सुध्दा न जमल्यास निदान स्वीस वा तत्सम देशांशी या मुद्द्यासंदर्भात काही करार करता आल्यास ते पहावे.

प्रतीक देसाई,खरोखर उत्कृष्ट प्रतिसाद.अगदी वास्तवच उलगडून दाखवलंत.आपल्याला'आपण काहीतरी उपाय सुचवतोय व त्याद्वारे चळवळीला हातभार लावतोय,असे समाधान व गुंगी हवी असते.म्हणून काळा पैसा भारतात आणा असा धोशा लावला जातो.प्रत्यक्षात ते वास्तवापासून किती दूर आहे हे तुम्ही दाखवून दिलं आहे. धन्यवाद.

<<सध्याचे सरकार पडणे अशक्य आहे हे मी कालच विविध पक्षांचे संख्याबल सांगून दाखवून दिले आहे. हे सरकार पडणे अशक्य आहे हे सर्व पक्षांना माहित आहे. त्यामुळे तसा कोणीही प्रयत्न करत नाही.>>
सध्याच्या परिस्थितीत विरोधी पक्षात असण्यातच खरं सुख आहे , हे विरोधी पक्षांना चांगलं माहीत आहे.
----
रामदेवबाबांनी स्वतःची सशस्त्र सेना स्थापन करायचा इरादा व्यक्त करून त्यांच्यावर मध्यरात्री झालेली कारवाई कशी योग्य होती, हे स्वतःच दाखवून दिलेय.

रामदेवबाबांनी स्वतःची सशस्त्र सेना स्थापन करायचा इरादा व्यक्त करून त्यांच्यावर मध्यरात्री झालेली कारवाई कशी योग्य होती, हे स्वतःच दाखवून दिलेय. >>>

मध्यरात्री झालेली कारवाईला उत्तर देण्यासाठी त्यांनी सशस्त्र सेना स्थापन करायचा इरादा व्यक्त केला आहे. मला तरी त्यात काहि चुकिचे वाटत नाहि. सामान्य माणसाने शस्त्र घेउन रस्त्यावर उतरायची वेळ खरोखर येत चालली आहे.

@हीरा....

~ मी तुम्हाला सांगितले तर कदाचित आश्चर्य वाटेल, पण वस्तुस्थिती अशी आहे की, दहाएक मिनिटापूर्वी मी तुमचाच 'काळा पैसा' या धाग्यावरील प्रदीर्घ प्रतिसाद वाचत होतो, अन् त्यावेळी राहूनराहून मनी येत होते की तुमच्या तेथील म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ येथील माझ्या वरील प्रतिसादातील काही भाग परत वाढवून द्यावा की काय ! जेणेकरून 'स्वीस बॅन्क' आणि सरकारचे दडपण या विषयावर सखोल लिखाण होईल.

थांबलो थोडा वेळ, आणि आत्ता खुद्द तुमचाच माझ्या त्या बाबतीतील विचाराना आधार देणारा प्रतिसाद वाचला. मनःपूर्वक धन्यवाद !

काळ्या पैशाची व्याख्या करणे हे जितके जटिल काम आहे तितकेच तो युरोपमधून इथे विनासायास येईल असा विचार देखील एक दिवास्वप्नच शाबित होणार आहे. मूळात सध्या या क्षणी या खंडप्राय देशाचे 'भारत' आणि "इंडिया" असे सरळसरळ दोन भाग पडले आहेत. राजकारण चालते ते 'भारत' देशात राहणार्‍या मतदारांवर तर आर्थिक नाडीच्या नीला आणि रोहिणी धावतात त्या 'इंडिया' व्याख्येत असणार्‍या धनदांडग्यांच्या शक्तीवर. जर दिल्लीकर श्वासासाठी 'इंडिया' तील मूठभर लोकांवर अवलंबून असतील तर हा 'प्रोटेक्टेड सेक्टर' या राजकारण्यांना 'स्वीस एअर' च्या विमानात बसवू देईल का कधी ?

कितीही थयथयाट केला तरी गेंड्याचे कातडे असणारे दिल्लीकर (मग ते कोणत्याही पक्षाचे असोत...इट मेक्स नो डिफरन्स !) या देशात दोनच जाती कायम राहतील हेच पाहणार....एक भारतीय आणि दुसरे इंडियन....पैकी इंडियन्सना भारतीय लोकांसंबंधी कोणत्याही कर्तव्याची जाणीव अगर संवेदना राहणार नाही....आजही नाहीच.

ह्म्म्म कितीही कटू असले तरी हे सत्य आहे की काहीही करणे शक्य नाही. कोणत्याही प्रकारचा काळा पैसा (विशेषतः बाहेरच्या देशातला) मुळात कळणेच कठीण आहे तर तुम्ही तो आणणार कसा ?
त्यापेक्षा जास्तीत जास्त चांगल्या सतशील प्रवृत्तीच्या लोकांनी (ला.ब.शास्त्री सारखे) राजकारणात जाऊन जास्तीत जास्त सतप्रवृत्तीचा दबाव निर्माण करणे हा एकच उपाय दिसत आहे.

"...सतशील प्रवृत्तीच्या लोकांनी (ला.ब.शास्त्री सारखे) राजकारणात जाऊन जास्तीत जास्त सतप्रवृत्तीचा दबाव निर्माण करणे ...."

~ महेश....या तुमच्या आशादायी सूर असलेल्या वाक्यात फक्त एकच अ‍ॅड करतो : Provided people elects him. आज लालबहादुरजींच्याही विरोधात धनदांडगा उभा राहू शकतो आणि मनगटाच्या जोरावर (अगदी तुरुंगात राहुन) निवडूनही येऊ शकतो हे तुम्ही आम्ही पाहतो आहेच.

अतिशिक्षित समजल्या जाणार्‍या मतदारसंघातून गोविंदा, विनोद खन्ना, धर्मेन्द्र सारखे टुकार अभिनेते 'नेता' म्हणून निवडून येतात आणि एक दिवसही संसदेच्या कामकाजात भाग घेत नाहीत, तर त्याचा दोष त्यांच्याकडे न जाता मतदारांकडेच जाईल ना? मग अशा वृत्तीच्या मतदारांपुढे उद्या प्रत्यक्ष विवेकानंद उमेदवार म्हणून आले तर त्यांचे मत विरोधात उभे राहिलेल्या बहुरूपी रजनीकांतला जाईल.

सर्व प्रश्नांना एकच उत्तर आहे ते म्हणजे प्रत्येकाने स्वतःची सदसदविवेकबुद्धी जागी ठेवून सभ्यतेने वागणे. स्वतःच स्वतःचा अभ्यास करणे (स्व-अध्याय). तरच सतप्र्वृत्ती वाढीस लागू शकेल.
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भुता !

>>> रामदेवबाबांनी स्वतःची सशस्त्र सेना स्थापन करायचा इरादा व्यक्त करून त्यांच्यावर मध्यरात्री झालेली कारवाई कशी योग्य होती, हे स्वतःच दाखवून दिलेय.

असा इरादा व्यक्त करणार्‍याला देशद्रोहाच्या आरोपाखाली कायमचे आत टाकायला हवे. इतका गंभीर इरादा व्यक्त करून सुध्दा त्यांना मोकळे का सोडले आहे? आणि हा इरादा त्यांनी उपोषणाच्या दिवशी व्यक्त केला नव्हता व ते आणि निशस्त्र आंदोलक मध्यरात्री शांत झोपलेले असताना त्यांना अशृधूर सोडून झोडपून काढण्याची काय गरज होती?

http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/aheteaseahe/entry/%E0%A4%AC...

"...सर्व प्रश्नांना एकच उत्तर आहे ते म्हणजे प्रत्येकाने स्वतःची सदसदविवेकबुद्धी जागी ठेवून सभ्यतेने वागणे...."

~ इथे पुन:श्च ते Law of Probability चे तत्व समोर येते, महेश. काय मीटर आहे तुमच्याकडे वा माझ्याकडे की ज्यावरून प्रत्येकाची सदसविवेकबुद्धी चेक करता येईल? लोकशाही प्रणाली राबविणार्‍या देशात कर्ताकरविता आहे तो 'मतदार' आणि आज परिस्थिती अशी आली आहे की 'बाय हूक ऑर बाय क्रूक" त्याला आपल्या पंखाखाली घेतले की झाला सुरू देशाचा कारभार....मग इथे घेणार्‍यापेक्षा देणार्‍याची बुद्धी कोणत्या गटातील आहे यावरच या देशाचे तारू व्यवहाररूपी समुद्रात जाऊ शकेल ना? आणि आपणास तर या प्रमेयाचे उत्तर माहीतच आहे की या 'देणार्‍या' ची बुद्धी सदसद आहे की अन्य कुठल्या रंगाची !

आपली भावना प्रामाणिक आहे पण ती व्यावहारिक जगात कितपत प्रभावी ठरेल याबद्दल मी साशंक आहे. असो.

मतमोजणीत गडबड करून स्वतःला निवडून आणलेले पी चिदंबरम् यांनी लाठीमार व अश्रृधूराचे समर्थन करताना खालील तारे तोडलेले आहेत.

"रामदेवबाबांच्या आंदोलनामागे संघ आहे. भ्रष्टाचाराविरूध्द आंदोलन करणार्‍या सर्वांना आपला पाठिंबा देण्याचे संघाने ठरविले आहे. २ एप्रिलला संघाने एक भ्रष्टाचारविरोधी समिती स्थापन केली असून रामदेवबाबांचा त्या समितीत समावेश आहे."

बरोबर आहे. काँग्रेस कितीही भयंकर लुटारूंची टोळी असली तरी संघ म्हणजे अल कैदापेक्षाही भयंकर संघटना. त्यांनी केलेली कोणतीही कृती, मग तो भ्रष्टाचाराला विरोध का असेना, गुन्हाच असणार. अशा भयंकर संघटनेवर कायमची बंदी घातली पाहिजे.

यापुढे कोणीही भ्रष्टाचारविरोधात आवाज उठविला तर त्याला संघाचा स्वयंसेवक समजले जाईल.

@sangh pathishi asanyachya shakytevarun lokshahivirodhi krutya karane nivval murkhpana aahe.. sanghavar aataparyant 3-4 vela bandi ghatali geli aahe. sangh satat vadgrast rahila asala tari aanibanichya kalat sanghane desh hitasathi kahi changali kamehi keli hoti. mala watate, he sarkar 1975 te 1977 chya kalakade bhartala gheun jaat aahe. yapudhil konatehi aatataayi krutya cogress la sattevarun khali yenyas purese tharave !

रामदेवबाबांच्या आंदोलनामागे संघ आहे.>>>>> यामुळे फरक काय पडतो?
काँग्रेसने एकेकलमी कार्यक्रम चालू केला आहे असे वाटते.... हिन्दुत्वाविरोध!

Pages