रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून सरकारने काय साधले?

Submitted by dr.sunil_ahirrao on 6 June, 2011 - 00:17

काल रात्री १ वाजता अचानक पोलिसांनी बळाचा वापर करून रामदेवबाबांना अटक करून आंदोलन चिरडून काढले.यावेळी अश्रधुराचा आणि लाठीमाराचा वापर केला गेला.इतकेच नव्हे तर काही 'पोलिसांनी' आंदोलकांवर दगडफेक सुध्दा केल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखवले.किरकोळ तांत्रिक कारणाचा आधार घेऊन पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढले,हे कितपत समर्थनीय आहे? असे करून सरकारने काय साधले?

१)सरकारला हे आंदोलन महागात पडणार होते,म्हणून येनकेनप्रकारेण त्यांना बाबांना तेथून हटवायचे होते? असे करून सरकारने स्वतःची चिंता मिटवली?

२)अण्णा हजारे रामदेवबाबांना पाठींबा देण्यासाठी आंदोलनस्थळी हजेरी लावणार होते,त्यामुळे आंदोलनाची ताकद वाढली असती-जे सरकारला होऊ द्यायचे नव्हते?

३)बाबा आंदोलनस्थळावरून सरकारचे एखादे मोठे बिंग फोडण्याची शक्यता होती?

ती आता नाहीशी झाली?

४)भविष्यात अशी आंदोलने होऊ नयेत यासाठी दहशत बसावी म्हणून? की

५)सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे बनत चालले आहे? असे असेल,तर मग सरकारचे आणि भारताचे भविष्य अंधारमय आहे ,असे नाही वाटत?

Group content visibility: 
Private - accessible only to group members

हसन अलीविरूध्द कारवाई करायला युपीए सरकारने ३ वर्षे घेतली, ए राजाविरूध्द २ वर्षांनी कारवाई करावी लागली, कलमाडीला आत टाकायला ९ महिने लागले; पण रामदेव बाबांविरूध्द कारवाई फक्त एका दिवसात झाली.

मास्तुरे | 10 June, 2011 - 05:03
हसन अलीविरूध्द कारवाई करायला युपीए सरकारने ३ वर्षे घेतली, ए राजाविरूध्द २ वर्षांनी कारवाई करावी लागली, कलमाडीला आत टाकायला ९ महिने लागले; पण रामदेव बाबांविरूध्द कारवाई फक्त एका दिवसात झाली.

मास्तुरे, धन्यवाद.

हे सर्व काळे पैसे निर्माण करणारे होते जे सरकारला हवे होते म्हणुन दिरंगाई ( गाई -गाई )

रामदेव बाबा हे पैसे निर्माण होण्याच्या विरोधात होते ( खात्रीने कारण वेगाने कारवाई )

मतमोजणीत गडबड करून स्वतःला निवडून आणलेले पी चिदंबरम् यांनी लाठीमार व अश्रृधूराचे समर्थन करताना खालील तारे तोडलेले आहेत. << आता काँग्रेसवाल्यांना जळी स्थळी काष्ठीपाषाणी संघ संघ आणि संघच दिसतोय ....अगदी उद्या त्यांच्या सांबारमध्ये झुरळ पडले तरी यात संघाचाच हात आहे असं म्हणायलाही ते कमी करणार नाहीत.

@स्वप्ना: >> अगदी उद्या त्यांच्या सांबारमध्ये झुरळ पडले तरी यात संघाचाच हात आहे असं म्हणायलाही ते कमी करणार नाहीत.

डेडली संधर्भ दिलाय....... Happy

@स्वप्ना: >> अगदी उद्या त्यांच्या सांबारमध्ये झुरळ पडले तरी यात संघाचाच हात आहे असं म्हणायलाही ते कमी करणार नाहीत.

डेडली संधर्भ दिलाय.......

डेडली काय आहे ? अहो पध्दत आहे ती. महात्मा गांधीच नाव घेऊन वाटेल तसे वागणे , धर्मनिरपेक्षता ( म्हणजे लांड्यांच लांगुलचालन ) आणि संघाला शिव्या या पायर्‍या पार केल्या शिवाय काँग्रेसमध्ये सच्चा काँग्रेसमन ही उपाधी मिळत नाही. सत्ता नाही मिळाली तरी उपाधीवर अनेक काँग्रेसमन खुष असतात.

शिवाजी महाराजांचं प्रसिद्ध वाक्य आहे," स्वधर्म सहिष्णुता म्हणजे दुसर्‍या धर्माबद्दल अनादर नव्हे आणि परधर्म सहिष्णुता म्हणजे स्वतःच्या धर्माबद्दल अनादर नव्हे." पण स्वधर्माचा अनादर केल्याशिवाय दुसर्‍या धर्माबद्दल आम्हाला आदर आहे हे आता स्वतंत्र भारतात सिद्ध किंवा खरेच वाटत नसावे म्हणून हे लांगुलचालन ...

शिवाजी महाराजांचं प्रसिद्ध वाक्य आहे," स्वधर्म सहिष्णुता म्हणजे दुसर्‍या धर्माबद्दल अनादर नव्हे आणि परधर्म सहिष्णुता म्हणजे स्वतःच्या धर्माबद्दल अनादर नव्हे

>>
कुठे आहे हे वाक्य? महाराजांनी लिहिलेल्या पुस्तकात की केलेल्या भाषणात? सन्दर्भ द्या प्लीजच.

नक्की कुठे आहे हे माहित नाही. शाळेत असताना शिवराज्याभिषेकाचा सोहळा गॅदरिंगला बसवून घेतला होता. त्यात हे वाक्य शिवरायांच्या तोंडी होते. आणि ते स्वतः शिवरायांचे असो वा नसो मला तरी या वाक्यात आक्षेपार्ह काहीच वाटत नाही. नक्की कुठे आहे हे वाक्य हे मी तुम्हाला विचारून नक्की सांगेन बाजो Happy

सुटलो! आता हा बा.फ. ही बंद करायला हरकत नसावी.

अरे घाई कसली ! जरा पुढ्यातली डिश संपवतो आणि मग विस्तृत लिहीतो. ५००० पर्यंत नेऊयात..

नमस्कार dr.sunil_ahirrao,
मायबोलीवर वेगवेगळे ग्रुप आहेत जे आपल्याला

या दुव्यावर दिसू शकतील. त्यात अशा स्वरुपाच्या चर्चांसाठी, चालू घडामोडी हा ग्रुप आहे.

कृपया, आपले रोजच्या जीवनातील घटनांवरील धागे, चालू घडामोडी या ग्रुपमध्ये काढून सहकार्य करावे. म्हणजे माहिती/चर्चा योग्य त्या ग्रुपमध्ये एकत्रित सापडेल आणि प्रशासकांचे धागे हलवण्याचे काम हलके होईल. धन्यवाद.

he dhage hitguj madhye pratisadansah kase takavet? krupaya margdarshan kara. dhanyavad.

नमस्कार dr.sunil_ahirrao,

सध्या हे धागे, प्रशासकांनी हलवले आहेत. त्यामुळे तुम्हाला या धाग्यांच्या पुनर्रचनेसाठी काही करण्याची गरज नाही. मात्र, यापुढील नवीन धागे, कृपया चालू घडामोडी या दुव्यावर जाउन तिथे 'नवीन लेखनाचा धागा' हा दुवा वापरून सुरू करावेत. म्हणजे ते आपोआप 'चालू घडामोडी' ग्रुप अंतर्गत समाविष्ट होतील.

वेगळ्या धाग्यावर देता आले असते पण मला वाटते शेवटी सर्व मार्ग एकाच स्टेशन ला जाऊन मिळत आहेत तेव्हा, हे घ्या:
http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-interview-with-sri-sr...

आता पुढील क्र. कुणाचा लागतो ते पाहुया..

बाकी:
>>Our youth volunteers approach the government officials and put a sticker on their tables saying, 'I will not take bribe'. This is on the bureaucratic level.

हे कुठल्या कार्यालयात केले आहे जरा कुणी aol वाल्यांनी माहिती दिलीत (फोटो टाकला तर फारच ऊत्तम!) तर पुढील सरकारी कामासाठी त्याच कार्यालयात जाईन म्हणतो.

Pages