रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून सरकारने काय साधले?

Submitted by dr.sunil_ahirrao on 6 June, 2011 - 00:17

काल रात्री १ वाजता अचानक पोलिसांनी बळाचा वापर करून रामदेवबाबांना अटक करून आंदोलन चिरडून काढले.यावेळी अश्रधुराचा आणि लाठीमाराचा वापर केला गेला.इतकेच नव्हे तर काही 'पोलिसांनी' आंदोलकांवर दगडफेक सुध्दा केल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखवले.किरकोळ तांत्रिक कारणाचा आधार घेऊन पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढले,हे कितपत समर्थनीय आहे? असे करून सरकारने काय साधले?

१)सरकारला हे आंदोलन महागात पडणार होते,म्हणून येनकेनप्रकारेण त्यांना बाबांना तेथून हटवायचे होते? असे करून सरकारने स्वतःची चिंता मिटवली?

२)अण्णा हजारे रामदेवबाबांना पाठींबा देण्यासाठी आंदोलनस्थळी हजेरी लावणार होते,त्यामुळे आंदोलनाची ताकद वाढली असती-जे सरकारला होऊ द्यायचे नव्हते?

३)बाबा आंदोलनस्थळावरून सरकारचे एखादे मोठे बिंग फोडण्याची शक्यता होती?

ती आता नाहीशी झाली?

४)भविष्यात अशी आंदोलने होऊ नयेत यासाठी दहशत बसावी म्हणून? की

५)सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे बनत चालले आहे? असे असेल,तर मग सरकारचे आणि भारताचे भविष्य अंधारमय आहे ,असे नाही वाटत?

Group content visibility: 
Private - accessible only to group members

रामदेव बाबा यांच्या जिवाला धोका असल्याचा शोध लागला आहे.... म्हणुन त्यांना हलवले :स्मित:. या मधे बाबांना मारायची छुपी धमकी तर नाही आहे ना?

भविष्य अंधकार मय आहे. सर्व चोर लोकं सरकारात आहेत. तरुणांनी भ्रष्टाचार निपटायला बाहेर यायला हवे असे म्हणणारे राहुल आता बिळात का अडकले.

जर खरोखरच रामदेव बाबा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असतिल तर ते पुन्हा उपोषण सुरु करु शकतात. पण त्यांच्या मागचे हेतू बद्दल प्रामाणिक शंका आहेत.

पण `आमरण' उपोषण करायला तयार असणार्‍या बाबांना वेषांतर करुन पळ काढावासा आणि मला काही झाले तर....... असा सूर का आळवावासा वाटला?

सध्यातरी सगळेच धूसर आहे. १ तारखेला विमानतळावर भेटायला जाणे पण काहितरी गूढ वाटत होते.
आता खरी गोष्ट बाजूलाच राहिल, पण याचा राजकीय फायदा मात्र घेतला जाईल.

रामदेव बाबाच्या मागे आता सरकार हात धुवुन मागे लागेल असं दिसतंय. मुख्य कारण म्हणजे रामदेव बाबाला असलेला भाजपा आणि संघाचा छुपा पाठींबा. रामदेव बाबाचा सूर देखिल ब्लॅकमेलींगचा वाटतोय. त

सरकारला हे आंदोलन पुढे चालवु द्यायचं नव्हतं. मुळात रामदेव बाबा आणि अण्णा यांत फूट पाडण्याचा डाव सरकार खेळत होतं पण अण्णा देखिल बाबाच्या मंचावर येणार म्हटल्यावर सरकार गडबडलं असावं. रामदेव बाबानी देखिल पळ कां काढावा हे कळलं नाही. आमरण उपोषण करणार्‍याने जीवाला कां घाबरांवं?

@नितीन,उदय,भरत,
राहुल गांधी मायावतींविरोधात नाट्यमयरीत्या आंदोलनात उतरले,आणि आता (चूक त्यांच्या सरकारची असल्यामुळे )त्यांनी या घटनेबद्दल ब्र सुध्दा काढलेला नाही.हा दुटप्पीपणा नाही,तर काय आहे? रामदेवबाबांचे आंतरिक हेतू काहीही असले तरी त्याचे परिणाम देशातील जनतेसाठी हितकारकच होते;आणि अर्थातच सरकारसाठी हानिकारक! आत्यंतिक भीतीतून सरकारने हे लोकशाहीस मारक कृत्य केले आहे.याचा आपण सर्वांनी निषेध करायलाच हवा.काळ्या फिती लावून म्हणा,काळे झेंडे फडकावून म्हणा,किंवा लाक्षणिक उपोषण करून.
आपण सारे निषेधासाठी रस्त्यावर आलो,तर ती स्वातंत्र्यातील क्रांती ठरावी.पण मला वाटते ,ती वेळ अजून आलेली नाही;भविष्यात नजीकच्या काळात कदाचित कधीही येऊ शकते. कारण रामदेवबाबासारख्यांची अशी अवस्था सरकार करू शकते,तर सामान्य माणसाची काय कथा? म्हणून सामान्य जनतेत वैचारिक प्रगल्भता आणणे आवश्यक आहे.

१)सरकारला हे आंदोलन महागात पडणार होते,म्हणून येनकेनप्रकारेण त्यांना बाबांना तेथून हटवायचे होते? असे करून सरकारने स्वतःची चिंता मिटवली?

आंदोलकांच्या मागणीवर सरकारने आधीच चर्चा केली होती. मागण्या मान्य केल्या आहेत. अश्या वेळी लाखो लोकांनी आंदोलन या नावाखाली एकत्र येणं म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून सरकारने हे आंदोलन चिरडलं असावं.

२)अण्णा हजारे रामदेवबाबांना पाठींबा देण्यासाठी आंदोलनस्थळी हजेरी लावणार होते,त्यामुळे आंदोलनाची ताकद वाढली असती-जे सरकारला होऊ द्यायचे नव्हते?

रामदेवबाबांचे लाखो अनुयायी आहेत व ते आंदोलनस्थळी हजर असताना अजून अण्णांच्या उपस्थितीने कितीसा फरक पडणार होता? शिवाय साध्वी ऋतंबरा व्यासपीठावर असल्याने, अण्णा व्यासपीठावर जाणारच नव्हते.

३)बाबा आंदोलनस्थळावरून सरकारचे एखादे मोठे बिंग फोडण्याची शक्यता होती?
ती आता नाहीशी झाली?

रोज प्रसारमाध्यमांशी सतत मुलाखती देणार्‍या बाबांना जर सरकारचे काही बिंग असेल तर ते कधीही फोडता आले असते. त्यासाठी करोडो रुपये खर्चून फार्स करायची आवश्यकता नाही.

४)भविष्यात अशी आंदोलने होऊ नयेत यासाठी दहशत बसावी म्हणून? की
५)सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे बनत चालले आहे? असे असेल,तर मग सरकारचे आणि भारताचे भविष्य अंधारमय आहे ,असे नाही वाटत?

लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे हे,कुणी स्वयंघोषित बाबा आणि चेल्यांचे राज्य नव्हे. की ज्यांना विचार्णारे कुणी नाही. सरकार चुकलं,हुकुमशहा झालं तर नायायाल्य आहे,विरोधी पक्ष आहे. त्यामुळे सरकार कुणाला जरब बसावी म्हणून असं करेल हे काहीतरीच वाटतं.

मला प्रामाणीक पणे असं वाटतं,की अण्णांच्या आंदोलनाला देशभर पाठींबा मि ळाला. अण्णा निमिषार्धात देशाचे हिरो झाले. अशीच व्यापक प्रसिद्धी आपल्याला मिळावी,व आपण केवळ योगगुरुच नाही तर महान समाजसेवक सुद्धा आहोत हे जगाला कळावं या हेतूने रामदेवबाबां नी हे आंदोलन उभारलं होतं.

अण्णांच्या माङण्यांत तथ्य होतं. सरकारने त्यावर साधकबाधक विचार करुन उपाययोजना केली,समिती स्थापिली व अण्णांचे उपोषण सुटले.

इथे रामदेवबाबांची प्रत्येक मागणी हे सरकारचं कर्तव्यच आहे. सरकारने त्या मान्य केल्याच आहेत. पण जर मग उपोषण केलं नाही तर कोट्यावधींचा खर्च जो रामदेवबाबांनी मंडप उभारणीवर केला,तो व्यर्थ गेला असता,म्हणून उपोषण्,मुलाखती आल्याच आणि पुढे काय झालं आपण जाणताच आहात.

मला यातलं खरच काही कळत नाही म्हणून शक्यतो अशा विषयांवर मतही देत नाही. पण कालची दृश्य पाहून जरा वाईटच वाटलं.

हटेला, त्यावर असहमत. ते सगळं खरं असेल तरी अशा प्रकारे नि:शस्त्र लोकांवर अश्रूधूर आणि लाठीमार? केवळ नृशंस हा एकच शब्द आठवतो. आणि त्यात भर म्हणून कॉंग्रेसी कुत्रा दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यात गोवण्याचा प्रयत्न केला. संघाची माणसं म्हणे बाँबस्फोटाच्या केस मधे सापडली म्हणून संघाने या आंदोलनाला भ्रष्टाचाराविरुद्ध अशी दिशा देण्याचा प्रयत्न केला. दिग्विजय सिंह याला तर तो ज्या माणसांची नावे घेत होता ती नावे सुद्धा नीट धड आठवत नव्हती. कोर्टात अजून काहीही सिद्ध झालेलं नाही. मी संघाचा माणूस नाही, पण त्यांची कार्यपद्धती मी जवळून पाहिली आहे. ते अहिंसक पद्धतीने करतात सगळं आणि यशस्वी होतात म्हणून या इटालियन काँग्रेसी कुत्र्यांना हे खुपतंय.

आणि गेली सात आठ (किंवा अधिक) वर्ष आयुर्वेदिक औषधे देणार्‍या रामदेवबाबाकडे मेडिकल लायसन्स नाही ही गोष्ट दिग्विजय सिंह याला काल आठवली? इतकी वर्ष झोपला होता का?

रामदेवबाबा दोषी असेल तर त्याला फासावर लटकवा, पण मग आधी लोकसभेतल्या किमान ५०० खासदारांना गोळ्या घाला.
संतश्री अफझल गुरू यांना विनम्र विनंती Proud

<< लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे हे,कुणी स्वयंघोषित बाबा आणि चेल्यांचे राज्य नव्हे. की ज्यांना विचार्णारे कुणी नाही. सरकार चुकलं,हुकुमशहा झालं तर नायायाल्य आहे,विरोधी पक्ष आहे. त्यामुळे सरकार कुणाला जरब बसावी म्हणून असं करेल हे काहीतरीच वाटतं. >>
निवडून दिलेलं सरकार व विरोधी पक्ष [सरकार व विरोधी यांचा पक्ष कोणताही असो ] वर्षानुवर्षं जर भ्रष्टाचाराला आळा घालत नसतील व उलट त्यात सामील होत असतील, तर लोकानी अशा आंदोलनातून त्याना याची जाणीव करून देणं ही काय लोकशाही नाही का ? किंबहुना, केवळ अशा आंदोलनातूनच लोकशाहीची खरी ताकद उभी रहाते, असं नाही वाटत ? ज्या भ्रष्टाचाराविरुद्ध आज पंतप्रधानांपासून बरेच इतर ओरडा करायला लागलेत, तो काय आत्ताच त्यांच्या लक्षात आला ? न्यायालय व विरोधी पक्ष यानी कमी वेळां का भ्रष्टाचारावर ताशेरे मारले होते, पण शेवटी या आंदोलनांमुळेच ना हा खरा दबाव आला.? "स्वयघोषित बाबा आणि चेले " महत्वाचे नाहीतच पण हे आंदोलन मात्र लोकशाहीकरतां आत्यंतिक महत्वाचे आहे; "बाबा आणि चेले" फक्त प्रतिकात्मक आहेत, असं मला वाटतं.

उपोषण आणि तत्सम मार्गाने सरकारी धोरणांना विरोध करणे हा लोकशाही तत्वावर विश्वास असणार्‍या जनतेचा हक्क आहे, जो कोणत्याही पक्षाचे सरकार अमान्य करू शकत नाही. उपोषण अण्णा हजारे करोत वा बाबा रामदेव, सरकारने घटनेच्या चौकटीत राहूनच त्या मागील कारणांची दोन्ही बाजूला समाधानकारक वाटेल अशी मीमांसा करणे अपेक्षित आहे. पोलिसी दंडुकेशाहीविरुद्ध गांधींनी उचललेल्या उपायांची सार्‍या जगभर वाहवा झाली आणि पुढे स्वातंत्र्यानंतर कॉन्ग्रेसने त्याचीच जाहीरात करून सत्ताही प्राप्त केली हा इतिहास आजचे राज्यकर्ते सोयिस्कररित्या विसरत चालले आहे, हेच 'रामलीला कांड' दर्शविते.

बाबा रामदेव हे योगगुरू आहेत म्हणून त्यानी त्याच क्षेत्रात आपला 'उजेड' पाडावा, अशा धर्तीचे उर्मट उत्तर दिग्विजय सिंग आणि कपिल सिब्बल हे दोन जबाबदार नेते जर देत असतील तर 'गांधी' विचाराचा असा अपमान ब्रिटिशदेखील करू धजले नसते. वाईट वाटते ते इतकेच की, डॉ.मनमोहन सिंग यांच्यासारख्या बुद्धीमान आणि ज्यांची कारकिर्द प्रामुख्याने सिव्हिल सर्व्हिसमध्ये गेली आहे, शिवाय सौम्य प्रवृत्तीच्या व्यक्तीनेही इतक्या हलक्या दर्जाच्या राजकारणाला मुकाट होकार देणे, त्याबद्दल.

विरोधी पक्षांनी उठविलेला गदारोळ अपेक्षित आहेच कारण आता हवा आहे ती राजकारण तप्त ठेवण्याची. अण्णा असोत वा बाबा वा विनायक सेन....अशा 'पब्लिक फिगर्स"चा राजकीय डावपेचासाठी वापर करता येत असेल तर रस्त्यावर असलेले राजकारणी करणारच, त्याबद्द्ल दोष द्यायचाच असेल तर 'रामलीला' वरील लीला घडवून आणणार्‍या सत्ताधार्‍यानाच द्यावा लागेल.

राहुलबाबाला मायावतीने केलेला विरोध ही 'लोकशाहीची पायमल्ली' म्हणून दिल्लीत गळे काढायचे तर अण्णा आणि रामदेव यांची मोहीम ही मात्र 'देशहितविरोधी' अशी पत्रके काढायची, यामधील दुटप्पीपणा लहान मूलदेखील ओळखेल. थोडक्यात, सध्याचे सरकार अशा कृत्यांनी स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेत आहे, हेच समोर येत आहे.

(थोडेसे अवांतर : आण्णांचे असो वा रामदेव बाबांचे....त्या उपोषणामागील हेतू काय आहेत...ते योग्य की अयोग्य.... यावर जर चर्चा अपेक्षित असेल तर हा धागा त्याचे स्थळ बनू नये. डॉ. अहीरराव यांच्या लेखनाचा उद्देश्य तो नसावा, तर ज्या रितीने सरकार उपोषण मोडीत काढण्याची मोहीम राबवित आहे ती कितपत स्पृहणीय आहे, असा असावा.)

बाबा कोण मला काही देणे घेणे नाही आहे.

सरकार किती भ्याड आहे, शांतता मय आंदोलन चिरडणे हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे...
तिव्र निषेध!

शिवाय सौम्य प्रवृत्तीची व्यक्तीनेही इतक्या हलक्या दर्जाच्या राजकारणाला मुकाट होकार देणे, त्याबद्दल.
----- असे त्यांनी प्रथम नाही केले आहे, वारंवार होते आहे. त्यांनी सर्व बुद्धी १० जनपथ येथे ठेवलेली आहे.

निष्पाप लोकांवर हल्ला करणे हे काही आजचे नाही ...यापुर्वीही ..अयोध्येला...बाबरी मशिद पाडली तेव्हा...निष्पाप लोकंनाच जीव गमवावे लागते... ह्यात मला सांगा एखाद्या पुढार्‍याला, मंत्र्याला गोळी का लागत नाही... काल जे टिव्हीवर बाबांचे पाहिले ते पण मला ढोंगीच वाटत होते... त्यामुळे जनतेवर अमानुष अत्याचार करण्याचा सगळ्यांनीच तिव्र निषेध करावा.

शायर तूमचे मुद्दे अमान्य आहेत असे नाही, पण या पद्धतीने पोलिस पाठवून अशी कृति करण्याला सगळ्यांचाच विरोध राहील. जर ते आंदोलन बेकायदेशीर होते तर अटक करायची सगळ्यांना.

मूळात या परदेशी खात्यांबाबत सरकार काय कृती करते आहे, त्यांच्या काय माहिती आहे हे जाहीर का केले जात नाही ? कि हे पैसे वळते करण्यासाठी वेळ दिला जातोय ?

@शायर हटेला,
आपले विचार एकांगी वाटतात.
१) सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या,हे कबिल सिब्बल यांचे म्हणणे अत्यंत धूर्तपणाचे आहे.'आम्ही बऱ्याचशा मागण्यांसाठी सहमत आहोत;बाकी आम्ही बाबांवर सोडतो' असे कबिल सिब्बल म्हणाल्याचे ४ जून रोजी दुपारी प्रसारमाध्यमांनी दाखवले.याचा अर्थ कोणत्या तरी एखाद दुसऱ्या मुद्द्यावर संमती झालेली नव्हती,असे दिसून येते.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होता,तर मग लगेच कारवाई करायला हवी होती.त्यासाठी सरकारने जवळपास १५-१६ तास वाया का घालविले? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही कारवाई दि.४ जून रोजी संध्याकाळपर्यंत केव्हाही शक्य असताना किंवा दि.५ जून रोजी सकाळी करणे शक्य असताना मध्यरात्रीनंतर का केली?
२)अण्णांच्या उपस्थितीने मोठा जनप्रवाह सरकारविरोधात जाऊन आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता होती.(ऋतुंभरांच्या उपस्थितीने अण्णांना काहीही फरक पडला नसता कारण अण्णा तिथे बाबांसाठी म्हणून जाणार होते.आणि ऋतुंभरादेविंशी त्यांना काहीच कर्तव्य नव्हते.
३)'मेरे खिलाफ साजिश रची जा रही है...' असे रामदेवांनी म्हटलेच होते- ती साजिश जाहीरपणे नंतर बोलणे हेही एक 'बिंग' ठरू शकले असते.
४)महिला,लहान मुले यांच्यावर लाठीमार,तोही अपरात्री- हे सर्व भयंकरच आहे. कारवाई करावयाचीच होती तर ती प्रसारमाध्यमांद्वारे/मोबाईलवर संपर्क करून वा तशी लेखी सूचना देऊन करणे शक्य असताना सरकारने ते काहीही केले नाही.झोपेतून उठवून अचानक हल्ला करणे यामुळे सामान्य माणसाच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.कायमची दहशत बसू शकते;सरकारला तेच साधायचे होते,असे म्हणण्यास वाव आहे.कारण अशी कारवाई चोर,दरोडेखोर,अतिरेकी यांच्यावरही क्वचितच केली जाते.
५)बाबांचे हेतू(असे समजू थोडा वेळ,ते )कितीही वाईट असले तरी सरकारने ज्या पद्धतीने हे आंदोलन चिरडण्याचा आततायीपणा दाखवला,त्याचे लोकशाहीत समर्थन करता येत नाही. १९७५ च्या आणीबाणीची आठवण करून देणारे हे कृत्य होते.

दिनेशदा परदेशी पैसा आणणे या केवळ गप्पा आहेत... तसे कुणाचेही सरकार आले तर करु शकत नाही. आता गप्पा मारायला काही लागत नाही.

उदय, त्यासाठी कुणाचेच हात गुंतलेले नसतील, असे सरकार असायला पाहिजे ना ? सध्या तरी सब घोडे बारा टक्के असेच आहे.

अश्रूधूराचा वापर इतक्या प्रमाणात केला गेला होता की एका वृत्तवाहिनीचा वार्ताहर ते सगळं झाल्यानंतर गेला तिथे तर त्याचे डोळे बघवत नव्हते. सतत पाणी वाहत होतं डोळ्यांतून. मग जेव्हा सोडला गेला तेव्हा बायका आणि मुलांची काय अवस्था झाली असेल?

हटेला ला अनुमोदन... सरकारने योग्य निर्णय घेउन रामदेवबाबा सारख्या ठगाला अद्दल घडवली.. ठकासी व्हावे महाठक हाच न्याय बरोबर आहे... अण्णांच्या बाबतीत वेगळी भुमिका आणी या भोंदु पंचतारांकीत बाबासाठी वेगळी हे योग्यच आहे... Happy

बोलु नका हो. पुण्यातल्या रस्त्यावर संध्याकाळी कोण कोण निषेधाचे फलक घेऊन यायला तयार आहे ते सांगा.

वेळ सायं . ६.०० वाजता.
स्थळ : लक्ष्मी रोड आणि बाजीराव रोड मिळतो तो चौक.

मंदार, आपल्याकडे लष्करात तरी, एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला नाही, हि खरेच अभिमानाची बाब आहे.
लोकशाहीच हवी, त्याबाबत दुमत नाही. पण यापेक्षा जास्त पारदर्शकता हवी.

नितिन, खरेच यायला आवडले असते. रामदेव बाबाला विरोध झाला म्हणून नाही, तर बळाचा गैरवापर झाला, याला विरोध आहे.

जनाअंदोलन उभे राहिले तर उत्तमच पण याचा राजकीय फायदा उठवला जाऊ नये, हि इच्छा.

जनाअंदोलन उभे राहिले तर उत्तमच पण याचा राजकीय फायदा उठवला जाऊ नये, हि इच्छा.

कमाल आहे. लोकशाहीत राजकिय पक्ष अनिवार्य आहेत. जनआंओलनात दुसरा विरोधी पक्ष फायदा उठवणारच. म्हणुन जनाअंदोलन होऊ नये असे असेल तर ते बरोबर नाही अस माझ मत आहे.

Pages