रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून सरकारने काय साधले?

Submitted by dr.sunil_ahirrao on 6 June, 2011 - 00:17

काल रात्री १ वाजता अचानक पोलिसांनी बळाचा वापर करून रामदेवबाबांना अटक करून आंदोलन चिरडून काढले.यावेळी अश्रधुराचा आणि लाठीमाराचा वापर केला गेला.इतकेच नव्हे तर काही 'पोलिसांनी' आंदोलकांवर दगडफेक सुध्दा केल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखवले.किरकोळ तांत्रिक कारणाचा आधार घेऊन पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढले,हे कितपत समर्थनीय आहे? असे करून सरकारने काय साधले?

१)सरकारला हे आंदोलन महागात पडणार होते,म्हणून येनकेनप्रकारेण त्यांना बाबांना तेथून हटवायचे होते? असे करून सरकारने स्वतःची चिंता मिटवली?

२)अण्णा हजारे रामदेवबाबांना पाठींबा देण्यासाठी आंदोलनस्थळी हजेरी लावणार होते,त्यामुळे आंदोलनाची ताकद वाढली असती-जे सरकारला होऊ द्यायचे नव्हते?

३)बाबा आंदोलनस्थळावरून सरकारचे एखादे मोठे बिंग फोडण्याची शक्यता होती?

ती आता नाहीशी झाली?

४)भविष्यात अशी आंदोलने होऊ नयेत यासाठी दहशत बसावी म्हणून? की

५)सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे बनत चालले आहे? असे असेल,तर मग सरकारचे आणि भारताचे भविष्य अंधारमय आहे ,असे नाही वाटत?

Group content visibility: 
Private - accessible only to group members

उपोषणाचा हेतू इथे चर्चेचा मुख्य हेतू नसून सरकारने ते हाणून पाडण्यासाठी अंमलात आणलेले इंजेक्शन हा आहे.>> असं कसं हो, आंदोलनाचे हेतू आणि त्यामागचे लोक याप्रमाणेच इंजेक्शन बसणार ना? उदा. ऑपरेशन ब्लूस्टार काय अश्रुधूराच्या मार्‍याने साध्य झाले असते काय?

वा!!!

सरकारने नेमके काय करायला हवे होते ते कुणी सांगेल का... त्या बाबाचा अंतस्थ हेतु माहीती असुनसुद्धा केवळ बरेच लोक आणी जनभावना यांचा आदर करुन सरकारने आपले मंत्री पाठवुन त्यांच्याशी चर्च्या केली... त्या बाबाची समजुत घालायचा प्रयत्न केला त्याच्या बर्‍याचश्या मागण्या मान्य केल्या... यानंतर काय केले पाहीजे होते सरकारने???? बाबरीपतनाच्या वेळी सरकार आंदोलन कर्त्यांच्या शांततापुर्वक कारसेवा या आश्वासनामुळे गप्प बसले होते त्याचे परीणाम अजुन भोगतो आहोत.. Sad

कदापिही अश्रुधुराच्या मार्‍याने ऑपेरेशन ब्ल्यू स्टार थंड झाले नसते....यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही. त्यासाठी चिलखत दल मंदिर परिसरात न्यावेच लागले, कारण शेवटी देशाच्या अखंडतेचा तो प्रश्न होता ते तुम्हीही मान्य कराल, आगाऊ. पण सर्वच आंदोलनाला त्या पंगतीत कसे बसवू आपण? ज्या वयाच्या लोकांवर रामलीला येथे लाठीमार झालेला दिसला त्याना अश्रुधुरांचा किती आणि कोणत्या पातळीवर त्रास होणार यासाठी कुठल्या एम.डी.चे प्रमाणपत्र लागणार नाही. ते तर स्वयंस्पष्टच आहे. बाबांच्या उपोषणाने जादूची कांडी फिरेल आणि युरोपमधील झाडून सार्‍या बॅन्का निवासी/अनिवासी भारतीयांचे लॉकर्स त्यांच्या पायाशी आणून रिती करतील असे समजणेही बालिशपणाचेच आहे. पण म्हणून तसले आंदोलनच नको (कारण त्याचा आऊटपुट झीरो आहे म्हणून) असेही म्हणू नये.

अशी आंदोलने ही प्रतिकात्मक असतात हे सरकार आणि जनतेच्याही ध्यानी येणे फार गरजेचे असते. विद्यापीठातील प्रश्नपत्रिकेतील भ्रष्टाचार, एमपीएससी/युपीएससी तत्सम स्पर्धात्मक परीक्षेतील बजबजपुरी चव्हाट्यावर येणे ही अशाच धाटणीच्या आंदोलनांचे फलीत आहे, हे तर तुम्ही मान्य कराल ?

परत....बाबा रामदेवाना डोक्यावर घेऊन रिंगण घातले पाहिजे इतकी त्यांची महती नसेलही, पण म्हणून सिब्बल, दिग्विजय आणि चिदंबरम यांच्या हातातील आसूड कुरवाळणे हेही ठीक नाही.

>>> साधारण २००७ च्या दरम्याने एक बातमी आली होती की रामदेवबाबाच्या औषधामधे मानवी हाडे वापरलेली अस्तात. ही बातमी अत्यंत यशस्वी रित्या दाबली गेली.

ही मुद्दामहून पसरविलेली खोटी बातमी होती. वृंदा करात यांनी मानवी हाडे असलेली रामदेवबाबांची औषधे कोठून मिळाली हे शेवटपर्यंत सांगता आले नव्हते. औषधे जिथून विकत घेतली त्याची त्यांच्याकडे पावती नव्हती व ते दुकान त्यांना शेवटपर्यंत सांगता आले नाही. रामदेवबाबांच्या त्याच व इतर औषधांच्या सॅम्पलची वेगवेगळ्या ५ प्रयोगशाळेत तपासणी होऊनसुध्दा कोणत्याही औषधात मानवी हाडांची पूड सापडली नाही.

>>> असं कसं हो, आंदोलनाचे हेतू आणि त्यामागचे लोक याप्रमाणेच इंजेक्शन बसणार ना? उदा. ऑपरेशन ब्लूस्टार काय अश्रुधूराच्या मार्‍याने साध्य झाले असते काय?

आंदोलन शांततेने चालू होते. आंदोलनामुळे दिल्लीत किंवा रामलीला मैदानावर कोणताही गैरप्रकार घडलेला नव्हता. कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नव्हता. कोणत्याही आंदोलकाने दंगल वा मारामार्‍या केलेल्या नव्हत्या. आंदोलकांकडे कोणतीही शस्त्रे नव्हती. मध्यरात्री सर्व आंदोलक झोपलेले होते.

आंदोलनाचा हेतू भ्रष्टाचाराविरोधात होता व त्यामागचे लोक सर्वसामान्य अहिंसक नागरिक होते. अशा आंदोलनाला जर अश्रृधूर व लाठीमार हे इंजेक्शन योग्य असेल तर एखाद्या मोर्चावर अणूबॉम्ब किंवा क्षेपणास्त्रेच टाकावी लागतील.

>>> परत....बाबा रामदेवाना डोक्यावर घेऊन रिंगण घातले पाहिजे इतकी त्यांची महती नसेलही, पण म्हणून सिब्बल, दिग्विजय आणि चिदंबरम यांच्या हातातील आसूड कुरवाळणे हेही ठीक नाही.

सहमत. न्यायालयात अनेक खतरनाक गुन्हेगारांचा बचाव करणारा उर्मट सिब्बल आणि देशद्रोह्यांचा समर्थक असलेला वाचाळ दिग्विजय यांनी रामदेवबाबांना शिव्या देणे हा एक मोठा विनोद आहे.

शायर हटेला,भरत मयेकर,बाळू जोशी,, ठमादेवी,आगाऊ आणि हीरा या सर्वांस जोरदार अनुमोदन.

>>>
मुळातच सगळे हिंदु साधुसंत रामदेव बाबा, आसाराम बापु ,नरेन्द्र महाराज , श्री श्री वगैरे चोर लुछे लफंगे आहेत .]

कॉन्ग्रेस हाच ह्या इन्डीयातला एकमेव भ्रष्ट्राचार मुक्त पक्ष आहे !
आणिबाणी आवश्यकच होती मुर्ख लोकांन्ना धडा शिकवायला !
बोफोर्स घोटाळा हा आर एस एस चा कट होता .
बाबरी पडली हे वाईट झालं. त्या सगळ्या कटकर्त्यांन्ना फासावर लटकवलं पाहिजे ..(बाबर महान होता ...केवढे उपकार केले होते त्याने राममंदीर पाडुन !!)
राश्ट्रकुल स्पर्धात काहीच घोटाळा झाला नाहीये ....बिच्चारे कलमाडी निर्दोष आहेत !
आदर्श घोटाळ्या मागे खरे तर शिवसेनेचाच हात आहे ...
२जी स्कॅम हे पुर्ण खोटं आहे ...भाजप उगाच्च ९६००० कोटी वगैरे कैच्या कै आकडे सांगुन देशाची दिशाभुल करतय !
.
.
राहता राहिला काळा पैसा ... पैसा कधी काळा असतो का हो ? ज्यावर प.पु बापुजींचे चित्र आहे ती गोष्ट " काळी" अपवित्र कशी असु शकेल ?
आणि असलाच काळा पैसा अन गेलाच तो धेशाबाहेर तर त्यात काय वाईट ? प.पु बापुजींचे चित्र देशाबाहेर जाईल अन त्यांचे विचार जगभर पसरतील ! हे ह्या मुर्ख हिंदुत्ववादी संघटनाना कळणारच नाही Angry

|| सबको सन्मती दे भगवान ||

आता लालकृष्ण अडवाणीनींच सांगितलं ना की बाबरी पडली तो माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस. आधी त्यांच्याकदून नक्की खात्री करून घ्या पाडली (पडली का? हं ईश्वरी शक्तीच्या प्रभावाने वाट्ट?) ते वाईट आहे की नाही.
आणि आज भाजपने देशभर शांततामय निषेध करायचं ठरवलंय तर दिवसभर ध्यान आणि मौन ठेवा बरं. (मौनात कीबोर्ड पण नाही बडवायचा)

कमाल आहे राव भारतीयांची आणि पत्रकारांची सुध्दा. अण्णा हजारे काय किंवा रामदेवबाबा काय यांना कलमाडी किंवा टुजी स्प्रेट्रमच्या राजाच्या पंगतीत कसकाय बसवता येईल. याला पुरावा काय २००५ साली त्यांच्या ट्रस्ट च्या कागदपत्रातली एक छोटीशी तांत्रीक चुक.

हे लोक किमान आवाज उठ्वु शकतात आणि सरकार त्यांना घाबरते. आपल्या सारख्या सामान्य नागरिकांना काय किंमत आहे ?

नितीन, बाबाची एवढी हिंमत होती तर त्याने आंदोलन करण्यासाठी जागेची परवानगी मागायला हवी होती पोलिसांत. योग शिबिराच्या नावाखाली उपोषणाचं खोटं नाटक करण्याची काय आवश्यकता होती? बाबरीच्या वेळी कारसेवेच्या नावाखाली परवानगी घेऊन बाबरी मशीद पाडण्याचा खोटेपणा आणि आत्ताचा खोटेपणा यांच्यात मलातरी अर्थाअर्थी फरक जाणवत नाही. आता कुणी म्हणेल की शांततापूर्ण मार्गाने आंदोलन वगैरे... पण मुळात ती जागाच त्यांनी उपोषणासाठी आणि आंदोलनासाठी घेतली नव्हती. मग? तिथे त्यांनी फक्त उपोषणाला बसण्याचा प्रयत्न केला. उद्या आणखी कुठल्या ठिकाणी शिबिराच्या नावाखाली आणखी काही केले असते तर कोण जबाबदार होते? शिबिराच्या आडून आणखी कसले उद्योग केले जातात ते त्या बाबांनाच माहीत.
अण्णांनी किमान तसं केलेलं नाही. त्यांनी आंदोलनासाठीच परवानगी मागितली आणि ती दिली. तेवढा सच्चेपणा आहे अजून त्यांच्यात. त्यांच्या आंदोलनाचा थेट मुद्दा नाहीच आहे इथे.

आवाज उठवायचा आहे तर थेट उठवावा. आडून आडून, लपून छपून नव्हे...

कदापिही अश्रुधुराच्या मार्‍याने ऑपेरेशन ब्ल्यू स्टार थंड झाले नसते....यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही. त्यासाठी चिलखत दल मंदिर परिसरात न्यावेच लागले, कारण शेवटी देशाच्या अखंडतेचा तो प्रश्न होता ते तुम्हीही मान्य कराल,

>>>>
हो हो ...१९४७ साली मुर्ख आर एस एस " अखंड भारतासाठी" झगडत होते ..कोणत्याही किमतीत फाळणी होवुन देवु नका असे बरळत होते ...तो त्यांच्या स्वार्थाचा भाग होता ....पण काँग्रेस ने अथक प्रयत्नांन्नी हे षडयंत्र , कारस्थान मोडुन काढले !!

१९८४साली मात्र कॉन्ग्रेसला अचानक अखंड भारताचा पुळका कसा काय आला देव जाणे ?

>>नितीन, बाबाची एवढी हिंमत होती तर त्याने आंदोलन करण्यासाठी जागेची परवानगी मागायला हवी होती पोलिसांत.

Rofl

"मला आंदोलन करायचंय मला परवानगी द्या" असं म्हणून लग्गेच कनवाळू काँग्रेस सरकारच्या पोलीसांनी परवानगी दिली असती Biggrin मज्जाय

ठमा. तूझे विचार पटलेच. पण मध्यरात्री कार्यवाही आणि अश्रुधुराचा वापर, याबाबत खरी बातमी काय ते पण नक्की लिही.

नितीन, बाबाची एवढी हिंमत होती तर त्याने आंदोलन करण्यासाठी जागेची ......

कोमल, हे सर्व सरकारी आणि तांत्रिक मुद्दे आहेत. मी असहमत आहे.

माझ्या मते ज्या मुद्यावर बाबांनी उपोषणाची घोषणा केली ती एका रात्रीतली नव्हती. ४ जुन च्या आधीपासुन एक महिना ते हेच
सांगत होते.

त्यांनी तांत्रिक चुका केल्या असतील तर सरकारने अक्षम्य घोड्चुक केली आहे ज्याची बरोबरी फक्त दडपशाही
या शब्दाबरोबर होउ शकते.

इतर उल्लेख जसे बाबरी इ माझ्या मते अनावश्यक आहेत.

>>> योग शिबिराच्या नावाखाली उपोषणाचं खोटं नाटक करण्याची काय आवश्यकता होती?

आपण भ्रष्टाचाराविरूध्द ४ जून पासून रामलीला मैदानावर उपोषण करणार आहोत हे रामदेव बाबा ४ जून पूर्वी अनेक आठवड्यांपासून सांगत होते. अनेक वृत्तपत्रात व दूरदर्शनवरील अनेक वाहिन्यात यावर चर्चा झालेली आहे. ते उपोषण करणार हे माहिती असल्याने केंद्र सरकारचे तब्बल ४ मंत्री त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना विमानतळावर भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी मैदान योगशिबिरासाठी घेतले आहे व ते उपोषण करणार आहे हे जर केंद्र सरकारला अनेक दिवसांपासून माहित होते, तर मग त्यांना दिल्लीत आल्याक्षणीच का अटकाव केला नाही?

>>> उपोषणाचं खोटं नाटक

उपोषण खरे होते. त्याचे नाटक केले नव्हते.

>>> शिबिराच्या आडून आणखी कसले उद्योग केले जातात ते त्या बाबांनाच माहीत.

भ्रष्टाचाराविरूध्द उपोषण म्हणजे "उद्योग"???

टग्या.. Proud
या बाबाची संपत्ती म्हणे ४५० कोटी रुपये आहे.. अण्णांची ६७ हजार.. अण्णांचे आंदोलन झाले तेंव्हा तिथे ताडपत्री सुद्धा न्हवत्या या भोंदुला ए.सी. शामियाना, कुलर्स, मिनरल वॉटर लागते... अण्णांच्या आंदोलनाला आर एस एस चा लांबुन पाठींबा याच्यासाठी म्हणे रस्त्यावर उतरणार. कर्नाटकात झालेला भ्रष्टाचार हा केवळ आरोप आहे म्हणुन जातीयवादी भाजप याच्यासाठी सत्याग्रह करणार... धन्य आहे..:)

बाबाची एवढी हिंमत होती तर त्याने आंदोलन करण्यासाठी जागेची परवानगी मागायला हवी होती पोलिसांत. योग शिबिराच्या नावाखाली उपोषणाचं खोटं नाटक करण्याची काय आवश्यकता होती?

>>> अगदी अगदी !! जोरदार अनुमोदन ठमे !!

सविनय कायदेभंग करायचाच होता तर इंग्रज सरकारची परवानगी मागायची होती ... दांडी ट्रीप च्या नावाखाली खोटं नाटक करण्याची काय आवश्यकता होती !!

<<तर मग त्यांना दिल्लीत आल्याक्षणीच का अटकाव केला नाही?>>
अटकाव होऊ नये म्हणून बाबांनी उपषण मागे घेणार असल्याचे आश्वासन दिले ना?
कोलांट्या उड्या मारण्याचा योगप्रकार ते इतका छान करतात, राजकारणात नक्की चांगले चालतील.

"मला आंदोलन करायचंय मला परवानगी द्या" असं म्हणून लग्गेच कनवाळू काँग्रेस सरकारच्या पोलीसांनी परवानगी दिली असती >>> द्यावी लागलीच असती. दिली नसती तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मूलभूत हक्काचा भंग झाला असता आणि भारतात तरी निदान कुणालाही आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारलेली नाही. आणि नाकारलीच असती तर बाबाला ओरड करता आलीच असती. तेव्हा मग सर्वच त्याच्या पाठीशी उभे राहिले असते. शिवाय अशी परवानगी नाकारणार्‍यावर कारवाईचीही तरतूद आहे कायद्यात...

पण मध्यरात्री कार्यवाही आणि अश्रुधुराचा वापर, याबाबत खरी बातमी काय ते पण नक्की लिही.>>> दिनेशदा, रात्री १० नंतर कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. मग ती लग्नाची वरात असो नाहीतर योगशिबीर...
सरकारने ते केलं आणि ते चूक आहे हे मान्यच. पण त्याचबरोबर साध्वीला आणल्यावर त्याच्यावर राजकीय शिबिराचा ठप्पा बसला होता.

सरकारच्या वतीने मंत्री भेटल्यावर मग त्यांच्याकडे आंदोलन स्थगित करण्याचं मान्य करणं आणि प्रत्यक्षात मात्र तिकडे गेल्यावर असं आंदोलन करायचं, हे अयोग्यच होतं. त्यांनी आधीच स्पष्ट करायला हवं होतं की आम्हाला सरकारचं म्हणणं पटलेलं नाही त्यामुळे आंदोलन होणारच आहे.

सरकार गाढव आहे. दिलं असतं बाबाना कागदावर लिहून की आम्ही सगळा काळा पैसा देशात परत आणू म्हणून तर काय आभाळ कोसळणार होतं?

तो पैसा काळा आहे हे कोण कसं सिद्ध करणार? आणि समजा अगदी सिद्ध केलंच तर स्वीस बँक भारतीय संसदेचे कायदे पाळायला थोडीच बांधील होती? बाबाची काठीही मोडली असती आणि काळा पैसावाले सापही मेले नसते ! Proud आता उगाच सगळे अडकले.. काँग्रेस्मध्ये असून असली राजकारणं जमत नाहीत म्हणजे अजबच! Proud

>> दिनेशदा, रात्री १० नंतर कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे.

होक्का? मग आयपीएल का चालतं अकरा साडेअकरा पर्यंत? तेव्हा नाही ते बोलत सरकार? उलट करमाफी वगैरेच्या गोष्टी चालतात म्हणे..... गंमतच्चे सगळी.

मूळ कारवाई ही उपोषणावर कधीच नव्हती. योगा शिबीर भरवण्याच्या नावाखाली
रामलीला मैदानावर रामदेव बाबांनी तळ ठोकला. हजारोंच्या संख्येने बाबांचे
अनुयायी आल्यानंतर बाबांच्या अंगात हत्तीचं बळ आलं. दुसर्या दिवशी
सकाळच्या सुमारास परिस्थिती चिघळेल म्हणून पोलिसांनी कारवाई केली.
कारवाईसाठीसुद्धा कारण होतं, ते म्हणजे, योगा शिबीरासाठी घेतलेल्या जागेचा
उपोषणासाठी वापर केला म्हणून. कायद्यानुसार ते चुकीचं ठरतं, म्हणून सेक्शन
१४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली. रामदेव बाबा हे आरऍसऍस, विश्व
हिंदू परिषद आणि भाजपाचं पिल्लू आहे, यात शंका नाही. त्यांनी आपला राजकीय
पक्षही वर्षाआधीच जाहीर केलाय. ते आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करताहेत

Pages