रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून सरकारने काय साधले?

Submitted by dr.sunil_ahirrao on 6 June, 2011 - 00:17

काल रात्री १ वाजता अचानक पोलिसांनी बळाचा वापर करून रामदेवबाबांना अटक करून आंदोलन चिरडून काढले.यावेळी अश्रधुराचा आणि लाठीमाराचा वापर केला गेला.इतकेच नव्हे तर काही 'पोलिसांनी' आंदोलकांवर दगडफेक सुध्दा केल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखवले.किरकोळ तांत्रिक कारणाचा आधार घेऊन पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढले,हे कितपत समर्थनीय आहे? असे करून सरकारने काय साधले?

१)सरकारला हे आंदोलन महागात पडणार होते,म्हणून येनकेनप्रकारेण त्यांना बाबांना तेथून हटवायचे होते? असे करून सरकारने स्वतःची चिंता मिटवली?

२)अण्णा हजारे रामदेवबाबांना पाठींबा देण्यासाठी आंदोलनस्थळी हजेरी लावणार होते,त्यामुळे आंदोलनाची ताकद वाढली असती-जे सरकारला होऊ द्यायचे नव्हते?

३)बाबा आंदोलनस्थळावरून सरकारचे एखादे मोठे बिंग फोडण्याची शक्यता होती?

ती आता नाहीशी झाली?

४)भविष्यात अशी आंदोलने होऊ नयेत यासाठी दहशत बसावी म्हणून? की

५)सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे बनत चालले आहे? असे असेल,तर मग सरकारचे आणि भारताचे भविष्य अंधारमय आहे ,असे नाही वाटत?

Group content visibility: 
Private - accessible only to group members

योग Biggrin

नितिन, खरेच तो आकडा खुपच मोठा आहे. इतकेच काय स्वातंत्र्य मिळण्यापुर्वी, ब्रिटिशांनी भारताला किती लूटलेय याची आकडेवारी, दादाभाई नवरोजी यांनी प्रसिद्ध केली होती. तो आकडाही असाच अगडबंब होता. त्याबाबतीत कुणा एका व्यक्तीला जबाबदार धरणे शक्य नव्हते. पण या पैश्याबाबत, खातेदार शोधणे कठीण असले तरी अवघड नाही.

मेळघाट प्रकल्पातील आदिवासींनाही अटक होणार आहे म्हणे.. विनापरवाना उपोषण केल्याबद्दल

तवलीन सिंग यांचा इंडियन एक्सप्रेसमधला लेख.
http://www.indianexpress.com/news/political-leaders-go-awol/799453/0
This is what happened again last week when Baba Ramdev made his first political speech in Delhi. I listened carefully. And, discovered that his economic ideas are nonsense, his statistics fantastical, but politically he is raising issues that our political leaders have failed to address.
He spoke for that vast majority of Indians who have not benefited from the economic boom of the past twenty years but who can see on their television screens that others have. It is ridiculous to assume that those who have are only those who have black money in foreign bank accounts but it is an assumption that many Indians make
To say that the amount of black money that supposedly lies hidden in foreign bank accounts is Rs 400 lakh crore is utter rubbish. As the editor of this newspaper explained when he interviewed Baba Ramdev on television, this figure exceeds the GDP of India and cannot be true. To say that if this mythical black money is brought back to India there will be no poor, illiterate or hungry Indians left in the world and that one rupee will be worth $50 is an outright lie.

दिनेशदा,

ते सर्व ठीक आहे.. पण का काळ्या पैशांचा लढा तत्वांसाठी असेल तर अवघड होईल कारण अगदी चार रूपयाची कोथिंबीर रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेत्याकडून विकत घेणे/त्याने तशी विकणे हा देखिल काळा पैसाच आहे. तांत्रिक दृष्ट्या ज्याचा "हिशेब" नाही तो सर्व पैसा काळ पैसा असतो, बरोबर ना? Happy
स्विस बँकेत ठेवलेले धन ईतके गडगंज आहे की त्याने देशाचे कर्ज फिटून शिवाय शिल्लक राहील म्हणून त्या आंदोलनाला ऊगाच धार आल्यासारखी भासते. अन्यथा काळा पैसा आणि काळा धंदा अगदी गल्ली, नाक्यावर असतो. अजून गम्मत अशी की चौपाटीवर वा ईतरत्र असलेल्या बर्‍याच्श्या भेळपुरी, पाणीपुरी गाड्या हे सर्व "अनधिकृत" मध्ये मोडतं. घरगुती शिकवण्या (काही फी च्या मोबदल्यात) हे देखिल अनधिकृत आहे.. त्यातून कमावलेला पैसा देखिल काळे धनच आहे. Happy

असो. थोडक्यात विनोदाचा भाग वगळता, काळा पैसा याकडे संपूर्ण समाजाने जरा अधिक डोळसपणे बघायची गरज आहे. या मुद्यावर सरकारला धारेवर धरलं जातय ते बरेच आहे, पण त्या धारेत आपलाही एक थेंब कळत नकळत असतो हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं. गेली अनेक दशके हे चालू आहे पण अलिकडे राडीया टेप्स, २g, राजा, कलमाडी, कानिमोझी ई. गडगंज प्रकरणे बाहेर येवू लागली आणि या घोटाळ्यांची संख्या "लक्ष" वेधी असल्याने आंदोलकांचा नव्याने भाव वाढला. त्याला सध्या असलेल्या जागतीक मंदीच्या फोडणीमूळे हे सर्व अजून "जळतय"..

बाकी, तिहार मध्ये जे जे गेलेत तो निव्वळ योगायोग आहे असे वाटत नाही. सत्ता आणि सरकारची निवडणूकांमधील बदललेली समीकरणे लक्षात घेता या खास पाहुण्यांचा वापर करून फेकून देण्याची वेळ आली होतीच. दोन्हीकडून सरकारचा फायदा- पहा आम्ही कारवाई करतोच आहोत हेही सांगायला मोकळे.

राहुल मुळे डिवचलेली बेहेनजी, करुणा राजवटीचा करूण शेवट करायला टपलेली अम्माजी, डाव्यांना पुरते देशोधडीला लावून सत्तेवर आलेली दिदी आणि अण्णा, बाबा व सत्तेसाठी आता स्वयंघोषीत आणीबाणी पुकारलेले भाजप हे सर्व मिळून मध्यावती निवडणूका घडवून आणतील. मॅडम जावून त्याजागी अम्मा/दिदी/बेहेनजी/सुशमाजी पैकी कुणीतरी येईल. भ्रष्टाचार नाही तरी कॉ. ला गाडल्याचा जल्लोश होईल आणि पुन्हा आहेच एक नविन तमाशा- याला म्हणतात लोकशाही.

तेव्हा तूर्तास रामदेव बाबांचे आंदोलन चिरडून सरकारने काय साधले ? तर आधीच जळलेल्या फोडणीत अजून तेल ओतलय.. लोकांवर फेकलेल्या अश्रूधूरापेक्षा हा धूर सरकारला अधिक महागात पडेल असे दिसते.

(नेहेमीप्रमाणे अतीबुध्दीमान बाबा चि. येतील आणि रामदेवांच्या जीवाला धोका होता आणि जातीय दंगली घडवण्याची तय्यारी सुरू होती असा "अ‍ॅक्शनेबल इंटलिजंस" आमच्याकडे होता म्हणून धोका पत्करून कारवाई केली असे म्हणतील आणि या सर्वाला वेगळेच वळण देतील/शमवतील. गृहमंत्रालयाकडे "नको तो" ईंटेलिजंस आहे असेच म्हणावे लागेल.)

वर रामदेव बाबांच्या अंतःस्थ हेतूबद्दल शंका घेतल्या गेल्या आहेत.
मला खरच प्रश्ण पडलाय, रामदेव बाबांचा अंतःस्थ हेतू काय? पक्ष तर त्यांनी आधीच स्थापन केला आहे. सुराज्य आण्ण्याचा त्यांचा हेतू असू शकेल, असे मला वाटते.

पण का काळ्या पैशांचा लढा तत्वांसाठी असेल तर अवघड होईल कारण अगदी चार रूपयाची कोथिंबीर रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेत्याकडून विकत घेणे/त्याने तशी विकणे हा देखिल काळा पैसाच आहे. घरगुती शिकवण्या (काही फी च्या मोबदल्यात) हे देखिल अनधिकृत आहे.. त्यातून कमावलेला पैसा देखिल काळे धनच आहे.

अगदी चूक आहे. कोथिंबीरवाल्याचे/क्लासवाल्याचे उत्पन्न टॅक्सेबल नसल्याने त्याने रेकॉर्ड नाही ठेवले तर चालते. मग हा व्यवहार काळा पैसा कसा बुवा? कोथींबीर विकायला बसताना आधी मंडईच्या जागेची भाड्याची पावती फाडावी लागते. क्लास चालवणाराही व्यवसाय कर , इतर टॅक्स भरू शकतो. आणि टॅक्सेबलच्या वर एखाद्याचे उत्पन्न असेल तर त्याने त्याचा टॅक्स भरला की झाले. इतर माहिती सी ए ना विचारा..

सरकारी नोकर, लो प्र यानी खाल्लेला पैसा ते असा टॅक्सेबल दाखवु शकत नाहीत, तो पैसा हा काळा पैसा ठरतो. सामान्य माणसानेही टॅक्स न भरलेला पैसा काळा ठरतो.

हो योग, देशतील पैसाही शोधलाच पाहिजे. (कलमाड्यानीही तो देशाबाहेर पाठवला असेलच.)
यासाठी आधीच असलेल्या यंत्रणा अधिक कार्यक्षम केल्या पाहिजेत आणि काहि प्रमाणात ते होतेही आहे. (आता माझा देशातील करपद्धतीशी संबंध राहिलेला नाही. पण व्ही ए टी ऑफिसर असलेल्या वहिनीकडून बातम्या कळत असतात.) यासाठी नवे कायदे वा फार राजकिय दबाव लागणार नाही. शिवाय कर चुकवलेला असला, तरी त्यात देशविघातक कारवाया कमी प्रमाणात असतात.

पण देशाबाहेर नेलेला पैसा, हा गैरमार्गाने कमावलेला असण्याचीच शक्यता जास्त आहे, यात गुन्हेगारी, शस्त्रास्त्रे, दलाली, अनधिकृत आयात, निर्यात, हेरगिरी काहीही असू शकेल. त्या पैश्यासोबत हेही उघडकीला यायला पाहिजे.

अंतःस्थ हेतू सत्ताप्राप्ती किंवा सत्ताबदल हाच आहे. बाबांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांचा. असा हेतू असणे हे गैर नाही,किंबहुना असा हिडन अजेंडा असणेही गैर नाही. फक्त असा उघड हिडन अजेंडा असला की मग त्याच्या आवरणाला ढोंग म्हणण्याचा पर्याय खुला राहातो.बाबांनी सांगितलेल्या मार्गाने काळा पैसा भारतात परत येणार नाही,त्याची निर्मितीसुद्धा थांबणार नाही,चुटकीसरशी तर मुळीच नाही, हे सर्व लोक जाणतात, मानतात. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे.असे 'पॉप्यूलर हीरोज' लोकशाहीला घातक ठरू शकतात. याहूवर गिरीश शहाणे यांचे एक सुंदर आर्टिकल यासंबंधात आज आले आहे. सत्ताबदल झाल्यानंतर येणारा पक्ष हे सर्व लगेच दूर करू शकेल किंबहुना दूर करू शकेलच याची खात्री नाही(रणगर्जना:दाऊदला {एकादिवसात?}भारतात आणून हजर करू.)सरकारवर दबाव आणण्यासाठी आंदोलने,जनजागृती हवी हे खरे पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दबावाने दहा टक्केसुद्धा यश मिळणार नाही.अण्णांचे आंदोलन सरकारने चिरडले नाही कारण त्यात पारदर्शकता होती,हिडन काहीही नव्हते.भ्रष्टाचार हा राजधानीत उगम पावतो ही एक भाबडी समजूत आहे.समाजाची वैयक्तिक आणि सर्वंकष नीतिमत्ता सुधारणे हाच खरा पण अतिदीर्घकालीन उपाय आहे.एव्हढ्या प्रदीर्घकाळ वाट पाहायची कोणाचीही तयारी नाही. शॉर्ट कट् हवा,सारे काही झटपट,माझ्या हयातीतच हवे. मीडियाला सनसनाटीपूर्ण न्यूज हवी असते ती त्यांना मिळते,लोकांना रवंथ करायला आणि आपण काही करतो आहोत अश्या खोट्या समाधानाच्या गुंगीत राहायला कारण मिळते, बस्स.

"...भ्रष्टाचार हा राजधानीत उगम पावतो ही एक भाबडी समजूत आहे...."

हीरा यांच्या प्रतिसादातील वरील वाक्य काहीसे वादाचा उगम होण्यासारखे वाटते. 'राजधानी' या शब्दातूनच ही बाब अभिप्रेत होत असते की तिथे जे घडते त्याचे प्रतिबिंब देशभरात उमटणार. मिडीया असो वा चर्चास्थळ, कोणत्याही घटनेची गंगोत्री शोधण्याचा प्रयत्न अभ्यासक करणारच, मग ज्या ठिकाणाहून आर्थिक आणि राजकीय उलथापालथीची बावन्न पत्ते टेबलवर चाळली जातात तिथूनच तो वृक्ष फोफावत जाणार ना ? दिल्लीत जे घडते त्याची छोटी आवृत्ती मग एखाद्या दत्तवाड खेड्यात जरी घडली तर दोष दिल्लीकडे आपसूकच येणार.

सॅम्युअल जॉन्सन लंडनबद्दल म्हणत, "By seeing London, I have seen as much of life as the world can show." याच चालीवर नवी दिल्लीतील भ्रष्टाचार एखाद्याने पाहिला वा अनुभवला तर तो किंवा ती हा भ्रष्टाचार देशभर चालत असलेल्या भ्रष्टाचाराचीच जननी आहे असे म्हणेल; किंबहुना त्यामुळेच राजधानीतील व्यवहार (भले वा बुरे) सार्वजनिक चर्चेचा विषय बनतात.

बाकी हीरा यानी "असे 'पॉप्यूलर हीरोज' लोकशाहीला घातक ठरू शकतात" असे जे म्हटले आहे त्याबद्दल इतकेच म्हणू शकेन की, आज आपण ज्यांच्या फोटोना हार घालतो, तेदेखील त्यांच्या त्यांच्या काळात 'पॉप्युलर हीरो' होते. फक्त काळाच्या कसोटीवर त्यांचे हीरोपण सिद्ध झाल्याने त्यांना जनमानसात आदराचे स्थान मिळाले....त्यांचे कार्य लोकशाहीला पूरक असेच शाबीत झाले.

कोण जाणे आजच्या घडीतील असे काही हीरोज् उद्या गळ्यातील ताईतही बनू शकतील. एका रात्रीत तर असे घडत नाही.

योग आणी हीराला अनुमोदन..:)
एनरॉनला समुद्रात बुडवायची भाषा करुन सत्ता मिळवणार्‍या मुंडेनी या प्रकल्पाला जाहीर समर्थन दिले आहे.. त्यामुळे सरकार विरोधात केलेल्या आंदोलनामुळे सत्ताप्राप्ती झाली तरी विरोधी पक्षाचे पुन्हा येरे माझ्या मागल्याच चालु होणार.. Sad

सुभानल्ला शंकराचार्यजी...

नवी दिल्ली - भ्रष्टाचाराविरुद्ध केंद्र सरकारविरोधात सुरू असणाऱ्या रामदेवबाबांच्या आंदोलनावर सरकारने केलेली कारवाई योग्य असल्याचे मत पुरी पीठाचे शंकराचार्य अधोक्षजानंद देव यांनी व्यक्त केले आहे. देव म्हणाले, ""भगव्या वस्त्रांचा वापर रामदेवबाबांनी गैरमार्गासाठी करून घेतला. रामलीला मैदानावर घडलेल्या प्रकारास रामदेवबाबाच जबाबदार आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माफी मागावी.'' योगविद्येचा वापर रामदेवबाबांनी व्यावसायिक कारणांसाठी केल्याचा आरोपही शंकराचार्य यांनी केला. (इ-सकाळ..)

शंकराचार्यजी प्रो-सोनिया असावेत का? Uhoh

>>> राहुल मुळे डिवचलेली बेहेनजी, करुणा राजवटीचा करूण शेवट करायला टपलेली अम्माजी, डाव्यांना पुरते देशोधडीला लावून सत्तेवर आलेली दिदी आणि अण्णा, बाबा व सत्तेसाठी आता स्वयंघोषीत आणीबाणी पुकारलेले भाजप हे सर्व मिळून मध्यावती निवडणूका घडवून आणतील.

सध्याच्या लोकसभेतील पक्षीय बलाबल काँग्रेसच्या बाजूने आहे. त्यामुळे इतर पक्षांनी कितीही आटोकाट प्रयत्न केले तरी मध्यावधी निवडणूका अशक्य आहेत.

लोकसभेच्या ५४३ जागांपैकी फक्त काँग्रेसकडेच २०६ खासदार आहेत. त्यांना बहुमताला फक्त ६६ खासदारांची आवश्यकता आहे. ५४३ पैकी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसविरूध्द मतदान करतील असे फक्त १८१ खासदार आहेत (भाजप ११६ + शिवसेना ११ + अकाली दल २ + डावे पक्ष २४ + तेलगू देसम ६ + बिजू जनता दल ११ + अण्णा द्रमुक ९ + तेलंगणा राष्ट्रीय समिती २).

संयुक्त जनता दलाच्या २२ खासदारांची काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्यास किंवा तटस्थ राहण्यास हरकत असणार नाही.

उरलेले १३४ खासदार कायम काँग्रेसच्या बाजूने आहेत (समाजवादी २० + बसप २० + द्रमुक २० + तृणमूल २० + राष्ट्रवादी ९ + राजद ४ + लोकदल ५ + नॅशनल कॉन्फरन्स ४ + निजद ३ + अपक्ष व इतर ३०).

या १३४ मधल्या फक्त ६६ खासदारांचा पाठिंबा काँग्रेसला बहुमतासाठी आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसचे सरकार पडून मध्यावधी निवडणूका होणे अशक्य आहे.

शायर हटेला यांची पोस्ट वाचुन हसायला आले. त्यापलिकडे किंमत द्यावी असे वाटत नाहि आणी त्या पोस्ट ची त्याहुन जास्त लायकीही नाहि.

बाबा बिजेपीचे असोत वा नसो, काळा पैसा भारतात आला पाहिजे हि मागणी बरोबर आहे. माणुस बिजेपीचा असेल तरी या मागणीत गैर काय ते समजत नाहि.

.

चाणाक्य,

कृपया, वैयक्तीक टिका टाळुन मतप्रदर्शन करायला पाहिजे. कटुता निर्माण करुन मतपरिवर्तन शक्य नसते.

आपण काही कुणाचे शत्रु नाही. या निमित्ताने वर्तमानपत्रांच्या विकलेल्या मतांपेक्षा जास्त चांगले मतप्रदर्शन व त्यातुन महत्वाच्या प्रश्नांवर वैयक्तिक मत तयार व्हावे इतका माफक उद्देश या चर्चेचा असायला हरकत नाही.

या १३४ मधल्या फक्त ६६ खासदारांचा पाठिंबा काँग्रेसला बहुमतासाठी आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसचे सरकार पडून मध्यावधी निवडणूका होणे अशक्य आहे.

जेव्हा केंव्हा निवडणुका होतील त्याची तयारी आज पासुन केल्यास जास्त चांगले.

कृपया, वैयक्तीक टिका टाळुन मतप्रदर्शन करायला पाहिजे. कटुता निर्माण करुन मतपरिवर्तन शक्य नसते. >>

यात वैयक्तीक टिका काय आहे बुवा ? Uhoh मी त्यांच्या पोस्टची लायकी काढली. त्यांची नाहि!

असो. " मुळातच सगळे हिंदु साधुसंत रामदेव बाबा, आसाराम बापु ,नरेन्द्र महाराज , श्री श्री वगैरे चोर लुछे लफंगे आहेत " हे वाक्य तुम्हाला वैयक्तीक टिका वाटले नाहि म्हणजे आश्चर्यच आहे.

अंतःस्थ हेतू सत्ताप्राप्ती किंवा सत्ताबदल हाच आहे. बाबांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांचा. असा हेतू असणे हे गैर नाही,किंबहुना असा हिडन अजेंडा असणेही गैर नाही. फक्त असा उघड हिडन अजेंडा असला की मग त्याच्या आवरणाला ढोंग म्हणण्याचा पर्याय खुला राहातो.बाबांनी सांगितलेल्या मार्गाने काळा पैसा भारतात परत येणार नाही,त्याची निर्मितीसुद्धा थांबणार नाही,चुटकीसरशी तर मुळीच नाही, हे सर्व लोक जाणतात, मानतात. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे.असे 'पॉप्यूलर हीरोज' लोकशाहीला घातक ठरू शकतात. याहूवर गिरीश शहाणे यांचे एक सुंदर आर्टिकल यासंबंधात आज आले आहे.
हीरा,

रामदेव बाबांना ढोंगी म्हणा. लोकशाहीत हा अधिकार आहे. गेले अनेक वर्षे गावोगाव फिरुन नि:शुल्क योग शिकवणार्‍या माणसाला ढोंगी म्हणणे गैर आहे. २५ मेला आस्था चॅनलवर मी त्यांचा कार्येक्रम पहात होतो. मध्यप्रदेशच्या त्या शहरात अनेक लोक सकाळी समोरची जागा नाही मिळणार म्हणुन मैदानावर लांबुन येऊन रात्री मुक्काम करुन होते. जिथे निस्वार्थपणा असतो तेथेचे हे पहायला मिळते.

या देशात सर्व निरोगी असावेत ही इच्छा व्यक्त करुन अनेक लोकांना योग करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे भावी तलवार, दाऊद आणि दाभोळ विजप्रकल्पाच्या घोषणा करण्यापेक्षा कठीण आहे. हे ज्याने समजाऊन घेतले की लक्षात येत की रामदेवबाबांना विरोध करणारे सत्ताधारी लोक खुर्ची जाण्याच्या भितीने ग्रासले आहेत.

१९७७ साली जेव्हा पुल देशपांडे, दुर्गा भागवत जेव्हा जनता पक्षाच्या माध्यमातुन पुढे आल्या तेव्हा त्यांचावरही टिका झाली. सभेत वळु सोडण्यात आले. पण हे निस्वार्थी लोक सरकारमध्ये खुर्ची अडवुन बसले नाहीत. पुल तर जनता पक्षाच्या विजयसभेला सुध्दा आले नाहीत.

जेव्हा लोकशाही कठीण कालखंडतुन वाटचाल करते तेव्हा असे लोक पुढे येतात. जनसामन्यांनी त्यांच्यावर आधीच टिका करण्यापेक्षा पुढे काय घडते ते पहावे.

राम, अगदी अगदी सहमत.सत्तेवर नसताना जोरदार आंदोलने करायची,सरकारकडे भल्याथोरल्या मागण्या करायच्या आणि सत्ता मिळाली की त्यातली एकही पुरी करण्याची आपली कुवत नाही हे कळून चुकले की वेगवेगळ्या कसरती करायच्या हेच काम भारतातील विरोधी पक्ष करीत आलेले आहेत.
प्रतीक देसाई, भ्रष्टाचाराचा उगम हा वर नसून खाली तळागाळात आहे,प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेत,बेशिस्तीत,बेलगामीत आहे आणि सामान्य जनतेला या सामान्यांच्या सामान्य गैरव्यवहारांचाच त्रास अधिक होतो असे माझे मत आहे.राज्यकर्ते हे आपलेच प्रतिनिधित्व करणारे,आपल्यातूनच आलेले असल्यामुळे जे आडात आहे तेच पोहोर्‍यात येणार हे उघड आहे.
दुसरे,पॉप्यूलर या शब्दाचे भाषांतर आपण लोकप्रिय असे करीत असलो तरी इंग्लिशमधे त्या अर्थाला सवंग लोकप्रियता अशी एक डूब असते.

चाणाक्य,

मताला किंमत देत नाही असे वाक्य वैयक्तिक टिका समानच आहे. असो आपल्याला पटले नसल्यास क्षमा असावी. मी उशिरा इथे आलो. प्रतिसादाचे पान ही बदलले आहे. ती मते माझ्या वाचनातुन निसटली असावीत.

फक्त असा उघड हिडन अजेंडा असला की मग त्याच्या आवरणाला ढोंग म्हणण्याचा पर्याय खुला राहातो >>>

उघड हिडन अजेंडा ?????? म्हणजे नक्कि काय बुवा ? Proud

हीराजी,

भ्रष्टाचाराचा उगम हा वर नसून खाली तळागाळात आहे,प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेत,बेशिस्तीत,बेलगामीत आहे आणि सामान्य जनतेला या सामान्यांच्या सामान्य गैरव्यवहारांचाच त्रास अधिक होतो असे माझे मत आहे.राज्यकर्ते हे आपलेच प्रतिनिधित्व करणारे,आपल्यातूनच आलेले असल्यामुळे जे आडात आहे तेच पोहोर्‍यात येणार हे उघड आहे.

पांडुरंगशास्त्री आठवले यांचा एक सिध्दांत आहे. समाजात ३० % लोक रोल मॉडेल किंवा नेतृत्व करणारे असतात. ते ज्या पध्दतीने वागतात त्याचे अनुकरण ७०% लोक करतात. या ३० % लोकांच्यात जर किमान १५% सज्जन लोक असतील तर ८५ % समाज सदाचाराकडे वळतो. याउलट ही संख्या घसरली तर सदाचार नसतोच या विचाराने लोक अनाचारी लोकांचे अनुकरण करतात.

>> कोथिंबीरवाल्याचे/क्लासवाल्याचे उत्पन्न टॅक्सेबल नसल्याने त्याने रेकॉर्ड नाही ठेवले तर चालते. मग हा व्यवहार काळा पैसा कसा बुवा

जागो,
ज्या मिळकत वा खर्चाचा कागदोपत्री हिशेब देता येत नाही त्याला काळा पैसा म्हणतात या साध्या व्याख्येच्या अर्थी माझे विधान होते- टॅक्स रिटर्न्स मध्ये काय दाखवायचे काय नाही वगैरे तुम्ही म्हणता तसा वेगळा विषय आहे.
पण मुद्दा तोच आहे की जे बेहिशेबी असते ते बेकायदेशीर असते, ते "हिशेबात वळते" करून दाखवण्याचे धंदे अनेक आहे तो भाग वेगळा Happy

असो. चालूदेत चर्चा. रामदेवांनी लावेलेली काडी आताशी कुठे पेट घेतीये.. अजून काय आणि किती मनोरंजन येणार्‍या दिवसात होणार आहे ते बघायला मिळेलच.

Pages