रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून सरकारने काय साधले?

Submitted by dr.sunil_ahirrao on 6 June, 2011 - 00:17

काल रात्री १ वाजता अचानक पोलिसांनी बळाचा वापर करून रामदेवबाबांना अटक करून आंदोलन चिरडून काढले.यावेळी अश्रधुराचा आणि लाठीमाराचा वापर केला गेला.इतकेच नव्हे तर काही 'पोलिसांनी' आंदोलकांवर दगडफेक सुध्दा केल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखवले.किरकोळ तांत्रिक कारणाचा आधार घेऊन पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढले,हे कितपत समर्थनीय आहे? असे करून सरकारने काय साधले?

१)सरकारला हे आंदोलन महागात पडणार होते,म्हणून येनकेनप्रकारेण त्यांना बाबांना तेथून हटवायचे होते? असे करून सरकारने स्वतःची चिंता मिटवली?

२)अण्णा हजारे रामदेवबाबांना पाठींबा देण्यासाठी आंदोलनस्थळी हजेरी लावणार होते,त्यामुळे आंदोलनाची ताकद वाढली असती-जे सरकारला होऊ द्यायचे नव्हते?

३)बाबा आंदोलनस्थळावरून सरकारचे एखादे मोठे बिंग फोडण्याची शक्यता होती?

ती आता नाहीशी झाली?

४)भविष्यात अशी आंदोलने होऊ नयेत यासाठी दहशत बसावी म्हणून? की

५)सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे बनत चालले आहे? असे असेल,तर मग सरकारचे आणि भारताचे भविष्य अंधारमय आहे ,असे नाही वाटत?

Group content visibility: 
Private - accessible only to group members

सरकारच्या वतीने मंत्री भेटल्यावर मग त्यांच्याकडे आंदोलन स्थगित करण्याचं मान्य करणं आणि प्रत्यक्षात मात्र तिकडे गेल्यावर असं आंदोलन करायचं, हे अयोग्यच होतं.

पुन्हा एकदा जोरदार अनुमोदन !!

सरकारच्या वतीने मंत्री भेटल्यावर गोलमेजला जायचं मान्य करणं आणि प्रत्यक्षात तिकडुन परत आल्यावर आंदोलन करणं हे अयोग्यच होतं !त्यांनी आधीच स्पष्ट करायला हवं होतं की आम्हाला तुमचं सरकारचं मान्य नाही त्यामुळे आंदोलन होणारच आहे.

रामदेव बाबा हे आरऍसऍस, विश्व
हिंदू परिषद आणि भाजपाचं पिल्लू आहे, यात शंका नाही. त्यांनी आपला राजकीय
पक्षही वर्षाआधीच जाहीर केलाय. ते आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करताहेत

लोकशाहीत यात काय गैर आहे ? काँगेस सेवादल, इंटक ही पिल्लावळ चालते आणि
रामदेवबाबाच का नाही ?

हो हो आरऍसऍस, विश्व हिंदू परिषद आणि भाजपा हे वाईट्टच्चेत
काँग्रेस तेवढी स्वच्छ, नितळ, कायदा पाळणारी इ.इ.

नितीन, चालायला काय, आपल्याला कुणीही चालतं. शेवटी लोकशाही आहे... मी बाबाला आक्षेप कधीच घेतला नाहीये. फक्त तिथे जे झालं ते कायद्यात बसत नव्हतं. हे सांगतेय.

आधुनिक विज्ञानाने ही जे सिध्द केलेय की योगाभ्यासाने आरोग्य सुधारते - अशा योगाचे यशस्वी मार्केटिंग करून रामदेवबाबाने भरपूर पैसा जोडला यात नेमके काय वाइट केले की त्यांना भोंदू म्हणावे? अन राजकारणी मंडळी कसा पैसा जोडतात ते टेलिकॉम राजाच्या भारतातल्या व " जाणत्या" राजाच्या महाराष्ट्रातल्या लोकांना काय वेगळे सांगावे? रामदेवबाबानी जर गैरप्रकार केले असतील तर कायदा राबवणारी यंत्रणा आहे. जातील तिहारजेलमधे अन कलमाडी/राजा/ कनिमोझीला योग शिकवतील. रामदेवबाबानी बनवलेली औषधे घेउन लोकांना बरे वाटले नसते तर ती खपली नसती. दवाई मे जानवरका हड्डी क्या और आदमीका हड्डी क्या इलाज होनेसे मतलब असे शिफारसपत्र सेक्युलर, चारा फेम लालूप्रसादांनी दिले होते असे स्मरते. मग आता संघपरिवाराने पाठिंबा दिला म्हणून रामदेवबाबानी चालवलेला भ्रष्टाचार विरोधी लढा समाजा करता घातक कसा ठरतो? की आता सेक्यूलर भ्रष्टाचार व कम्युनल भ्रष्टाचार असे भ्रष्टाचाराचेही प्रकार निर्माण झाले आहेत? व त्या नुसार त्यांच्या विरोधी लढे उभारायला हवे? असे अनेक प्रश्न या धाग्यावरची चर्चा वाचून माझ्या मनात उभे राहिले आहेत.

ठमादेवी | 6 June, 2011 - 14:51
बरं झालं सांगितलंत... मला कुणाचंही सरकार असल्याने फरक पडत नाही. फक्त बाबा, आण्णा आणि ताईंचं नसलं म्हणजे मिळवली.

ठमादेवी | 6 June, 2011 - 16:45
नितीन, चालायला काय, आपल्याला कुणीही चालतं. शेवटी लोकशाही आहे... मी बाबाला आक्षेप कधीच घेतला नाहीये. फक्त तिथे जे झालं ते कायद्यात बसत नव्हतं. हे सांगतेय.

यात नक्की काय खरं?

मला नकोच्च आहे त्यांचं सरकार. पण त्यांचा आंदोलन करण्याचा अधिकारही नाकारत नाहीये. फक्त जे करायचं ते कायदेशीर मार्गांनी करा, नीट कागदोपत्री परवानगी घेऊन करा म्हणजे फटके खायची वेळ येत नाही. Proud

बाकी मंजो, तुम्हाला ज्या गोष्टी कळत नाहीत तिथे जास्त काळ थांबत जाऊ नका... एक फुकटचा सल्ला. Light 1 Proud

कोमल,
रामदेवबाबा मागणी काय करत आहेत हे सोडुन हाडे, भाजप - विहिंप, अन्य तांत्रिक मुद्यांकडे
चर्चेचा ओघ वळवायचा हा प्रकार चांगला नाही. हे सर्व प्रसार माध्यमांना उद्देशुन आहे.
कोमल यांना वैयक्तिक नाही.

दिल्ली कोर्टाने सुध्दा कोणाच्याही अर्जाशिवाय सरकारला चौकशीचे आदेश दिले आहेत यातुन
बोध घेता येऊ शकतो.

>>> दिनेशदा, रात्री १० नंतर कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. मग ती लग्नाची वरात असो नाहीतर योगशिबीर...

अहो, पण रात्री १० नंतर सर्व आंदोलक झोपलेले होते. आता १० नंतर झोपायची देखील कायद्याने बंदी असेल तर मग अशृधूर सोडून व लाठीमार करून त्यांना उठवणे योग्यच होते. शेवटी कोणी किती का जखमी होईना, घटनापालन झाल्याशी कारण.

मंजो, तुम्ही जे करताय ते सगळ्यांनाच दिसतंय...

असो. नितीन, मी मघाशीच म्हटलं की सरकारने जे केलं ते अयोग्य आहेच. पण बाबाची पार्श्वभूमीही स्पष्ट होणं आवश्यक आहे. शिवाय या सगळ्या तांत्रिक बाबी जगजाहीर आहेत. त्यात लपवण्यासारखं काहीही नाही.

चलो, मी चाल्ले आता...

>>> ते आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करताहेत

राजकारण करायला भारतात बंदी कधीपासून आली? मुस्लिम अनुनय, कर्जमाफी, अफझलची फाशी इ. गोष्टींच्या माध्यमातून काँग्रेस राजकारण करते त्याचं काय?

आणि जामा मशिदीचा इमाम काश्मीर समस्येवर वगैरे भडकावणारी भाषणे करतो तेव्हा नाही कुणी त्याला सांगायला जात... की तुम्ही फक्त कुराण पठण करा राजकारण नको म्हणून. आणि हे सुद्धा वर्षानुवर्ष सुरू आहे.

नितीन बरोबर बोललात
महीनाभर तरी बुवा ओरडतोय आंदोलन करेन वगैरे
मैदान एका महीन्यासाठी बुक केलेले ते निव्वळ उपोषणासाठी आता गरीब बिच्चा-या कॉग्रेसजनांचा समज झाला की अरे हा बुवा तर योगा शिकवतोय तेव्हा योगाच करेल.

बाकी टगया सही लिहीलयस

डॉ.साहेब,

भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे मग ते आंदोलन कोणीही करो, देशात बांबाना नांव ठेवणारे तरी निष्कलंक आहेत का?
उगाच मोठे मोठे शब्द वापरायचे अन हे बरोबर आहे ते चुक आहे म्हणत विषय वाढवत जायचा.
मी राजकारणी आहे म्हणून मला बांबाना पाठींबा देता येणार नाही का? शब्दांचा खेळ आहे सारा.
प्रत्येक गोष्टीला फाटे फोडणारे आहेत, त्यांचा तो उद्योगच आहे असे वाटते.
सरकारने आंदोलन चिरडले हे चुकच आहे.

सुप्रीम कोर्टाच्या बातमीत आणखी काही मजकूर आहे. यासंबंधात एक याचिका दाखल करण्यात येणार होती. पण ती याचिकाच सर्व वर्तमानपत्रांना मिळाली, त्यामुळे ती याचिका दाखल करुन न घेता, कोर्टाने स्वतःहून हा आदेश दिला आहे.

>>> दुसर्या दिवशी सकाळच्या सुमारास परिस्थिती चिघळेल म्हणून पोलिसांनी कारवाई केली.

दुसर्‍या दिवशी परिस्थिती चिघळेल म्हणून पोलिसांनी मध्यरात्री झोपलेल्या आंदोलकांना झोडपून काढून व अश्रृधूर सोडून त्यांना पळवून लावून खबरदारी घेतल्याबद्दल पोलिसांचे व युपीए सरकारचे अभिनंदन!

>>> कारवाईसाठीसुद्धा कारण होतं, ते म्हणजे, योगा शिबीरासाठी घेतलेल्या जागेचा उपोषणासाठी वापर केला म्हणून.

आपण उपोषण करणार हे रामदेवबाबांनी १-२ महिने आधीच सांगितले होते. तरीसुध्दा या कारवाईला उशीर केला याबद्दल दिल्ली पोलिसांना अटक केली पाहिजे.

>>> कायद्यानुसार ते चुकीचं ठरतं, म्हणून सेक्शन १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली.

सेक्शन १४४ हे मध्यरात्री आंदोलकांना झोडपून काढून हाकलल्यानंतर लावले. ४ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत हे कलम लावलेले नव्हते.

>>> रामदेव बाबा हे आरऍसऍस, विश्व हिंदू परिषद आणि भाजपाचं पिल्लू आहे, यात शंका नाही.

बरं मग. एखाद्या पक्षाचे किंवा संघटनेचे पिल्लू असणे याला घटनेची बंदी आहे का? आणि संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिवधर्म, जिजाऊ ब्रिगेड ही कोणाची पिल्ले आहेत?

>>> त्यांनी आपला राजकीय पक्षही वर्षाआधीच जाहीर केलाय.

जर ते वेगळा पक्ष काढणार आहेत, तर मग ते भाजप या पक्षाचे पिल्लू कसे?

मिसळपाव.कॉम वरील http://www.misalpav.com/node/18149 या अशाच एका धाग्यावरील धमाल मुलगा यांचा हा प्रतिसाद मला आवडला.

ह्म्म..
धमाल मुलगा यांनी Mon, 06/06/2011 - 14:56 ला प्रकाशित केले.
गडबड आहे खरी.

परंतू, मला गंमत वाटतेय ती दुसर्‍याच गोष्टीची.
जो माणूस, काहीतरी विधायक कार्य करायचा प्रयत्न करतोय, (मग भले त्यात त्याचा हिडन अजेंडा का असेना) तर त्या कामात बिब्बा घातलाच पाहिजे.
राजकारण्यांची रखेल बनलेली प्रसारमाध्यमं जे ओकतील त्यावर निर्बुध्दपणे माना डोलावल्याच पाहिजेत, अडचणीत येणार्‍या भ्रष्टाचारी सरकार आणि त्याच्या नोकरशाहीच्या दडपशाही आणि अंदाधुंद कारभाराला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या मदत केलीच पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं काही विधायक काम करण्याची काहीशी का होईना इच्छा असलेला मनुष्य प्रयत्न करु लागला रे लागला, की ताबडतोब त्याचं खच्चीकरण केलंच पाहिजे ह्या हस्तीदंती मनोर्‍यातील विचारांना कुरवाळणार्‍या 'मला काय त्याचं?' ह्या नवउच्चमध्यमवर्गिय मानसिकतेचं जे जाहीर प्रदर्शन दिसतंय त्याचं काय? हे सगळेच तर उभा देश मातीत घालायला निघालेत की.

*(हिडन अजेंड्याबद्दलचं वैयक्तिक मतः आजच्या घडीला कोण माईचा लाल आहे उभ्या १००कोटीच्या ह्या देशात, की जो स्वत:च्या हिडन अजेंड्याविना काम करतोय? मग त्यातल्या त्यात जरा बरं असलेलं जरी दिसलं तरी त्याची बाजू काळीकुट्ट ठरवण्यातून लोकांना काय आसूरी आनंद मिळतो कोण जाणे. )

>>बरं मग. एखाद्या पक्षाचे किंवा संघटनेचे पिल्लू असणे याला घटनेची बंदी आहे का? आणि संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिवधर्म, जिजाऊ ब्रिगेड ही कोणाची पिल्ले आहेत?

स्वाभिमान संघटनेला विसरलात Happy

तुमचा आमचा पैसा राजकारणी लोकांनी स्विस बँकेत नेऊन ठेवला आहे हे मान्य आहे का ?

सर्वच राजकिय पक्ष आळीमिळी .... गप्प आहेत.

राजकारणी लोकांशी लढायला चुकीचे तंत्र वापरले म्हणुन मुळ उद्देश कसा चुकीचा ठरतो ?

आता बातम्या पाहतेय, शीला दीक्षित म्हणतात, "कारवाईबद्दल मला माहिती नव्हती." सोनिया म्हणतात, "कारवाई मध्यरात्री का केली?"

प्रश्न असा की पोलीस कारवाईचा आदेश कोणी आणि का दिला?

>>> आता बातम्या पाहतेय, शीला दीक्षित म्हणतात, "कारवाईबद्दल मला माहिती नव्हती." सोनिया म्हणतात, "कारवाई मध्यरात्री का केली?" प्रश्न असा की पोलीस कारवाईचा आदेश कोणी आणि का दिला?

युपीए सरकारमध्ये व काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या आदेशाशिवाय पान तरी हलते का?

ज्योति_कामत | 6 June, 2011 - 15:43 नवीन
आता बातम्या पाहतेय, शीला दीक्षित म्हणतात, "कारवाईबद्दल मला माहिती नव्हती." सोनिया म्हणतात, "कारवाई मध्यरात्री का केली?"
प्रश्न असा की पोलीस कारवाईचा आदेश कोणी आणि का दिला?

>>>>

अरे व्वा !!

ज्योती जबरदस्त शोध !!

ह्यात नक्कीच भाजपाची चाल असणार .....२६-११ च्या वेळेला त्यांन्नीच( भाजप,संघवाल्यांनी) जाणुन बुजुन करकरेंना घटना स्थळी जाण्याचा आदेश दिला होता ( अन करकरेंचा खुन करवला होता )

मध्यंतरी या पैश्यासंबंधात काही इमेल्स फिरत होत्या. यापैकी अनेक खातेदार आज परागंदा आहेत. हा पैसा जर भारतात आला, तर अर्थव्यवस्था मजबूत होईलच शिवाय अनेक वर्षे कुठलाही कर लादावा लागणार नाही वगैरे वगैरे. .. याचा अर्थ असा आहे कि कुणाकडे तरी त्याबद्दल माहिती आहेच.

दुसरे म्हणजे असे एक खाते मी स्वतः माझ्या कंपनीसाठी ऑपरेट करतो. त्याबाबात बाऊ केला जातोय तितकी गुप्तता असेल असे मला वाटत नाही. शिवाय सरकारी पातळीवर जर आदेश निघाले तर त्या बँकाना ती माहीती पुरवावीच लागेल.

ज्या लोकांनी हा पैसा तिथे ठेवला आहे, त्यांनी कायदेशीर मार्गानी, कर भरुन हा पैसा जमा केला असेल, याची अजिबात शक्यता नाही.
हा पैसा परत आणणे, कोहिनूर हिरा वा भवानी तलवार भारतात आणण्याइतके अवघड नक्कीच नाही.
केवळ राजकिय इच्छाशक्ती हवी आहे.

दिनेशदा,

आज पर्यत सामान्यांना देशाची अर्थव्यवस्था चालवण्याइतका पैसा स्विस बॅकेत आहे हे माहित नव्हते. आता लोक लक्ष ठेवतील. परिणामी राजकारण्यांना दुसरा मार्ग शोधावा लागेल.

Pages