..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूर्याला जे दिसत नाही ते कविला दिसते असे म्हणतात. पण म्हणून काहीही आणायचं का डोळ्यापुढे? काय तर म्हणे माझ हृदय म्हणजे कौलारु छप्पर त्यातल्या एका कौलात तुला बसवीन. ओळखा Happy

'सिने मे जलन आखों मे तूफान सा क्यों है' हे माझ्या कोड्याचं उत्तर नाहिये. लोक्स, बाकीची सिच्युएशन लक्षात घ्या.

.

माधव नाही....आता द्रुपलभाऊ यायच्या आत उत्तर सांगून टाकते

गेले काही दिवस वामनरावांना छातीत दुखत असतं. अगदीच असह्य झाल्यावर ते बायको, मुलगा आणि एका मित्राला सोबत घेऊन डॉक्टरकडे जातात. सगळी कर्मकहाणी सांगतात. वामनरावांची बायको, मुलगा आणि मित्र डॉक्टरना त्यांच्या सिगरेट पिण्याबद्दल सांगतात. डोळ्यांत पाणी आणून केविलवाण्या नजरेने 'आता मला तपासा तरी' असं वामनराव डॉक्टरना कोणत्या गाण्यातून सांगतील?

उत्तरः
दिलकी आवाजभी सुन, मेरे फसानेपे न जा
मेरी नजरोंकी तरफ देख, जमानेपे न जा

सूर्याला जे दिसत नाही ते कविला दिसते असे म्हणतात. पण म्हणून काहीही आणायचं का डोळ्यापुढे? काय तर म्हणे माझ हृदय म्हणजे कौलारु छप्पर त्यातल्या एका कौलात तुला बसवीन. ओळखा>>>>>

दिल के झरोखें मैं तुझको बिठा कर????

गेले काही दिवस वामनरावांना छातीत दुखत असतं. अगदीच असह्य झाल्यावर ते बायको, मुलगा आणि एका मित्राला सोबत घेऊन डॉक्टरकडे जातात. सगळी कर्मकहाणी सांगतात. वामनरावांची बायको, मुलगा आणि मित्र डॉक्टरना त्यांच्या सिगरेट पिण्याबद्दल सांगतात. डोळ्यांत पाणी आणून केविलवाण्या नजरेने 'आता मला तपासा तरी' असं वामनराव डॉक्टरना कोणत्या गाण्यातून सांगतील?>>>>>>

स्वप्नाच्या वरच्या कोड्याला पुढे continue करतो Proud

वामनरावांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर त्यांची तपासणी करतात. सगळ्या चाचण्या करावयास सांगतात आणि शेवटी जे व्हायचे असते तेच होते. वामनरावांना ब्लड कॅन्सर होतो. ते फक्त २-३ दिवसच जगणार असे डॉक्टर सांगतात. वामनरावंना धक्का बसतो. आपल्या हातात केवळ २-३ दिवसच आहे हे जाणुन ते आपल्या कुटुंबियांना जवळ बोलावतात आणि हे गाणे म्हणतात. Happy

माधव, अखियोंके झरोके म्हणजे डोळ्यांच्या खिडक्या हो, छप्पर नाही Happy

असो. माझं आजचं शेवटचं कोडं:

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करून कप जिंकला. कुमार संगाकारा मात्र अनिमिष नेत्रांनी त्या कपाकडे पहात होता. तर तो कप त्याला काय म्हणेल?

जिप्शा एकदम सही>>>>हुर्रे!!!!
:आजच्या दिवसात एकतरी गाणं ओळखल्याच्या आनंदात नाचणारा बाहुला:

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करून कप जिंकला. कुमार संगाकारा मात्र अनिमिष नेत्रांनी त्या कपाकडे पहात होता. तर तो कप त्याला काय म्हणेल?>>>>>>

(पण हे लेडिज आवाजातले आहे :()
"पराई हुं पराई मेरी आरजु न कर, न मिल सकूंगी तुझको मेरी जुस्तजु न कर"???

जिप्सी, अजून नाचा. गाणं बरोबर आहे Happy

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करून कप जिंकला. कुमार संगाकारा मात्र अनिमिष नेत्रांनी त्या कपाकडे पहात होता. तर तो कप त्याला काय म्हणेल?

उत्तरः पराई हुं पराई मेरी आरजु न कर, न मिल सकूंगी तुझको मेरी जुस्तजु न कर

माधव
स्वप्नाच बरोबर आहे. तू कौलात म्हणालायस. खिडकी वेगळी दार वेगळ. बेसिन वेगळ मोरी वेगळी.

स्वप्ना
त्याला काय शिक्षा करायची?

बाहेर पडणा-या पावसाला पाहून मला एक किस्सा आठवल. एका इंग्रजी शाळकरी मराठी मैत्रीणीने एका गाण्याबद्दल विचारल हे गाण तर पावसाच वर्णान सांगत मग तुम्ही अश्लिल का म्हणता?
गाण अर्थातच मराठी आहे सांगा कोणात?

गुगु, बस काय? ढगाला लागली....आता म्हणू नको की दिनेशदांच्या मैत्रिणींना असली गाणी पण येतात म्हणून. नाहीतर फटकावीन बघ Proud

वामनरावांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर त्यांची तपासणी करतात. सगळ्या चाचण्या करावयास सांगतात आणि शेवटी जे व्हायचे असते तेच होते. वामनरावांना ब्लड कॅन्सर होतो. ते फक्त २-३ दिवसच जगणार असे डॉक्टर सांगतात. वामनरावंना धक्का बसतो. आपल्या हातात केवळ २-३ दिवसच आहे हे जाणुन ते आपल्या कुटुंबियांना जवळ बोलावतात आणि हे गाणे म्हणतात. >>>>>

एक क्लु: हे गाणे लेडिज आवाजातील आहे. Happy

स्वप्ना, गुगु अरे हो हिंदीत झरोखा = खिडकीच पण मी जरा मजेशीर करायला मराठीतून अर्थ घेतला तरी त्या जिप्शाने ओळखलेच Sad

माधवचं घर पावसात बांधू >> चेरापुंजीला चालेल Happy

स्वप्ना, गुगु अरे हो हिंदीत झरोखा = खिडकीच पण मी जरा मजेशीर करायला मराठीतून अर्थ घेतला तरी त्या जिप्शाने ओळखलेच>>>>हो ना. Happy कुणाला ओळखता नसते आले तर मग शिक्षा करायची. Proud

खि!!!खि!!!खि!!!खि!!!खि!!!

स्वप्ना वाह!!! मला खोट पडू दिल नाहीस जे जे वाटल ते ते उतरवलयस

जिप्सी
आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा

आशाला, सी रामचंद्र, वसंत देसाई, रवि, जयदेव यांनी पण उत्तम गाणी दिली.
आर्डीने मात्र पहिल्यांदा त्याच्या अनेक उत्तम रचना लतालाच दिल्या. ( हे आता वाचायला कठीण जातेय )
घर आजा घिर आयी, आजकल पाँव जमीपर, बाहोमे चले आओ, रैना बिती जाये, चुनरी संभाल, आजा पिया तोहे प्यार दु... कितीतरी सांगू शकेन.
कारवॉं मधे तीन हिरवीनी, आशा पारेख, हेलन आणि अरुणा इराणी .. आरडीने वाटणी करताना हेलन आणि आशा पारेख ची गाणी आशाला दिली तर अरूणा इराणी चे लताला दिले.
बंदीनी मधे मात्र एक अजब गोष्ट घडली. एसडीने आनंदी गाणी ( मोरा गोरा अंग / जोगी जबसे तू आया ) लताला तर गंभीर गाणी आशाला ( अबके बरस / ओ पंछी प्यारे ) दिली.

जयदेव ने, हम दोनो मधे मात्र छान विभागणी केली, अभी ना जाओ छोड्कर आणि जहॉमे ऐसा कौन है हि साधनाची गाणी आशाला तर, अल्ला तेरो नाम आणि प्रभु तेरो नाम हि नंदाची गाणी लताला दिली.

जयदेवने दोघीना समसमान कठीण गाणी, मुझे जीने दो मधे दिली. माँग मे भरलो आशाला तर रात भी है, लताला. दिली. पण त्यात आशाचे पारडे, नदी नाले मुळे जड झाले.

मदनमोहनने फारच कमी गाणी आशाला दिली, पण अदालत (जा जा रे जा, जमींसे हमे ), मेरा साया ( झुमका गिरा रे ) वह कौन थी (शोख नजरकी बिजलिया ) मधे आशाने जान ओतलीय.

चला अजुन एक क्लु देतो Happy
ज्यांनी या गीताला संगीत दिले आहे त्यांच्याच घरातील एका व्यक्तीने हे गाणे गायले आहे.

Pages