शेव नजाकती - (फोटोसहीत )

Submitted by दिनेश. on 1 June, 2011 - 12:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी
अधिक टिपा: 

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे हे. करायला विचार करावा लागेल पण पिठले भातासारखे पटापट होणार नाही Happy

दिनेश एक सांगू का? तुम्ही फोटो टाकता ते खुपच मोठे असतात. साईझ साधारण ७०० पिक्सेल ठेवता येईल का? ते फोटो इथे डाव्या भागातल्या चौकटीत नीट बसतात म्हणुन सांगितले.
पिकासामधुन जर लिंक देत असाल तर मिडियम साईझ निवडा लार्ज नको.

काहीतरी नाविन्य इतपतच हा पदार्थ ठीक वाटतोय. उकडलेल्या पीठाची शेव खातोय असे मला वाटत राहील. पिठलं भाताशी याची तुलना होणे अशक्य... एकतर पिठल्याचा खमंगपणा यात नाही, नुसतीच मीठ, हळद, हिंगाची चव आहे. तुपाची धार ओतलेला गरम वाफाळता भात खमंग चुरचुरीत पिठल्याबरोबर भुरके मारून खाण्यातलं स्वर्गीय समाधान हा पदार्थ खाऊन मिळणे शक्य नाही.

मिनोती, पिकासावर तसे ऑप्शन दिसत नाही. ८०० च्या खालची साइझ करुन बघतो पुढच्या वेळी.

हो मंजूडी, नाविन्य म्हणूनच. पण हे दोन्ही प्रकार वेगवेगळे, पारंपारिकरित्या केले जातात. तांदळाची शेव नारळाच्या दूधाबरोबर खातात.
आणि बेसनाची शेव ज्यांना तळलेली शेव खायची नसते त्यांच्यासाठी हि चांगली. कच्चा कांदा घालून घेतात. पण मला कच्चा कांदा आवडत नाही. ताकात पिठ भिजवल्यास, साधारण सुरळीच्या वड्यासारखी चव येते.

गुगलच्या आजच उघडलेल्या 'आर्ट म्युझियम्स'मधे फेरफटका मारून इथं आलो तर प्र्.चि. बघून परत तिथंच गेल्यासारखं वाटलं ! चवीबद्दल प्रत्यक्ष करून चाखल्याशिवाय बोलणं बरोबर नसलं तरी प्रकार जीभेला संकेत देतोय ,हे खरं !! ग्रेट.

दिनेश, जो फोटो पिकासावरून इकडे आणायचा आहे त्या फोटोपेजवर जायचे तिथे -
१. उजवीकडे लिंक टू धिस फोटो अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे
२. तिथे खाली थंबनेल असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केले की अजुन ऑप्शन्स दिसतील
३. त्यातला २ किंवा ३ हे ऑप्शन्स मायबोलीवर नीट चालतात.
४. आता लिंक या शब्दाखालच्या बॉक्समधली लिंक कॉपी करमायबोलीबलीवर द्यायची!

मी बरेचसे फोटो तसेच टाकले आहेत.

इदीअप्पम व ओली शेव आहे ना ही. पांढरी शेव व बरोबर स्ट्यू पण मस्त लागेल. दमून आल्यावर एवढी मेहनत कशी जमेल? पण ब्रेकफास्टला मस्त आहे.

दिनेशदा, तुमच्या पाकृ नेहमीच हटके आणि तोंपासु असतात. फार मानसिक त्रास होतो त्या बघुन! Happy तुम्ही दिलेल्या नवीन पाकृ बघायच्या नाहीत असे मी ठरवले होते त्यामुळे सकाळपासुन या बाफकडे 'काणा'डोळा करत होते. पण अगदीच रहावलं नाही आणि भरल्या पोटी बघुनच टाकला.
आता करुन बघावाच लागेल (सोर्‍या आणल्यानंतर) असा हा पदार्थ आहे!
परत एकदा धन्यवाद!

आयडिया एकदम भारी आहे, मस्त दिसतंय. पण गरमगरम खावे लागेल ना? गार झाल्यावर (उकडलेली) शेव व्यवस्थित राहणार नाही बहुतेक.

बराच मेहनतीचा प्रकार आहे. आयता खायला मिळावा असा.
<<उकडलेल्या पीठाची शेव खातोय असे मला वाटत राह>> तांदळाच्या पिठाच्या शेवयांचा घोर अपमान. नारळाच्या गूळ घातलेल्या रसातल्या शेवया खाणे ही शिक्षा Happy

छानच प्रकार.
यात व्हेरिएशन म्हणुन बेसनाच्या जागी नाचणी किंवा कुळीथ पीठ वापरल्यास कसे? काय बदल करावेत?

भरत मयेकर Happy
अपमान वगैरे नाही हां, प्लिजच.
आमच्याकडे करतात त्या रसातल्या शेवया. फक्त उकडीचे गोळे पाण्यात वाफवून नंतर शेवया पाडत नाहीत तर उकडीच्याच शेवया थेट उकळत्या पाण्यात पाडतात. आणि त्यावर नारळाचे गूळ घातलेले दूध घालून खायचे म्हणजे अवर्णनीय पक्वान्न. त्या चवीपुढे हा पदार्थ म्हणजे मला खरोखर बिनपाकाची जिलबी वाटली.

पौर्णिमा, या शेवया गार झाल्या तरी फोडणीमुळे कोरड्या लागत नाहित. तसेही हे दोन्ही पदार्थ थंड करुनच खातात. फक्त तांदळाच्या शेवया, गोळे गरम असतानाच पाडाव्या लागतात एवढेच.

लिना,
नाचणीचे किंवा कुळथाचे पिठ वापरल्याच, चिकटपणासाठी (खास करुन कुळथाच्या पिठासाठी) पाव भाग मैदा किंवा कणीक वापरावी लागेल. नाचणीच्या पिठाला कमी लागेल. पण नाचणीचे पिठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे लागेल. नाचणीचे सत्व वापरले तर जास्त चांगले.

भरत : शिरवळ्या हा प्रकार कोकणाच्या बाहेर नाही माहित जास्त. कोकण्यांचा विक पॉइंट आहे तो.

अश्विनी : स्ट्यू तयार असेल तर नाही वेळ लागणार, नुसती शेव करायला.

वत्सला : मायबोलीकरांना दाखवले नाही, तर मला पण खावेसे वाटत नाही ना !

आज्जे : काय हे, कुणी कुणाला खाऊ घालायचे ?

मंजुडी , मजेतच लिहिलं होतं मी. पण तुम्ही काय म्हणताय ते कळतंय मला.
मी काही वर्षे इंदूरास होतो. तिथे कोणत्याही खास प्रसंगी दाल बाफले/दाल बाटी असा बेत असायचा. त्याच्यावर तुपाची आणि आग्रहाची धार. मात्र मुंबैवरून गेलेल्या बहुतेकांना तो पदार्थ म्हणजे उकडलेली कणीक वाटायचा. आणि भर उन्हाळ्यात एवढ्या कॅलरीज पोटात ढकलायच्या!

हो मंजूडी, नाविन्य म्हणूनच. पण हे दोन्ही प्रकार वेगवेगळे, पारंपारिकरित्या केले जातात. तांदळाची शेव नारळाच्या दूधाबरोबर खातात. >>> अगदी...

मी केरळी लोकांचा पुट्टू नावाचा असाच एक पदार्थ खाल्ला होता. फक्त त्यात पिवळ्या शेव नव्हत्या. ते लोक पुट्टू केळी आणि तुपाबरोबर खातात. गरम गरम पुट्टू सोर्‍यातून घालून त्याची शेव पाडता येईल. माझी आजी अशा पांढर्‍या उकडशेवया करायची. आम्ही त्या तूपसाखरेसोबत वरून खोबरं भुरभुरून खायचो. त्याची आठवण झाली.

दिनेशदा, तुमच्या पुढच्या देशवारीत तुमच्या मावशीला भेटायला रत्नागिरी ट्रिप असेलच, मग आपण भेटू. ज्योतिताई आणि इतर गिरीकरांनाही हाळी घालूच. येतील सगळे पटापटा आयती खादाडी गटग करायला.. Proud

डिश सहीच आहे! केली की झब्बू देते. (आधी शेवेचा साचा शोधते! Uhoh )

सह्हीच दिनेश दा.. अजून एका संजीव कपूर ला देश मुकला ना!!!.
>>>> अनुमोदन. वर्षुताई, तुला १०० मीटर शेवया बक्षीस.

छानच. लहानपणी एकदा या पिवळ्या शेवेचा प्रकार करतांना पीठ कच्चं राहिलं आणि मावसभावाने त्या पदार्थाचे नाव ठेवले कच्ची शेव Happy
फोटू सही!

वा......मस्त च. एरवी ह्याला भारतीय नुडल्स म्हटले तरी चालेल, नाव काहीही असु द्या दिसायला तर छान आहे बाकी चव सध्यातरी आपणासच माहित असेल. आम्ही येत्या रजेला बनवु व खाल्यानतर आपणास कळवु.......

बेसनाच्या शेवेला, ओली शेवच म्हणतात. आणि दाण्याच्या कुटाबरोबर चांगली लागते. मला वाटतं, कांदा घेतला तर आणखी चांगली लागेल.

Pages