स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आश्विनी के, हा माहितीपुर्ण धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
तसेच, लेखन केलेल्या सग़ळ्यांनाही धन्यवाद.
भगवद्गीता , दासबोध तसेच मी शोधत असलेले अनेक आरत्या आणि स्तोत्रे इथे मिळाली.
हा धागा निवडक १० मधे !
Thanks.

करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन येथे उपलब्ध आहे: http://www.samarthramdas400.in/mar/download_audio.php?strongid=karunasht...

करुणाष्टके समजायला अतिशय सोपी आहेत तरी पण हे प्रवचन एकदा अवश्य ऐकावे असे आहे.

श्री लिंगाष्टकः
ब्रह्ममुरारी सुरार्चित लिंङगं |
निर्मल भासित शोभित लिंङगं ||
जन्मज दुःख विनाशक लिंङगं |
तत् प्रणमामि सदाशिव लिंङगं || १ ||

देवमुनि प्रवारार्चित लिंङगं |
कामदहन करुणाकर लिंङगं ||
रावण दर्प विनाशक लिंङगं |
तत् प्रणमामि सदाशिव लिंङगं || २ ||

सर्व सुगंध सुलेपित लिंङगं |
बुद्धी विवर्धन कारण लिंङगं ||
सिद्ध सुरासुर वंदित लिंङगं |
तत् प्रणमामि सदाशिव लिंङगं || ३ ||

कनक महामणि भूषित लिंङगं |
फणिपती वेष्टित शोभित लिंङगं ||
दक्ष सुयज्ञ निनाषन लिंङगं |
तत् प्रणमामि सदाशिव लिंङगं || ४ ||

कुंकुम चंदन लेपित लिंङगं |
पंकज हार सुशोभित लिंङगं ||
संचित पाप विनाशक लिंङगं |
तत् प्रणमामि सदाशिव लिंङगं || ५ ||

देवागणार्चित सेवित लिंङगं |
भावै-र्भक्तिभिरेव च लिंङगं ||
दिनकर कोटी प्रभाकर लिंङगं |
तत् प्रणमामि सदाशिव लिंङगं || ६ ||

अष्टोदलोपरीवेष्टित लिंङगं |
सर्वसमुद्भव कारण लिंङगं ||
अष्टदरिद्र विनाषन लिंङगं |
तत् प्रणमामि सदाशिव लिंङगं || ७ ||

सुरगुरु सुरवर पूजित लिंङगं |
सुरवन पुष्प सदार्चित लिंङगं ||
परात्पर परामात्मक लिंङगं |
तत् प्रणमामि सदाशिव लिंङगं || ८ ||

लिंङगाष्टकमिदं पुण्यं य: पठेश्शिव संनिधौ |
शिवलोकमवाप्नोती शिवेन सह मोदिते ||

हसरी, तुला ही लिंक नीट दिसतेय का? मला काहीतरी अगम्य भाषा दिसतेय. तुला नीट दिसत असेल तर मी वर संपादीत करते.

॥ श्री ॥
अथं श्रीव्यंकटशेस्तोत्रम्
(या स्तोत्राचा पाठ रोज करतात.शक्यतो पाठ चालू असताना खंड पडु देउ नये.
लागोपाठ तीन रात्री स्नान करुन दर रात्री २१ वेळा पाठ केला असता विशेष फलदायी असतो.)

श्री गणेशाय नमः ॥
श्री व्यंकटेशाय नमः ॥
ॐ नमोजी हेरंबा सकळादि तूं प्रारंभा ॥
आठवूनि तुझी स्वरुपशोभा वंदन भाव करीतसी ॥१॥
नमन माझे हंसवाहिनी वाग्वरद विलासिनी ॥
ग्रंथ वदावया निरुपणी भावार्थखाणी जयामाजी ॥२॥
नमन माझे गुरुवर्या प्रकाशरुपा तूं स्वामिया ॥
स्फूर्ति द्यावी ग्रंथ वेदावया जेणे श्रोतेया सुख वाटे ॥३॥
नमन माझे संत सज्जनां आणि योगिया मुनिजनां ॥
सकळ श्रोतेयां सज्जनां नमन माझे साष्टांगी ॥४॥
ग्रंथ ऐका प्रार्थनाशतका महादोषासी दाहका ॥
तोषूनियां वैंकुठनायका मनोरथ पूर्ण करील ॥५॥
जयजयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा ॥
पंरज्योती प्रकाशगहना श्रवण की जे ॥ ६ ॥
जननीपरी त्वा पाळिले पितयापरी त्वा सांभाळिले ॥
सकळ संकटापासूनि रक्षिले पूर्ण दिधले प्रेमसुखा ॥७॥
हे अलैलिक जरी मानवी तरी जग हे सृजिलें आघवी ॥
जनकजननी स्वभावी सहज आले अंगासी ॥८॥
दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी ॥
प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या ॥९॥
आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मीरमणा ॥
मज घालोनि गर्भाधाना अलैलिक रचना दाखिवली ॥१०॥
तुज न जाणतां झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातलीं मिठी ॥
कृपांळुवा जगजेठी अपराध पोटी घालीं माझे ॥११।।

एवढं कशाला टाईप करतेयस? सिलेक्ट करुन इथे पेस्ट कर होत असेल तर.

पायपेटी, तुलाही अगम्यच दिसतंय ना?

हो

मला आयइ वर पण व्यवस्थित दिसतय, फक्त पान उघडल्या उघड्ल्या अगम्य दिसतय पण १ मि. तसच थांबलं तर ठिक होतय आपोआप. तिकडून कॉपी करायचा प्रयत्न केला पण ते इकडे टाकताना परत अगम्य होतय.

५२ श्लोकी... त्याला दत्तबावनी म्हणतात. ते मूळ गुजराती आहे. दत्तबावनी या नावाने सर्च करा..

गुजराती मिळाले. मराठीची लिंक कॉपी पेस्ट होत नाही. प्रयत्न करतो.

**************************************************************************
जय योगीश्वर दत्त दयाळ ! तुं ज एक जगमां प्रतिपाळ;
अत्र्यनसूया करी निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित.

ब्रह्मा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार;
अंतर्यामी सत् चित् सुख, बहार सदगुरु द्विभूज सुमुख.

झोळी अन्नपूर्णा करमांह्य, शांति कमंडल कर सोहाय;
क्यांय चतुर्भूज षड्भूज सार, अनंतबाहु तुं निर्धार.

आव्यो शरणे बाळ अजाण; ऊठ दिगंबर, चाल्या प्राण !
सुणी अर्जुन केरो साद, रीझ्यो पूर्वे तुं साक्षात्;

दीधी रिद्धि सिद्धि अपार, अंते मुक्ति महापद सार.
कीधो आजे केम विलंब, तुज विण मुजने ना आलंब !

विष्णुशर्म द्विज तार्यो एम, जम्यो श्राद्धमां देखी प्रेम,
जंभ दैत्यथी त्रास्या देव, कीधी म्हेर तें त्यां ततखेव.

विस्तारी माया दितिसुत, इन्द्रकरे हणाव्यो तूर्त
एवी लीला कंइ कंइ शर्व, कीधी वर्णवे को ते सर्व.

दोड्यो आयु सुतने काम, कीधो एने तें निष्काम,
बोध्या यदुने परशुराम, साध्यदेव प्रहलाद अकाम.

एवी तारी कृपा अगाध ! केम सूणे ना मारो साद?
दोड, अंत ना देख अनंत ! मा कर अधवच शिशुनो अंत !!

जोइ द्विजस्त्री केरो स्नेह, थयो पुत्र तुं निःसंदेह;
स्मर्तृगामी कलितार कृपाळ ! तार्यो धोबी छेक गमार.

पेटपीडथी तार्यो विप्र, ब्राह्मण शेठ उगार्यो क्षिप्र ;
करे केम ना मारी व्हार ? जो आणीगम एक ज वार!!

शुष्क काष्ठ ने आण्यां पत्र ! थयो केम उदासीन अत्र ?
जर्जर वंध्या केरां स्वप्न, कर्या सफळ तें सुतनां कृत्स्न.

करी दूर ब्राह्मणनो कोढ, कीधा पूरण एना कोड.
वंध्या भेंस दूझवी देव, हर्युं दारिद्रय तें ततखेव.

झालर खाइ रीध्यो एम, दीधो सुवर्णघट सप्रेम.
ब्राह्मणस्त्रीनो मृत भरथार, कीधो सजीवन तें निर्धार !

पिशाच पीडा कीधी दूर, विप्रपुत्र ऊठाड्यो शूर;
हरी विप्रमद अत्यंज हाथ, रक्ष्यो भक्त त्रिविक्रम तात!!

निमिषमात्रे तंतुक एक, पहोंचाड्यो श्रीशैले देख!
एकीसाथे आठ स्वरूप, धरी देव बहुरूप अरूप,

संतोष्या निज भक्त सुजात, आपी परचाओ साक्षात्.
यवनराजनी टाळी पीड, जातपातनी तने न चीड,

रामकृष्णरूपे तें एम, कीधी लीलाओ कंइ तेम.
तार्यां पथ्थर गणिका व्याध ! पशुपंखी पण तुजने साध !!

अधमओधारण तारुं नाम, गातां सरे न शां शां काम !
आधि व्याधि उपाधि सर्व ! टळे स्मरणमात्रथी सर्व !

मूठचोट ना लागे जाण, पामे नर स्मरणे निर्वाण.
डाकण शाकण भेंसासुर, भूत पिशाचो जंद असुर

नासे मूठी दइने तूर्त, दत्तधून सांभळतां मूर्त.
करी धूप गाए जे एम ‘दत्तबावनी’ आ सप्रेम,

सुधरे तेना बंने लोक, रहे न तेने क्यांये शोक !
दासी सिद्धि तेनी थाय, दुःख दारिद्रय तेनां जाय !

बावन गुरुवारे नित नेम, करे पाठ बावन सप्रेम,
यथावकाशे नित्य नियम, तेने कदी न दंडे यम.

अनेक रूपे एज अभंग, भजतां नडे न माया-रंग.
सहस्त्र नामे नामी एक, दत्त दिगंबर असंग छेक !!

वंदु तुजने वारंवार, वेद श्वास नारा निर्धार !
थाके वर्णवतां ज्यां शेष, कोण रांक हुं बहुकृतवेष ?

अनुभव-तृप्तिनो उद्दगार, सूणी हसे ते खाशे मार.
तपसी ! तत्वमसि ए देव, बोलो जय जय श्रीगुरुदेव !

धन्यवाद जामोप्या. कॉपी पेस्ट होत नसेल तर लिंक द्याल तर बरं होईल Happy

दिपुर्झा, दत्तबावनी १ल्या पानावरही आहे.

http://www.khapre.org/ वर पूजा विधी मध्ये दत्तोपासना क्लिक करा. ड्रॉप डाउन बॉक्स येईल. त्यात दत्तबावनी सर्च करा. मराठी आहे.

जामोप्या धन्यवाद. दत्तबावनी माहीती आहे पण ह्यालाच ५२ श्लोकी म्हण्त्तात ते नव्हतं माहीत. लिंक द्या जमल्यास.

दत्तबावनीच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ आणि त्यामागची कथा माझ्याकडे आहेत. इथे टाकेन लवकरच!

होय. होय. दत्तबावनी आणि बावन श्लोकी गुरुचरित्र वेगळे वेगळे आहेत. Happy

आणखी एक आहे. सप्तशती गुरुचरित्र... यातील प्रत्येक चरणाचे तिसरे अक्षर घेत्ले तर गीतेचा १५ वा अध्याय तयार होतो.. इथे उदाहरण म्हणून काही ओळी देत आहे....

datta 7.JPG

आमच्या घरात याची हस्त लिखित प्रत आहे. काही संकट असल्यास लोक वाचायला नेतात आणि पुन्हा आणून देतात.. Happy

अश्विनी के,

फार सुंदर धागा काढला आहेस, मी जरा उशिराच बघितला.

काही दुर्मिळ स्तोत्र आहेत माझ्याकडे त्यांची नांव देते, आधी कुणी टाकली नसतील तर टाकते...

||अथ श्रीगणेशकवचम||
||अथ श्री गणेशवरच स्तोत्र||
||अथ श्री गणेशभुजंगप्रयातम||
||श्रीगणेश्-भक्ति-स्तोत्रम|| आणि श्री समर्थ रामदासांची चौपदी, श्रीरामाची प्रार्थना, गजानन महाराज आवाहन पण आहे.

वरील सगळी स्तोत्र शुद्ध आणि स्पष्ट उच्चार करुन आणि चालीत म्हटलीत तर अतिशय सात्विक स्पंदन निर्माण होतात, अनुभव आल्याशिवाय रहात नाही.

दत्तबावनी: दत्तबावनी म्हणजे दत्तप्रभू आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लबह व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र.
या स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. हे स्तोत्र 'सईज' या गावी (ता. कलोल, जि.मेहसाणा, गुजरात) संवत/शके १९९१ माघ शु. प्रतिपदा सोमवार ता. ४/२/१९३५ रोजी करण्यात आली. सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशालेमधे या स्तोत्राची रचना झाली. मूळ दत्तबावनी गुजराती भाषेत असल्याने इथे त्याचा मराठीत अर्थ देत आहे.

संदर्भः "दत्तबावनी प्रश्नोत्तरी (लेखकः प्रा. कुलीन ग. उपाध्याय, अनुवादः श्रीमती कुंदा माजगावकर)आणि दत्त प्रणति: (रचयिता: प.पू. श्री रंगअवधूत महाराज, अनुवादः श्रीमती अरुणा निंबाळकर)".
प्रकाशकः श्रीमती हेमा पाठक, श्रीरंगावधूत शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था प्रकाशन समिती, नाशिक, श्री रंगावधूत आश्रम, तळेगाव-अंजनेरी, त्र्यंबक रोड, नाशिक.

जय योगीश्वर दत्त दयाळ| तु ज एक जगमां प्रतिपाळ ||१||
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस.

अत्र्यनसूया करी निमित्त| प्रगट्यो जगकारण निश्चित||२||
अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तु प्रगट झाला आहेस.

ब्रम्हाहरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार ||३||
तु ब्रम्हा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तु या भवसागरातुन तारुन नेतोस.

अन्तर्यामि सतचितसुख| बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||४||
तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस.

झोळी अन्नपुर्णा करमाह्य| शान्ति कमन्डल कर सोहाय ||५||
तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे.

क्याय चतुर्भुज षडभुज सार| अनन्तबाहु तु निर्धार ||६||
कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहेस.

आव्यो शरणे बाळ अजाण| उठ दिगंबर चाल्या प्राण ||७||
मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा! तू उठ. आता प्राण जाईल अशी स्थिती आहे.

सुणी अर्जुण केरो साद| रिझ्यो पुर्वे तु साक्शात ||८||
दिधी रिद्धि सिद्धि अपार| अंते मुक्ति महापद सार ||९||
पुर्वी तु सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते.

किधो आजे केम विलम्ब| तुजविन मुजने ना आलम्ब ||१०||
मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही.

विष्णुशर्म द्विज तार्यो एम| जम्यो श्राद्ध्मां देखि प्रेम ||११||
विष्णुशर्मा ब्राम्हणाचे प्रेम बघुन तु श्राद्धामधे जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास.

जम्भदैत्यथी त्रास्या देव| किधि म्हेर ते त्यां ततखेव ||१२||
विस्तारी माया दितिसुत| इन्द्र करे हणाब्यो तुर्त ||१३||
जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तु त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास.

एवी लीला क इ क इ सर्व| किधी वर्णवे को ते शर्व ||१४||
अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करु शकेल?

दोड्यो आयु सुतने काम| किधो एने ते निष्काम ||१५||
आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित) केले.

बोध्या यदुने परशुराम| साध्यदेव प्रल्हाद अकाम ||१६||
यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तु उपदेश केला होता.

एवी तारी कृपा अगाध| केम सुने ना मारो साद ||१७||
अशी तुझी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मात्र का ऐकत नाहीस?

दोड अंत ना देख अनंत| मा कर अधवच शिशुनो अंत ||१८||
हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच अंत करु नकोस.

जोइ द्विज स्त्री केरो स्नेह| थयो पुत्र तु निसन्देह ||१९||
ब्राम्हण स्त्रीचे प्रेम पाहुन तु खरोखर तिचा पुत्र झालास.

स्मर्तृगामि कलिकाळ कृपाळ| तार्यो धोबि छेक गमार ||२०||
स्मरण करतास धावणारा तु, कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू, तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस.

पेट पिडथी तार्यो विप्र| ब्राम्हण शेठ उगार्यो क्षिप्र ||२१||
पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राम्हणाला तु तारलेस, आणि व्यापारी ब्राम्हणशेठला वाचवलेस.

करे केम ना मारो व्हार| जो आणि गम एकज वार ||२२||
मग देवा, तु माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा!

शुष्क काष्ठणे आंण्या पत्र| थयो केम उदासिन अत्र ||२३||
वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तु का उपेक्षा करत आहेस

जर्जर वन्ध्या केरां स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्ण ||२४||
हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देउन तु तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पुर्ण केलेस.

करि दुर ब्राम्हणनो कोढ| किधा पुरण एना कोड ||२५||
हे दत्तात्रेय प्रभू! तु ब्राम्हणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा पुर्ण केलीस.

वन्ध्या भैंस दुझवी देव| हर्यु दारिद्र्य ते ततखेव ||२६||
हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राम्हणाचे दारिद्र्य दूर केलेत.

झालर खायि रिझयो एम| दिधो सुवर्ण घट सप्रेम ||२७||
श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राम्हणाला प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात.

ब्राम्हण स्त्रिणो मृत भरतार| किधो संजीवन ते निर्धार ||२८||
ब्राम्हण स्त्रीच्या मृत पतीला तु पुन्हा जीवित केलेस.

पिशाच पिडा किधी दूर| विप्रपुत्र उठाड्यो शुर ||२९||
पिशाच्च पीडा दुर करुन, तु मृत ब्राम्हण पुत्र पुनश्च जीवंत केलास.

हरि विप्र मज अंत्यज हाथ| रक्षो भक्ति त्रिविक्रम तात ||३०||
हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राम्हणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस.

निमेष मात्रे तंतुक एक| पहोच्याडो श्री शैल देख ||३१||
तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस.

एकि साथे आठ स्वरूप| धरि देव बहुरूप अरूप ||३२||
संतोष्या निज भक्त सुजात| आपि परचाओ साक्षात ||३३||
हे प्रभो, तु निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली.

यवनराजनि टाळी पीड| जातपातनि तने न चीड ||३४||
हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तु जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवुन दिलेस.

रामकृष्णरुपे ते एम| किधि लिलाओ कई तेम ||३५||
हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस.

तार्या पत्थर गणिका व्याध| पशुपंखिपण तुजने साध ||३६||
हे दत्तात्रेय प्रभो, दगड, वेश्या, शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

अधम ओधारण तारु नाम| गात सरे न शा शा काम ||३७||
हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही?

आधि व्याधि उपाधि सर्व| टळे स्मरणमात्रथी शर्व ||३८||
हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधी नष्ट होतात.

मुठ चोट ना लागे जाण| पामे नर स्मरणे निर्वाण ||३९||
तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो.

डाकण शाकण भेंसासुर| भुत पिशाचो जंद असुर ||४०||
नासे मुठी दईने तुर्त| दत्त धुन सांभाळता मुर्त ||४१||
या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर, भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात.

करी धूप गाये जे एम| दत्तबावनि आ सप्रेम ||४२||
सुधरे तेणा बन्ने लोक| रहे न तेने क्यांये शोक ||४३||
दासि सिद्धि तेनि थाय| दुःख दारिद्र्य तेना जाय ||४४||
जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही.

बावन गुरुवारे नित नेम| करे पाठ बावन सप्रेम ||४५||
यथावकाशे नित्य नियम| तेणे कधि ना दंडे यम ||४६||
जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही.

अनेक रुपे एज अभंग| भजता नडे न माया रंग ||४७||
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना माया-मोह त्रास देत नाहीत.

सहस्त्र नामे नामि एक| दत्त दिगंबर असंग छेक ||४८||
दत्तात्रेयाला अनेक विध नामे असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच अहे आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे.

वंदु तुजने वारंवार| वेद श्वास तारा निर्धार ||४९||
हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!

थाके वर्णवतां ज्यां शेष| कोण रांक हुं बहुकृत वेष ||५०||
जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे अनेक जन्म घेणार्‍या माझ्यासारख्या पामराची काय कथा?

अनुभव तृप्तिनो उद्गार| सुणि हंशे ते खाशे मार ||५१||
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.

तपसि तत्वमसि ए देव| बोलो जय जय श्री गुरुदेव ||५२||
श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रम्हस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन 'जय जय श्री गुरुदेव' म्हणावे.

Pages