आंब्याच्या तुम्हाला आवडतात त्या आकाराच्या फोडी करुन घ्या. त्या फोडींना थोडी हळद व थोडे मिठ चोळुन ४-५ तास कडकडीत उन्हात वाळवा.
दुपारी फोडी वाळवत टाकुन संध्याकाळी लोणच घातल तरी चालेल.
जाडे मिठ पाट्यावर किंवा मिक्सरवर जाडसर वाटुन घ्या. नंतर वाटलेले मिठ तव्यावर किंवा कढईत चांगले भाजुन घ्या.
कढईत २-३ चमचे तेल घेउन त्यावर मेथी परतवा.
मेथी काढुन थंड करत ठेवा व त्याच कढईत मेथी परतवुन राहिलेल्या तेलात हिंग, हळद व लाल तिखट मिडीयम गॅसवर ४-५ मिनिटे परतवा.
मेथी थंड झाली की ती वाटून घ्या.
आता आंब्याच्या फोडींवर मेथीचा गर, मिठ, हिंग, हळद, लाल तिखट घालुन एकजीव करा.
आता उरलेले सगळे तेल गरम करा. फोडणी देण्याइतपत गरम झाले की गॅस बंद करा १० मिनीटांनी त्यात मोहरीची डाळ परतवा. लगेच टाकु नका नाहीतर मोहरीची डाळ करपेल.
आता राईची डाळ टाकलेले तेल पुर्ण गार झाले की ते आंब्यांच्या फोडींच्या मिश्रणात ओता व पुन्हा एकजीव करुन काचेच्या बरणीत दाबुन दाबुन भरा.
तेल फोडींच्या वर आले पाहीजे. जर नसेल आले तर अजुन गरजेपुरत तेल गरम करा व थंड करुन बरणीत ओता.
जर फोडी तेलात बुडाल्या नाहीत तर काही दिवसांत त्यांना बुरशी येते.
लोणच्याच्या बरणीचे झाकण घट्ट बंद करा व ८-१० दिवसांनी लोणचे वापरण्यास काढा.
आंब्याच लोणच म्हटल की आजीचीच आठवण येते. आजी अगदी मुंबईला राहणार्या सुद्धा सगळ्या नातवंडांना लोणच पाठवुन द्यायची. तिच्या हातच लोणच आमच्या आख्या कुटुंबातील लहान मुलांना आवडायच. डब्ब्याला सुद्धा अधुन मधुन आवर्जुन नेल जायच. १० वर्ष झाली ती जाऊन पण तिच्या हातची चव अजुनही जिभेवर रेंगाळत आहे. म्हणुनच ही लोणच्याची पाककृती तिला समर्पित.
शक्यतो जाडेच मिठ वापरा त्यामुळे वेगळीच चव येते व लोणचे जास्त टिकते.
हिंग, हळद व लाल तिखट न परतवताही डायरेक्ट फोडिंमध्ये मिसळले तरी चालते.
लोणचे वापरण्यासाठी काढताना सारखी बरणी उघडू नका. महिनाभराचे एका लहान बरणीत काढून घ्या.
जागू, सही. तुझ्या इथल्या
जागू, सही.
तुझ्या इथल्या सचित्र रेस्प्या बघणे हीच एक मेजवाणी असते.
जागुतै, तु कित्ती प्रेमाने
जागुतै, तु कित्ती प्रेमाने सगळं बनवतेस गं...
जागू, छुंदाची रेसीपी टाकलीस
जागू, छुंदाची रेसीपी टाकलीस तर पळेल तुला वेळ असेल तर. धन्यवाद.
उम्म! एकदम तोंपासु!!
उम्म! एकदम तोंपासु!!
छुंदाचा तयार फोटोच मिळेल आता
छुंदाचा तयार फोटोच मिळेल आता कारण कधीच करुन झाला तो चालेल का ?
जागु, 'जागु' आंब्याचे लोणचे
जागु,
'जागु' आंब्याचे लोणचे ...लई भारी !
काश मैं भी ऐसे (तोंपासु) लोणचे घाल सकता ...!
जागु मस्त रेसीपी. सोपी
जागु मस्त रेसीपी. सोपी वाटतेय. आताच छुंदा केलाय तो प्रयोग सफल झाल्याने हे लोणचे करुन बघायचा मोह होतोय.
तोंपासु असे लिहितालिहिता परत
तोंपासु असे लिहितालिहिता परत तोंडात पाणी गोळा होतेय.. >>> +10000000
कैरीला मीठ लावुन वाळवताना
कैरीला मीठ लावुन वाळवताना पाणी सुटत नाही का?
मी काल कैरी कापायला सन्ध्याकाळचे ५ वाजले त्यामुळे जास्त वेळ उन मिळाले नाही. आज वाळवीन म्हटले तर पाणी इतके सुटलेय कि सुकतच नाहिय... काय करु?
पाणी इतके सुटलेय कि सुकतच
पाणी इतके सुटलेय कि सुकतच नाहिय... ..सेम प्रॉब्लेम आहे मलाही.यावेळी 4 कैऱ्यांचे लोणचे घातले.मीठ हळद लावून उन्हात ठेवले तर चांगले वाटीभर पाणी निघाले.मग काय चाळणीत फोडी उपसून परत दुसऱ्या दिवशी वाळवले.मस्त लोणचे झाले होते. लॉक डाऊन क्या काळात केलेला मसाला होता,तो वापरला.मस्त झाले होते.
माझी आई,आजी, फोडी न वाळवता लोणचे करीत.
Pages