वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालवणी मसाला , दगडू तेली मसाला, फुटाणा -कढीपत्ता सुकी चटणी, कडवे वाल या पैकी काय हवंय ते लवकर कळवा

आँ? हे काय असते? खायचे पदार्थ की पुस्तकांची नावे? Light 1

शोनू मालवणी मसाला वाटणार होय ! अरे अरे. Sad निदान त्यासाठी तरी गटगला जाणं जमायला हवं होतं.. काय ऑस्स्सम फिश फ्राय होतो मा.म. घातला की !!

माझ्याकडे खाद्य पदार्थ आहेत झक्की, नागपुरात किंवा विशिष्ट शहरात या नावाची पुस्तके मिळत असतील तर मला कल्पना नाही Happy

अंजली शनिवारी ल कारांत ब्रेफा नाही ना Happy
पण !!! असू दे बर्का .

मेधा, बाई येणार असल्यानं ल कारान्ती ब्रेफा मी कटाक्षानं दूर ठेवला आहे. Wink !!! बरोबरच कोना कॉफी आणि बंगळूरातून आणलेली कॉफी इतके ऑप्शन असतील.

शनिवारी scattered thunderstorms सुद्धा असणार आहेत आपल्या बरोबर GTG ला..... >>

योगी, आतापर्यंतच्या सगळ्या कल्लोळाला असतातच असं आम्ही वाचून आहोत. फक्त continuous असतात तू scattered का म्हणतोयस?. त्याला हस्याचा गडगडाट म्हणतात.

असो. मजा करा. अंजली स्वादिष्ट स्वयंपाकाच्या बाबतीत आणि आदरातिथ्याबाबतीत माहीर आहेच.

आणते मी तु़झ्यासाठी मधुरिमा. आधी हवा असेल तर मग येवून घेवून जाशील का?. मागच्या रविवारी काय केलस? कशासाठी वापरणार होतीस?

अंजली स्वादिष्ट स्वयंपाकाच्या बाबतीत आणि आदरातिथ्याबाबतीत माहीर आहेच.>>>> ती असेलच पण तू ही आहेसच ना. कल्लोळाला येणार्‍यांना तुझ्या पाककलेची झलक कधी बघायला मिळणार ? (ह्याला म्हणतात उंटावरुन शेळ्या हाकणं)

अंजली,
मला जीटीजीला येणं जमत नाहीये. मी सध्या नोकरीच्याच कामात फार बिझी आहे. पण आवर्जून आमंत्रण दिल्याबद्दल खरोखर धन्यवाद. मी कधी त्यासाईडला आलो तर नक्की भेटून जाईन. Happy

जीटीजीला शुभेच्छा! फोटो आणि वृत्तांत टाका. वाचायला मजा येते. Happy

तयार का सगळी मंडळी?
कल्लोळाला खूप शुभेच्छा. भरपूर खा, प्या, गॉसिप करा, फोटो काढा.
स्वाती, सगळं गॉसिप नीट लक्षात ठेव आणि पुढच्या आठवड्यात मला सांग. गाडीत (बिचार्‍या) बुवांना त्रास देऊ नका. तुम्हांला सुखरुप नेणं, आणणं त्यांच्याच हातात आहे हे ध्यानात ठेवा. गाडीत छुपे कॅमेरे कोण लावणारे? त्यांनी प्रायव्हेट सर्क्युलेशनचं मनावर घ्या. Proud

बॅग भरून झाली काल रात्री पण कॅमेरे पॅक केले नाहीत.ते आता घरी जाउन करणार , सायो थँक्स.

तिरफळं हवीत का कोणाला , किंवा शेझ्वान पेप्पर्स ?

मैत्रेयीचं पण रद्द का? बाराच्या बस ऐवजी तीन सिटर रिक्षाच झाली काय मग ?? Happy

कल्लोळाला शुभेच्छा. मेन्यूचे नीट फोटो काढून पाठवा.. Happy

शुभेच्छांबद्द्ल धन्यवाद!
मेधा, तिरफळं चालतील मला.
आज माझी इंग्रोला फेरी होईल .. अळू वगैरे मिळाला तर आणू का?

शोनू जीटीजीच्या वेळेस विकुंना त्यांच्या बायकोनी त्या घालतात ते मंगळसुत्र दिलं होतं मला "डायवर"/तारहणहाराला द्यायला. जवाबदारीची जाणीव असावी डायवरींग करताना म्हणून. त्या हिशोबानी मला आता गाडीतल्या काकवांच्या काकांचे "मॅन"गळसुत्र म्हणजे अंगठ्या वगैरे मिळतायत की काय अशी शंका येतेय मला.
खरं तर गाडीत मी एकटाच धोतर म्हणून माझ्या बायकोचे मंगळसुत्र आणून आरश्याला लटकवायला हवं होतं, त्याच्याकडे बघून तरी जरा ..... Proud

Pages