वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनय, Happy

मधुरीमा, पग्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तो मला(ही) खेडवळ म्हणतो .<<<<<<<<<<

मलाही? म्हणजे मला म्हातारीबरोबर खेडवळही म्हणतो?:राग:

पराग, तू येत नाहीस तेच ठिकाय. नाहीतर....

किंवा

आता ये तर खरा. तुझी काय धडगत नाय Angry

सुमॉ, आमंत्रणाबद्दल धन्यवाद! तिकडेच येऊ लवकर असं दिस्तंय. मग वरचेवर भेटू. Happy

अँजे, तू (माझ्या फेवरेट) पत्रिकास्टाइलीत आमंत्रण दे कल्लोळाचं :

भेज रहे हं प्रेमपत्रिका प्रियवर तुम्हे बुलाने को,
हे मानस के राजहंस तुम भूल न जाना आने को. Proud

स्त्यात शीटं भरत जाणार असं दिसतय >> Lol सुलेखा आणि क्रेग लिस्ट वर अ‍ॅड द्या, (फुकटात नेऊ म्हणून, बस भरायला वेळ लागणार नाही.)

आरं, बाराच्या बशीची पापिलारिटी म्हायत नाय तुमाला! लोक धडपड्त्याती त्यातून यायला! Proud

बशीत बस कुनाची? बाराची! बाराची!!! Happy

फुकटात नेऊ म्हणून,???
अहो काय बोलता काय? तसली भारतीय पद्धत इथे चालत नाही, जसे अमेरिकेतले भारतात काही चालत नाही. उलट त्यांना नेवून जमेल तेव्हढा भाव आकारून फायदा होईल, अगदी कल्लोळाचा, बसचा, खाण्यापिण्याचा, सग्गळा खर्च भरून निघेल नि शिवाय!! ही अमेरिकन पद्धत आहे. (:दिवा:)

झक्की, तुम्ही काही बोलू नका. बुंदी लाडूकरता तुम्ही बसला कल्टी मारून बळच आमच्या शुल्कांचे आकार वाढवले आहेत. आ शो ना हो! Proud Light 1

मालवणी मसाला , दगडू तेली मसाला, फुटाणा -कढीपत्ता सुकी चटणी, कडवे वाल या पैकी काय हवंय ते लवकर कळवा
सुमॉ, तुमची ऑर्डर नोंदवलीय Happy

कल्लोळाला शुभेच्छा !! तेव्हढे ते कोणी तरी बुवांना मोसंबी खायचे मनावर घ्या जरा Lol

बाराच्या दुकानांमधून काही हवय का कोणाला? भाज्या वगैरे? बशीतून येताना गप्पा मारता मारता निवडून पण होतील Wink तसचं इथे प्रविणचा कांदा लसूण मसाला, केळकरांचा वर्‍हाडी ठेचा मिळतो. हवं असेल तर सांगा.

अंजली,
काश ! Sad
तुम्हाला टीपी कमी पडला तर स्काईप वर या. आपण टीपी करु. Happy

सुमॉला मी सांगीतलेला लेख लिहायला सांग नक्की.

मला सुमा फूडस्ची कारळाची ( खुरासणी ) चटणी हवीय एक पाकीट - सहज जमल्यास , फक्त तेव्हढ्याकरता खेप करू नका इं ग्रो ची

Pages