वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

testing

barbecue-21.gif

अगं किती तयारी करशील ? माझी आई यायचि असली की व्हॅक्यूम क्लीनर, ट्रॅशकॅन अन सगळे रॅग्ज सुद्धा साफ आहेत की नाही ते बघावं लागतं - तसं काही नाहीये कल्लोळाच्या तयारीत. खादाडीला भरपूर कायकाय असल्याशी कारण !

मेधा,
'तो' स्वच्छतेचा लेख आल्यापासून घाबरून आधी घर साफ करायला सुरुवात केली. खाणं पिणं नंतर Proud
(just kidding :))
रूनी, हो पाठवते गं. विसरलेच होते.

माझी जरा याददाश्त कच्ची आहे.
स्वच्छतेवरून होष्टांना तु.क. द्यायचे असतात की स्वच्छता बघणार्‍या गेष्टांना? Proud

अहो यजमानीण बाई किती दमालं कामानं. आता जरा विश्रांती घ्या म्ह्ण्जे उद्या पाहुण्यांचं जंगी स्वागत करता येईल. Happy

कल्लोळाला खूप खूप शुभेच्छा!

कल्लोळाला शुभेच्छा!! मज्जा मज्जा करा, भरपूर खा-प्या, मेनूचे फोटो काढा, ते फोटो, गाणीगिणी, उ उ वि वगैरे कराल आणि बाकी जे काही गॉसिप्स कराल ते सर्व काही वृत्तांतात येऊद्या! Happy

तुमच्या गटगला शुभेच्छा!

(उद्याच्या मेनुची तयारीची सुरुवात केली असेल ना आजपासूनच.. हम्म.. दि***बाई येणार नाहीत गटगला अश्याने. ) Proud

मज्जा करा.. अंजलीला आणि सगळ्या कल्लोळकरांना शुभेच्छा !
मी फोन करीनच मेनु ची वि.पू करायला Proud

होहो. असाम्याला अनुमोदन.
कल्लोळापुरते ऋजूताला टांग मारा. खाप्यामज्जाकरा. Happy

Pages