वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मिनोती Happy
९ दिवस राहिले.
१४ मे: तापमान दिवसा ७८, रात्री ५८. भरपूर सूर्यप्रकाश.

कोणाला कसले मसाले, कॉफ्या, वाल अस्लं काय पायजे असेल ते लिहा.
(म्हणजे मिळेलच असं नाही, Proud पण प्रयत्न करणेत येईल.)

म्हणजे माझ्याकडचे रोप दुसर्‍याला दिले तर चालेल ना बाई ? एका रोपावर पाच जणांचा डोळा आहे Proud

'विकतचा' असं स्पेशली म्हटल्यामुळे वाक्याचा उत्तरार्ध 'कोणाला फुकट हवा असेल तर सांगा' असा ऐकू आला. Proud

सायो: GTG कस unique हव! प्रत्येक वेळी मसाला वाटप, झाड/फुलांची देवाणघेवाण (u know अगदी चाळ mentality बर का!), झालच तर ही भाकरी ती भाजी तो पुलाव, वगैरे करायच्या printed recipes (going green जसे ह्याना माहितच नाही...) आणि कहर म्हणजे हे सर्व GTG मध्ये कसे झाले ह्याचा आन्खो देखा हाल पुन्हा इथे type करायचा (म्हणजे too much waste of time ना!).... Wink

Pages