वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही येवू शकत नाही आहे. Sad काल पर्यंत ट्राय करत होते. त्यामुळेच अजुन कळवल नव्हत. पण काल फिक्स झाल कि स्केड्युल असं आहे कि काहीही केल तरी अ‍ॅडजस्ट होत नाहीत तारखा. माझी खुप इच्छा होती यायची.असो. तुम्ही लोक मज्जा करा.

मस्त आहे अ‍ॅड अंजली!!

अर्र.. मृ आणि सीमा Sad

बुवा, आपल्या बशीचं काय झालं? कोण कोण येतय बशीतून? किती जणांचं 'अपहरण' करायचय Wink

सध्यातरी मला भाई धरुन टोटल ५ डोकी फिक्स वाटतायत. बाकी तू डिज्जे जीटीजी ला टांग मारलीस त्याचा काय हिशोब आहे म्हणे?

अरे, माझं नक्की नाही असचं बोलले होते की मी.. असो.

१०-१२ गोणपाटं तयार ठेवा.. एकेकाच्या घरी जाऊन उचलू Wink

पन्ना आणि बुवा, तुम्हाला गोणपाटात घालून आणलेल्या प्रत्येक माणशी किती हवे तितके स्पे. कबाब Wink

अँजे, आमंत्रण फाऽरच मस्त झालंय.

आणि काय रे टोणग्यांनो, महिन्याभरापूर्वी (की त्याही आधी) नाव काढलं यादीतून. तेव्हा द्यायचे सोडून आत्ता फटके?? आधीच्या तारखेला जमणार होतं. १५ मे ला लेकाच्या ऑर्केस्ट्राची काँसर्ट आहे.

लालू, अगदी अगदी. याच तुम्ही.

..

असाम्या, तू येणार हे नक्की नाही की तू येणार नाहीस हे नक्की आहे?
(नीट सांग म्हणजे नीट निषेध करता येईल. :P)

Pages