नागपूरमधली खादाडी

Submitted by webmaster on 3 June, 2009 - 15:55

नागपूरमधल्या खादाडीबद्दलचं हितगुज.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्ध्याला बरेच इतरत्र न मिळ्णारे पदार्थ मिळतात. वर्ध्याला लाईन लावून विकत घेतात अशी दोनच दुकाने आहेत.
पहिले अर्थातच समाधान होटेल. समाधान चे आलुबोन्डे व समोसे केवळ दोन तासात सम्पतात. शुद्ध फल्ली तेलात
तळलेल्या आलूबोन्ड्याची व सामोस्याची लज्जत केवळ "खाओ तो जानो".
मेहेर बेकरीतील कणकेची व नाचणीची बिस्किटे भल्या पहाटे सेवाग्रामहून येउन लाइनीत राहून विकत घेणारे
अनेक लोक आहेत. बरोबर सातच्या थोक्याला दुकान उघड्ण्याची साडेसहा पासुन मी स्वतः कित्येक वेळा
वाट पाहत असतो.
या शिवाय गोरस भन्डारचे गोरसपाक ही तर वरध्याचि आयडेन्टिटी आहे.
मुम्बई पुण्याची पाहुणे मन्डळी देखील तिकडे गेल्यावर गोरसपाक आणल्याची प्रथम खात्री करुन घेतात, व
मगच घरात प्रवेश देतात.
सेवाग्रामच्या आश्रमातील शुद्ध गाईच्या दुधातील पेढे, मराठा मधिल लज्जतदार जेवण, ईत्यादी बरेच् काही
सान्गण्यासारखे आहे,पण आवरते घेतो, समाधानच्या लाईनीला लागायचे आहे.

नागपुरच्या खादाडी मधे,
१) हल्दीराममध्ये मिळणारे गुळाच्या पाकातले रसगुल्ले, आणि गुळाची रसमलाई
२) धरमपेठेतल्या फियोनात कोरियंडर बॉल
३) यशवंत स्टेडीयमजवळ फाउंटन सिझलर्स
४) यशवंत स्टेडीयमजवळचीच ड्राय्फ्रुट शिकंजी
५) रसकुंजमधे तसं सगळंच चांगलं मिळतं
६) साधं जेवण हवं असेल तर धरमपेठेतली गायत्री मेस
७) कुठेतरी मूंग भजे खाल्ले होते, तेही छान होते
८) लॉ कॉलेज रोड गणेश स्वीट्समधे पोहे, ब्रेड पकोडा, ढोकळा मस्त

अजुन आठवेल तसे लिहीन तुर्तास इतकेच.. Happy

जीपीओ ची कांदा भजी,
एल आय सी समोरचा पोहे वाला, "तर्री मार के"
हाय कोर्टातली पाटोडी आणि कढी - द बेस्ट काँबो
शंकर नगर स्क्वेअर चा समोसा - चण्याची उसळ घालून 'बनवून' देणारा एक लहानसा दुकानदार होता. मला वाटतं की तिथल्या दिनशॉ समोर.
राम भंडारची महाल मधे मिळणारी खवा जिलेबी आणि कढई मधले आटवलेले दूध
सदर पोस्ट ऑफिसच्या समोरच्या गल्ली मधला मुंगोडी आणि इमरती वाला
बब्बू ची बिर्याणी .. मूळ दुकान सी ए रोड ला होतं, पण एक ब्रांच सदरला पण होती. दम बिर्याणी अगदी हैद्राबादी बिर्याणीच्या थोबाडीत मारेल अशी!
काशीनाथ सावजी.. वर लिहिले आहेच कोणीतरी..
व्हेरायटी स्क्वेअर मधे असलेले शंकर खानावळीची वांगी बटाट्याची भाजी आणि चपाती.. Happy

आणि सगळ्यात शेवटचे.. लोकमत स्क्वेअर मधले एक मोहन सेठ चे हॉटेल - कम बार होतं .."प्रितम"!!!तिथे आमचा अड्डा असायचा. तिथले कबाब- तळलेले आणि ओल्ड मंक... क्या कहने!!...(२५ वर्षापूर्वी होते - आता आहे की नाही ते माहिती नाही)
साऊथ इंडीयन साठी विरास्वामी सदरचा. अजूनही नागपूरला गेलो की तिथे जातोच.
सदरचे मोती महल ( मला अशोका पेक्षा हे जास्त आवडते ) इथले चिकन मसाला अप्रतिम- . तेल फोबिया असलेल्या लोकांसाठी हे नाही.
एम आय डी सी मधे अमरावती रोडने गेल्यावर उजव्या हाताला एक लहानशी टपरी होती, तिथे कचोरी मस्त मिळायची.
बाय द वे, जगत संपलं.. अजूनही आहे, पण जेवण एकदम वाईट.. तसेच नैवेद्यम ची पण वाट लागली आहे. मागच्या खेपेस तिथे गेलो होतो. अजिबात आवडले नाही .
नागपूर म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय...

आमच्या अकोल्याबद्दल आम्ही असंच म्हणतो. अकोल्यातलीच पापु बेष्ट, असा सार्वत्रिक समज आहे
>>>
चिनूक्ष , अकोल्याचे वराह आणि एक मनपाचे उपायुक्त देखील बेष्ट आहेत असे माबोवरच वाचलेले आठवले... Proud

हा बाफ वाचला की नागपूरचे मस्त दिवस आठवतात.
हे वाक्य वर कुठेतरी वाचलं अन एकदम जोरात हसले Lol :
लेडीज क्लब जवळ्चा जॉगर्स स्ट्रीट सुधा खाण्यासाठी प्रसीद्ध..

नागपूरचे प्रसिद्ध म्हणून सांगितले जाणारे नॉन व्हेज सावजी हॉटेल्स कुठे आहेत? सर्वोत्तम सावजी कुठले? सावजींचे वैशिष्ट्य काय?

खव्याची जिलेबी .. क्यु क्यु क्यु आठवण दिलायी यार..
यवतमाळातही मिळते बर्का ती..काय लागते..स्लर्‍प्प्प्प्प्प्प्प्प...
पाणीपुरी म्हणजे यवतमाळातले मथुरावासी जवळची..

असो..चर्चा नागपुरची सुरुये ना..
खरच मला या चार वर्षात कधीच शिंगाडे दिसले नै पुण्यात..
आणि काय हे बोरकुट नै माहित म्हण्जे काय..

सप्टेंबरात पाच दिवस वर्धा आणि एक दिवस नागपुरात. वर्धा खादाडी काय स्पेशल असल्यास सांगा. धागा नाहीये वेगळा त्यामुळे इथेच विचारते.
नागपुरात जेमतेम २४ तासही नाहीये आणि डॉक्टर लोकांच्या घरात असल्याने बाहेरचं किती खाऊ देतील सांगता येत नाही. Wink

नी, वर्ध्यात गोरसपाक म्हणून कुकीज मिळतात. शुद्ध गायीच्या दूधा, तुपात केलेल्या असतात. विशेष असं दुकान काही माहीत नाही पण बर्‍याच ठिकाणी मिळतील.

एक दोन वर्षापुर्वी मी "पिंटु सावजी" चं नाव ऐकलं होतं? कसं आहे त्याच्याकडचं जेवण? आणि कुठे भेटेल हा पिंटु सावजी? एनी वन?
मी कधी सावजी रेस्टॉ. मध्ये जाउन जेवले नाहिये. ट्राय करायचेय. पण शेजारच्या सावजींकडे (म्हणजे जातीनी सावजी) जे काय खाल्लेय त्या अनुभवावरुन एवढं जहाल तिखट मला जमेल की नाही अशी शंका आहे. कुणी जरा कमी तिखट सावजी नाही का? Lol

वर्ध्यात गोरसपाक म्हणून कुकीज मिळतात. शुद्ध गायीच्या दूधा, तुपात केलेल्या असतात. >> योकु..क्या याद दिला दी..त्या चवीच्या फकस्त अर्धेतच मिळतात..मस्ट मस्ट मस्ट टेस्ट.. माझा मामा न चुकता माझ्या भाचा भाची साठी आणि आमच्यासाठी घेऊन येतो वर्धा नागपुर चक्कर होते तेव्हा..

नताशा, जिथे उत्तम सावजी मिळतं तिथे मी तरी शक्यतो लेडीज करता वेगळी जागा असलेली पाहीली आहे. किंवा मग सरळ पार्सलच नेतांना पाहिलंय. तुला महाल, इतवारीच्या गल्ल्यांमध्येच उत्तम सावजी मिळेल बहुधा. इकडे बर्डीकडे वगैरे जे आहेत त्यांची चव 'तशी' अफलातून नसते!

अवांतर - मुळात सावजी म्हणजे फक्त वेगळ्या मसाल्याचा तर्रीवाला रस्सा. सूपपेक्षा जरा पातळ पण आमटीपेक्षा दाट. यात दाटपणाकरता गहू, डाळी भाजून घातलेल्या असतात. तिखट म्हणजे पाहा, कानातून धूरतरी यायलाच हवा या लेवलचं असतं. काळपट लाल रंग + कमीतकमी बोटभर तरी तर्री असतेच.
जशी ऑर्डर असेल तसा हा रस्सा + अंड/ चिकन/ मटण/ नल्ली/ खूर असं वेळेवर गरमागरम मिक्स करून देतात. हवी तशी वर तर्री! सोबत कांदा, लिंबू. Happy

योकु, करेक्ट. म्हणूनच बहुतेक मी कधी गेली नाहिये. कारण सावजी हॉटेलात फॅमिली/बायका-मुली वगैरे जाण्याचा ट्रेण्ड आधी तरी नव्हता.

अगो, नागपूर व्हिजिट करणे.:) बाय द वे, त्या फक्त मी एकटीनी खाल्ल्या होत्या. Wink
आणि तो समोसा एवढा टेम्प्टिंग दिसत न्सला तरी सुपर टेस्टी असतो. समोसा, त्यावर तर्री, चिंचेची चटणी, कांदा-कोथिंबीर वगैरे..

अरे हो, ही एक नागपूरी स्पेशालिटी. दही समोसा, समोसा तर्री वगैरे. अफलातून चव असते.

Pages