नागपूरमधली खादाडी

Submitted by webmaster on 3 June, 2009 - 15:55

नागपूरमधल्या खादाडीबद्दलचं हितगुज.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्धा रोडला अजनी चौकात सावजी भोजनालय आहे. तिथलं मटण अप्रतीम असतं असं ऐकलंय. मी खात नसल्यामुळे बाकी ठिकाणासारखा 'फर्स्ट हँड ' अनुभव ह्या जागेचा नाही.

वर्धा रोडला अजनी चौकात सावजी भोजनालय आहे.>>तिथली अंडाकरी मी खाल्ली आहे, छान असते.

त्यांनी मेनुमधे 'भरली वांगी' ठेवली तर मी पण जाईन. Happy

शिंगाडे हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे गोकुळपेठेतला शुक्रवारचा बाजार. मी १-२ वर्षांपूर्वी नागपूरला गेलो तेंव्हा तरी मिळत होते बुवा. मी शिंगाडे नागपूर, उमरेड, भंडारा. चंद्रपूर या गावात खाल्ले आहेत त्यामुळे विदर्भात सगळीकडे (सगळ्याच भाजी बाजारात) मिळत असावेत अशी माझी समजूत. या शिंगाड्यांपासून उपासाचे शिंगाड्याचे पीठ करतात त्यामुळे ते उपासालाही चालतात. Happy विकत घेताना, ते आधिच कातरलेले घ्यावेत. घरी स्पेशल कात्री असल्याशिवाय जमत नाही.

आणि हो मी एक महत्वाचा शब्द विसरलो ते "रात्री". रात्री जेवण झाल्यावर अंगणात गप्पा मारताना शिंगाडे खावेत. दिवसा नागपूरच्या उन्हाळ्यात कोण अंगणात बसतोय.

अजय मुंबईत पण मिळतात शिंगाडे. गुजराती बहुल भागात दिसतात जास्त करून. (गिरगाव, बोरिवली ई.)

बर्डी बाजारात (सोमवार-गुरवार) मिळतात. अख्खे शिंगाडे उकडून सोलले तर फोडावे लागत नाहीत.
नस्ती माहिती : शिंगाडे-करवंद एकत्र लोणचं फार छान लागतं. त्यासाठी शिंगाडे आंबेफोडणीने कापावे.

मला पण शिंगाडे फक्त भंडारा आणि नागपूरलाच दिसलेत, पुण्यात कधी बघितल्याचे आठवत नाही.
मृण्मयी, ते लोणचं टिकतं का गं कि लगेच संपवायचं ? तसही लगेच संपत असेल! Happy

थोडंसं अवांतरः
शिंगाडे = गडचिरोली. (२ ते ५ रुपये शेकडा)
बहुतेक ठिकाणी वजनाने मिळणारे शिंगाडे तिकडे शेकड्यानी मिळायचे (मिळतात?).

हवे, सहीच माहिती दिलीस. सगळ्या अंधुक झालेल्या आठवणींना उजाळा दिलास. जातेस वाटतं अधून मधून नागपूरला?
अजय, बरोबर आहे. शिंगाडे धरमपेठच्या भाजी बाजारात, बर्डीवर आणि महालात शुक्रवार तलावापाशी मिळायचे. तसेच रामटेक, कामठी, भंडारा ई. ठिकाणी पण.

>>पण नेहमीच नागपूरमधल्या पाणीपुरीला जी चव आहे ती कुठेच मिळाली नाही
१००% खरे अन आईसक्रीमसाठीही हेच म्हणेन...
जाता जाता बर्डीमध्ये एक मारवाडी कुटुंब पापड विकतात्...अप्रतिम्...खास करून बटाट्याचे...
भारत वारीत करायच्या खरेदीत मस्ट!!

<<<<<<आईसक्रीमसाठीही हेच म्हणेन>>>>>>>>>>>>>

अगदि अगदि, दिनशा ला पर्याय नाहिच! तिथल बटर्स्कॉच, पाइनॅपल सुप्रिम आणि नविन सुरु झालेल ऑरेंज सिटि सहिच.
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

केळकरांकडचं बोरकूट चवीला छान असतं. पण ह्यावेळी क्वालिटी बंडल. आणलेल्या ८ पाकिटांपैकी पाचातल्या बोरकुटात लोळ्या(की लोळ?) निघाल्या. फेकून द्यावं लागलं. Sad

मृ...........अरे..असं कसं झालं ?? तू तारीख बघितली नव्हतीस का ? कारण असं होत नाही.

बाकी आता माझी लेक नागपुरात शिकतेय त्यामुळे अजून बर्‍याच नव्या जागा कळल्या आहेत Happy

शिवाय नागपुरच्या बाहेरचे धाबे पण सहीच आहेत.

~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/

काय असतं बोरकुट हा प्रकार नक्की?

नागपुर च्या कोर्टाजवळ पाटोडीवाला आहे. त्यापण खुप फेमस आहेत. तिथे स्वछता वैगरे नसते पण खुप खपतात. कधिहि जा रांग असतेच लोकांचि. आणि तो पाटोडी सोबत कढी देतो.

-बोकी

ट्युलिप,
बोरकुट म्हणजे बोराचं कुट, साखर, मीठ - आंबट-गोड असत> एकदम यम्मी! Happy

चर्चा वाचून डोळ्यांत पाणी आले किती किती, काय काय आठवावे! धरमपेठ कॉफी हाऊसमधली कॉफी आणि गप्पा. त्याच चौकातल्या वृंदावनमधला उपमा, तिथला सांबार व लाल चटणी. एकंदरच नागपुरातला सांबार उत्तम. कॉफी हाउसच्या मागच्या बाजूला नायराचे साउथ इंडियन रेस्ट्राँट आहे. तिथेही जायला हवे. अशोकावाल्याचे वीरस्वामी. गड्डीगोदाममधले कॅफे जॉन. शंकरनगर चौकात सावरकर पुतळ्याजवळचा चहा. चहात विशेष काही नाही. पण तिथे बसून चहा पिण्यात मजा होती.

गोळीबार चौक परिसरातले जगंदबा सावजी मटणासाठी व नागपूर सावजी कलेजीसाठी. नवीन सावजी फॅशनमध्ये येतच असतात. आणि लोकांचे सावजी बदलत असतात.

इतवारी सराफ्यातल्या विदर्भ चंडिका मंदिरासमोरील चिंचोळ्या गल्लीतल्या राजस्थानी चाटच्या दुकानातली पाणीपुरी, पानीबडा, कचोरी, दहीवडा. ( इथे गोड चटणी किंवा खटाई फार टाकत नसतात. खायला हिंमत हवी. हे वर्ष शंभर वर्ष जुने आहे.) इथे आसपास बरीच चाटची दुकाने आहेत.

पंडितांच्यापेक्षा सुरुचीच्या (नाव आठवत नव्हते. धन्यवाद हवा हवाई) पुडाच्या वड्या मलाही जास्त आवडतात.

धंतोलीतल्या आनंदाश्रममधला आलूबोंडा, दोसा एकेकाळी खूप आवडायचा. पण तिथल्या खानावळीतले जेवणही छान आहे. आमटीही असते. नागपुरात समोशासोबत, कचोरीसोबत ताक देतात (दही की चटनी), सांबार देतात किंवा 'चना तर्री' देतात. आनंदाश्रमात मी दही की चटनी आणि सांबार दोन्ही मागवायचो.

अरेरे! जरीपटक्यात दोन पाणीपुरीची चाटची दुकाने आहेत. पत्ता विसरलो. तिथेही उत्तम मिळते. इतवारीतली कुल्फीची दुकाने विसरलो. महालातल्या राम भंडारातली लस्सी उत्तम आहे. पण दुकान झ्याकपक झाले की सहसा चव बिघडते असा अनुभव. असो. पुढे जाऊन बडकस चौकातली पाटोडीही खायला हवी.

आनंद टॉकीजच्या पुढे एक राजस्थानी चाटवाला आहे. त्याच्याकडे पाणीपुरी, पानीबडा. आनंद टॉकीजच्या पुढच्या गल्लीतला पकोडेवाल्याकडे पूर्वी मुंगोडे वगैरे चांगले मिळायचे.

बाकी नागपुरात पाणीपुरी उत्तमच मिळते. प्रश्नच नाही. पश्चिम नागपुरातल्या पाणीपुरीत गोडपाणी जास्त असते. ही थोडी बामणीच. नागपुरातले अनेक पाणीपुरीवाले आणि चहावाले बहुधा मध्यप्रदेशातल्या रीवाच्या आसपासचे ( ह्यांना रीवाडी म्हणतात) आहेत. वेस्ट हायकोर्ट रोडवर, मातृसेवा संघाच्या जवळ, अनेक दुकाने आहेत. ह्या ठेल्यांवर पाणीपुरी चांगली मिळते. जनता चौकातले (लोकमत चौक) गुजरात पॉइंट आणि शंकरनगर चौकातले प्रीती चाट कॉर्नर आहेच. [ त्या प्रीती चाट कॉर्नरवाल्यांपैकी एक थोडा रणजीतसारखा (कल्ले, मिशा, शर्टाची बटनं उघडी ठेवण्याची स्टाइल वगैरे) दिसायचा. शाळेतली मुलं त्याच्याकडे बघत "ए रंजीत" असे "चिल्लावत" पळ काढायची..]

पुढच्या वेळेसे नागपुरात आलो की पाणीपुरी क्रॉलिंग करायचे ( पब क्रॉलिंगच्या धरतीवर) आहे. तूर्तास एवढेच. आता पळतो.

व्वा! बैरागी जी, एकदम 'खास'. शंकरनगर चौकातलं प्रिती चाट म्हणजे जिथे मस्त पॅटीस मिळतं तेच का? नाव आठवंत नाही..पाणीपुरी क्रॉलिंग भन्नाट कल्पना आहे. आवडली.

दुर्गा मंदिरासमोरील पाणी पुरीचे जे दुकान आहे >> बंद झाले

ह. ह. ते बंद नाही झाले. तिथे चांगल पक्क दुकान उभारले आहे. बॉबें चाट हाउस.
आजुन एक पदार्थ सुटला; हल्दीराम ईतवारी ची गरम गरम ईमरती. परत कुठेपण ठेल्यवर दबेली.. आईग चतुर्थी आही.. आणि तोंडला पाणी सुटलं.

युगंधर, प्रीती चाट म्हणजे तेच दुकान. तिथल्या मालाबरोबर मिळणारी छोले आणि आंबटगोड चटणी मस्त असते. रेशम, दाबेली आता नागपुरात ठेल्याठेल्यांवर मिळते!!! आता काही खाद्यसंस्कृतिरक्षक नागपूरची खाद्य संस्कृती भ्रष्ट होते आहे, अशी ओरड करणार Happy पूर्वी श्री टॉकीजसमोर (आताचे जानकी) चनाचिवडावाला असायचा. तो असतो का अजून? इतवारीत होलसेल कॉटनमार्केटमधला चनाचिवडावाला प्रसिद्धच आहे. चनाचिवड्यावरून तिकडच्या कच्च्या चिवड्याची (घरगुती कच्च्चा चिवडा वेगळा.)आठवण झाली. हा चनाचिवडा 'बम' तिखट असतो. (इतरांसाठी : 'बम'चा अर्थ इथे चिवड्याच्यासंदर्भात 'स्फोटक' असादेखील असला तरी 'बम' म्हणजे खूप, खूप चांगले/चांगली, मस्तदेखील. एकंदर एखाद्या गोष्टीचे 'खूप'त्व दाखवायचे असल्यास तत्पूर्वी 'बम' वापरतात. )

त्या जानकी टॉकीजसमोर मस्त लिंबू सरबत मिळायचे. अजूनही मिळत असेल. ह्या बाटलीबंद पाण्यामुळे थंड पाण्याच्या गाड्या बंद झाल्या असाव्यात. ५ पैशात ग्लासभर पाणी मिळायचे.

बर्डीच्या महाजन मार्केटमधले वृंदावन हे साउथ इंडियन उपाहारगृह विसरलो कसे. इथे कांजीवड्यासोबत किंवा तशीही सुकलेली चटणी देतात ती बेस्ट आहे.

कस्तुरचंदपार्कवरचे पोहे आणि पोहेवाला प्रसिद्ध आहे. (प्रत्येक प्लेटमध्ये रश्श्यातला टमाटा टाकतो) पण मला काही तिथली चव आवडली नाही. तो पोहेवाला दरवर्षी काही आठवडे परदेशात फिरायला जातो असे कळल्यावर ह्या लायनीत पडायची इच्छा कोणे एके काळी झाली होती. सध्या मात्र पुण्यात पाणीपुरीचे दुकान टाकायची इच्छा होते आहे. कारण पुण्यात फार फडतूस पाणीपुरी मिळते. इथल्या पाण्याला (पाणीपुरीच्या ) काही क्याऱ्याक्टरच नाही. नुसते तिखट किंवा नुसते गोड. बाय द वे, पुण्यात नागपूर भोजनालय आहे. पण फक्त नावातच नागपूर आहे.

युगंधर, बडकस चौकातील अशोका कुल्फि बंद होऊन बरीच वर्ष झालीत... Sad

विष्णु

नागपुर ला वानखेडे हॉलच्या oppisite रस्त्यावर (सुगंध क्डे जाणर्‍या) अप्रतीम पाणीपुरी मिळ्ते. तसच फुटाळ्याच्या मारऊती मंदिराखाली समोसा...........................
.... आठवूनही तोंडाला पाणी सुटतं..

आणि नागपूरी वडा भात......................... जगात त्याची सर कशालाही नाही

बैरागी,
विषय नागपूरच्या खादाडीचा असताना पुण्यावर लाथा कशाला? कधी कधी आपण त्या गावात नीट फिरलेलो नसतो आणि मग धाडकन टीका करुन जातो. खरा खाद्यप्रेमी नेहमी 'हे विश्वचि माझे घर' या भावनेने मजा लुटतो. असो. पुण्यातील खादाडी यावरील मजकूर वाचा. मी पुण्यात राहतो, पण निवडक ठिकाणीच पाणीपुरी खातो. कदाचित ती नागपूरइतकी छान नसेलही, पण फडतूसही नाही. उलट, पुन्हा पुन्हा खावीशी वाटते.
तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. कोल्हापूरची मिसळ प्रसिद्ध आहे. मी माझ्या आयुष्यातील सुंदर मिसळ नाशिकला एका कळकट हॉटेलात खाल्ली, पण म्हणून मी सरधोपटपणे कुणालाही बरे वाईट म्हणत नाही. जे उत्तम ते घ्यावे. थिंक पॉझिटिव्ह दादा.

माहिती बद्दल धन्यवाद विष्णु आणि बैरागी..
आता पुढच्या नागपुर भेटीत या सर्व नव्या जुन्या खाद्यकट्ट्यांची सफर करायला हवी. व्वा..सुखावणारा विचार आहे.

अलका इनामदार

nagpurchi khadadi vachli pan tyat NAND BHANDAR cha kuthech ullekh nahi 35 years zale aastil tithli KACHORI ekdam top aahe. shivay santra barfi aani khavyachi jilbi pan khoop famous aahe.
V R C E gate kadoon bajaj nagar kade jatana right la nanda bhandar aahe.

वाह जुन्या आठवणी जाग्या झाल्या........पण आणखीन भरपुर 'खाऊ' जागा आहेत नागपुर मध्ये.

१) सक्करदरा चौकातल्या 'अम्रुत' चे समोसे आणि कचोरी
२) ईतवारी किराणा ओळीतील 'तिख्खट' चना चिवडा
३) बडकस चौकातील पाटोडी आणी गरम मसाला दुध
४) ईतवारीतल्या बनारसी भन्डारची लस्सी आणी हल्दिराम चे 'अभिनन्दन' तर आहेच
५) शहीद चौकातील विविध प्रकरचे पकोडे, मटका कुल्फी
६) गान्धीबाग कापड मार्केटच्या बाहेर मिलणारे ब्रेड पकोडे
७) शिन्गाडा पिठाचे शेव, खव्याची जिलेबी
८) तेलन्गखेडि हनुमान मन्दिराचे समोसे आणी वडे
९) चिटनिस पार्क पुढे मिळणारी 'नसीब' वाल्याकडील भेळ
१०) लोकमत आणी सक्करदरा चौकात रात्रि २ नन्तर मिळणारे चना पोहे
११) लोकमत चौकातच 'सागर' मध्ये मिळणारे साम्बार समोसे
१२) अल् झम झम (सेन्ट्रल अव्हेन्यु रोड), बब्बु, तन्वीर, एम एल ए कन्टीन (मोमिनपुरा) येथे मिळणारे नॉन्-व्हेज (विशेषतः तन्दुरी आणि मुर्ग मुसल्लम). सावजी बद्दल तर बोलायलाच नको.
१३) हायवे वर असणारे ढाबे तर मस्तच आहेत

आणि हो 'वर्‍हाडी थाट' (यशवन्त स्टेडियम) येथे मिळणारे खास वर्‍हाडी जेवण.

<<<<<<शिन्गाडा पिठाचे शेव, खव्याची जिलेबी>>>>>

अगदि अगदि, मला नक्कि माहित नाहि पण बहुदा हे दोन्हि पदार्थ म्हणजे 'नागपुरचि खासियत' या सदरात मोडतात, इतरत्र फारसे मिळत नाहित. त्याचसोबत आनंदभंडार मध्ये मिळणारे 'खिर्-क्दम' (मलइ सॅडविच) सुध्धा एकदम सहि फक्त नागपुरलाच खाव अस.
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

Pages