नागपूरमधली खादाडी

Submitted by webmaster on 3 June, 2009 - 15:55

नागपूरमधल्या खादाडीबद्दलचं हितगुज.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे रश्मी, कित्ती दिवसांनी 'खीर्-कदम'ची आठवण झाली तुझ्यामुळे!

>>लोकमत चौकातच 'सागर' मध्ये मिळणारे साम्बार समोसे
हे नेमकं कुठे? माऊंट कार्मेलच्या बाजुला की सोमलवार आणि अकरामजलीकडे जाताना?

क्कमाल आहे मृ तु खिर कदम विसरलिस? बिलकुल चालणार नाहि हे Happy
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

Sad
मला रस्ते विसरायला होताहेत!

लक्ष्मीभुवन चौकात 'बंडु फुलवाले' च्या बाजुला काही दिवस एक रसवंती होती. उसाच्या रसाबरोबर मिरचीची भजी पण तळायचा. काय चव!!!!!

लोकमत चौकातील 'सागर'......लोकमत बिल्डीन्ग च्या diagonally opposite.....

>>लोकमत चौकातच 'सागर' मध्ये मिळणारे साम्बार समोसे
लोकमत चौकातले (जनता चौकातले) सागर हॉटेल तसे नवे आहे. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या इमारतीतले. सागरच्या मालकाची बहुधा त्याच चौकात फळांची गाडी होती. अजूनही असावी. पूर्वी जनता चौकात, जेव्हा फ्लायओवर व्हायचा होता आणि वर्धा रोडवर दुतर्फा कडुनिंबांची झाडं होती, एक उडप्याचं उपाहारगृह होतं. माझा हरिओम शरण ह्यांच्याशी परिचय तिथेच झाला. उडपी रोज सकाळी त्यांची भजनं लावत असे.

>>> उसाच्या रसाबरोबर मिरचीची भजी
!!! इंटरेस्टिंग .. पण रसवंतीपेक्षा फिरत्या गाड्यांवरचा "ताजे गन्ने का रस" (ताजे नंतर पॉज घ्यायचा, नंतर गन्ने का रस एका दमात म्हणायचे) का मजा कुछ और है. आम्ही तर धंतोलीतल्या आमच्या घरी चाटवाल्यालाही बोलवायचो. तो गाडी लावण्यापूर्वी आमच्या कडे येऊन मग त्याच्या नेहमीच्या धंद्याच्या जागेवर जायचा. असो. वो दिन हवा हुए....

>>> नंद भंडार
इथला चक्काही प्रसिद्ध आहे.

सागर हॉटेल नवं असावं असं वाटलंच. कारण १५ वर्षापूर्वीची जनता चौकातली दुकानं, हॉटेलं साधारण माहीती आहेत.

बैरागी, तुम्ही म्हणता ते उडप्याचं हॉटेल जनता चौकातून धंतोलीकडे जाताना डाव्या हाताला ह्योतं. नाही का? उजवीकडे औषधाची दुकानं आणि रस्त्याच्या डाव्या हाताला हे हॉटेल होतं. ह्याच चौकातून गोरक्षण कडे जाताना डाव्या हाताला माऊंट कार्मेलनंतर एक रसवंती होती. नंतर तीथे मंगल कार्यालय झालं.

आजकाल खामला रोडवरची एक टपरी (सावरकर नगरला?) अतीशय प्रसिध्द आहे समोश्यांसाठी. दोन वर्षांपूर्वी गेले असता मी अर्धा तास उभी राहीले समोसे, कचोर्‍या आणि आलुबोंडे विकत घ्यायला. आलुबोंड्यांची भाजी करण्यासाठी त्यांचा माणूस बटाटे सोलायला बसल्याचं पाहून पदरी पडलेले समोसे घेऊन खसकले.

आठवलं. नंदभंडार्चा चक्का आणि ढोकळे प्रसिध्द आहेत/होते.

सुरती फरसाण मार्ट कुठे होतं? अभ्यंकर रोडला का? तीथलं जामनगरी आठवलं.

>>बैरागी, तुम्ही म्हणता ते उडप्याचं हॉटेल जनता चौकातून धंतोलीकडे जाताना डाव्या हाताला ह्योतं. नाही का? नाही का? उजवीकडे औषधाची दुकानं आणि रस्त्याच्या डाव्या हाताला हे हॉटेल होतं.

बरोब्बर! ह्या दुकानाच्या बाजूला देशी दारूचे दुकान होते. पावसाळ्यात ह्या दुकानासमोर गरमागरम उकडलेले हरभरे मिळायचे. तिखटमीठ आणि लिंबू पिळून हे हिरवेगार हरभरे तो भय्या देत असे. आम्ही आमच्या सोमलवार शाळेतून घरी भिजत-भिजत परतताना कधीकधी इथून हे हरभरे खायला घ्यायचो.

>>> ह्याच चौकातून गोरक्षण कडे जाताना डाव्या हाताला माऊंट कार्मेलनंतर एक रसवंती होती. नंतर तीथे मंगल कार्यालय झालं.
अरे वा. किती जुन्या आठवणी गोळा झाल्या. माउंट कार्मेलनंतर फाटकांचे घर होते. बहुधा त्या घराच्या आवारातच उपाहारगृह, मंगल कार्यालय होते. फाटकांच्या उपाहारगृहात भेळ फार छान मिळत असे.

>>>आजकाल खामला रोडवरची एक टपरी (सावरकर नगरला?) अतीशय प्रसिध्द आहे समोश्यांसाठी. दोन वर्षांपूर्वी गेले असता मी अर्धा तास उभी राहीले समोसे, कचोर्‍या आणि आलुबोंडे विकत घ्यायला. आलुबोंड्यांची भाजी करण्यासाठी त्यांचा माणूस बटाटे सोलायला बसल्याचं पाहून पदरी पडलेले समोसे घेऊन खसकले.

नरगुंदकर लेआउटवरून पुढे गेलो की का? खामल्याचा जो चौक आहे त्याच्या आधी उजवीकडे ना? तिथे दोन तीन टपऱ्या किंवा दुकाने आहेत. त्यापैकी एका दुकानावर चांगलीच गर्दी असते. ते असावे.

अलकाचे नंद भंडार वेगळं. आम्ही लक्ष्मीभुवन चौकातल्या नंद भंडारमधून चक्का आणायचो. नागपुरातले ढोकळे हे कोरडे असतात. पुणेकरांना थोडे ओलसर ढोकळे लागतात, असे माझे निरीक्षण आहे. चूभूद्याघ्या. नागपूरला लक्ष्मीभुवन चौकातल्या मित्राच्या ऑफिसात आमचा अड्डा जमला की रामनगर चौकातल्या जामनगरीमधून आम्ही ढोकळा (आणि भरपूर मिरच्या) मागवत असू. त्या मिरचा कचाकचा खाताना काय स्वर्गीय आनंद मिळायचा!

>>> सेंट्रल ऍवेन्यू रोड
ऍवेन्यू नावाचा रोड फक्त नागपुरातच आहे बहुधा Happy ह्या रस्त्याला लागून खादाडीची अनेक केंद्रे आहेत.
मोमिनपुऱ्यातले बब्बू, मुस्लिम कँटिन, बरतानिया. गोळीबार चौकाकडे वळले की सावजीच सावजी.) मटण, कलेजी आणि खूर (आणि काही ठिकाणी गरिबांची सुंदरी...) .. आणि सहीद (शहीद नाही Happy ) चौकाकडे वळलो की चाटच चाट.

मॄ, सुरती फरसाण विसरलीस? आपल्या वर्गात त्यान्ची कन्या होती. तिचं नाव विसरलो. बर्डी वरून डॉ.मुन्जे चौकात जतान्ना डावी कडेच आहे. असो.

>>तिचं नाव विसरलो.
मुद्द्याच्या गोष्टी विसरायच्या? Proud
मला वाटलं मी केला होता उल्लेख. जामनगरी, भावनगरी, सुरती फरसाणमार्ट सगळ्यांबद्दल लिहीलंय. (बहुतेक. आता मागची पानं वाचायचा पेशन्स नाही. )

नागपूरला सगळ्यात चांगल जेवण सासरी मिळत.
आणि जवाहर होस्टेल मधे. जरी भर उन्हाळ्यात तुमच लग्न झाल असल तरी.
नागपूरच्या सांबाराची चव वेगळीच असते. Happy

नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.

स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.

तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/

कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर

नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.

स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.

तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/

कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर

अजनि च्या समोर देव नगर ला केशव राजेश फरसाण च्या समोर ईथे रस्सा पोहे अप्रतिम मिळतात आधि बटाटे-वडा झकास मिळाय चा पण त्याच्यासाठि मारा मारि झालि अन केशव ने बटाटे-वडा बंद केला सकाळि ८.०० पर्यन्त ८.०५ ला दरवाजा बंद भांडि घासुन पुसुन ठेवलेलि

सावजि क्याम्पस वरुन अंबाझरि कडे जातांना उजव्या हाताला पिन्टु सावजि वेळ ६.०० ते ८.०० नंतर फ्क्त बे-वडे असतात

टेलिफोन एक्स्चेंज चउकात डावि कडे वळुन लगेच उजवि कडे वळल्यास उज व्या हाताला प्रचंड सावजि
वेळ ६.०० ते ८.०० नंतर काहि दम नाहि पण मस्त मांडि घालुन पाटाव बसता येत

काय मस्त वाटतंय.. वाह प्रीती दुर्गा मंदिर ची पण आठवण करून दिलीस..
सुरुची च्या वड्या .. मस्तच .. पण कित्यक वेळा संपलेल्या असायच्या Sad
लस्सी लस्सी.. प्रताप नगर मधल्या राज भांडार ची पण मस्त असायची .. आता नागपूरला गेलो तर अपडेटेड लिस्ट घ्यावी लागणार म्हणजे..

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता

नागपूर सोडून ११ वर्ष झाली Sad आणि धरमपेठ, अजनी, बर्डी हे सगळे नाव ऐकून नागपूर चा virtual tour झाला...
नागपूर हून जेव्हा पुण्याला शिकायला गेले, तेव्हा पहिल्याच काही दिवसात इथे दाबेली खालली...आणि सोमलवारच्या मागे उभा असलेला दाबेलीला वाला इतका इतका आठवला :'( आई शप्पथ परत पुण्यात दाबेली खालली नाही!!!
आणि 'राजमलाई' ची सर कुठल्याच chocalate ला नाही....
एक बर...new jersey च्या पटेल मधे 'वर्हाडी ठेचा' मिळतो Happy
आणि मला बजाज नगर मधल्या ISCON च जेवण आणि मिठाई पण फार आवडायची...
कुठे गेले ते दिवस???

आता रामदास पेठे कडुन बजाज नगर कडे जाताना 'विष्णु मनोहर की रसोइ' झालंय.. उजव्या हाताला..
पु. पो, थालीपीठ, झुनका, भाकर सगळं मिळतं.

तसंच 'दुर्वंकुर' आहे सदर कडे. चांगलं आहे असं ऐकलं आहे.

सांझा-चुल्हा, सदर चं क्रिस्पी वेज.

यशवंत स्टेडीअम जवळचं पाव भाजी, पुलाव, शिकंजी.

हल्दीराम प्लनेट फुड चे छोले भटुरे.

वीरास्वामी, सदर/ व्रुंदावन, बर्डी/ गोकुळ व्रुंदावन, गोकुळपेठ- साउथ एंडिअन

लोकमत जवळचं गुजराती पोइंट चे समोसे, आग्रा भंडार बुध्वार बाजार चे समोसे

मोदी नं. ३ चे मुंग पकोडे, ंगा पुतळा-इतवारी चे ब्रेड पकोडे, मुंग पकोडे.

सराफा ओळिच्या चोकात इमरती, जिलबी ताजी मिळते.

गोखले, महाल यांचे आम्रखंड.

>>मोदी नं. ३ चे मुंग पकोडे
हे नेमकं कुठे? अपराजित क्लासेस, केतकर मोतीवाले, पंडितांच्या दुकानाच्या बाजुला की दुसर्‍या टोकाला?

बजाज नगर मात्रुसेवा संघा जवळचे पणीपुरी, भेळ, दहीपुरी.

अशोका कुल्फी, बडकस चोक जवळचा उसाचा रस.

राम भंडार, महाल ची लस्सी.

हल्दीराम ची रसमलाइ.

बर्डी च्या आनंद भंडार समोर्च्या दुकानातील सोन पापडी.

हल्दीराम, धरमपेठ चं सोफ्टी.. फक्त माहोल साठी Happy

तिथलाच भेळेचा ठेला, चांगलई होती तिथली पणीपुरी, भेळ.

लीलाझ, गोकुळ्पेठ

नागपुर ला पाव भाजी कुठे ही चान च मीळ्ते.

शेवाळकरंचं पर्णकुटी आजुन तरी आहे..

तसंच स्म्रुती, सदर च्या समोर चं दिन्शा..

सदर वी. सी. ए. जवळ्चं स्टेटस.

आता तर गोली वडा पाव मीळ्तो चक्क नागपुरात..

डोमीनोज..

आधी चं नागपुर रहीलं नाही.

एक बंगाली साड्यं चं दुकान आहे ना..
त्याच्या समोर..

ते २-३ ग्राम चे सोन्याचं दुकान झालंय ना.. सोनचाफा क काय..
त्याच लाइन मधे वन वे नी आलं, सोनचाफा मागे पडलं की उजव्या हातला एक गली लाग्ते.. त्यातच आहे..

वर्हाडी थाट ही सुपर..

यशवंत स्टेडीअम कडुन पंचशील कडे जाताना डावी कडे खाली फौंटन सिझलर्स होतं .. आमची पहीली भेट Happy

लेडीज क्लब जवळ्चा जॉगर्स स्ट्रीट सुधा खाण्यासाठी प्रसीद्ध..

फुटाळा जवळ सुधा बरंच काही मिळतं आज्काल.

गोकुळ्पेथेत सुगंध कर्यालयाजवळ एक आइस्क्रीम चं नवीन दुकान उघडलं आहे.. कोवळी जनता तीकडे आस्ते आज्काल..

बवर्ची.. शंकर नगर कडुन एल ए डी कडे जाताना आहे.. मस्त..

उजवी कडे बवर्ची.. डावी कडे अमेरीकन देसी...

मग बजाज नगर वी. एन. आय. टी. कडे भुट्टे Happy

कॉट्न मारकेट च्या अलिकडे टपर्यावर गरम दुध मिळते. तिथुनच थोडे पुढे एका
दुकानात शेगाव ची कचोरी. धरमपेठ मधले पियुष पण आवडतं मला.

बजाजनगरच्या पाणीपुरी/भेळ्पुरी ला मात्र पर्याय नाही. Happy

नमस्कार नागपुरकर !!

आम्ही लहान असताना जगतचा दोसा, रिजंटजवळचा बटाटेवडा, शेर ए पंजाबची लस्सी, धरमपेठेतली, गोकूळपेठेतली काही हॉटेलं सोडल्यास बाकी माहिती नव्हतं. आताच्या या डेटाबेसमधलं ५ % पण माहीत नाही.

हो हो जगत ने नंतर थाली म्हणून पण तिथेच काढ्लेलं ... बाप रे किती (तरी) वर्ष झालीत त्याला ..
रिजंट टॉकीज म्हणजे त्याच लाईनतलं नं?

येस Happy रिजंट मध्ये मराठी सिनेमे लागायचे .. आता तिथे एक मॉल झाला आहे.

या वेळेला त्या आनंद टॉकीज मधे सचिन तो भुक्कड सिनेमा पाहिला "आयडियाची कल्पना",
आणि नागपुर काही बाबतीन तरी तसेच असल्याची खात्री पटली Happy काय त्या खुच्या, कचरा
तो टिपिकल वास Happy

जगत ला लहान पणी जायचो.. आज्काल कुणीच जात नाही..
आहे का जगत अजुन? Uhoh

शहनशाह, अमरावती रोड
द्वारका, वर्धा रोड
त्रुप्ती, वर्धा रोड

घाटे दुग्ध मंदीर च गरम वाफळतं दुध..महाल
कस्तुर्चंद पर्क चे तरी पोहे..

सदर्/इतवरी मधे एक छोटी शी टप्री आहे.. ती़कडे दाल फ्राय-जीरा रैस मस्त्त्त्त्त मीळतं.

पीयुष मधे थालीपिठात कच्कच होती Sad

वी५ मधे बर्बेक्यु नेशन सरखं बर्बेक्यु असतं टेबलावर Happy

त्या जगत च्या थाली वाल्या ठीकाणी आम्ही मावस बहीणींचे केळवण केले आहेत.. ८ वर्षा पुर्वी.. त्या नंतर माहीत नाही.

Pages