वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय शिळ्या बातम्या सांगता ?? आमच्या इथे वसंता येऊन जुना झाला.. पाकळ्या पडायला पण लागल्या.. कोण कुठे वाट बघतय म्हणे ? Happy

चला २ डोकी फिक्स झाली. Happy
भाई, झक्की, देसाई (नाही म्हंटलेत ते आधी पण जमेल तितक्या लापि लावण्यात येतील) मै, सायो, पन्ना, नात्या .. लवकर कळावा. प्रज्ञा नं ९ना पण विचारा. वृंदाताईंना इमेल धाडायला पाहिजे.
तिकडे रेस्ट ऑफ द वर्ल्डं मधून, सिंडी, फचिन, असाम्या? है क्या और कोई?

अर्र, काय बुवा, मी येत नाहीये. माझं डोकं यावेळी धरु नका. मला जवळच्या जवळची गटग झेपतील.

अरे फक्त यन सी आहे म्हणून लांबचं धरु नकोस. रविवारी सकाळी किंवा थोडं उशीरा पर्यंत बारात असू. आता धरु का डोकं?

कोण कुठे वाट बघतय म्हणे ? >>>>>> बरोबर आहे, आमच्या इथे बळच चेष्टा म्हणून सगळी झाडं पालवी साईड इन आणि पाळं मुळं साईड आऊट अशी जमीनीत खुपसून ठेवली आहेत. Proud

अरे अरे. १३ मे ते १५ मे ला मी डीअरबॉर्न, मिशिगनमधे.
सौ.च्या खास मैत्रिणीच्या मुलाचे लग्न.
तुम्ही सर्वजण मजा करा.

निळा रुमाल फडकवणारे बुवा आणि मागच्या शिटांवर पिवळी पन्ना आणि गुलाबी बो वाली स्वाती. बशीच्या दुसर्‍या बाजूच्या खिडकीत तिची तनहाई पण आहे. Proud

पग्या मेन्यू सरप्राईज आहे. काचा तर आधी पुसल्या पाहिजेत. माझ्या घराच्या स्वच्छतेवर लेख येईल नाहीतर Proud

पग्या मेन्यू सरप्राईज आहे. काचा तर आधी पुसल्या पाहिजेत. माझ्या घराच्या स्वच्छतेवर लेख येईल नाहीतर
<< Biggrin

काचा तर आधी पुसल्या पाहिजेत. माझ्या घराच्या स्वच्छतेवर लेख येईल नाहीतर >>>> ओह.. म्हणजे आर्च येणारे का गटगला? Proud

१३ मे चुकीची तारीख आहे. ह्या दिवशी मी भारतात चाल्लोय. नेमकी हीच तारीख शोधून काढल्यामुळे माझ्या पत्रिकेतील ग्रह तुम्ही आधीच तपासले असल्याचा मला दाट संशय येत आहे. असा अनुल्लेख केल्याबद्दल पाणीपुरी खाऊन पोषण करणेत येईल.

असा अनुल्लेख केल्याबद्दल पाणीपुरी खाऊन पोषण करणेत येईल.>>>>>> Lol मोरारजी देसाईंचा खुप प्रभाव पडलाय का सध्या? काय वाचतोयस नेमकं. Proud

.

Pages