वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येतील येतील ... लवकरच...
केदार शार्लटमधे असतो ना? त्याने नाव नोंदणी केली नाही अजून.

भाईंच्या गाडीतल्या सीटवर सध्यातरी माझा रुमाल असू देत. १००% नंतर सांगेन. तसाही वेळ आहे अजून चिक्कार.

अरे, झाली पण का अनाउन्स्मेन्ट ?
मे मधले वीक एन्ड्स ऑलरेडी एन्गेज्ड आहेत :(.
हा तर लाँग वीक एन्ड आहे ना , माझ्या मेंदी पार्टीज आहेत तिनही दिवस..
अंजली,
नेक्स्ट टाइम आधी पासून ब्लॉक करु .

मंडळी, तयारी अल्मोस्ट झाली आहे. आता ऑफिशीयल निमंत्रण पत्रिका पाठवायच्या आहेत. न्यू जर्सीच्या, शिटीच्या, फिलीच्या लोकांनी लवकर लवकर गाडीचं बुकिंग करा बघू. बेकरीकर, डॅलसचे लोक तिकीटं बुक करा, अटलांटा, फ्लोरीडाच्या मंडळींनी आता कारणं सांगू नयेत.

मित्रहो, हा कार्यक्रम लाँग वीकेंडाला असल्यामुळे मला तरी येणं शक्य होईल असं दिसत नाही. बाकी जणांनापण जर ह्याच कारणामुळे जमत नसेल तर एखाद्या नॉर्मल वीकेंडला ठेवला तर शुक्रवारी रात्री निघून, शनिवारी गटग करुन परत रविवारी रात्री निघून बारात येणं जर बाराकरांना जमत असेल तर मग जमु शकतं. ड्रायविंग/किन्नरींग ची जवाबदारी मी घेइन.
Happy

मला कुठलाही विकेण्ड चालेल, लाँग विकेण्डच्या आधीचा आठवडा ठेवायचा का? २०-२१ मे? बुवा, गाडी चालवण्याची एवढी जबाबदारी घेतल्याबद्दल धन्यवाद. आता बाकी कुणी काही कारणं काढू नका. :).

आँ? या लांबच्या लोकांना यायला जमावं म्हणून लाँग वीकेन्ड ठेवला ना? Proud आता एवढं लांब जायचं तर रहावं २-३ दिवस..

कोणताही शनिवार ठेवा.

कोणताही शनिवार ठेवा, मला चालेल.
बुवा / भाई गाडी करून जायचं की कसं? वाटेत शिटा घेणार की कसं?

मला यायला आवडले असते पण सध्या देशात आहे. नेक्स्ट टाईम नक्की. ( पुढच्या वेळी मिशिगन नाही मधे करायचे का?)

लालु....साजन कोण? (कोणाचे?)>>>>>>>>>>>> साजन त्याच्या सजनी चा गं. पण ही साजणी कोण ते शोधा पाहु. Happy

नॉर्थ कॅरोलिना ट्रिविया :

स्टेट बर्ड : कार्डिनल
स्टेट फ्लॉवर : डॉगवुड
स्टेट बेव्हरेज : मिल्क!
स्टेट मॅमल : ग्रे स्क्विरल
स्टेट ट्री : पाइन
स्टेट व्हेजिटेबल : स्वीट पोटॅटो
स्टेट प्रेशस स्टोन : एमरल्ड

आता कल्लोळाची थीम ठरवा. Happy

(काही नाही, बाफ वर काढायला! :P)

एक काय दोन दोन माळा देऊ. दूध, दुग्धजन्य पदार्थ वगैरेपण मुबलक मिळेल. आमच्या घरापासून जवळच गोठा आहे. स्वीट पोटॅटोचे पदार्थ करीन. वर परत जाताना गोणी भरून रताळी देण्यात येतील. त्याची शेतीपण घरापासून जवळ आहे.
Proud

Pages