वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पग्या, तारिख बदलते आहे गटगची. २ किंवा १ आठवडा आधीची तारिख ठरवत आहे.
सिंडे, डोळे फिरवू नकोस (आणि घाबरू नकोस). वर जाताना म्हणजे नॉर्थला परत जाताना असं वाच. Wink

मला यायला जमणार नाही पण एमरल्डच्या एक दोन ज्या काय माळा देण्यात येतील त्या बाराकरांबरोबर पाठवाव्यात. बाकी काही नको. धन्यवाद.

सायो,
माझं नाही, मायबोलीच्या वासंतिक कल्लोळाचं म्हण. आता त्या बाळाला खाऊपिऊ घालायची जबाबदारी ज्यांच्यावर होती तेच...

तारीख/वेळ:
13 May, 2011 - 18:00 - 15 May, 2011 - 17:00
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
२८-२९-३० मे २०११

नक्की काय आहे ग ?

ओके. तारखा ठरल्या आहेत ना आता? बदलु नका.
मला १३/१४ ला येण्याच जमवण कठीण वाटतय. Sad त्यामुळ माझ ५०/५० धरा. यायची खुप इच्छा आहे. त्यामुळ जास्तीतजास्त प्रयत्न करीन.

अखेर तारीख पक्की झाली वाटत!!!

मी हजेरी लाविन.... Happy

Charlotte व जवळच्या area मधुन कोणि येणार असल्यास अकत्र जाण्याचा program करता येइल...

अरे बारा, न्यु यॉर्क, शिट्टीच्या लोकांनी त्यांची डोकी ठिकाणावर.. आपलं हजर राहणार आहेत का ते कळवा लवकर. आता फार दिवस नाही राहिले. होस्टीणबाईंशी कालच वार्तालाप झालाय. जरा पुष्कळ लांब प्रवास आहे त्यामुळे ट्राय स्टेटचीच बस काढूयात का? नान्स्टाप यन सी!
अंजलीचं म्हणणं आहे शुक्रवारी निघावे आणि तेच सोयिस्कर वाटतय. शुक्रवारी संध्याकाळी/रात्री ८ पर्यंत जरी निघालो तरी १० तासाचा प्रवास गृहित धरुन सकाळचे सहा वाजतील पोहोचायला. परतीच्या प्रवासाबद्दल आता बोलायला नको.

बुवा, मी माझा हेड काऊंट 'येणार नाही' म्हणून आधीच डिक्लेअर केलाय हां. बाकीच्या मंडळींना गुराखी गुरं हाकतात तसं आतापासूनच हाकायला लागा.

परतीच्या प्रवासाबद्दल आता बोलायला नको.>>> म्हणजे बस काय अनलिमिटेड वेळेकरता बुक करायची का काय?

सायो, तू डिक्लेअर केलय आणि ह्याचा अर्थ तू येणार नाहीयेस असा थोडीच होतो. अजून बरेच दिवस बाकी आहेत.

असो, नंब्र लावा लवकर, म्हणजे त्या हिशोबानी गाडी ठरवायला.

Pages