अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

स्वप्ना, सुकी, शोभा......तुमचेही अनुभव भयानक.

म्हमईकर : चाकुमधून भूत (भूतामधून चाकु म्हणा ) आरपार जातो. भूताला आणि चाकुलाही काही होत नाही. (संदर्भ : घोस्ट हा चित्रपट.)<<<<<<

दिनेशदा, तो चाकू भुताला मारण्यासाठी नसावा बहुतेक. आजी सांगायची की उशीखाली चाकू ठेवून झोपल्यास भुताची वा वाईट स्वप्ने वगैरे पडत नाहीत. तर तो चाकू 'बाहेरची' बाधा वगैरे होऊ नये यासाठीचा उपाय असावा. (असं मला वाटतंय).

माझ्याकडे 'मानवी' भुतांचे खूप अनुभव नि नमुने आहेत. पण ते नाहीच चालणार या बी बी वर Happy

ओह, सुमॉ, असल्या गोष्टी माझ्या डोक्यातच येत नाहीत.
पण मानवी भूतांचे किस्से चालतील कि. माणुस एकाचवेळी मानव आणि भूत नाही असू शकत ना !

आर्या
केळकर म्युझीयमचा अनुभव आहे शेजारच्या वाड्यात.

तिथे रात्री मटण शिजवल्याचे वास येतात. आताच माहीत नाही पण पुर्वी भर सदाशिव पेठेत मटणाचा वास शिव!! शिव!!!

तिथे तिस-या मजल्यावरून लहान मुलांच्या रडण्याचे आवाज येतात. त्याची तक्रारही केलेली साठे वाड्यातल्या लोकानी.

आमच्या घरामागे एक झोपडी आहे, त्यातल्या बाईने घरघुती वादातुन स्वतःला जाळुन घेतले होते. घरामागचा रस्ता बर्‍यापैकी वर्द्ळीचा आहे. एक दारुडा सिनेमा पाहुन रात्री त्याच वाटेन येत होता त्याला म्हणे ती जळाकी बाई आडवी गेली. हाच अनुभव अजुन काही लोकांना आला. पण घरातल्या कोणाला कधीच काही नाही जाणावले.

लहानपणी मी पण आमच्याच घरात फिरायला खुप घाबरायचो. पण आजोबांना हे समजल्यावर मुद्दामहुन मला एकट्याला रात्री घरातल्या बंद खोल्यातुन (लाईट नसलेल्या) फिरुन यायला लावले. एक राऊंड मारल्यावर भिती गेली. ते म्हणायचे आपल्याच घरात कुणाची भिती...

पाच सहा वर्षा मागे दिल्ली ला कामासाटी गेलो होतो. तीथल्याच ब्रँच ऑफिस कडुन हॉटेल बुक करुन घेतलं होतं. संध्याकाळी उशिरा चेक इन केलं .न्यू प्फ्रेंड्स कॉलनीतल ते हॉटेल ठिकठाकं होत . खास म्हणजे नोठी रुम आणि बाल्कनी पण होती. रात्री खाणेपिणे झाल्यावर घ्ररो मोबाईल बर बोलत बोलत बाल्कनित फिरत होतो. अचानक रुम मधे येक स्त्री दिसली .. ...
......नंतर लक्षात आले कि बाल्कनी कॉमन होती आणि ती स्त्री बाजुच्या रुम मधे होती. बाल्कनीत लोखंडी ग्रिल चे पार्टीशन होतं जे चुकुन बंद कारयचे राहिले असेल.

किती वेळा केमिकल लोच्या चे विनोद करणार
एक मार्गी भुत कथांची मजा घ्या

दिल्लीतच एका लग्नाला माझा मामा आणि त्याचे मित्र गेलेले काहींच्या बायकाही बरोबर होत्या.
त्याना रहायला एक फ्लॅट दिलेला.

हॉलमधे बायकानी आणि पुरूषानी दारूकाम करत बेडरूम मधे झोपायच ठरल.

पण काही केल्या त्या रूमच दार उघडेच ना .... अनेकानी प्रयत्न केले पण ....

त्यांच्यातल्या एकाने सहज हात लावला तर जणू काही ती रूम बंद नव्हतीच इतक्या सहजतेने ते उघडल.

ठरल्याप्रमाणेच हे लोक झोपले. ज्याने ते दार उघडल त्याला रात्री एक माणूस खिडकीजवळ उभा दिसला. सगळ्यांची फाटलेली पण हा म्हणाला की आम्ही इथे एक रात्र रहातोय वास्तुला कुठलीही इजा पोचणार नाही याची काळजी घेऊ.... आणि ती व्यक्ती नाहीशी झाली.

दुस-या दिवशी सगळयनी गाशा गुंडाळला तेव्हा शेजारी म्हणाले की काही महीन्यांपुर्वी इथे रहाणा-या माणासाने नैराश्याने आत्महत्या केलेली

सगळी भूते रात्रीचीच का येतात ? दिवसाढवळ्या फिरण्याची भूतांना भीती वाटते का ?
थट्टा म्हणून नव्हे पण सगळ्या भूतांच्या गोष्टी ऐकल्या वाचल्या की हाच प्रश्न पडतो. भूते 'रात्री'च दिसतात असे का असावे ? माणुस पुरेसा जागा नसल्याने / झोपेत असल्याने काही गैरसमज होण्याची शक्यता रात्रीचीच जास्त असते. तसेच भीतीमुळे 'खरे' काय आहे याची शहानिशा करू शकणे रात्रीच्या वेळी तरी अवघडच आहे.
अशा प्रकारची एक गोष्ट वाचलेली काही वर्षांपुर्वी. ज्यात दोन्ही बाजू ( भूताची आणि तर्क दृष्ट्या खरी ) उलगडून दाखवल्या होत्या. आणि दोन्ही गोष्टींवर विश्वास बसत होता.

भुतं तुमच्या आमच्या ऑकलनशक्तीच्या परे आहेत.
दिवस रात्र वगैरे सगळं तुमचं.
आणि कोण म्हणते नसतात ती दिवसा??
असतात. दिवसा दिसत नाहीत म्हणून काहीही मानाल तुम्ही.. तुम्हाला काय माहित बरे?

आणि त्याना काही परमिट लागत नाही.
आत्ता इथे कोंकणात. तर क्षणाअत तिथे तुमच्या त्या अमेरिकेत.

तस्मात. मन मोठं करा. दिसेल भुत.

रच्याक, तुमचा गण कोणता? कारण गणावर बरेच काही अवलबूंन आहे.

Light 1

भुंगा.. डेंजर रे भॉ ! अपुन तो डर जाता. आपला तर विश्वास आहे भुतावर Proud खरंच... थांबा लेख पाडतो आता...

भुंग्या.. भयानक अनुभव रे...
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत अंगणात झोपतांना ,रात्रीच्या अंधारात मोठी बहीण तोंडाने काढलेल्या बॅकराऊंड म्युझिक सहित भुताखेतांच्या गोष्टी अ‍ॅक्टिंग समेत सांगायची.. त्याचीच आठवण होतेय इकडे सारखी Lol
मस्त मज्जा येतीये..

मधुरिमा यांस अनुमोदन.

दिनेशदा,
ते चाकु भुतांसाठी नव्हे तर राक्षसांठी (Read : माणसां साठी) ठेवतो. Proud
अनोळखी जाग्यावर गेलं कि असं काही जवळ असल्यास तेव्हढाच कॉन्फिडंस वाढतो.

म्हमईकर : चाकुमधून भूत (भूतामधून चाकु म्हणा ) आरपार जातो. भूताला आणि चाकुलाही काही होत नाही. (संदर्भ : घोस्ट हा चित्रपट.)<<< अनुमोदन.

मी सांगितलेल्या अनुभवा मध्ये ही आम्हाला दिसलेले विचित्र आकार ट्रान्स्पेरेंट होते.

मला तरी माझा तो अनुभव भास असावा असं वाटतंय.

ani_ghost38.gif आणखीsssss कुणालाss लिहायच्याsss आहेतss आमच्याss गोष्टीss

रच्याक, तुमचा गण कोणता? कारण गणावर बरेच काही अवलबूंन आहे.>> ऋयामा, मग अतसं तर मला बाधा व्हायला हवी... मी मनुष्यगणाची! दिसतपण नै साधं... असो...

लग्नानंतर हळद उतरायच्या आधी नव्या जोडप्याला/खास करून नववधूला सतत लोखंडी चाकू जवळ बाळगायला लावतात बाहेरची बाधा होऊ नये म्हणून!

एक गोष्ट फार पूर्वी सांगितलेली मामानी.... एक कुटुंब एका घरात नवीनच राहायला आलेलं... त्यातील आठेक वर्षाचा मुलगा खूप मस्तीखोर होता... त्याची आई त्याला नेहमी कोंडून ठेवण्याची धमकी देत असे. पण हा बधला नाही. एक दिवस त्याच्या दंग्याने कंटाळलेल्या आईने त्याला फरफटत बाथरूममध्ये कोंडलं, बाहेरची कडी लावून टाकली. मुलगा रडून रडून थकला... अर्ध्या तासाने "आता ताळ्यावर आला असेल" असा विचार करून आईने दार उघडलं तर मुलगा गुपचूप कोपर्‍यात बसलेला. बाहेर आणलं तर बोलायला, खायला, खेळायला तयारच नाही.. मस्ती तर दूरच. १-२ दिवसांनी बरा होईल म्हणून वाट पाहीली... त्याच्या अवस्थेत काहीच फरक नाही... डॉक्टरांकडे नेलं, मानसोपचार तज्ञाकडे नेलं, अंगारे-धुपारे केलं काही नाही. त्याचा त्याच्या आजीवर खूप जीव होता. आजी त्याला बघायला आली.. आणि हळूहळू बोलतं करायचा प्रयत्न केल्यावर कळलं त्याला त्या बाथरूममध्ये मळवट भरलेली हिरव्या साडीतील बाई दिसली...

चौकशी केल्यावर समजले... त्या घरमालकाची ती ठेवलेली बाई होती.. तिचा त्या घरात खून झालेला... खरं खोटं कोणास ठाऊक पण त्या मुलाच्या मनावर या गोष्टीचा खोल परीणाम झाला तो झालाच.

या घटनांना गावाकडे अनन्यसाधारण महत्व आहे... तिथे भूत, देवदेवस्की यांना फार मानतात. कोणीही तिथे हे मनाचे खेळ/रात्रीच भूत का/तुलाच कसा भास झाला अशा शंकाकुशंका काढत नाहीत.

पाय सरळ आहेत कि रे तूझे !!!>>>दिनेशदा काल्पनिक भुतांचे पाय उल्टे असतात.., हा 'काल्पनिक भुत' नाहीय ना .... हा हा हा ..! ani_icon03.gif

चातक पक्षी आहे असे वाटलेले.. आज कळले की तो भूतही आहे म्हणुन..

इथले सगळे अनुभव एकदम मस्तच.. भुतांच्या गोष्टी नंतर ऐकताना मजाच येते, फक्त अनुभवताना वाट लागलेली असते.

दिनेशप्रमाणे मलाही लहानपणी भुतांची अजिबात भिती वाटत नव्हती. मी सावंतवाडीत होते जिथे झाडाझाडांवर देवचार राहायचे. Happy संध्याकाळी घरातल्या बायका कामे आटोपुन बसल्या की या गप्पा सुरू व्हायच्या. माझी खुप इच्छा होती की मला एकातरी देवचाराने दर्शन द्यावे. पण एकाही देवचाराने कधी मनावर घेतले नाही. भुतांना घाबरायचे असते हे मुंबईत आल्यावर शेजारच्या मुलांनी माझ्या डोक्यात भरवले. त्यांच्या त्या हडळ आणि जखिणींच्या गोष्टी ऐकुन मी खुप भित्री झाले.

मी वाडीला ज्या शाळेत जायचे ती शाळा म्हणजे एक मोठ्ठे ७-८ खोल्यांचे घर होते. मुख्य रस्त्यापासुन जवळपास ५०० मीटर आत जाणारा मातीला रस्ता आणि त्या रस्त्याच्या टोकाला शाळा. रस्त्याच्या दोन्ही बाजुला काट्यांचे कुंपण होते, कुंपणाच्या त्या बाजुला झाडांची गर्दी. घराच्या मागे हिरड्यांची, तिरफळांची झाडे होती. एकुण घराला झाडांचा वेढा होता आणि कोकणातल्या अशा घरात अर्थातच माणसे कमी आणि भुते जास्त असतात. कोकणाची ती खासियतच आहे.

ते घर मालक आधी भाड्याने द्यायचा. त्या घरात भाडेकरु आले की तिथली राहती भुते त्यांची चांगलीच खातिरदारी करत. म्हणजे रात्रीचे आवाज आले म्हणुन कोणी उठुन लाईट लावायला गेले तर भुते लगेच बटण दाबायची, दरवाजा उघडायला गेले तर आधीच कडी काढुन ठेवायची. मडक्यातले पाणी संपलेले असले तरी एखादा रात्री उठला पाण्यासाठी तर तेव्हापुरते पाणी भरलेले असायचे. एवढी चांगली कामसू भुते असुनही माणसांना त्यांचा त्रास व्हायचा. माणसाला स्वतःचे भले कळत नाही हेच खरे. शेवटी मालकाने वैतागुन घर शाळेला भाड्याने दिले.

वरच्या सगळ्या ऐकिव गोष्टी पण एक गोष्ट मात्र माझ्यासमोर घडलेली. आमची शाळा सकाळी ७.३० ते १०.३० सकाळचे अधिवेशन आणि दुपारी २.३० ते ५.३० दुपारचे अधिवेशन अशी दोनदा भरायची. एके दिवशी मी सकाळचे अधिवेशन संपवुन घरी आले. दुपारी जेवून परत गेले तर रस्त्याला लागुन असलेल्या गेटकडे मुलांची गर्दी. कोणी आत जायला तयार नाही. झालेले असे की घराची जो बाहेरचा लोटा म्हणजे इथल्या भाषेत हॉल होता त्याची खिडकी उघडी होती आणि त्यात एक डोक्यावर पदर घेऊन बसलेल्या बाईचा चेहरा दिसत होता. शेवटी शिक्षक आले आणि त्यांनी आत जाऊन पाहिले तर तिथे एक मोठा दगड होता. साधारण माणसाच्या चेह-याएवढा मोठा तो दगड नेहमी दरवाजाकडे पडलेला असायचा. आम्ही त्याचावर पाटीवरच्या पेन्सिलीं घासुन त्यांना टोक करायचो. एवढा मोठा दगड खिडकीत कोणी ठेवलेला देव जाणे. शाळा फक्त चौथीपर्यंतच होती आणि त्या वयाच्या मुलांना एवढ दगड उचलणे जरासे कठिण होते. जरी तिथे नंतर दगड दिसला तरी तिथे आधी बाई दिसलेली यावर सगळ्या मुलांचे एकमत होते. आणि शाळेचा लौकिक लक्षात घेता ते खरेच होते यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला. Happy

मंडळी, आत्ताच माझ्या बरोबर एक "अमानवीय" घटना घडली. या धाग्यावर आत येण्यापुर्वि मी २ जास्तीचे प्रतिसाद पाहीले आणि आत आलो तर ते प्रतिसाद गायब Uhoh जे प्रतिसाद पुर्विही वाचले होते फक्त तेच होते.
हो मी अगदी शुध्दीवर आहे.
या धाग्यावरही आता 'अमानवीय' अमंळ व्हायला लागला आहे, तेव्हा तुम्हाला ही असा अनुभव आलाच तर यात भिती वाटुन घेउ नये, कारण आपण सर्वच आता या पवित्र धाग्याने 'आमानवीयरीत्या' ग्रासले आहोत.

मला वाटते मतक-यांची एक गोष्ट आहे. तशा त्यांच्या खास भुताच्या अनेक आहेत आणि नकोत्या वेळेला म्हणजे आपण भुतांच्या जागेत असतानाच त्या नेमक्या आठवतात ही बाब वेगळी. Happy

या गोष्टीत एका घरात माणुसयोनीत असताना मुल नसलेले आणि आता भुतयोनीत आलेले म्हातारे जोडपे राहात असते. काही दिवसांनी तिथे एक कुटूंब राहायला येते. नवरा बायको आणि चार वर्षांचा मुलगा. म्हाता-यांचा जीव लगेच जडतो मुलावर. मग मुलगा झोपेत कुशीवर वळून पडेल या भितीने त्याला बेडवर मध्ये सरकवणे, त्याला इतर काही दुखापतीतुन वाचवणे इ. प्रकार सुरू होतात. मुलाला हे आजीआजोबा दिसत असतात, त्याला ते खुप आवडतात, तो त्यांच्याशी बोलतोही . पण आईबाबांना मात्र दिसत नाहीत. मुलाला लळा लागतो त्यांचा आणि त्यामुळे आई अस्वस्थ होते. बाबा अर्थातच आधी विश्वास ठेवत नाही पण त्याच्या डोळ्यासमोर एकदा मुलगा वरच्या मजल्यावरुन टाटा करत असताना खाली पडतो आणि आजोबा त्याला अलगद झेलुन खाली उतरवतात. एवढे झाल्यावर मात्र आईबाबा हादरतात आणि मुलाला आजीआजोबा हवे असतानाही घर बदलतात. मग एकदा आजीला बंद दारातुन मुलगा धावत येताना दिसतो आणि आनंदाने आता मी कायमचे तुमच्याकडेच राहणार हे सांगतो. आजीला दचकुन झोपेतुन जाग येते आणि मग आपले स्वप्न खरे ठरु नये म्हणुन ती देवाचा धावा करु लागते. मला ही गोष्ट खुप आवडलेली.

मतकर्‍यांच्या गोष्टी या भावभावनांची आंदोलने असतात... भूत झाले तरी त्याला मानवी भावनांची किनार असते...
धारपांच्या गोष्टी ता अमानवीय अकल्पित, सुष्ट दुष्टातील संघर्ष आणि अर्थात सुष्टाची दुष्टावर मात अशा असतात. मला दोन्ही धाटणीच्या आवडतात.

मला एकुलता एक अनुभव आलेला पण तो स्वप्न-सुषुप्तीच्या हिंदोळ्यावरचा होता. माझ्या लग्नानंतर देवांच्यां दर्शनाला जाऊन आलो होतो दोघेही. २ दिवसांनंतर रात्री झोप डोळ्यांवर असताना... खिडकीतून बाहेरच्या घनदाट झाडीत एक हिरवीजर्द नऊवारी साडी नेसलेली, मळवट भरलेली, लालभडक डोळ्यांची, केस मोकळे सोडलेली बाई माझ्याकडे टक लावून बघतेय...

दुसर्‍या दिवशी नवर्‍याला हळूच सांगितलं तर म्हणाला, आपली गांवदेवी असेल, आज ओटी भरून येऊया. आम्ही ओटी भरून आल्यावर साबांना सांगितलं तर त्या म्हणाल्या की त्यांच्या चुलत सासूबाई अहेवपणी गेल्या.
साबांनापण असेच भास व्हायचे लग्नानंतर! त्यांनी नमस्कार करून सांगितलं की घरावर, मुलाबाळांवर लक्ष ठेवा, मी दर नवमीला ओटी भरेन. त्यांनी ही प्रथा अजून चालू ठेवली आहे. नंतर दोनवेळा गेले पण पुन्हा तसा भास/स्वप्नं नाही जाणवलं!!!

भुंग्याSSSSSSSsssssssssss
धावSSsss धावSSsss आता कुठे पळशीलSSSsssनायss सोड्णारsssssआताsss

ani_ghost48.gif हाssss.. हाssss.. हाssss..

हे सगळी (भुतं)कथा वाचुन, मलाबी आजोबांना भेटलेलं भुत एकदम आठवलं ....

आजोबांच गाव हे कोल्हापुर जिल्ह्यातलं, नृसिंहवाडीजवळ ८-१० किलोमीटरवर कृष्णेच्या काठी वसलेलं !
आजोबांनी काही वर्षे परिसरात पैलवानकी गाजवली होती, नंतर ७-८ वर्षे ते तिथुन ८ किमीवर असलेल्या शेजारच्या गावामध्ये वस्ताद म्हणून तालमीत मल्लांना शिकवायला जात,त्यासाठी रोज पहाटे ४.३० ला घराबाहेर पडायचे, शेजारच्या गावच्या वेशीवर (काही वर्षापासुन ) लोकांनी पाहिलेल्या एका भुताबद्दल,त्याच्या पराक्रमाबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या त्यांनीही ऐकल्या होत्या.आजोबा तर अशा भुतांची कधी भेट होईल याची नेहमी वाट पाहायचे.
एका दिवशी पहाटे ते सायकलनी जात असताना रस्त्यावर एक भुत आडवं आलं, आजोबांनी मग त्याला लांबुन दरडाऊन रस्त्यातुन बाजुला होण्यास सांगुन पाहिलं, पण ते भुत सरळ हातातल्या विळ्यांनी मारायला अंगावर आलं, आजोबांनी मग सावध होत हात धरला आणि विळा काढुन घेतला, केस पकडुन २-४ चार कानशिलात लगावल्या आणि भुताला त्याच नाव,पत्ता विचारला, तर भुतांने आपली विनवण्या करत सुटका करुन घेतली आणि पळुन गेलं, त्यानंतर मात्र ते भुत पुन्हा कधी प्रकट झाल्याच ऐकिवात नाही.
.....ते भुत म्हणजे सगळे केस मोकळे सोडलेली, अंगावर एकही कपडा नसलेली, हातात एक धारदार विळा धरुन दिसेल त्याला भीती घालणारी, त्याच गावातली एक वेडसर बाई होती..
Happy

मी पण भुताच्या गोष्टी एकुनच आहे,, प्रत्यक्ष अनुभवले नाही, आणी अनुभव येऊ पण नाही... मी ऐकलेले दोन किस्से आहे...
१) अरे ए, उलट्या खोपडीच्या, पाय सरळ आहेत कि रे तूझे ...ह्या दिनेश दादाच्या वाक्यावरुन आठ्वला...
अकोल्याची गोष्ट आहे... एक ऑटोवाला म्हणे रात्री...१/१.३० च्या दरम्यान घरी चालला असता वाटेत त्याला एक माणुस भेटला, त्याच भागात जाय्चे म्हणुन ऑटोत बसला, मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतांना तो माणुस ऑटोवाल्याला म्हणाला तुम्ही एवढ्या रात्री फिरता भुताखेताची भिती नाही वाटत का? ऑटोवाला म्हणाला नाही आमचे रोजचेच आहे कसले भुत अन कसले काय... त्यावर तो माणुस म्हणाला बर समजा तुम्हाला भुत दिसलेच तर कसे ओळखाल...तर ऑटोवाला म्हणाला सोप्पे आहे भुताचे पाय उलटे असतात....तर लगेच तो माणुस म्हणाला ...मागे वळुन पहा "माझे पाय का सरळ आहे का? आणि ते भुत गायब झाले... ऑटोवाल्याला हार्टअटॅक येऊन तो मेला म्हणतात....

२) माझ्या मावस बहिणीचे मिस्टर.... सांगत होते ...ते आणि त्यांचे मित्र रात्री कुठ्ल्या तरी प्रोग्राम वरुन १ वाजता स्कॉरपिओने परत येत होते तर रस्त्यामध्ये एक बाई गाडीसमोर उभी दिसली.. पण ड्रायव्हरला माहीती होती की त्या रस्त्यावर नेहमीच असे प्रकार घडतात म्हणुन ड्रायव्हरने गाडी जोराने तिच्या अंगावरुन नेली ..तर ती बाई गाडिला मागे लटकुन दिसली असे ३/४ किलोमीटर ती अशी लटकलेले होती... मग गायब झाली.... असे ऐकण्यात आले की रस्त्यात असे काही दिसले तर गाडी थांबवायची नाही म्हणतात.... ..

Pages