Submitted by अ. अ. जोशी on 25 February, 2011 - 13:16
इथे पहा केवढे खलाशी
तरी गझल चालली तळाशी
कुणी हसावे, कुणी रडावे
कधीच नाते नसे कुणाशी
कधी कधी दानशूर असते...
कधी कधी वाटते अधाशी
कधीच नव्हतेच होय नाते ?
उगा मला वाटले मगाशी...!
नकोस माझ्याकडे बघू तू...
तुझे असे बघ तुझ्याचपाशी
नको बघू रोज डाग माझे
कधी तरी बघ तुझ्या मुळाशी
कधीच मी तूप सोडलेले....
तरी पहा शिंकलीच माशी
कधी नसे आपल्यात स्पर्धा
तुझीच स्पर्धा असे तुझ्याशी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कधी नसे आपल्यात स्पर्धा तुझीच
कधी नसे आपल्यात स्पर्धा
तुझीच स्पर्धा असे तुझ्याशी
सही!
गझल खूप आवडली!
कधीच नव्हतेच होय नाते ? उगा
कधीच नव्हतेच होय नाते ?
उगा मला वाटले मगाशी...!
नकोस माझ्याकडे बघू तू...
तुझे असे बघ तुझ्याचपाशी
मस्तच..
अ. अ. ..... अप्रतिम
अ. अ. ..... अप्रतिम
नकोस माझ्याकडे बघू तू... तुझे
नकोस माझ्याकडे बघू तू...
तुझे असे बघ तुझ्याचपाशी
मस्त है जोशीजी....
धन्यवाद मित्रांनो! ही गझल
धन्यवाद मित्रांनो!
ही गझल ऐकण्यासाठी
http://www.youtube.com/watch?v=YR33OpxMkj4
या लिंकवर क्लिक करा....
छान! आवडली. विशेषत: शेवटचा
छान!
आवडली.
विशेषत: शेवटचा शेर.
रामकुमार
मक्ता आणि मतला विशेष आवडले.
मक्ता आणि मतला विशेष आवडले.
रामकुमार,
रामकुमार, मुटेजी
धन्यवाद!
शेवटचा शेर मलाही आवडतो.
आहाहा!! क्या बात है!!
आहाहा!! क्या बात है!!
आवडली.
आवडली.
प्राजु, जर्दाळू धन्यवाद!
प्राजु, जर्दाळू धन्यवाद!
आज सगळे प्रतिसाद वाचताना गझल
आज सगळे प्रतिसाद वाचताना गझल पुन्हा वाचली
आज नव्याने भावलेले शेर-
कुणी हसावे, कुणी रडावे
कधीच नाते नसे कुणाशी
नकोस माझ्याकडे बघू तू...
तुझे असे बघ तुझ्याचपाशी
नको बघू रोज डाग माझे
कधी तरी बघ तुझ्या मुळाशी
पण
कधीच नव्हतेच होय नाते ?
उगा मला वाटले मगाशी...!
यात २ च नको वाटले!
रामकुमार