इथे पहा केवढे खलाशी

Submitted by अ. अ. जोशी on 25 February, 2011 - 13:16

इथे पहा केवढे खलाशी
तरी गझल चालली तळाशी

कुणी हसावे, कुणी रडावे
कधीच नाते नसे कुणाशी

कधी कधी दानशूर असते...
कधी कधी वाटते अधाशी

कधीच नव्हतेच होय नाते ?
उगा मला वाटले मगाशी...!

नकोस माझ्याकडे बघू तू...
तुझे असे बघ तुझ्याचपाशी

नको बघू रोज डाग माझे
कधी तरी बघ तुझ्या मुळाशी

कधीच मी तूप सोडलेले....
तरी पहा शिंकलीच माशी

कधी नसे आपल्यात स्पर्धा
तुझीच स्पर्धा असे तुझ्याशी

गुलमोहर: 

कधीच नव्हतेच होय नाते ?
उगा मला वाटले मगाशी...!

नकोस माझ्याकडे बघू तू...
तुझे असे बघ तुझ्याचपाशी

मस्तच.. Happy

रामकुमार, मुटेजी
धन्यवाद!
शेवटचा शेर मलाही आवडतो.

आज सगळे प्रतिसाद वाचताना गझल पुन्हा वाचली

आज नव्याने भावलेले शेर-

कुणी हसावे, कुणी रडावे
कधीच नाते नसे कुणाशी

नकोस माझ्याकडे बघू तू...
तुझे असे बघ तुझ्याचपाशी

नको बघू रोज डाग माझे
कधी तरी बघ तुझ्या मुळाशी

पण
कधीच नव्हतेच होय नाते ?
उगा मला वाटले मगाशी...!

यात २ च नको वाटले!
रामकुमार