मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवाळीच्या मुहूर्त सौद्याच्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबर २०१० ला मुंबई शेअर बाजार निर्देशांक २११०८ व निफ्टी निर्देशांक ६३३८ वर असलेला निर्देशांक अवघ्या तीन महिन्यांत अनुक्रमे १७२९५ व निफ्टीवर ५१७७ अशी १८ टक्के तीव्र स्वरूपाची घसरण झाली. थोडक्यात, ‘दिवाळीनंतर दिवाळं निघालं’ असे म्हणायला हरकत नाही.
आज मी मार्केटची ‘दशा’ झाली आहे, त्याची प्रथम आपण कारण समजवून घेऊया व या दशेतून दिशा शोधण्याचा प्रयत्न करूया.मार्केटची पडझड खालील कारणांमुळे झाली.
हाताबाहेर गेलेली ‘भाववाढ’ व ‘चलनवाढ’ रोखण्याकरता रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या अखत्यारीतीली विविध आयुधे म्हणजे सी.आर.आर., रिपोरेट, रिव्हर्स रिपोरेट वाढविण्यास सुरुवात केली. याचा परिणाम औद्योगिक कर्ज महाग होण्यास सुरुवात झाली व आजच्या घडीला ते १३ ते १४ टक्क्यांनी मिळत आहे. त्यामुळे लघू, मध्यम उद्योग तसेच ज्याचे नफ्याचे प्रमाण १५ ते १८ टक्के आहे, अशा सर्व उद्योगांना अर्थपुरवठा वाढीव दराने झाल्यामुळे उत्पादनाचे मूलभूत कोष्टकच कोलमडून पडले व त्याची परिणती औद्योगिक उत्पादन वाढीचा दर हा २ टक्के इतका खाली आला. (आय.आय.पी. रेट)
भाववाढ (इन्फ्लेशन) आटोक्या येत नाही हे पाहून परदेशस्थ अर्थसंस्थांनी, गुंतवणूकदारांनी केलेली सपाटून विक्री.
भारतात विविध आर्थिक घोटाळ्यांमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती.
वरील कारणांमुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांक १८७०० ची पातळी जी २०० दिवसांची सरासरी आहे. (२०० डे. मुविंग अ‍ॅवरेज) व निफ्टीवर ५६२५ आहे. ही पातळी तोडून मार्केट मंदीच्या गर्तेत गेलं व मंदीची दाहकता एवढय़ा भीषण स्वरूपाची होती की काही कंपन्यांनी आपला ऑक्टोबर २००८ च्या महामंदीचा नीचांक तोडून खाली गेल्या. (उदा. पूंज लॉइड, जी.एम.आर. इन्फ्रा)
आता ती तेजी आली आहे ती येणारा अर्थसंकल्प डोळ्यासमोर ठेवून आपण या तेजीचे स्वरूप जाणून घेऊया.
चिंताजनक वातावरणात स्थापन केलेला नीचांक (पॅनिक बॉटम) व त्यानंतर दीर्घकालीन तेजीची सुरुवात हे एक स्वरूप.
दुसरं स्वरूप मंदीच्या दाहक वातावरणात ‘तेजीची झुळुक’ ज्याला आपण ‘अल्प मुदतीची तेजी’ (रिलीफ रॅली, डेड कॅट बाऊन्स) असे संबोधतो. आता आलेली तेजी आपण येणाऱ्या अर्थसंकल्पाशी निगडित करून अर्थसंकल्प सादर झाल्यावर मार्केटची दिशा कशी असेल? व आताची तेजी अल्पमुदतीची आहे की दीर्घकालीन आहे हे जाणून घेऊन त्या अनुषंगाने गुंतवणूकदारांनी/ वाचकांना निर्णय घेण्यास खालील ‘तांत्रिक विश्लेषणाचा’ फायदा होऊ शकतो.
‘तांत्रिक विश्लेषणात’ २०० दिवसांच्या सरासरीला अनन्यसाधारण महत्त्व असते. (२०० डे. मुविंग अ‍ॅवरेज) किंबहुना मार्केटची धारणा, कल (तेजी अथवा मंदीचा कल) यावरून ठरवला जातो. (निर्देशांक २०० दिवसांच्या सरासरीच्या वर म्हणजे तेजीचा कल व निर्देशांक २०० दिवसांच्या सरासरीच्या खाली म्हणजे मंदीचा कल.)
आजच्या घडीला मुंबई शेअर बाजार निर्देशांकाची २०० दिवसांची सरासरी ही १८७०० आहे व निफ्टीवर ५६२५ आहे व ११ फेब्रुवारीला २०११ ला मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर १७२९५ व निफ्टीवर ५१७७ चा नीचांक गाठला. इथे दोन्ही निर्देशांकांनी आपली २०० दिवसांची सरासरी तोडून खाली (मंदीत प्रवेश केला) आल्या. तसेच दुसऱ्या संकल्पनेनुसार या घटनेला दुजोरा मिळाला. ती संकल्पना म्हणजे ‘कल निर्धारण रेषा’ (ट्रेंड लाइन) इथे अगोदरचे दोन महत्त्वपूर्ण नीचांक (बॉटम) घेऊन ही रेषा काढली आहे. इथे १७ जुलै २००९ चा नीचांक १३२१९ व २५ मे २०१० चा नीचांक १५९६० हे दोन बिंदू पकडून जी रेषा काढली आहे त्याची आजची किंमत ही मुंबई शेअर बाजार निर्देशांक १८४०० व निफ्टीवर ५५६० येत आहे व ११ फेब्रुवारी २०११ चा नीचांक हा त्याच्या खाली येत आहे म्हणजे मंदी दर्शवीत आहेत. तेव्हा आता जी तेजी चालू झाली आहे त्यात निर्देशांकांनी प्रथम १८५०० व नंतर १८८०० च्या वर १५ दिवस टिकला पाहिजे. (१५ वर्किंग डेज विशेषत: हा १८८०० व निफ्टीवर ५६५० च्या वर) तरच आपण मंदीच्या गर्ततेतून बाहेर आलो असे समजायला हरकत नाही. पण जर का या पातळ्यांना स्पर्श करून अर्थसंकल्पानंतर निर्देशांक या पातळ्याच्या वर टिकलाच नाही व खाली घसरायला लागला तर तो धोक्याचा घंटानाद असेल. आता प्राप्त परिस्थितीत गुंतवणूकदारांनी तेजीची झुळूक पदरात पाडून घ्यावी. जे समभाग नफ्यात आहेत किंवा भाव टु भाव आहेत ते विकून रोकड (कॅश) निर्माण करावी. याचा आपल्याला दुहेरी फायदा होऊ शकतो.
पहिला फायदा अर्थसंकल्प सादर झाल्यावर ज्या क्षेत्रांना (सेक्टर), कंपन्यांच्या अर्थसंकल्पामुळे फायदा होणार आहे ते समभाग खरेदी करण्यासाठी आपल्याकडे रोकड असेल. ज्याला आपण समभागांची पुनर्रचना (रिशफलमेंट) असे म्हणू शकतो. ज्यायोगे आता झालेला तोटा लवकर भरून येऊ शकतो.
दुसरा फायदा समजा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्देशांक कोसळला म्हणजे आताचा आधार (सपोर्ट) मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर १७३०० व निफ्टीवर ५१७७ हे तोडून खाली जायला लागले व या वेळेला मुंबई शेअर बाजार निर्देशांक १६५०० व निफ्टीवर ४९५० चा भरभक्कम आधार तोडला तर दुर्दैवाने मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर १५५०० व निफ्टीवर ४६५० ते ४७०० पर्यंत खाली जाईल, तेव्हा आता समभाग विकून निर्माण केलेली रोकड (कॅश) आपल्याला तेव्हा उपयोगी पडले तेव्हा आपण समभाग पडेल. भावात (थ्रो अवे प्राईज) मध्ये खरेदी करू शकू. कारण इथेच मार्केटचा दीर्घकालीन तळ गाठला जाईल व हीच मंदीतली सुवर्णसंधी असेल व हे सर्व मे २०११ पर्यंत पूर्ण होऊन मुंबई शेअर बाजार निर्देशांक पुन्हा २१००० व निफ्टीवर ६३०० पर्यंत झोपावयास सज्ज होईल.>>>> लोकसत्ता...आशीष ठाकूर, सोमवार, २१ फेब्रुवारी २०११

केदार, सुरेश काही टिपण्णी?

४९५० चा भरभक्कम आधार तोडला तर दुर्दैवाने मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर १५५०० व निफ्टीवर ४६५० ते ४७०० पर्यंत खाली जाईल, >>

हे सर्व मे २०११ पर्यंत पूर्ण होऊन मुंबई शेअर बाजार निर्देशांक पुन्हा २१००० व निफ्टीवर ६३०० पर्यंत झोपावयास सज्ज होईल >>>>

वरचे विवेचन बर्‍याच अंशी बरोबर असले तरी मी वरील वाक्यांशी सहमत नाही. आधी इथे लिहिल्यासारखे रिलीफ रॅली आहे व शुक्रवारी सकाळी देखील मी मार्केट पडेल असे लिहिले होते. नंतर निफ्टी ८० ने पडले. ४९५० वर निफ्टी जाणार नाही. बजेट मध्ये कुठलेही खूप + वा - मुद्दे असणार नाहीत. आधी मांडल्यासारखे इन्फ्लेशन राहणार व मार्केट त्यातून वाट काढणार. पडझड झाली तरी मार्केट ५२२० ला अरेस्ट होऊ शकते. दोन दिवस तिथे असतना मार्केट एक दोनदा ५१०० घरात जेंव्हा आले (११ फेब) तेंव्हा परत वर चढायला सुरूवात झाली होती. पडले तर परत तिथेच (५१३७ +/- ) जाऊन रिव्हर्स होईल. आता शॉर्ट टर्म डाउन ट्रेन्ड आहे जो एक्स्पयरी पर्यंत (व पर्यायाने बजेट पर्यंतही) राहील. बजेटच्या दिवशी चढ उतार नक्कीच होईल व तिथे शॉर्ट टर्म दिशा ठरेल. सध्यातरी फार तर १०० + ते १०० - असेच राहील असे वाटते. ( ५३५० ते ५५५०) आजही मार्केट आधी +२०. नंतर -१५ ते आता हे लिहिपर्यंत +५ असे फिरत आहे. त्यामुळे बायींग आहे. मार्केट मध्ये ५५०० च्या कॉलवर १४.५ लाखाचा OI काल वाढून तो सध्या ८९ लाख आहे.

एप्रील सुरूवातीपासूनच मार्केटला अर्निग गाईडंस मिळेल तो मे मध्यापर्यंत चालेल. त्यामुळे ४९०० ते ४७०० मला पटत नाही. (अर्थात मला पटण्यावर सर्व नसते. Happy )

२००८-०९ च्या सुमारास निफ्टी ४८०० च्या घरात होते. तेंव्हा पी इ होता १८ च्या सुमारास. म्हणजे कन्सोलिडेटॅड इ पी एस होता.. २४०-५० च्या आसपास.

आता निफ्टी जेंव्हा ६२०० होता, तेंव्हा पी इ झाला होता २६ आणि इ पी एस तेवढाच होता २४०-५०

अर्थात वैयक्तिक कंपन्यांची चढ उतार झाली असणार हा एक वेगळा मुद्दा.. पण म्हणजे आपल्या कंपन्यांचे सरासरी वॅल्युएशन दोन वर्षे आहे तेवढेच आहे आणि कुठल्या तरी किरकोळ मुद्द्यांवरुन होणारे चढ उतार आपण खेळत बसलो आहोत.. Happy हा नक्कीच चिंतेचा विषय आहे.. आता एप्रिल २०११ च्या आकड्ञावरुनच खरी परिसस्थिती कळणार असे मला वाटते

शेवटी फंडामेंटच्या चिंता बफेनाच सतावणार !

बाकी, हे टेक्निकलवाल्यांचं काही कळत नाही... मार्केट खाली जात असताना म्हणायचं , वरच जातय पण हे करेक्शन आहे.. आणि वर चाललं तर म्हणायचं , हे खालीच चाललंय, ही फक्त रॅली आहे.. Proud सगळं बैलो वा अस्वलो वा ,

५५२१ ( +६२)

हे सर्व मे २०११ पर्यंत पूर्ण होऊन मुंबई शेअर बाजार निर्देशांक पुन्हा २१००० व निफ्टीवर ६३०० पर्यंत झेपावयास सज्ज होईल >>>>

मार्च एंड ला मार्केट कनविनसिंगली ५४७२ वर राहीले तर लाँग टर्म बुलीश फेझ इनटॅक्ट राहील. ते साध्य होण्यासाठी त्याने ५७३२ लेव्हल तो पर्यंत दाखवली पाहीजे. थोडे कठीण वाटते. किंवा कमीत कमी फेब एंड पर्यंत ५५५० च्या वर बंद झाले पाहिजे. ते शक्य वाटते आहे.
६१८१ पासून ज्या दिवसात (२७) मार्कॅट ५१७७ पर्यंत आले त्यापेक्षा फार कमी वेळात (५ दिवस) त्याने ३८% करेक्शन दाखवले. बुलीश फेझ त्यामुळे अजुन थोडी टिकुन असावी.

तेव्हा आता समभाग विकून निर्माण केलेली रोकड (कॅश) आपल्याला तेव्हा उपयोगी पडले तेव्हा आपण समभाग पडेल. भावात (थ्रो अवे प्राईज) मध्ये खरेदी करू शकू.>>

हे सरसकट न करता केस बाय केस करायला हवे. नियम असा आहे की मार्केट खाली येताना हातात पैसे पाहीजेत व वर जाताना शेअर. पण वर जात असताना आपण ते विकत नाही व खाली येताना आपल्याला ते सोडवत नाहीत. ह्यात मी पण आहे. मार्कॅट खाली येताना हातात जर शेअर असतील तर पैसे कमवायचे तेव्हढेच सोपे आहे व त्यासाठी चार्ट शिवाय पर्याय नाही. वानगीदाखल SBI चा चार्ट देत आहे.
SBI.jpg

केदार, सुरेश
रिलायन्स ची डील ....... रिलायन्स आणि भारतासाठी?
(टि.व्ही. चैनल वर एक जण त्यावर बोलला.... त्यांनी प्लंबर आणला आहे.... आता गैस लिकेज थांबेल... फायदा होईल.... )
पण त्या साठी BP ला पार्टशीप द्यायची ऐवढी गरज होती का?

टाटा मोटर डी वी आर ८०० होता, ब्रोकरने १००० होईल २ महिन्यात असे सांगितले होते.... टाटा मोटर वाढला, पण हा डी वी आर मात्र वाढला नाही..

रिलायन्स ची डील ....... रिलायन्स आणि भारतासाठी?>>>
भारताला ऑइलची गरज आहे व ती रिलायन्स व इतर ऑपरेटर कडून वा ईंपोर्टनी पुरवली जाईल ह्यात काही फरक पडणार नाही. रिलायन्सने BP ला आपल्या तेल क्षेत्रातला ३०% वाटा दिला आहे. आता पर्यंत तेल शोधण्यात व इतर गोष्टीत रिलायन्सने समजा ५ बिलीयन डॉलर खर्च केले असतील (मला आकडा माहीत नाही) तर ह्या कराराद्वारे त्याना +९ बिलीयन डॉलर मिळतील. प्लॅटफॉर्मच्या आगीत BP जरी होरपळली असली तरी डीप वॉटर मध्ये काम करण्याचे तन्त्रज्ञान त्यांच्याकडे आहेच. त्याची रिलायन्सला गरज आहे. ह्या ब्लॉकस मधल्या पोटेंनशियल वरुनच ही डिल केली असावी. ह्याचे रिझल्ट मात्र एवढ्या लवकर दिसणार नाहीत.

केदार
गेले काही दिवस MACD बुलीश आहे. क्लोझींगच्या फिगर बघितल्या तर ५४५६, ५४८१, ५४८१, ५५४६, ५४५८, ५५१८, ५४६७ आहेत. कन्सोलीडेशन होते आहे का? का फक्त बजेट ची वाट बघत आहे?
बालक्रिशन इंडसट्रीझ क्लोझ १३५.३० व वेलस्पन कॉर्प क्लोझींग १९१ चार्ट वर चांगल्या आहेत. फंडामेंटल्स पण चांगली आहेत. एन्ट्रि करेन. काही कल्पना?

सुरेश बालकृष्ण चांगला दिसतोय. सावध एन्ट्री करा म्हणजे आत्ता २० टक्के, नंतर ३० असे.
निफ्टी बजेट साठीच वाट पाहत आहे. बजेट नंतर काय ती डिरेक्शन मिळेल. पण बजेट आधी अ‍ॅटॉ सेक्टर वर लाँग राहावे का हा विचार करत आहे. कारण कदाचित मोठ्या गाड्यांवरील ( इंजीन > १. ५ लिटर) एक्झाईज कमी होण्याचे चान्सेस आहेत. ज्यांना बजेट डे चा नफा तोटा पदरात पाडायचा आहे त्यांनी अ‍ॅटो वर लाँग राहावे.

एक राजा होता.

एकदा त्याच्याकडे दोन विणकर आले आणि म्हणाले आम्ही तुम्हाला एक सुंदर वस्त्र विणून देऊ, जे फक्त पुण्यवान लोकानाच दिसेल.

झाले, राजा खुष, दिली त्याने परवानगी त्याना.

ते बसले वस्त्र विणत. काही लोकाना रोज किती धागे खाली वर झाले, याची चिंता, ते रोजच यायला लागले. काही आठवड्याची हालचाल बघायला यायला लागले. काही म्हणाले, आम्ही सारखे सारखे न्हाय बघत. एकदाच बघू, फुल अँड फायनल. कोण म्हणतोय लाल धागे खाली चालले, कोण म्हणतोय हिरवे धागे वर चालले.

पण गंमत ही की कुणाला कापड दिसतच नव्हतं. पण सांगायची सोय नाही. सगळे रोज गोडवे गात होते, वा काय छान वस्त्र आहे.

आणि अखेर राजाची त्या वस्त्रात मिरवणूक निघाली. प्रतेकजण म्हणतोय.. वा काय छान वस्त्र आहे !

पण गर्दीतला एक लहान मुलगा वराडला.. आरं, राजा तर नागडाच हाये !

आणि मग लोक वस्तुस्थितीची जाणीव होऊन खजील झाले.

त्या लहान मुलाने नंतर अमेरिकेत जन्म घेतला. आणि नंतर आयुष्यात एकदा असेच तो उद्गारला:

Derivatives are financial weapons of mass distruction ! Happy

( ते विणकार आजकाल शेअर मार्केट मध्ये ब्रोकर आणि मार्केट एक्सपर्ट म्हणून कामं करतात, असं कानावर आलय .)

आणि त्या लहान मुलाचं नाव काय???

मलाच इचारताय व्हय? दिसतय न्हवं माझ्या प्रोफाइलवर तेचं नाव आणि फोटो ?? Proud
http://www.myloansconsolidated.com/2010/08/25/derivatives-are-financial-...

बफेटभौ डेरिव्हेटिव्ह्ज जगात अनेक शतकांपासून आहेत. त्यात नवीन काहीच नाही. फक्त आधी सामान्य गुंतवणूकदाराला ह्याचा फायदा घेता येत नव्हता कारण शेअर्सचे डेरिव्हेटिव्ह्ज नव्हते. कमोडिटी ट्रेडिंग मध्ये नेहमीच हे वापरात आले आहेत. त्यामुळे दोष डेरिव्हेटिव्जला देऊन फार तर मोकळे होता येते पण खरा प्रश्न तो नाही.

क्रुड ऑईल, मध्यपूर्वेतील काही देशातील अशांतता, भारतातील इन्फ्लेशन, अपारदर्शक गव्हर्नन्स, खूप प्रभावी नसलेला कार्पोरेट गव्हर्नन्स असे अनेक कारण आहेत. आणि इन्फ्लेशन हे सर्वात मोठे.

डेरिव्हेटिव्ह्ज नीट वापरणारा आता शॉर्ट वर असतो. मार्केट ५५४६ च्या वर असताना तीन दिवसांपूर्वी मीच इथे स्टीम संपली आणि रिव्हर्सल येऊ घातले आहे असे लिहिले होते. तेव्हा शॉर्ट वर असला असतात आज दिवाळी साजरी झाली असती. Happy त्यामुळे मार्केटला दोन्ही बाजू आहेत. गुंतवणूकीचे तसे नाही. तिथे एकच बाजू लाँग.

आजचे शॉर्ट हे व्हॉल्युमवर होते. ५१८० परत एकदा टेस्ट होणार. उद्याचा दिवस आहे. मग तिथून बजेट आणि त्या दिवशी ट्रिगर मिळाला तर त्या दिवशी लाँग जायचे.
गुंतवणूकीसारखे इथेही पेशन्स महत्वाचा आहे. Happy

Happy

केदार
कुठल्या ऑपशनला जास्त मागणी आहे ते कुठे बघायचे? एक चार्ट बघितला. खाली देत आहे. काय निष्कर्ष निघतो?
option.jpg

पुट कॉल रेशो मध्ये कॉल ५४०० ला जास्त आहेत कारण तिथे OI जास्त आहे. त्यानंतर ५५००. ५२००ला कोणी सध्या इन द मनी असलेला कॉल पण घेत नाही म्हणजे मार्केट सेंटिमेंट बियरिश आहे. आता हा डेटा घेऊन फ्युचर्स प्राईज बघायच्या, तिथे जेंव्हा प्रिमियम यायला सुरू होते तिथे रिव्हर्सल होण्याच्या मार्केट राईटर्सचा मूड असतो. (त्यासाठी मार्केट थोडे ग्रीन व्हावे लागेल.)

आज + आहे कारण कालचे शॉर्ट कव्हर होतील त्यामुळे आजचा दिवस पॅटर्न साठी उपयोगी नाही. कदाचित दुपारी मार्केट पडेल.

कुठल्या ऑपशनला जास्त मागणी आहे ते कुठे बघायचे >> http://www.nseindia.com/content/fo/MostActiveCallsOPTIDX.htm

तिथेच खाली पुट आणि फ्युचर्स आहेत.
मोस्ट अ‍ॅक्टीव अंडरलाईंग - http://www.nseindia.com/content/fo/MostActiveUnderlyings.htm

केदार, सुरेश

अलाईड सिस्ट्म्स (ADSL) वर buyback (cm 89 buyback 140) ची न्युज आहे............. ह्या न्युज कशा रिड करायच्या म्हणजे प्रोजेक्शन कसं ठरवणार त्या स्र्किप्टं........back history ..... fundamental.... की technical
त्यावर विव्ह कसा असावा?

IVRCL ची ६३ ची क्लोजिंग असेल तर चार्ट वर डबल बॉटम फॉर्म होतोय का?

आज + आहे कारण कालचे शॉर्ट कव्हर होतील

हे न उलगडलेले कोडे आहे... शॉर्ट कवर केल्याने मार्केट वाढते म्हणे.. नेमके काय कव्हर करतात? एफ ओ मधील कवरिंगमुळे कॅश प्राइस वाढायचा संबंध नसतो.. आणि कॅश मध्ये कधी शॉर्ट पोसिशन घेताच येत नाही, असलीच तर ती इन्ट्रा डे साठी. मग शॉर्ट कवर करतात म्हणजे नेमके काय करतात?

लिबियात सुरू असलेल्या संघर्षामुळे तेल संकट उद्भवू शकते अशी बातमी वाचली, त्यात काल मार्केटही भरघोस पडले. त्यात भारताचे बजेट सादर होईल अशा वातावरणात मार्केटची दिशा ठरवणे अवघड असेल ना? का यातून काहीतरी पॉझिटीव मूवमेंट मिळेल ??

संदिप हो.

फ ओ मधील कवरिंगमुळे कॅश प्राइस वाढायचा संबंध नसतो.. आणि कॅश मध्ये कधी शॉर्ट पोसिशन घेताच येत नाही>>
? काही कळले नाही. आणि मार्जिन सेल प्रॉडक्टचे काय. इकॉनॉमिक्सचा डिमान्ड सप्लाय तिथे लागू होत नाही का? त्या बंद होताना कव्हर झाल्यावरही दुसरे दिवशी सकाळी सेंटिमेंट बदलले असते का? जर एखादा शेअर १०० पासून ७० वर आला तर दुसरे दिवशी बाजारात तो वोलटाईल नसतो का?

तुम्ही असे म्हणताय का डेरिव्हेटीव आणि स्पॉट ह्यांचा काही संबंध नसतो? ते इंडिपेंडंट ऑफ सेक्युरिटी प्राईज अ‍ॅन्ड वोलटॅलटी असतात.

शॉर्ट कवर केल्याने मार्केट वाढते म्हणे >>> शॉर्ट कव्हरींग रॅली असे गुगल करा. मी इथे लिंका देत बसत नाही. Happy

जर एखादा शेअर १०० पासून ७० वर आला तर दुसरे दिवशी बाजारात तो वोलटाईल नसतो का?

हीच शंका मलाही आहे.. ..

एखादा शेअर १०० वर आहे, असे मानु की त्याचा फुतुर ही ९९ आहे.. १०० लोकानी १०० लॉट सेल केले होते. ( त्याचवेळी ते १०० लॉट बाय करणारेही असणार, हा एक वेगळा मुद्दा.. )
आता मार्केटमधील कॅशचा रेट पडला. तो ७० झाला.

डे मध्ये खेळणारे, डिलिवरी असलेले विकलेले, नवे डिलिवरी बाय करणारे असे सगळे रोजच्या वॉल्युम मध्ये समाविष्ट झाले. त्याना दुसर्‍या दिवशी शॉर्टवर असायचे काही कारण नाही..

आता , दुसर्‍या दिवशी १०० लॉटपैकी , ३० लोकानी आपल्या पोझिशन स्क्वेअर केल्या.. आता या ३० लोकांनी कवर केल्या त्या त्यांच्या फुतुर च्या पोझिशन्स.. कॅशमधील शेअर वॉल्युमशी यांचा संबंध नसतो.. मग या पोझिशन स्क्वेअर झाल्या म्हणजे शॉर्ट कवर झाल्यावर कॅशमधील किंमत वाढायचं काय कारण? शिवाय लोक शॉर्ट कवर करणार ते प्राइस वर चालली म्हणून... कॅश प्राइस त्यांच्या स्क्वेअर करण्यामुळे वाढत नसते.

मी वरही मार्जिन प्रॉडक्टचे काय? हा प्रश्न विचारला होता. त्यावर विचार केला का?

सकाळ SBI 2618, लिबियामध्ये घोळ!

मी लगेच ब्रोकर कडे मार्जिन ठेवून शेअर्स शॉर्ट करतो. माझ्यासारखे इतर फायनान्शियल इन्स्टीट्युशन पण शॉर्ट करतात. खूप सप्लाय. किमंत कमी झाली. सध्यांकाळी माझे मार्जिन पोझिशन मी स्वेअर करतो. मी फायद्यात.

दुसरी सकाळ : SBI ओपन 2५१५ कारण खूप सारे लोक SBI विकत घेऊ इच्छिणारे असतात ते अचानक विकत घेतात कारण मार्केट मध्ये SBI सारखा ब्लु चिप शेअर पडलेला असतो व तो विकत घ्यायला मग माझ्यासारखे सामान्य गुंतवणूकदार पैसे टाकतात. बाजारात डिमान्ड, किंमत जास्त. दुसरे दिवशी सकाळी ओपन मुळी २५४८ कारण डिमान्ड, मग डे हाय परत २६१८ परत तिथे मार्जिन वाले शॉर्ट वर आले कारण टोटल मार्केट बियरिश आहे, ते किमंत खाली घेऊन जातात व क्लोज होतो २५८६ वर

प्रचंड शॉर्टचा इफेक्ट मार्केट क्लोज होताना व दुसरे दिवशी होत असतो.

हा पूर्ण डेटा खरा आहे. चार्ट / किमंत बघा. आणि पहिल्या दिवशीचा व्हॉल्युम बघा. इतर दिवशीपेक्षा जास्त!

--------

मी भारत वारीवर असणार आहे. त्यामुळे उत्तरे द्यायला उशीर होईल.

केदार, मागे एकदा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आय व्ही आर सी एल घेऊन ठेवला साधरणतः ७५ च्ह्या लेव्हलला. खरे तर तुम्ही सान्गितले तेव्हा तो अराऊन्ड ९२-९५ असा काहीसा होता. तेथून तो खाली जायची वाट पाहत पाहत ७५ ला घेतला. पण त्याने त्याच्याही खाली पलटी मारली. आणि आत वर यायचे नाव घेत नाहीये...... काढून टाकू की बजेट कडून काही अपेक्शा धरायला हरकत नाही? [बाजारात फार म्हणजे फारच नवीन आहे, तुम्हा लोकान्ची वरील चर्चा पाहूनच (वाचूनदेखील नव्हे) डोळे पान्ढरे होतात.]
तुमच सल्ल्ला वाचून घेतला म्हणून म्हटले तुम्हालाच विचारून पाहूया पुढे काय करायचे ते !!! अखेरीस पैसे आपापल्या रिस्कवरच लावायचे असतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहेच !! Happy

मार्जिन प्रॉडक्टवर पैसे लावणारे फारसे लोक नसावेत. शिवाय मार्जिनवरती तुम्ही शॉर्ट करताय म्हणजे त्याच वेळी कुणीतरी लाँग असणारच. त्याच्म काय?

केदार,

आयसीआय ने टाटा मोटर्ससाठी स्ट्रॉन्ग बाय रेकमंडेशन दिलेले आहे. आताच्या ११०९ वरून १२ महिन्यात त्याचा भाव १५२३ इतका वर जाईल असा त्यांचा अंदाज आहे. खरा वाटतोय का त्यांचा अंदाज?

केदार, मार्जिनवर तुम्ही सेल करुन पुन्हा त्याच दिवशी बाय केले तर ते डे ट्रेडिंगच झाले ना? मग त्यानंतरच्या दिवशी तुम्ही शॉर्ट कवर करायचा प्रश्न राहिलाच कुठे?

तेल , महागाई ही नुसती कारणं असतात मार्केट पाडायची. तेल ४५ वरुन ४८ झाले, तेंव्हाही मार्केट पडलं होतं, ५%. आता तेल ९० ला गेले तरी मार्केट इतके वाढलेच ना?

आय सी आय सी वाले काहीहीसांगतात. त्यांचं काही खरं वाटत नाही. शिवाय आअजच्या बजेटला वेहिकल महाग होणार असा अंदाज आहे. म्हनुन तर सगळे गाडीवाले शेअर पडलेत खाली ३-४ दिवसात

Pages