गझल चर्चा

Submitted by विजय दिनकर पाटील on 14 February, 2011 - 02:54

नमस्कार मंडळी,

आताशा मायबोलीवर गझलेला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून आणि नवनवीन लोकांना ह्यात येण्याची आवड लक्षात घेऊन बर्‍याच विचारांती हा धागा काढावा असे वाटले(श्री. निशिकांत देशपांडे ह्यांच्या एका गझलेवरील प्रतिसादात श्री. भूषण कटककर(बेफिकीर), डॉ. कैलास गायकवाड, श्री. निशिकांत देशपांडे आणि अस्मादिक ह्यांची एक चर्चा झाली तेथे असा धागा गझल विभागात असावा ह्यावर एकमत झाले)

गझलेचे तंत्र, मंत्र, विषय, सूटी ह्याविषयी बरेच समज/गैरसमज सद्या आपल्यातल्या बर्‍याच लोकांच्या मनात आहेत परंतु ह्या गोष्टींना सप्रमाण सिद्ध्/असिद्ध करू शकतील असे फारच थोडे जाणकार आपल्यात आहेत. ह्या धाग्यांवर अशा सर्व शंकांचा उहापोह झाला तर नवशिक्यांना खूप उपयोगी होईल ते सगळे.

तसेच सद्या प्रकाशित असलेल्या गझलांतील तांत्रीक बाबींवरही ह्या धाग्यावर चर्चा होऊन मतमतांतरे आजमावता येईल.

चला तर मग! गझलेचा काफिला पुढे नेण्यासाठी आपापला खारीचा वाटा उचलायला सज्ज व्हा!!!

गुलमोहर: 

एकूण वृत्ते (लोकमान्य) किती?
गझल गेय असली पाहिजे का?
वृत्तांच्या नावावरून प्रत्येकवेळी मात्रांचा अंदाज येतो का?

एकूण वृत्ते (लोकमान्य) किती?>>> मुळ फारसी/उर्दू वृत्ते १९ असून त्यात अजून काही उपछंद आहेत

गझल गेय असली पाहिजे का?>>> अर्थातच!! असतेच, अन्यथा ती गझलच नसते.

वृत्तांच्या नावावरून प्रत्येकवेळी मात्रांचा अंदाज येतो का?>>> सहसा येतो तरीही काही नावावरून बोध होत नाही

सविस्तर माहिती भूषणजी लिहीतीलच अथवा गझल परिचय संपूर्ण वाचाल तर त्यात सगळेच आहे Happy

मुळात गझल लिहीताना वृत्ते किती आहेत हा प्रश्नच पडायला नको. आशय ताकदीने मांडता येईल असे वृत्त निवडावे..महत्वाचे म्हणजे, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगून जाता आले पाहिजे.

नाहीतर माधव ज्युलियनांच्या 'छंदोरचनेत' भारंभार वृत्ते दिली आहेत त्यातल्या बहुसंख्य वृत्तांचा गझल/कविता रचण्याच्या दृष्टीने उपयोग शुन्य आहे.

त्यात सगळ नाही म्हणुन तर विचारतेय>>>

साती, कृपया त्यातील त्रुटी अवश्य सांगा, मला तो लेख अधिक अचूक बनवता येईल.

कोणत्या गोष्टी नाहीत त्यात?

साती,

'एकूण वृत्ते किती?' हा प्रश्न कवीला पडायला नको. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की एखादी ओळ तुम्ही गुणगुणू शकता त्यातच वृत्त आले. मग बाकीच्या ओळी त्याच लयीत याव्यात. नव्हे-- येतातच! बस्स! मग त्या वृत्ताचे नाव जाणून घेण्यात काय अर्थ आहे?

सहमत आहे.

वृत्ताच्या शीर्षकाला अर्थ नाही.

ओळी वृत्तात व एकाच वृत्तात आहेत की नाहीत व 'लयीत म्हणता येतील अश आहेत की नाहीत' इतके पुरे!

(वृत्तात असूनही लयीत नसलेल्या अनेक गझला दिसतात. )

गगोवरची चर्चा इकडे.

भारंभार गझलींविषयी गिरीला पडलेल्या प्रश्नाबद्दल.

गिरी,खुप जणांनी प्रयत्न केला तर काही अपरिचित कविंच्या गुणांची ओळख होईल.
नविन नविन खयाल समोर येतील.
नव्यांना जुन्यांकडे बघून सुंदर गझल म्हणजे काय ते क ळेल.

आणि भारंभार गझलीम्मधूनही शेवटी जे उत्तम ते सर्वांनाच वेगळं कळतं.

काहिंचा तात्कालिक आणलेला उत्साह थोड्याच दिवसांत संपून जाईल आणि ज्यांना पहिल्यापासून आस्था आहे किंवा नव्याने खरी आस्था निर्माण झालीय ते आपल्याला सुंदर सुंदर गझला वाचायला देतील.

कणखर | 25 February, 2011 - 10:41
गिरी,

सातीने एक दोन मुद्दे सांगीतले आहेतच...तरी

१. नवनवीन लोक येणे ही चांगलीच गोष्ट आहे कारण मुळातच मराठी गझल हा प्रकार अजूनही बर्‍यापैकी उपेक्षितच आहे...अगदी वाचणारे सुद्धा कमी आहेत.
२. उत्साह टिकण्यावर सगळे अवलंबून आहे नाहीतरी खरी परीक्षा ही गझल तंत्रात शुद्ध लिहीणे जमायला लागल्यानंतर सुरू होते.
३. लिहीणार्‍याने प्रतिसादांच्या क्वालिटीकडे फक्त शिकण्याच्या दृष्टीकोनातून पहावे आणि अखंडपणे लिहीत रहावे...प्रतिसादांवर मनोधैर्य खचू दिले तर आयुष्यात गझल लिहीता यायची नाही.
४.लिहिणार्‍याने नेहमी दुसर्‍या गझलांचा अभ्यास करावा, उर्दू साहित्य वाचावे...खास करून गझल...उर्दू शायरांच्या जीवनाविषयी माहिती करून घ्यावी इ.इ.... ह्या सगळ्यातूनच जाणिवा प्रगल्भ होत जातात

**** म्हणजे मला असे म्हणायचे आहे की एखादी ओळ तुम्ही गुणगुणू शकता त्यातच वृत्त आले. मग बाकीच्या ओळी त्याच लयीत याव्यात. नव्हे-- येतातच! बस्स! मग त्या वृत्ताचे नाव जाणून घेण्यात काय अर्थ आहे?

शरद,
मला असे वाटते की केवळ गुणगुणण्याने वृत्त ठरत नाही. कारण, लयीमध्ये गुणगुणतानासुद्धा र्‍हस्वचा दीर्घ किंवा दीर्घचा र्‍हस्व होवू शकतो.

बेफिकीर,
वृत्तामध्ये असलेली ओळ लयहीन कशी काय होईल ? हे सरसकट होणार नाही. मात्रावृत्ते वापरताना हे कदाचित होवू शकेल. मात्र अक्षरगणवृत्त बरोबर असल्यास लयहीन ओळ होणारच नाही. म्हणूनच बाराखडीत भटांनी गझल करताना शक्यतोवर अक्षरगणवृत्ते वापरा असे म्हटले आहे.

वृत्त व लय - नुकतेच समोर आलेले असल्याने आपल्याच गझलेचे उदाहरण देतो.

नुकतीच आपण येथे प्रकाशित केलेली एक गझल अक्षरगणवृत्तात आहे. पण ती म्हणता येत नाही.

हा तो फरक आहे असे माझे मत आहे.

गझल सापडली की तिची लिंक येथे देतो.

(म्हणता न येणे ही बाब सापेक्ष नाही हेही अ‍ॅड करत आहे)

**** नाहीतर माधव ज्युलियनांच्या 'छंदोरचनेत' भारंभार वृत्ते दिली आहेत त्यातल्या बहुसंख्य वृत्तांचा गझल/कविता रचण्याच्या दृष्टीने उपयोग शुन्य आहे.

कणखर,
वरील तुमचे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. इथे तुम्ही ज्याला भारंभार वगैरे म्हणत आहात त्यापलिकडे अजून कितीतरी वृत्ते तयार होवू शकतात. ते माधव ज्युलियनांचे संशोधन आहे. तसेच सध्या जसे कोणाचीतरी ५-७ पुस्तके वाचून त्याचा आधार घेऊन लेख किंवा पुस्तके लिहून मोठे होणारे आहेत तसे छंदोरचना हे पुस्तक नाही. यामध्ये संशोधनात्मक भाग जास्त असल्याने काही वेळा ते बोअर वाटेल पण ते वाचणे आवश्यक आहे.

उपयोग शून्यच्या बाबतीत मी वरील मुद्दा मांडला आहे. आपल्याला त्या वृतांत रचना करता येत नाही याचा अर्थ ते वृत्तच निरुपयोगी आहे असे होत नाही.

मात्र मी केवळ भाषणे ठोकणारा नाही किंवा पाच-सहा पुस्तके वाचून त्यातील विचार स्वतःच्या नावावर खपवून प्रसिद्धी मिळविणाराही नाही.

तसेच सध्या जसे कोणाचीतरी ५-७ पुस्तके वाचून त्याचा आधार घेऊन लेख किंवा पुस्तके लिहून मोठे होणारे आहेत तसे छंदोरचना हे पुस्तक नाही.>>>

आपल्या दोन भिन्न प्रतिसादांमधील ही वरील विधाने कुणाला उद्देशून आहेत हे स्पष्ट कराल काय?

कारण असा माणूस माझ्या माहितीत नाही. उत्सुकता आहे.

गझल / गझलियत या संबंधी बोलणारे अनेक आहेत. केवळ इन्फॉर्मेशनच्या आधारे मोठे होणारेही अनेक आहेत. आपण आजुबाजूच्या कवी/गझलकारांकडे पाहिले तर उर्दू साहित्याबाबतीत ते भरभरून बोलतात. त्याचा इतिहासही रोचकपणे सांगतात. मात्र याचा अर्थ ते उत्तम कवी किंवा गझलकार असतातच असे नव्हे.
माहिती असणे आणि प्रत्यक्ष सहभाग असणे यात फरक आहे. मध्यंतरी या बाबतीत खूप ऊहापोह झाला होता. खूप माहिती असणारे आणि आपल्याला हीही माहिती आहे असे सांगणारे खूप आहेत. मलाही असे लोक भेटले. घागर में सागर / गझलियत वगैरे ठराविक शब्द आमच्या अंगावर फेकणारे स्वतः किती पातळ गझला लिहितात हे मी आणि तुमच्यापैकी अनेकांनी पाहिले असेल. त्यामुळे माझ्यामते कोणालाही गॉडफादर मानण्यात अर्थ नाही.
त्यामुळे मला तरी असे वाटते की चर्चा करणार्‍यांनी या चर्चेबरोबरच गझल लिहिण्यामध्ये खंड पाडू नये. खंड पडल्यास कदाचित पुन्हा तशी गझल लिहिण्यासाठी पुन्हा वेळ घालवावा लागेल.

असो.

साधारणपणे कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा करण्यासाठी (मत पटले नसल्यास का पटले नाही व आपले मत काय आहे हे स्पष्टपणे व साधेपणाने सांगण्यासाठी ) एक धागा असावा असा मूळ हेतू होता.

येथे कुणी गुरू नाही, कुणी शागीर्द नाही! आपापला प्रवास सांगायचा आहे. शेअर करायचा आहे.

बेफिकीर,

आपला प्रश्न कळला.
अशी माणसे आपल्या दोघांनाही माहीत आहेत. कदाचित इतरांनाही माहित असावीत. जर नसतील तर कोणाचे नाव घेण्यात इथे पॉईंट नाही. मात्र आपण लोकांनी असे करू नये किंवा तशी दक्षता घ्यावी असे सांगण्याचा उद्देश होता.

गझल / गझलियत या संबंधी बोलणारे अनेक आहेत. केवळ इन्फॉर्मेशनच्या आधारे मोठे होणारेही अनेक आहेत. आपण आजुबाजूच्या कवी/गझलकारांकडे पाहिले तर उर्दू साहित्याबाबतीत ते भरभरून बोलतात. त्याचा इतिहासही रोचकपणे सांगतात. मात्र याचा अर्थ ते उत्तम कवी किंवा गझलकार असतातच असे नव्हे.
माहिती असणे आणि प्रत्यक्ष सहभाग असणे यात फरक आहे. मध्यंतरी या बाबतीत खूप ऊहापोह झाला होता. खूप माहिती असणारे आणि आपल्याला हीही माहिती आहे असे सांगणारे खूप आहेत. मलाही असे लोक भेटले. घागर में सागर / गझलियत वगैरे ठराविक शब्द आमच्या अंगावर फेकणारे स्वतः किती पातळ गझला लिहितात हे मी आणि तुमच्यापैकी अनेकांनी पाहिले असेल. त्यामुळे माझ्यामते कोणालाही गॉडफादर मानण्यात अर्थ नाही.
त्यामुळे मला तरी असे वाटते की चर्चा करणार्‍यांनी या चर्चेबरोबरच गझल लिहिण्यामध्ये खंड पाडू नये. खंड पडल्यास कदाचित पुन्हा तशी गझल लिहिण्यासाठी पुन्हा वेळ घालवावा लागेल>>>

हा भरकटलेला प्रतिसाद देण्याआधी एकदा हे वाचा:

१. येथे तरही गझल या उपक्रमामुळे किमान सहा नवीन लोक गझलेकडे वळलेले आहेत. येथे नुसती चर्चा चालत नाही.

२. मी जेव्हा 'मला न पटलेल्या' बाबतीत बोलतो तेव्हा नावे स्पष्टपणे लिहून बोलतो. मला ही असली विधाने व्यक्तीशः आवडत नाहीत. बाकी मर्जी तुमची. जमल्यास खालील व्यक्तींची नावे लिहा:

झल / गझलियत या संबंधी बोलणारे अनेक आहेत. - कोण?

केवळ इन्फॉर्मेशनच्या आधारे मोठे होणारेही अनेक आहेत. - कोण?

आपण आजुबाजूच्या कवी/गझलकारांकडे पाहिले तर उर्दू साहित्याबाबतीत ते भरभरून बोलतात. - कोण?

त्याचा इतिहासही रोचकपणे सांगतात. - कोण?

मात्र याचा अर्थ ते उत्तम कवी किंवा गझलकार असतातच असे नव्हे. - कोण?

. खूप माहिती असणारे आणि आपल्याला हीही माहिती आहे असे सांगणारे खूप आहेत. - कोण?

मलाही असे लोक भेटले. - कोण?

घागर में सागर / गझलियत वगैरे ठराविक शब्द आमच्या अंगावर फेकणारे स्वतः किती पातळ गझला लिहितात हे मी आणि तुमच्यापैकी अनेकांनी पाहिले असेल. - कोण ?

बेफिकीर,
आपण दोघांनी याबाबतीत अनेकवेळा अशा गोष्टींवर मनमोकळी आणि भरपूर चर्चा केली आहे. आणि आपल्याला न पटण्यासारखे पॉईंट्स बर्‍याचदा तेच असायचे. त्यामुळेच तर आपली मैत्री झाली.

बेफिकीर,
नुकतीच आपण येथे प्रकाशित केलेली एक गझल अक्षरगणवृत्तात आहे. पण ती म्हणता येत नाही.

लगेच लिंक द्या.

http://www.maayboli.com/node/23521

ही ती गझल!

गालगागा गालगागा 'ल'गालगागा

यातील 'ल' मुळे लय बिघडत आहे.

ही गझल म्हणता येत नाही.

हं! आता 'म्हणून दाखवणे' हे शक्य असते. जसे मागे कुणीतरी तुमची गझल लयहीन नसल्यामुळे गझल म्हणता येणार नाही असे सांगितल्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटलात तेव्हा त्यांनी स्वतःच ती गझल लयीत म्हणून दाखवली असे तुम्ही मला म्हणाला होतात!

वरील प्रतिसादातील 'ही गझलम्हणता येत नाही' या विधानाचा अर्थ 'ही गझल लयीत म्हणता येत नाही' असा कृपया घेतला जावा!

ही लिंक पहा..>> खरंच! नुसती पहावीच लागली. कारण माझ्या लॅपटॉपला सध्या साउंड नाही आहे.

ऐकवा एकदा!

-'बेफिकीर'!

Pages