गझल चर्चा

Submitted by विजय दिनकर पाटील on 14 February, 2011 - 02:54

नमस्कार मंडळी,

आताशा मायबोलीवर गझलेला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून आणि नवनवीन लोकांना ह्यात येण्याची आवड लक्षात घेऊन बर्‍याच विचारांती हा धागा काढावा असे वाटले(श्री. निशिकांत देशपांडे ह्यांच्या एका गझलेवरील प्रतिसादात श्री. भूषण कटककर(बेफिकीर), डॉ. कैलास गायकवाड, श्री. निशिकांत देशपांडे आणि अस्मादिक ह्यांची एक चर्चा झाली तेथे असा धागा गझल विभागात असावा ह्यावर एकमत झाले)

गझलेचे तंत्र, मंत्र, विषय, सूटी ह्याविषयी बरेच समज/गैरसमज सद्या आपल्यातल्या बर्‍याच लोकांच्या मनात आहेत परंतु ह्या गोष्टींना सप्रमाण सिद्ध्/असिद्ध करू शकतील असे फारच थोडे जाणकार आपल्यात आहेत. ह्या धाग्यांवर अशा सर्व शंकांचा उहापोह झाला तर नवशिक्यांना खूप उपयोगी होईल ते सगळे.

तसेच सद्या प्रकाशित असलेल्या गझलांतील तांत्रीक बाबींवरही ह्या धाग्यावर चर्चा होऊन मतमतांतरे आजमावता येईल.

चला तर मग! गझलेचा काफिला पुढे नेण्यासाठी आपापला खारीचा वाटा उचलायला सज्ज व्हा!!!

गुलमोहर: 

आंतरजालावर धागा उघडायचा की नाही ह्यासाठी अनेक आडाखे असावेत जसे, कुणी लिहीले आहे?, विषय काय आहे?, इ. तिथे थोडी गूढता निर्माण होण्यासाठी छोटी शीर्षके वापरली जात असावीत.

गझलेची जमीन पटकन माहीत व्हावी ही जशी भावना आहे तशीच पटकन अंदाज येऊ नये आणि धागा उघडायलाच लागावा ह्याकरीता संक्षिप्त शीर्षकाचा मार्ग स्वीकारल्या जात असावा कदाचित!

माझ्या मते संपूर्ण मिसरा दिल्यास वाचक धागा उघडायच्या आतच हा शेर कसा असावा ह्याचे आडाखे बांधायला सुरू करत असावा. अर्थात हे चांगले किंवा काय ते नक्की समजत नाही. वाचकाला काय आवडते ह्याचा विचार करायला लागेल. त्यातही मतभिन्नता असेल हे नक्की.

सळ्या गझलांवर हेच दळण दळताय कि. अजून एक गिरणी कशाला काढली ही ? काय ते रदिफ न काफिया अन अमकं अन ढमकं ही गझल आहे का नाही इथपासुनच भांडनं लागतात. करायचंय काय असल्या प्रकाराचं ? आम्हाला चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्या, संदीप खरेच्या कविता इतकं बास आहे. आणि जोडीला गाणी आहेत.

एक शंका - गझल काढणा-याला ड्युआय काढणं आवश्यक असतं का ?

Pages