युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिजलेला रवा अगदी किंचीत गरम पाणी घालून सारखा करा, पातळसर. मग खीरीच्या कन्सिस्टन्सीइतकं दूध घालून आटवा. आवडीप्रमाणे साखर, सुकामेवा, वेलदोडा घाला.

हो तो पाहिला Happy
पण कोणाच प्रमाण १:२, १:३, १:४ असं आहे मला कोणतं घेउ तेच कळत नाही. आणि पोहे घालायचे असल्यास त्याचं किती प्रमाण?

मी १:२ असं उडीद डाळ : इडली रवाचे प्रमाण घेते आणि त्यात मूठभर पोहे/शिळा भात घालते. Happy

कुठलंही लिक्विड ब्लिच (जसं की आला ब्लिच) कापसावर घेऊन त्याने क्रोकरी, कपबशा पुसून घ्यायच्या आणि मग लिक्विड सोपने नेहमीप्रमाणे धुवून टाकायच्या.

जयु कपबशीवरचे चहाचे डाग, मीठाने घासल्यावर जातात. तेलाचे डाग मात्र, नाही घालवता आले मला. आत तेल मुरल्यासारखे दिसतात. तेव्हापासून काळी क्रोकरी वापरतो.

गव्हाच्या पीठात मैदा आहे का हे कसे ओळखायचे? मागच्या महीन्यात नेचरल चे पीठ आणले पण पोळ्या वातड्या होत होत्या. या महीन्यात स्वर्ण चे आणून बघीतले- पोळ्या खुप पान्ढर्या वाट्तात ; बहुतेक मैदा असावा का?

माझ्यामते पांढरट पोळ्या होतात म्हणजे त्यात मैदा असावा. भारतीय दुकानातुन घेतलेल्या बहुतेक सगळ्याच पीठांमध्ये कमीअधिक प्रमाणात मैदा असतो. पोळ्या अगदी ब्राऊन रंगाच्या कधीच होत नाहीत.

मला आशिर्वाद आटाचा चांगला अनुभव आहे इथे. आधी माझ्यापण पोळ्या वातड होत. अर्थात मी आता पोळ्यांचा नाद सोडून फुलकेच करते. पोळ्यांपेक्षा फुलके जास्त वेळ मऊ राहातात असा अनुभव आला. डब्यासाठी तरी फुलकेच. मग रात्रीच्या जेवणात वाटलं तर पोळ्या करते कधीतरी, नाहीतर तेही फुलकेच.

मीरा, माझा 'आशिर्वाद' ह्या ब्रँडचया कणकेचा अनुभव अगदी उत्तम आहे. तो मिळत नसेल तर मग सुजाता वापर.

प्रज्ञा९ची पोस्ट जरा उशीराच पाहिली. तिला अनुमोदन.

बाहेरच्या कणिकेत म्हणजे आटा असं लिहिलेल्या पॅकेटस मध्ये शक्यतो मैदा असतोच. जाहिरातीत दाखवतात ते फुलकेच असतात आणि ते गरम गरम खाल्ले जातील अशी जाहिरातदारांची अपेक्षा असते. मैदा असलेल्या कणिकेत पाणी भरपूर मावते. कणिकेत मैदा आहे की नाही हे ओळखण्यासाठी अजून एक सोप्पा उपाय म्हणजे कणिक मळून झाल्यावर आणि भिजल्यावर (साधारण अर्ध्या तासात) त्याची क्वान्टिटी थोडी वाढल्यासारखी (फुगल्यासारखी) वाटते. दुसरा मार्ग म्हणजे पोळी लाटताना, लाटणं फिरवल्यावर रबरासारखी ताणल्या प्रमाणे दिसून पुर्ववत होते.
आशिर्वाद अन्नपुर्णा सारखे आटे फक्त फुलके करून गरम खायचे असतील तरंच वापरावेत, तरिही विचार करावाच कारण मैदा कमी/अधिक प्रमाणात रोज खाणं आरोग्यास चांगलं नाहीच, त्याने पचनक्रियेवर खूप परिणाम होतो.
त्यापेक्षा सकस, अग्रज सारख्या लोकल कंपन्या ट्राय कराव्यात. काही छोटे मोठे किराणा दुकान चालक सुद्धा कणिक ठेवतात, नविन ट्राय करताना कायम एखादा किलो वापरून मग जास्ती प्रमाणात घ्यावी शक्यतो.

दक्षीणा, हे भारतात करणे शक्य आहे पण इथे उसगावात देसी स्टोरमधे मिळणार्‍या जवळपास सगळ्या पिठांची वर लिहीलेय तशी बोंब असते.

किंग आर्थर ब्रांडचे पूर्ण गव्हाचे पीठ मी मधे कित्येक महीने आणत होते. पण ती कणीक कमीतकमी तासभर भिजवून ठेवावी लागते नाहीतर पोळ्या चामट होतात.

जे मायबोलीकर विकतची कणिक वापरतात आणि मुंबई-नवी मुंबई इथे राहतात त्यांच्यासाठी :

देशपांडे फ्लोर मिल्सची कणिक उत्पादने अतिशय सुंदर आहेत. साधी कणिक (एम. पी. सिहोर), लोकवन गव्हाची कणिक, मेथी मिश्रीत, सोयाबिन मिश्रीत, फुलक्यांसाठी कणिक, भाकरीची पिठे, पराठ्यासाठी कणिक, बेसन इत्यादी बरीच उत्पादने आहेत. त्यांच्या कणकेच्या पोळ्या अतिशय मऊसूत होतात आणि शिळ्या झाल्या तरी तशाच मऊ, सुरेख राहतात हा स्वानुभव आहे. बाहेरपेक्षा थोडी महाग आहेत ही उत्पादने, पण वर्थ आहेत.
त्यांच्या पार्ल्याच्या मुख्य केंद्राचा नंबर - ०२२-२६८२७४७१
इच्छुकांनी इकडे फोन करून आपल्या जवळपासच्या एजंटचा नंबर घ्या आणि संपर्क साधा. बरेचसे एजंट घरपोच माल पोचवतात.

एका मिलचा प्रत्यक्ष अनुभव म्हणून लिहितोय. मिलमधे मैदाच तयार केला जातो (गहू भिजवून ते रोलरमधे प्रेस करतात. आतला जो गर निघतो त्याची कुटून पावडर करतात, तो मैदा, त्याचेच जरा रवाळ मिश्रण केले कि तो रवा) कारण मैद्यालाच जास्त मागणी असते. असा मैदा आधी पांढराशुभ्र नसतो. हवेशी संयोग झाल्यावर तो पांढरा होतो.

वरचे जे टरफल असते त्यापासून ब्रान वेगळे करतात. त्यापैकी काही परत मैद्यात मिसळतात आणि ते मिश्रण आटा म्हणून बाजारात येते. अखंड गहू दळून जसे चक्कीवर पिठ तयार केले जाते, तसे क्वचितच एखाद्या तयार पाकिटात असेल. गहू असे दळल्यावर त्यापासून मैदा करणे शक्य नाही, पण मैद्यापासून जे काही मिश्रण तयार करतात, ते आटा असण्याचा भास मात्र, निर्माण करता येतो.

रवाही वर लिहिले आहे तसाच करतात. गव्हाचा दळून रवा केला तर तो पाण्यात नीट शिजणार नाही (व त्याच्या कुरड्या वगैरे होणार नाहीत.) दलिया मात्र गहू दळून करतात, म्हणून तो शिजायला वेळ लागतो.

ओहो मिनोती Sad मग त्या केसमध्ये फुलकेच बरे तुम्हा लोकांसाठी नाही का? गरम गरम करून वाफ काढून लगेच निट झिपलॉक मध्ये ठेवले तर नरम राहतील थोडे..

@मंजुडी - यांची एखादी शाखा पुण्यात असेल तर विचारून मला विपु करशील का प्लिज?

दक्षिणा, अगं सध्या तरी त्यांनी मुंबई-नवी मुंबईपुरतीच सेवा मर्यादित ठेवली आहे. तरीही वर जो मुख्य शाखेचा नंबर दिलाय तिथे मी फोन करून विचारते आणि तुला सांगते.

मंजू ढण्यवाद Happy
सध्या मी पुण्यात सहस्त्रबुद्धेंची सकसची कणिक वापरते, कधी कधी ती खराब लागते पण एकूण बरी असते.. अगदी नावाजावी अशी नाही. अग्रज वगैरे पण बर्‍या आहेत अगदी आऊटस्टॅंडींग नाही. Sad ऑफिसच्या वेळांमूळे तयार कणिकच बरी पडते.

दक्षिणा पुण्यात अग्रजची सगळी पीठ अतिशय उत्तम असतात. मी गेली १०-१२ वर्षे वापरते. खुपच छान आहेत, नक्की ट्राय कर . फक्त सगळी कडे मिळत नाहीत. टिळकरोडला त्यांचे प्रमुख दुकान आहे. आमच्या इथे देवेशच्या दुकानाजवलही आहे, डहाणुकर कॉलनीतही आहे... नक्की बघ वापरून Happy

मुबंई पुण्यात राहणारे गहु दळुन का नाही आणत. सोप्प पडेल ना?
पार्ल्याच्या ह्या मिलचं नाव मी पण ऐकलं आहे.

निकिता, अगंखात्रीने दरवेळेस चांगला गहू मिळतोच असं नाही. अन आता वर्षाचा गहू साठवणं अन सगळी जिकझिक आता नको वातते Happy
शिवाय थोडाफार हिशोब बदलतो , पण त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, कष्ट अन होणारा संभाव्य त्रास पाहता, नव्या सोई स्विकारायला हरकत नाही वातत मला !

अवल नक्की पहाते वापरून Happy
निकिता.. अगं दळायला जमेल एक वेळ पण त्यासाठी गहू पण आणावे लागतात, ते चांगले वाईट तपासावे लागतात, निवडावे लागतात, त्यासाठी वेळ मिळत नाही. Sad

Happy

मी गहु आणते, चांगले बघुन (star bazzar) मधुन. निवडावे नाही लागत. मग द्ळुन आणते. पण महिन्याचे. वर्षाचे नाही.

निकिता, तुमचा गिरणीवाला त्यात ज्वारी/बाजरी/भाजणी/बेसन इत्यादी पिठे मिसळत नाही??? तू भाग्यवान आहेस Wink

Happy नाही मिसळत. प्रत्येक धान्याची वेळ ठरलेली असते. ज्वारी बाजरी रात्री. गहु सकाळी आणी दुपारी. भाजणी वगैरे असेल तर मीच तांदुळ पण देते आणि तांदळावर दळायला सांगते.

निकिता, तु स्वत: उभं राहून दळण करून घेतेस का? कारण बरेच गिरणीवाले पीठं मारतात Sad त्याचा ही प्रॉब्लेम नाही पण कशावरही काहीही दळतात.. एकदा ज्वारी अशी चिकट झाली होती आमची की बास. त्यापेक्षा विकत पीठ आणलं की वेळ पडली तर त्या माणसाच्या डोक्यावर नेऊन हाणता येतं Proud

गहु उभी राहुन करुन घेते. बाकीचं नाही. अजुन इतका प्रॉब्लेम आला नाही कधी. मला नाही जमंत विकतच पीठ. आत्ता दिनेशदांच पोस्ट वाचुन बिलकुल्च नाही जमणार Sad

Pages