युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त एंजॉय करा. मी पण मेल करतोच आहे.

=========

आता अजून ५०० युक्त्या हव्या आहेत.
मग १७६० युक्त्या होतील इथे.

तळणीच्या उरलेल्या तेलाचे काय करावे?
असे तेल आरोग्यास अहितकारक असल्याने खाण्यात वापरू नये असे म्हणतात.
पण मग काय उपयोग करावा??

माझी आई दिवाळीच्या तळणीचे तेल पणत्यांसाठी वापरून टाकते. पण दिवाळीला अजून पुष्कळ अवकाश आहे आणि पुर्‍या, पापड, इ. चे तळणीचे बरेच तेल शिल्लक आहे.

कृपया इथे उत्तर दिल्यास विपूमध्ये कळवणे.

निंबुडा, घरात लहान मूले असतील तर आणी एरवीही तळणीचे तेल परत तळायला वापरु नये. अगदीच टाकवत नसेल तर ते भाजीच्या फोडणीत वगैरे वापरुन टाकावे.
शक्यतो तळायला जास्त तेल घेऊच नये. घाणा कमी कमी करत ते संपवून टाकावे.
ओमानमधे असे तेल हॉटेलवाल्यांना पण परत वापरता येत नसे. त्यावर कायद्यानेच बंदी होती.

कृपया तळणीचे तेल भाजीच्या फोडणीत वापरू नये. अगदीच टाकवत नसेल तर पोळ्यांच्या घडीमध्ये लावायला वापरा पण शक्यतो नकोच. पुन्हा गरम तर (फोडणीसाठीसुद्धा करू) नका.

इथे अजून माहिती पाहा.

http://whatscookingamerica.net/Q-A/CookingOil.htm

शूम्पी छान आहे आयडिया.. Happy
आवांतर - देव कशाला ही नाही म्हणत नाही. सर्व आपले समज असतात.. Sad
माझ्या एक नातेवाईक आहेत, भयंकर देव्-देव करतात... घरी तूप कढवलं की अख्खी बरणी देवाजवळ, ठराविक कालावधी पर्यंत जर का ते दिव्यात घालून संपलं नाही तर उरलेलं खवट तूप कुटुंबियांना खायला देतात की देवाला पुन्हा ताजं... Sad

मी तर तळणीच तेल समईत घालते. >>>
हेच मीही वर म्हटलंय की माझी आई पणत्यासांठी वगैरे वापरून टाकते. त्याच धर्तीवर मीही संध्याकाळी देवापुढे दिवा लावताना तेलाची वात लावते तेव्हा असे तेल (जे वेगळ्या तेलाच्या कावळ्यात भरून ठेवलेले असते) वापरते. पण ते फक्त शनि-रविच. कारण वीकडेज मध्ये दिवेलागणी पर्यंत मी घरीच पोचलेली नसते. सकाळी तूपाचे निरांजन असते.

पण त्यामुळे होतं काय की तळणीचं तेल आपलं वाढतंय पण वापर तितका नाही. म्हणून इथे विचारतेय की या व्यतिरिक्त काही उपयोग करता येईल का ते.

मी दैनंदिन तळण्यासाठी लोखंडी लहान कढई घेतली आहे. मोठ्या कढईत फक्त दिवाळीचे तळण होते.
किती वस्तु तळायच्या या अंदाजानेच तेल घेते. एकदा तळायला घेतले की त्यात परत तेल ओतत नाही. आणि तळण झाले की उरलेले तेल सरळ फेकुन देते. आपण हॉटेल, कपडे इ. गोष्टीत गरज नसतानाही केवळ आपल्याला आवडते म्हणुन पैसे खर्च करतो. तसाच विचार करुन आरोग्याला चांगले नाही म्हणुन एकदा तळलेले तेल फेकुन द्यायचे. तिथे तेल वाया जाते वगैरे विचार करु नयेत. ते वाचवलेले पैसे कालांतराने डॉक्टराची धन होतात.

शास्त्र काय सांगते ह्या पुस्तकात देवापुढे दिवा लावण्यामागचे कारण दिलेय आणि दिव्यात गाईचे तुप वापरावे असे सांगितलेय कारण त्यामुळे घरात आवश्यक असे चांगले वातावरण निर्माण होते. (इती पुस्तक, माझे या विषयावर काहीही मत नाही). दिवा लावल्याने काय चांगले किंवा वाईट होणार हा आहे खरेतर श्रद्धेचा प्रश्न. पण मग श्रद्धापुर्वक दिवा लावायचाच तर तो उरलेल्या तेलाचा कशाला?? जी गोष्ट आपल्याला नको ती देवाला का वाहा??

निंबुडा, समईखेरीज शोभेचा तेलाचा दिवाही करता येईल अशा तेलापासून.
लागणारे साहित्य : खडे मीठ (रॉक सॉल्ट), जाड काचेचा हव्या त्या रंगाचा / आकाराचा पेला, तळण करून उरलेले व गाळलेले तेल, कापूस व जरा जाड काडी (वातीसाठी)
काचेच्या पेल्यात खडेमीठ दाबून बसवावे. त्यात गाळलेले तळण करून उरलेले तेल घालावे. तेलाची पातळी मीठाच्या पातळीपेक्षा जास्त हवी. काडीच्या एका बाजूला कापूस वळून नीट गुंडाळावा. हा कापूस गुंडाळलेला भाग पेल्यात खुपसून त्याला सर्व बाजूंनी तेल लागल्याची खात्री करावी. मग कापूस न गुंडाळलेला भाग पेल्याच्या बरोबर मध्यभागी खोचावा, ज्यामुळे वातीचा भाग वर राहील.
मी ह्याची व्हिडियो पाहिली आहे. कधी केलेले नाही. पण अवघड वाटत नाहीए. लिंक आहे : http://www.metacafe.com/watch/1698881/recycle_used_cooking_oil_lamp/

कांद्याची मोठी पिशवी घेतली आहे, तरी हे कांदे महीनाभर कसे टिकवावे हे कोणी सांगेल का? एक उपाय ऐकला तो कांदे कॅरॅमलाईझ करुन फ्रिझ करायचा. या शिवाय काही उपाय आहे का?>>
कांदे ड्राय ठिकाणी पसरुन ठेवले तर त्याला महीनोंन महिने कहीपण होत नाही ना?

तळणिच्या तेलाचे काय करावे, हा विचार करून मी दिवाळीशिवाय एरव्ही कधीच तळण्याचे बेत काढत नाही. फार फार तर शॅलो फ्राय.

After frying, immediately put mustard seeds and season it. Put it in a jar and use it. When making vegetables/ or any thing, heat the pan put required amount add turmeric, cumin ect…..

I always have a jar full of (Phodani) ready, easy and quick.

रिमा,
कांदे ओले असतील तर ताबडतोब कडक उन्हात पसरून नीट वाळवून घे,
नाहीतर त्याला कोंब येतात, आणि आतून सडतात.. शक्यतो खुल्या हवेत स्टोअर कर.. पोत्यात बंद असतील तर सोडव आणि पसरवून ठेव... (उन्हात वाळवल्यानंतर सुद्धा)

कणिक भिजिवताना ते तेल वापरले तर? माझ्याकडे ही चिकन ६५ साठी वापरलेले तेल कश्यातच वापरता येत नाही. व्हेज पदार्थात वास येतो. देवाला उदबत्ती रोज . व तुपाचे नीरांजन शनिवारी.
एक कढई तळणीची आहे पण त्यात दोन डावच्यावर तेल नसते. सफोला तेल आमचे - दिल का दोस्त.

तळणीचे तेल फेकून द्यायचे असेल तर ते कधीही सिंक मधे ओतून देऊ नका. पाइप्स, ड्रेनेज सिस्टीम वर त्याचा विपरित परिणाम होतो. रद्दी कागदात सोक करून ते कागद टाकून द्या. इथे काही काऊंटीमधे वेस्ट व्हेज ऑइल साठि कलेक्षन सेंटर्स असतात - फार जास्त तेल असेल तर तिथे नेऊन देता येईल .

मी सुरळीच्या वड्या केल्या तेव्हा वरून द्यायची फोडणी जरा जास्त प्रमाणात झाली. उरलेल्या फोडणीचा पुन्हा वापर करू का? म्हणजे गरम करून वगैरे नाहे, तशीच गार फोडणी, कोशिंबीर केल्यावर किंवा दहीबुत्ती केल्यावर वरून घालायला?
आदल्या रात्री केल्या वड्या, आणि दुसर्‍या दिवशी रात्रीच्या जेवणात को. किंवा दहीबुत्तीमधे ती उरलेली फोडणी घालू का?
लगेच घातली असती, पण वड्या करून घेऊन जायच्या होत्या. आणि रात्री जेवायला घरी नव्हते मी.

मेधा, खर की काय? बर झालं सांगितलसं. मी तेच करते. कलेक्शन सेंटरची चौकशी केली पाहिजे.

प्रज्ञा, हो वापर अशी फोडणी पुन्हा गरम करणार नसशील तर.

कांदे ड्राय ठिकाणी पसरुन ठेवले तर त्याला महीनोंन महिने कहीपण होत नाही ना? >>> काहीपण होत नाही, पात येते फक्त Proud

मी शक्यतो तळण करणंच टाळते. म्हणजे तळकट खायला आवडतं पण तेलाचा पसारा नको वाटतो. पण कधी तेल उरलंच तर मेधाने सांगितल्याप्रमाणे झिपलॉक बॅग किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यात ते ओतून ते शोषले जाईपर्यंत कागद घालते आणि कचर्‍यात टाकते. ड्रेन अजिबातच करु नये. इथल्या कुकिंग शोजमध्ये ते गाळून परत स्वयंपाकात वापरले तर चालते असं सांगतात पण त्यात ट्रान्स फॅट्स निर्माण होतात असं वाचल्याने तसं करणं पटत नाही.
दिव्यात किंवा समईत वापरणंही पटलं नाही. त्यातली विषद्रव्यं हवेत सोडली जातीलच असं वाटलं. सुगंधी कँड्ल्सचा वास येतो ह्यावरुन कल्पना करा. माझा समज चुकीचा असेल तर सांगा प्लीज.

आमच्या काऊंटी मध्ये तेल सिंक मध्ये ओतायला परवानगी नाही. (एक प्रकारचा गुन्हाच समजला जातो.)
ड्रेनेज पाइप्स तर ब्लॉक होउ शकतातच , पण तेलामुळ कचरा विघटीत करणारे जीवाणु मरतात. आणि ते पर्यावरणाला अत्यंत हानिकारक आहे . थँक्स गिव्हिंग च्या दुसर्‍या दिवशी तर खास वापरलेले तेल गोळा करण्यासाठी गाडी पाठवितात. इतरवेळी कलेक्शन सेंटर मध्ये द्यायला सांगतात.
तसच पेंट , केमिक्ल्स च पण रिसायकल करण कंपल्सरी आहे आमच्याकडे.

मी इतके दिवस तेल असलेल्या कढईत भरपूर लिक्विड सोप घालून वर गरम पाणी सोडून सिंकमधेच टाकत आलेय Sad आता चौकशी करते कलेक्शन सेंटरची.

कलेक्शन सेंटर किंवा रिसायकलिंगची सोय नसेल तर दह्याच्या रिकाम्या डब्यात तळणीचे तेल घालुन ,डबा झिपलॉकच्या पिशवीत घालुन ट्रॅश मध्ये टाका. पण कोणत्याही परिस्थितीत सिंक मध्ये ओतु नका.

मला माहित नव्हते तळलेले तेल सिंक मध्ये टाकायचे नाही ते. माझ्याकडे वर्षातून एकदा फारतर दोनदा तळण होते पण तरीही ही चूक व्हायला नको. रीसायकलींगचे फ्लायर्स देतात त्यात कुठेच ही माहिती मी कधी दिलेली बघीतली नाही.

मी एकदा वापरलेले तळणीचे तेल जुन्या रिकाम्या तेलाच्या बाटलीत ओतून ठेवते. ते सोपे जावे म्हणून खास एक नरसाळे ठेवले आहे. बाटली भरली की ती बाकी कचर्‍यासोबत फेकते. हे करणे कितपत योग्य आहे, ते माहित नाही, पण समजा पेपरमधे तेल शोषले तर ते पेपर्स रिसायकलींगसाठी वापरले जातात की नाही हे माहित नाही आणि उगीच पेपरचा अपव्यय कशासाठी म्हणून हा उपाय करते. बरोबर आहे का? ते कुणी सांगा मला.

मला उलट असं ट्रॅश मध्ये टाकायला भीती वाटायची म्हणून सिंडरेला म्हणते तसचं मी सिंक मध्ये ओतून द्यायची. चालतं का तेल ट्रॅश बिन मध्ये टाकलेलं?

दिव्यात किंवा समईत वापरणंही पटलं नाही. त्यातली विषद्रव्यं हवेत सोडली जातीलच असं वाटलं. सुगंधी कँड्ल्सचा वास येतो ह्यावरुन कल्पना करा.>>> अनुमोदन.

माझंही तळण फार क्वचीत असतं. मी घेतानाच अगदी थोडं घेते, उरलेलं कणिक भिजवताना वापरते (हे पण कितपत बरोबर माहीत नाही.)

अनुमानः तळणाचं उरलेलं तेल फेकून द्यावं. सिंकमध्ये फेकू नये.

आता नवी चर्चा करुयात.

सिंडरेला, पण एक प्रश्न अनुत्तरीत आहेच! पर्यावरण सुरक्षित ठेवून उरलेल्या तेलाची योग्य विल्हेवाट कशी लावायची...

Pages