युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, किति दिवस मला पडलेला बालिश प्रश्न्न होता, कि बुवा मैदा नक्कि कशाचा बनवतात? मग जर का तो गव्हापासुनच बनवत असतिल तर तो वाईट का? ( २रा बालिश प्रश्न्न?)

दिनेशदा, जर तुम्ही सांगीतल्या प्रमाणे मैदा / रवा बनवतात तर रवा पण अपायकारक आहे का? माझा मुलगा सकाळी सकाळी रव्या ची खीर खातोये जवळ जवळ ६ महीने झाले अगदी रोज. ते चांगले नाही का मग? की बंद करावी?

पोळ्यांची कणिक भिजवताना पाण्यात कणिक टाकत भिजवावी, कणिक छान / पटकन भिजते व पोळ्या मऊ होतात. सरावाने हे मस्त जमते, फक्त आधीच्या पिढिच्या हे पचनी पडत नाही. माझी आई तर सॉलीड वैतागते. साबांना पण कळत नाही माझा अंदाज कसा बरोबर येतो पाण्याचा ते Proud

आधी ही चर्चा झाली होती. पण भिजवलेली कणीक डब्यात ठेवली आणि डब्यात हवा असली तर ती काळी पडेलच. त्यापेक्षा ती काळ्या पॉलिथीन मधे गुंडाळून ठेवली तर नाही काळी पडणार. पण तरीही दोन / तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नयेच.

बाजारी रवा आणि मैदा यात भरपूर प्रथिने आणि ग्लूटेन असते. अभाव असतो तो फायबरचा. त्यामुळे या दोन्ही पदार्थांचा भाज्यांशी संयोग करुन खाणे चांगले. पण तेलात वा तूपात तळणे, अतिरिक्त साखर वगैरे टाळावी.
पाव व केक नीट फूगायला मैदा वापरावाच लागतो. होल मील पिठ वापरुन ते हलके होत नाहीत.

माझी ताई कणिक ऐनवेळी मळते, आणि त्यात आदल्या दिवशीचं उरलेलं दूध घालते.. आणि मग वरून लागेल तेव्हढं पाणी. मऊसूत म्हणजे आहाहा! Happy

मावे मधे शेंगदाणे कसे भाजायचे? मी नॉर्मल सेटिंगवर मधे मधे हलवत थोडे भाजले, पण जमले नाहीत.

आर्च, शेंगदाणे भाजताना काय सेटिंग हवं? की नॉर्मल वर भाजायचे? साधारण किती वेळ लागतो?
खरंतर कसे भाजायचे हेच माहिती नाहिये Sad

प्रज्ञा९ यांना नॉर्मल प्रतिसाद-

>>मधे मधे हलवत थोडे भाजले, पण जमले नाहीत.
म्हणजे काय झाले? कमी भाजले गेले का? मग अजून भाजायचे!

>>काय सेटिंग हवं? की नॉर्मल वर भाजायचे? साधारण किती वेळ लागतो?
>>खरंतर कसे भाजायचे हेच माहिती नाहिये
'पॉपकॉर्न' सेटिन्गवर मी कधी भाजले नाही. किती वेळ लागतो ते पॉवरवर आणि शेन्गदाणे किती आहेत त्यावर अवलंबून आहे!
आणि कसे भाजायचे म्हणजे?? मावेमध्ये सगळ्या गोष्टी एकाच पद्धतीने भाजतात. मावेबल भांड्यात घेऊन ते भांडे मावेत ठेवून मावे सुरु करायचा. कळले?

Light 1
-------

१० आकडे मोजून प्रतिसाद-

कमी भाजले गेले असतील तर जास्त वेळ ठेवून बघा. पसरट भांड्यात किंवा प्लेटमध्ये बरे. वेगळे सेटिन्ग लागत नाही. १-१ मिनिट ठेवून मध्ये हलवावेत. किती वेळ लागेल ते नक्की खात्रीलायक सांगता येणार नाही पण भाजले जाईपर्यंत एकदा केले की तुम्हालाच अंदाज येईल.

चला एकदाच्या पोळ्या झाल्या तर... आता शेंगदाणे भाजायला घेतले. अशानी स्वयंपाक होणार कधी? Happy

माझ्याकडचं पोळ्या करणारं यंत्रच शेंगदाणे पण भाजतं. पोळ्या, भाजलेले शेंगदाणे दोन्ही उत्तम असतात. इच्छुकांनी येऊन खात्री करून घ्यावी. पाहिजे असल्यास ट्रेनिंग दिले जाईल. Happy

मावेमध्ये सगळ्या गोष्टी एकाच पद्धतीने भाजतात. मावेबल भांड्यात घेऊन ते भांडे मावेत ठेवून मावे सुरु करायचा. >>>> Biggrin आणि भांड्यात मावतील एवढे!

प्रज्ञा९, शेंगदाणे मावेत भाजताना मावे सेफ प्लेट मधे पसरुन ठेवायचे.. एकाच लेयरमधे..१ मिनीटाच्या इंटरवल्स मधे भाजायचे. मधे मधे थोडे शेंगदाणे चमच्याने हलवायचे म्हणजे सगळीकडुन नीट भाजले जातात. मी शेंगदाण्यावर एक किचन पेपर टाकते म्हणजे एकदम जास्त हीट लागुन करपत नाहीत.

मी एक पाऊंड शेंगदाणे एका काचेच्या मायक्रोवेव्ह प्लेटमध्ये घेते त्याला पाणी लावून ओले करते. त्यावर मायक्रोवेव्ह कव्हर ठेवते. (हे कव्हर प्लास्टीकच असत आणि त्याला बाजूने भोकं असतात) आणि ३ मिनिटं ठेवते. त्यानंतर काढून हलवून १ मिनिट ठेवते. परत हलवून १ मिनीट.आणि झाले नसले भाजून तर ३० सेकंद असं करत जाते. प्लेटमध्ये एका लेअरमध्ये दाणे नसतात.

ओक्के!! Happy

आता मी हे सगळं करून बघते.
झालं काय, की मी असं एकएक मिनिट करून बघितलं, पण ५-६ मिनिटं झाली तरी काहीच फरक दिसला नाही दाण्यांत. थोडेतरी भाजले जायला हवे होते ना..पण नाही भाजले गेले. मग पॉपकॉर्न सेटिंग ठेवून बघितलं, पण उगिच जळायला लागले तर काय घ्या! या भितीने फार वेळ ठेवले नाहीत.
शंका आली की लगेच बाहेर काढणे हा उपाय आहेच, पण या वेळी आणलेले दाणे पटकन जळणार्‍या प्रकारात होते. (कसे कोण जाणे! Sad ) गॅसवर भाजताना पण खूपच लक्ष ठेवून भाजत होते मी.
तर...असो!!

पुन्हा एकदा सगळ्यांना ठांकू!

पण ५-६ मिनिटं झाली तरी काहीच फरक दिसला नाही दाण्यांत >>>>
प्रज्ञा दाणे मायक्रोवेव्हमधे भाजतांना फरक 'दिसत' नाही. बरेचदा दाण्याचा रंग तव्यावर भाजतो तसा गडद, डाग पडलेला येत नाही. चव बघा म्हणजे कळेल भाजले गेलेत की नाही ते. जेव्हा रंगात खूप फरक पडलेला दिसतो तेव्हा ते बरेचदा जळालेले असतात. Happy

जेव्हा रंगात खूप फरक पडलेला दिसतो तेव्हा ते बरेचदा जळालेले असतात.
ओह! हे मला खरंच माहीत नव्हतं. आता लक्षात ठेवेन. थँक्स रूनी!

मला समजत नाहिये, कोणी सभासदानी लिहिताना किन्वा माहिती विचारताना काही चुक केल्यास (किन्वा अज्ञानामुळे एखादि चुक झाल्यास)एवढे टोचून किन्वा उपहासाने का उत्तरे दिली जातात. जे लोक already खुप शहाणे आहेत (असे ते समजतात )ते अश्या वेळी थोडी सहानुभूती का नाही दा़खवू शकत ? मायबोली वर तुसडेपणा न दाखवता प्रेमाने व समजुतिने बोलायला मनाई नाहिये ना.

मला समजत नाहिये, कोणी सभासदानी लिहिताना किन्वा माहिती विचारताना काही चुक केल्यास (किन्वा अज्ञानामुळे एखादि चुक झाल्यास)एवढे टोचून किन्वा उपहासाने का उत्तरे दिली जातात. जे लोक already खुप शहाणे आहेत (असे ते समजतात )ते अश्या वेळी थोडी सहानुभूती का नाही दा़खवू शकत ? मायबोली वर तुसडेपणा न दाखवता प्रेमाने व समजुतिने बोलायला मनाई नाहिये ना.

रूनी ला अनुमोदन.. Happy
मला मावे चा अजिबात अनुभव नाही... एकदा काकूच्या घरी आईस्क्रिमवर घालायला मला चॉकलेट सॉस हवं होतं, नविन आणण्याऐवजी तिने २-३ कॅडबर्‍या मोडून मावेत ठेवल्या... आणि वेळ झाल्यावर काढल्या.. मी म्हणलं ए वड्या घालून नाही खायचंय मला आईस्क्रिम.. तिने बोल बाहेर काढून चमच्याने हलवलं तर ते पातळ झालं, पण 'दिसत' वडी सारखंच होतं... Uhoh त्यामूळे..
मावेत जसं 'दिसतं' तसं नसतं Proud

>>>>जे लोक already खुप शहाणे आहेत (असे ते समजतात )ते अश्या वेळी थोडी सहानुभूती का नाही दा़खवू शकत ? मायबोली वर तुसडेपणा न दाखवता प्रेमाने व समजुतिने बोलायला मनाई नाहिये ना.<<

सुमेधाताई, अहो काहिंना स्वतःला जरा ज्यास्त येते व कळतं हे दाखवायचे असते ते कसे दाखवणार.. किंवा मी बाई खूप हुशार असे दाखवण्याच्या नादात ते तसे होते. ते मुद्दमहून नसते हो. Wink

<<<आधी ही चर्चा झाली होती. पण भिजवलेली कणीक डब्यात ठेवली आणि डब्यात हवा असली तर ती काळी पडेलच. त्यापेक्षा ती काळ्या पॉलिथीन मधे गुंडाळून ठेवली तर नाही काळी पडणार.>>>> सॉरी पुन्हा चर्चा पिठाकडे.
पण काळ्या पॉलिथिन पिशव्या वापरू नका. सर्वात खराब क्वालिटीच्या प्लॅस्टीकने या पिशव्या बनवलेल्या (भारतातल्यातरी) असतात. त्या रिसायकल होत नाहीत आणि विषद्रव्ये जास्त असतात. या काळ्या पिशव्यांमधे कुठलेही खाद्यपदार्थ ठेवु नका. खरतर कुठल्याच साध्या पिशव्यामधे फार काळ ठेवू नयेत. पण फूड ग्रेड पिशव्या, झिप लॉक्स चालतील. प्लॅस्टीकचे डबे सुद्धा खुप जुने झाले, चरा पडल्या, पिवळे झाले की खाद्यपदार्थ ठेवायला वापरू नका. प्लॅटीक मधली हानीकारक द्रव्ये खाण्यात उतरतात.
आता पिठासाठी - पिठ अ‍ॅल्युमिनीयम रॅप मधे सुद्धा गुंडाळून , मग डब्यात ठेवता येतं.

सुमेधव >>> हे कोणी टोचून बोलत नाहीये हो. असच इनोदानं चाल्लय. आणि प्रज्ञा९ ने पण तसंच स्पोर्टिंगली घेतलय.

प्रज्ञा९, मावे बरोबर एक पसरट भांडे मिळते त्यात दाणे पसरून ठेवायचे. मग १.४० मिनिट ऑन करायचे. पहिले काही वेळा काही फरक दिसणार नाही पण ३ ४- वेळा केल्यावर म्हणजे १.४० १.४० १.०४ असे तीनदा चारदा केल्यावर दाणे आतूनच एका इवन प्रमाणात हलके बदामी रंगाचे होतील. मग ३० सेकंदाने करायचे असे केले कि साले सूटू लागतील कि झाले गार झाले की साले काढा. सर्व दाणे एकसारखे ब्राउनिश होतील. पण एकावेळी ५ - ७ मिनिटे एकदम ठेऊ नका. मध्ये मध्ये लाकडी चमच्याने ते फिरवा. हात भाजू शकतो.

चॉकोलेट पण एकदम १.४ मिन. केले तर खराब होते. ३० ३० सेकंदाच्या प्रमाणात गरम करावे.

प्रज्ञा मावे मधे दाणे भाजताना दर थोड्या वेळाने चव घेऊन पाहिले तरी दाणा परफेक्ट भाजला गेलाय का हे बरेचदा कळत नाही. दाणे थोडे गार होऊ द्यावे म्हणजे अंदाज घेता येतो. प्रत्येकाच्या मावेचं सेटिंग आणी पॉवर वेगळी त्यामुळे थोड्या प्रयत्नां नंतरच परफेक्शन येईल. हल्ली ईंडियन ग्रोसरी मधे साले काढलेलेच दाणे मिळतात. ते भाजताना जरा काळजी घ्यावी लागते कारण ते फार लवकर करपतात. पण सालं काढायचे कष्ट वाचतात.

दुसर्यान्च्या चुका दाखवुन त्यावर इनोद करण्यापेक्शा, उत्तम विनोद करण्याचि प्रतिभा असलेल्यान्नी विनोदि लेखन बाफ वर उत्तम ले़ख द्यावेत. आम्ही ते आनन्दाने वाचु.

Pages